http://www.loksatta.com/daily/20090724/pnv02.htm
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/4814400.cms
पुण्यात 'स्वाइन फ्लू' ची लागण झालेली आहे. निरागस बालके आजारी पडत आहेत.
टि.व्ही. त या रोगावर काही उपचार उपलब्ध नाही असे पाहीले. खरे काय, खोटे काय?
त्याची त्रिव्रता किती?
अशा परिस्थितीत काय काळजी घ्यावी?
जाणकार प्रबोघन करतील काय?
प्रतिक्रिया
24 Jul 2009 - 5:24 pm | बहुगुणी
पुण्यात आणि जगात इतरत्र हाहा:कार उडवणारा स्वाईन फ्लू virus हा A/1H1N या प्रकारचा व्हायरस असून तो यापूर्वी माहित असलेल्या तीन इतर स्वाईन फ्लू व्हायरस, तीन bird flu viruses आणि एका मानवांमध्ये आढळणार्या फ्लू व्हायरस अशा सात प्रकारच्या निरनिराळ्या व्हायरसेस मिळून तयार झालेला नवीन व्हायरस आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध नाही आहे ते व्हॅक्सीन (लस), औषधे उपलब्ध आहेत. (लस उपलब्ध व्हायला अमेरिकेत व युरोपात आणखी काही महिने लागू शकतील, पण ऑस्ट्रेलिया मध्ये या आठवड्यातच एका कंपनीने त्यांची लस प्रायोगिक तत्वावर उपयोगात आणली आहे असं काल national public radioवर ऐकलं.)
Oseltamivir आणि zanamivir अशी दोन औषधे सध्या तरी या प्रादुर्भावावर लागू पडताहेत असं दिसतं. Neuraminidase या, H1N1 virus च्या वाढीसाठी आवश्यक अशा वितंचकाचे (enzymeचे) inhibitors म्हणून ही औषधं कार्य करतात. (सर्वच फ्लू च्या विरुद्ध उपयोगी पडणारी जी निरनिराळी औषधं उपलब्ध आहेत, त्या औषधांपैकी ही दोन सर्वाधिक महाग आहेत.)
या ठिकाणी आणि इथे आधिक विस्तृत माहिती उपलब्ध आहे.
या दोन औषधांना अजून तरी virus चा विरोध (resistance) develop झालेला नाही, म्हणून आजमितीला ही औषधं लागू पडत आहेत; या औषधांच्या अति-वापराने (किंवा अर्धवट वापराने) अशी विरोध-प्रवृत्ती H1N1 virus मध्ये निर्माण होऊ शकते हे भीती आहेच.
Oseltamivir हे टॅमीफ्लू या नावाने तर zanamivir हे रॅलेन्झा या नावाने बाजारात विक्रीला उपलब्ध आहे. टॅमीफ्लू हे रोश या कंपनीतर्फे तर रेलेन्झा हे ग्लॅक्सो-स्मिथ-क्लाईन या कंपनीतर्फे उपलब्ध आहे. भारतात (आणि इतरत्रही) या साथीला पुरून उरेल इतका या औषधांचा साठा नसेल अशी भीती आहे. (पण म्हणूनच या औषधांची साठेबाजी आणि काळाबाजार होणार नाही याची काळजी सरकारांना -आणि जागृत जनतेलाही- घ्यावी लागेल!)
24 Jul 2009 - 6:46 pm | लिखाळ
चांगली माहिती. आभार.
-- लिखाळ.
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी असतात :)
24 Jul 2009 - 7:50 pm | नितिन थत्ते
स्वाईन फ्लू हा हल्लीच्या पद्धतीनुसार हाइप केलेला रोग आहे. विकिपीडियारील माहिती वाचल्यास तो सामान्य इन्फ्लुएन्झा (फ्लू) पेक्षाही किरकोळ स्वरूपाचा आजार आहे. बहुतेक केसेस कुठलाही खास उपचार न करताच बर्या होतात असे त्यात लिहिले आहे.
however, the majority of people infected with the virus make a full recovery without requiring medical attention or antiviral drugs.
