बोलत होता मोबाईलवर
आरे त्या देवळात करुंन र्ह्यायलाय? इकडे माझ्याकडे सिग्नलवर ये. लई ट्रापीक आसतीया. काय नाय, गाडीला कपडा मारायचा आन हात पुढं करायचा, १०-२० ची नोट मिळती बघ लगेच.
- सिग्नलवरचा एक भिकारी दुसर्याला सांगत होता मोबाईलवर.
"हाँ, शाम को दुकानपे आता हूं, कल के भंगार का पैसा तैयार रखना", असे भंगारवाला हातगाडी चालवता चालवता बोलत होता मोबाईलवर.
आर ए मारुत्या, त्या खालच्या शिमीटाच्या गोण्या निट वरती लाव आन त्या बल्या आन फाळके निट रचून ठेव. आन कायरे भाडखाऊ, सेंट्रींग प्लेटांना लावायला ऑयल आनल नाय का रे, तुझ्यायला?
- सुदाम मुकादम बोलत होता त्याच्या मोबाईलवर.
अरे, कॉलेजमध्ये नको, त्याच्या समोरच्या आइस्क्रीमच्या शॉप मध्येच येना. तेथे वरती गर्दी पण नसते काही. चल हट, मागच्या वेळेसारखं काही करायच नाही हं, चल ठेवते, बाय!
-शिल्पा आपल्या मित्राला सांगत होती मोबाईलवर.
अरे, काय क्लिनीकमध्येच आहेस ना? मी बाफणा नावाच्या पेशंटला पाठवतो आहे तुझ्याकडे. हं, टाईप २ डायबेटीक विथ लेफ्ट व्हेंन्ट्रीक्यूलर हायपर्ट्रूफी. जरा बघून घे. हो.. हो... बिजनेसमन आहेत. अन तुझी नवीन जागा कशी आहे? माझे काय रे, सध्या सिझन चालू आहे. रविवारी बसू सगळे. चल बाय.
- डॉ. गोगटे डॉ. शहांशी बोलत होते मोबाईलवर.
भाऊराव, ३ वाजत आले, आता तरी माघार घ्या. नाय बंडखोरी आम्हीपन केली आसती हो, पन आम्ही तुमचं सगळं सांभाळून घेवू. महामंडळाच अध्यक्षपद देवू. चला आता कलेक्टर हापिसात या आन माघारी अर्जावर सह्या करा.
- पक्षाचे अधिकृत उमेदवार बंडखोर भाऊरावांना सांगत होते मोबाईलवर.
आरे गेनू, लवकर ये बाबा. २ पोती जास्त आन शिंच्या. आज लोकांनी जास्त नारळ अन फुलांच्या माळा वाहील्यात देवीला. येतांना मागच्या दाराने ये अन हो पैसे पण घेवून ये हो.
देवीचे पुजारी मंदीराबाहेरच्या गेनू दुकानदाराला सांगत होते मोबाईलवर.
ए आई, आता तू जास्त काम करत जावू नको. बाबांना घरीच रहायला सांगत जा. प्रकृतीची काळजी घेत जा. मी पैसे पाठवतोच आहे. तुझी सुनबाई मजेत आहे येथे. धर आता तुझ्या नातवाशी फोनवर बोल.
- एनआरआय आयटीतला मुलगा आपल्या भारतातल्या आईशी बोलत होता मोबाईलवर.
प्रतिक्रिया
1 Oct 2009 - 9:02 am | मिसळभोक्ता
मोबाईल हे एक माध्यम आहे. प्रत्यक्षातही अशाच अनेक भावना व्यक्त होतात, होऊ शकतात.
पण तरी, आवडले.
-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)
1 Oct 2009 - 9:03 am | दशानन
तुम्हाला काय म्हणायचे आहे तेच कळाले नाही...
राजे मोबाईलवर..
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
1 Oct 2009 - 9:10 am | टारझन
आणि हो , माझा लेख वाचा आणि प्रतिक्रिया द्या ! मी अतिशय मनापासून लिहीले आहे. अतिशय माहितीपुर्ण लेख आहे , तुम्हाला नक्की आवडेल.
-कुठलेसे दादा कुठल्यातरी बकर्याला आपल्या लेखावर प्रतिक्रिया पाडायला सांगत होते मोबाईलवर
अरे टार्या ,,,, कुठपर्यंत आला आहेस ? अच्छा .. ठाण्यात उतरलास का ? आता लुईस नगर विचार ... ल... लंडन चा लं .. लुईस नगर विचारा .. हो ,, आलास की पुन्हा फोन कर
- पहिल्यांदाच ठाण्याला येणार्या टारझनला मास्तर स्वत:च्या घरचा रस्ता मोबाईलवर सांगत होते.
