स्वाईन फ्लू चे विषाणू नाकातोंडाला मास्क लावल्यास आपल्या शरीरात जात नाहीत हे आता आपल्या सरावाचे झाले असेल. त्या बरोबरच हातही धूतले पाहिजे म्हणा.
पण जर कमीतकमी माणसांनी जर त्यांना उगवणारी मिशी काढली नाही व नाकातले केस तसेच वाढू दिले तर मला वाटते की स्वाईन फ्लू चे विषाणू "ह्या" केसांच्या नैसर्गीक गाळणीत अडकून पडतील. वारंवार नाक तोंड साफ करावे हा सल्ला तर डॉक्टर देतच असतात. त्या साफसफाईत मिशी पण साफ होते. म्हणजे महागाचा मास्क किंवा अडणीचा रुमाल वापरावा लागणार नाही.
हां, आता लहान मुले, महीलावर्गाची यात कुचंबणा होणार, पण निसर्गापूढे कोणाला जाता येते का?
दुर्देवाने या साथीत ज्यांचे म्रुत्यू झाले आहेत त्यांच्या व त्यांच्या कुटूंबियांबद्दल सहानुभूती बाळगून मी म्हणतो की त्यांच्या (माणसांच्या) शारीरीक (मिशी) ठेवण्याबाबत जर काही संख्याशास्त्रीय डाटा उपलब्ध केला गेला तर मला वाटते की या माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आढळेल.
मी हसण्यासाठी म्हणत नाही.
आपल्याला काय वाटते?
प्रतिक्रिया
28 Aug 2009 - 9:08 am | नीधप
कैक वर्षांपूर्वी संध्यानंद मधे 'दाढी मिशी ठेवणार्यांचे आरोग्य धोक्यात' अशी बातमी वाचली होती. दाढी मिशी मुळे संपूर्ण तोंड साफ धुतले जात नाही आणि त्या केसांवर विषाणू, जीवाणू वाढतात ते श्वासावाटे शरीरात जातात.. इत्यादी... असे त्या बातमीत होते.
त्या बातमीची आठवण झाली.. :)
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
28 Aug 2009 - 11:39 am | पाषाणभेद
अगदी ताज्या संध्यांनंद मधे 'दाढी मिशी ठेवणार्यांचे आरोग्य सुधारते' अशी बातमी वाचली आहे.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
28 Aug 2009 - 9:18 am | विसोबा खेचर
हा हा हा! जबरा आयडिया आहे! :)
पडलो खुर्चीतनं! =))
डेट्याकरता कृपया अवलिया किंवा युयुत्सूला भेटा... :)
तात्या.
28 Aug 2009 - 9:34 am | पाषाणभेद
धन्यवाद.
वेगळी वाट, (आपले बाय द वे हो) कमीतकमी दोन तर प्रतिसाद आले. मला वाटले की चांगली काय अन वाईट काय, मागच्यासारखे काहीच प्रतिसाद येणार नाही.
दोनच प्रतिसादामुळे फार फार आनंद झाला. अगदी प्राध्यापकांचा संप मिटल्यावर होईल तितका. आणखी जास्त प्रतिसाद आले तर माझे काही खरे नाही. (नॉमीनीची लिस्ट कपाटातल्या फाईल मध्ये ठेवलेली आहे.)
"रस्त्ता ओलांडतांना आधी डावीकडे पहावे, निम्मा रस्ता ओलांडावा, थांबावे, आता उजवीकडे पहावे, नंतर उरलेला रस्ता ओलांडावा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
28 Aug 2009 - 9:41 am | अवलिया
आपल्याला काय वाटते?
काय वाटणार ? तुम्ही महान आहात... :)
बाकी आयडीया जबरा =))
पण केवळ पुरूषांची सोय पाहिली म्हणजेच तुम्ही पुरुषप्रधान संस्कृतीचे समर्थक आहात म्हणुन जाहीर नीषेध :T
चालु द्या ! चालु द्या !!
तात्या,
माझा डेटा सध्या मी प्रभुमास्तरांना दिला आहे. भेटले तर घ्या झेरोक्स त्यांच्याकडुन ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
28 Aug 2009 - 10:20 am | पाषाणभेद
:-)
मी तर त्या पुढे जावुन देवाला म्हणतो की बायकांना पण दाढी मिशा येवू दे.
(आता यात आस्तीक नास्तिक वाद नको.)
अवलियाजी, आपला वरील फोटो बघून आपण संसाराला ( व त्यातील स्त्रीयांना) कंटाळूनच साधू झालेले दिसतात. आपण तर जालिंदर बाबांचे पट्टशिष्य झालात. माझा तसा फोटो नसल्याने मी फक्त पुरुषप्रधान संस्कृतीचा समर्थक कसा ठरू शकतो?
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
28 Aug 2009 - 10:32 am | सखाराम_गटणे™
>>मी तर त्या पुढे जावुन देवाला म्हणतो की बायकांना पण दाढी मिशा येवू दे.
स्त्रीया खोट्या मिशया लावु शकतात्त.
28 Aug 2009 - 9:45 am | महेश हतोळकर
असहमत.
विषाणूचा आकार ०.३µm असतो (संदर्भ). मला नाही वाटत नाकातले केस आणि मिशा कमी आकाराचे कण गाळू शकतील.
28 Aug 2009 - 10:32 am | पाषाणभेद
दाढी मिशीतले केस काही एका केसाचा लेयर नसतो (संदर्भ). ते केस पाठीमागे पुढे असतात. पहिल्या केसातून विषाणू पास झाला तर तो दुसर्या केसाला अडकू शकतो, नाही का? अगदी मास्क सारखेच ते वर्तन करतात.