विकीवरील त्याच लेखाच्या खाली आणीबाणीचा उपाय म्हणून टॅमिफ्लू आणि रेलेंझा ही दोन बंदी असलेली औषधे वापरण्यास अमेरिकेत परवानगी देण्यात आली आहे. तेव्हा ही हाइप औषधांच्या अर्थव्यवहारातूनही निर्माण केली गेलेली असू शकते. ;)
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
24 Jul 2009 - 8:53 pm | विकास
स्वाईन फ्ल्यू मुळे जगभर ७०० आणि त्यातील अमेरिकेत २६३ रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. त्याला किरकोळ म्हणणे जरा अवघड आहे.
फ्ल्यूच्या बाबतीत आणि कुठल्याही संसर्गजन्य रोगाच्या बाबतीत सगळ्यात गंभिर काय असते? - जर तो प्रमाणाबाहेर पसरला तर त्याचे परीणाम भिषण असतात. १९१८ साली आलेल्या जगभरच्या फ्लूच्या साथीमधील व्हायरस हा स्वाईनफ्ल्युच्या (H1N1) व्हायरसच्या कुटूंबातीलच होता. तेंव्हा फ्ल्यू हा जगभर म्हणजे अगदी आर्क्टीकसारख्या विरळ वस्तीच्या भागात पण पोचला होता. एकूण ५० लाख माणसांना त्याची लागण झाली आणि ५ ते १० लाख माणसे जगभर मृत्युमुखी पडली. (संदर्भ). आज विचार करा दळणवळण हे १९१८ पेक्षा किती वाढले आहे ते!
त्या एका अनुभवावरून शहाणपण येऊन अमेरिकेत दरवर्षी फ्ल्युची लस टोचणी चालू झाली. Prevention is better than cure आणि better err on the safe side (म्हणजे सेफ्टीचा थोडा अतिरेक ठरला तर चालेल, पण निष्काळजीपणामुळे नंतर पस्तावा नको) असे काहीसे हे धोरण आहे. तसेच धोरण युरोपिअन युनियन आणि इतर प्रगत राष्ट्रांचे थोड्याफार प्रमाणात असते. मला ते बर्याच अंशी बरोबर वाटते कारण त्यात प्रत्येक जीवाची किंमत आहे. म्हणूनच जेंव्हा एकाच शाळेत बर्याच मुलांना लागण होते अथवा एकंदरीतच जेंव्हा अशा घटना वाढीस आहेत तेंव्हा त्याला किरकोळ म्हणणे पटत नाही.
10 Aug 2009 - 6:30 pm | प्रदीप
स्वाईन फ्ल्यू अर्थात AH1N1 फ्ल्यू ह्यात काहीही हाईप्ड नाही. माणसे ह्या रोगामुळे मरत आहेत तो हाईप्ड कसा?
साध्या फ्यूचे जीवाणू फुफुस्सात जिवंत राहू शकत नाहीत. तेव्हा त्यांच्याकडून जीवाला अपाय मर्यादित आहे. ह्या AH1N1 फ्ल्यूचे जीवाणू फुफुसात जिवंत राहातात, व तेथील स्नायूंवर हल्ला करतात. आणि ही प्रक्रिया बरीच झटकन होते. म्हणून ह्या फ्ल्यूवर शक्य तितक्या लवकर इलाज होणे आवश्यक आहे. वर बहुगुणी ह्यांनी दोन प्रकारच्या औषधांविषयी लिहीले आहेच. त्यांचा इलाज सुरू होण्याअगोदर अर्थात रक्ताच्या चाचण्या होऊन हाच फ्ल्यू आहे, ह्याशी शहानिशा झाली पाहिजे. माझ्या माहितीनुसार ह्यात घसा धरतो (sore throat) आणि जोरदार ताप येतो. हा ताप साध्या पॅनॅडॉलने कमी होत नाही. अशी लक्षणे दिसू लागताच त्वरा करावी व चांचण्या करून घ्याव्या.
ह्यावरील इलाज म्हणून जी (सध्यातरी) लागू पडणारी औषधे आहेत, त्यांचेही दुष्परिंणाम आहेतच. पण सर्वसाधारण तब्येतीच्या व्यक्तिस ते दीर्घकाळ सुरू न ठेवल्यास विशेष तीव्र नाहीत. आणि दुसरा अजून कुठलाही इलाज अद्यापतरी माहिती नाही (तो येईईस्तोंवर ह्या जीवाणूंचे म्युटेशन झालेले असेल व ते अधिक तीव्र झालेले असतील, तेव्हा काय करायचे हा प्रश्न आहेच. पण ते पुढे पाहू या). किडनीचा विकार असलेल्यांनी तसेच गरोदर स्त्रीयांनी ही औषधे डॉक्टरांच्या देखरेखीखालीच घ्यावीत असे समजते.