-(शिल्पाचा चावट मित्र) टारझन
1 Oct 2009 - 9:22 am | दशानन
>>पहिल्यांदाच ठाण्याला येणार्या टारझनला मास्तर स्वत:च्या घरचा रस्ता मोबाईलवर सांगत होते.
=))
=))
=))
त्याचवेळी कळाले म्हातारा हिरवट आहे =))
***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "
राज दरबार.....
1 Oct 2009 - 10:39 am | पाषाणभेद
हेच अगदी असेच मी ड्राफ्ट मध्ये लिहीले आहे. पण नंतर विचार केला अन काढून टाकले.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
1 Oct 2009 - 9:26 am | चतुरंग
काही लोक सतत कानाला मोबाईल किंवा नीलदंत लावून असतात आणि सतत बोलत असतात. पण हे वरचे संवाद एकदम मस्त वाटले. :)
(सेल्यूलर)चतुरंग
1 Oct 2009 - 10:52 am | विजुभाऊ
काही लोक सतत कानाला मोबाईल किंवा नीलदंत लावून असतात आणि सतत बोलत असतात. पण हे वरचे संवाद एकदम मस्त वाटले.
(सेल्यूलर)चतुरंग
चश्मा नसल्यामुळे वाचनात थोड्या चुका झाल्या नीलदंत हे नीलकांत असे वाचले गेले.
सेल्यूलर हे सेक्यूलर असे वाचले गेले ;)
1 Oct 2009 - 10:59 am | चतुरंग
'योग्य चष्मे' घातले की काही प्रश्न येत नाही, नाहीतर काँटॅक्टलेन्स लावा म्हणजे अशा सेक्यूलर चुका होणार नाहीत! ;)
चतुरंग
1 Oct 2009 - 9:36 am | अजय भागवत
संकल्पना चांगली. आवडला लेख.
1 Oct 2009 - 9:47 am | शाहरुख
अॅज फार अॅज माय मेमरी गोज, वुई हॅव इंप्लिमेंटेड दॅट फंक्शनॅलॅटी !!
- एक हतबल सॉफ्टवेअर डेव्हलपर कॉन्फरन्स कॉल वर
येस माईक, वुई कॅन डू इट इन २ विक्स !!
- ग्राहकाला हांजी हांजी करणारा एक मॅनेजर
2 Oct 2009 - 7:20 pm | शक्तिमान
लेख मस्तच... आणि किंग खान ची प्रतिक्रियाही!
1 Oct 2009 - 9:53 am | चिरोटा
लेख आवडला.आर्थिक विषमता संवादातून दाखवण्याची कल्पना आवडली.
भेंडी
क्ष्^न + य्^न = झ्^न
1 Oct 2009 - 10:41 am | पाषाणभेद
आणि भावनीक विषमतेतही संवाद कसे होतात हे पण पहा.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
1 Oct 2009 - 10:56 am | अवलिया
वा ! मस्त !!
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
2 Oct 2009 - 2:38 am | धनंजय
वेगळाच आणि गमतीदार प्रयोग आवडला.
2 Oct 2009 - 6:49 am | सहज
मोबाईलवर मारा शिक्का!!
2 Oct 2009 - 7:49 am | पाषाणभेद
कोण हा मार्टी कूपर? मोबाईलचा शोध त्याने लावला का?
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
=============================
वरचा प्रश्न आम्हास पडलेला असतांनाच आम्ही तो पोस्टावला, लगेचच सहजरावांनी "हुशार आहेस रे बांकेबाबू!" असे मला ख.व.त सांगितले. म्हणून नविन प्रतिक्रीया न लिहीता व धागा वर न आणता यातच लिहीतो:-
पहले हमें शंका हूयी के शायद मारटी कुपरनेही मोबाईलवा का खोज किया रहेगा तभी वरना मिपा के लोग इतने सहज नहीं बोलत रहत | बहूत ही होशियार लोगबाग है यहाँ के|
हमने तुरंत गुगलवा पे सरच मारा तो हमे पता चला के मारटी कुपरनेही मोबाईलवा का खोज किया है|
- पासानभेद बांकेबिहारी
(बडे बाबू,
तहसिल कार्यालय,
गुडगूडी, ता. रामनगर, जि. पस्चिम चंपारन, बिहार)