जरूर पडली तर वरील अवलीयाजींचे / ()भडकमकर मास्तरांचे छायाचित्र आपण बघू शकतात. पटले तर आपण त्यांची दिक्षा पण घेवू शकता. ते समस्त स्र्त्री वर्गाला कंटाळून साधू झालेत. त्यांना आपण व्य. नी . करा.
खाली दिपकजी यांनी चिकटवलेला फोटो (तो त्यांचा आहे की त्यांनी काढलेला कुणाचातरी फोटो माहीत नाही) पण बघावा. तो कुणाचा फोटो आहे ते त्यांनाच विचारा.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
28 Aug 2009 - 10:17 am | दिपक
भारी आयडिया :)
28 Aug 2009 - 11:54 am | महेश हतोळकर
बॉडी गार्ड अगेन्स्ट स्वाइन फ्लु. या माणसाला सध्या नवीन जॉबचे टेन्शन नाही.
-----------------------------------------------------------------
येथे तेराव्याचे कूपन्स जमा करून घेतले जातील आणि त्यांचे नि:पक्षपाती पणे वाटप केले जाईल.
-----------------------------------------------------------------
28 Aug 2009 - 10:34 am | सखाराम_गटणे™
सांधुच्या आरोग्याचे रहस्य हे आहे होय !!!!!!!!!!!
28 Aug 2009 - 11:37 am | ऋषिकेश
हा हा हा! =))
का हो अनेक गरीबांच्या पोटावर पाय देताय.. मिश्या वाढवल्या की मास्कवाले, डॉक्टर, मास्क बनविणारे आणि न्हावी इतक्या लोकांचा धंदा कमी होईल
त्यामुळे बेकारी वाढवणार्या ह्या उपायाचा णिषेध! ;)
हा लेख वाचलात का?
ऋषिकेश
------------------
सकाळचे ११ वाजून ३५ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "गोलमाल है भाई सब गोलमाल है...."
28 Aug 2009 - 3:10 pm | शैलेन्द्र
नाकात असलेले केस हे न्हाव्यांचा धंदा वाढवण्यासाठी नसतातच, शरीराच्या रोगप्रतिबंधक व्यवस्थेतील ती एक पायरी आहे(physical barrier). नाकातील केस व त्यावर येणारी श्लेश्मा ही हवेतील धुलीकणांना अडवते आणि त्याद्वारे हवेतील बायोबर्डण कमी करते. जर नाक कोरडे राहत असेल तर त्यात तुपाचे दोन थेंब टाकावे व थोड्या थोड्या वेळाने शिंकरुन साफ करावे. याने शरीरात जाणार्या मायक्रोब्सच्या संखेत कपात होते व शरीराच्या रोगप्रतीबंधक शक्तीवर पडणारा ताण कमी होतो(macrophages and other immune system soldiers will have less targets to neutralise). कोणत्याही विशीष्ट रोगप्रतिबंधाएवजी सर्वसाधारण आरोग्य चांगले राखण्याचा हा एक स्वस्त व मस्त मार्ग आहे.
29 Aug 2009 - 1:43 am | पाषाणभेद
चला म्हणजे शैलेन्द्र तुम्ही अनूमोदन दिले आहे. म्हणजे माझी विचार करण्याची दिशा योग्य आहे. तरीही वर सांगितल्याप्रमाणे जर काही संख्याशास्त्रीय डाटा उपलब्ध केला गेला तर मला वाटते की या माझ्या बोलण्यात काहीतरी तथ्य नक्कीच आढळेल.
"रस्त्ता ओलांडतांना आधी डावीकडे पहावे, निम्मा रस्ता ओलांडावा, थांबावे, आता उजवीकडे पहावे, नंतर उरलेला रस्ता ओलांडावा."
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
29 Aug 2009 - 1:32 pm | शैलेन्द्र
मिसळ्पाव वरती स्वयंसेवक शोधायचे का? नाकातील केसांबद्दल, मीशांबद्द्ल नाही. कारण मिशांचे प्रयोजन हे सेक्सुअल डिफरेंशीअलसाठी आहे. रोगप्रतीकारश्क्तीचे अंग म्हणुन नाही.
29 Aug 2009 - 8:40 am | सुधीर काळे
वाचा आणि मगच मिशा वाढवा!: http://www.misalpav.com/node/8179
स्वाईन फ्लू व व्यावसायिक यश यांच्यात जुंपणार असं दिसतंय!!
सुधीर
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
29 Aug 2009 - 9:13 am | पाषाणभेद
काळेसाहेब, आपला लेख कसा नजरेतून सूटला ते समजत नाही. आता घाईत असल्याने वाचला नाही म्हणून जागा राखून ठेवतो.
रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते.
- पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
29 Aug 2009 - 1:11 pm | प्रमोद देव
एक व्यंगचित्र.
डुकरं म्हणताहेत...भगवानके घर देर है..पर अंधेर नही है! ;)
आधीच्या चित्रातल्या दोघां व्यक्तींना मिशा दिसताहेत.
नंतरच्या चित्रातल्या एका व्यक्तीला मिशा नाहीयेत. ;)
विरोधकांनो सावधान. ’चाल’ अस्त्र फेकून मारलं जाईल. ;)
27 Sep 2009 - 11:36 pm | पाषाणभेद
तेच तर म्हणतोय मी.
मिशीचा असा उपयोग कुणीतरी सायंटिस्ट लोकांना सांगा हो. ते संशोधन तरी करतील.
अवांतर: पुण्यात नुकताच थुंकणार्यांना (स्वाईन प्लू पसरू नये म्हणून) दंड लागू केला आहे. म्हणजेच पुण्यात जास्त थुंकणारे आहेत असे समजायचे काय?
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या