अद्याप लस बाजारात उपलब्ध नाही. ह्या रोगाचे जंतू सर्वसाधारण फ्ल्यूप्रमाणेच हवेतून पसरतात. रोग्याच्या थुंकितून, पडश्यातून, खोकल्यामुळे इ. हे पसरतात. तेव्हा काही प्रतिबंधक उपाय आपणाला करायला हवेत.
* मास्क सर्वच सार्वजनिक ठिकाणी लावणे चांगले
* हात वारंवार जंतूनाशक साबणाने धुवावेत (सर्वत्र वावरतांना आपण इथेतिथे हात सहज लावतो-- दारे उघडणे, लिफ्टची बटणे दाबणे, कसली ना कसली हँडल्स पकडणे इ).
*चेहर्याच्या कुठच्याही भागास हात जंतुनाशक साबणाने धुतल्याशिवाय लावू नयेत. (ही क्रियाही आपण सहजपणे अनेकदा करत असतो-- डोळे पुसणे, नाकास , कानास हात लावणे इ).
* गर्दीच्या ठिकाणी जाणे शक्य असेल तसे टाळावे.
24 Jul 2009 - 9:53 pm | धनंजय
मे महिन्यात चतुरंग आणि माझ्यामध्ये काही पत्रापत्री झाली. पैकी एका पत्रात मी येणेप्रमाणे लिहिले. (यात काही आकडे दोन महिन्यांपूर्वीचे असू शकतील, क्षमस्व.)
आधीच सारांश देतो: ही पुढील माहिती "अर्धवट दिलासा" देणारी आहे.
१. हा व्हायरस कदाचित अति-घातक नसेल, पण
२. हा व्हायरस बहुधा भरपूर पसरणारा आहे
३. या व्हायरसविरुद्ध प्रभावी औषध आजही उपलब्ध आहेत, आणि अमेरिकेत तरी त्याचा पर्याप्त साठा आहे - वृद्ध+बालकांना देण्यापुरता तरी आहेच
४. भारतापाशी मध्यम-संख्येची लागण निबटून काढण्यासाठी साठा आजही आहे. (पण भारतात मे महिन्यापर्यंत रोगाची लागण झालेली दिसत नाही.) वाटल्यास भारत पॅटंट तोडून या औषधाचे उत्पादन करायला सिद्ध आहे - जेनेरिक टॅमिफ्लू भारतात बनवले जाते.
५. वैयक्तिक काळजीची वेळ अजून आलेली नाही, पण सरकारी पातळीवर ही आपत्कालीन स्थिती आहे.
- - -
तसा या वर्षीचा व्हायरस नवीन आहे, तसा नेहमीचाच. हे काय विचित्र बोलणे? कारण दर वर्षीच एक नवीन फ्लू येतो, म्हणून कदाचित "नेहमीच्या अपेक्षित नाविन्यापेक्षा वेगळे नाही" असे कोणी म्हटले असेल.
या फ्लू व्हायरसच्या कुटुंबातले व्हायरस-गण हे डुकरे, पक्षी आणि मनुष्य तीन्ही प्राणिजातींमध्ये आढळतात. (फ्लू सोडला तर) बहुतेक व्हायरस आपल्या "पोशिंद्या प्राणिजाती"शी इमान राखतात. म्हणजे गुराला झालेली सर्दी मानवाला संसर्ग होऊन येत नाही.
पण फ्लू-व्हायरसचे तसे नसते. डुकरे-पक्षी-मानव यांचे "खास" फ्लू थोड्या-फार प्रमाणात दुसर्या प्राणिजातीला सुद्धा होऊ शकतात. तसे मिसळून दरवर्षी एक नवीनच "सरमिसळ" व्हायरस सर्वाधिक पसरणारा होतो. त्यामुळे दरवर्षीचा "मुख्य" व्हायरस मागच्या वर्षीच्या सर्वाधिक पसरलेल्या व्हायरसपेक्षा वेगळा असतो. (दरवर्षी हिवाळ्याच्या आधी देशोदेशी प्राण्यांच्या चाचण्या करतात, आणि पुढच्या वर्षीच्या मिश्रणाचा अंदाज करतात. त्या अंदाजपंचे व्हायरसविरुद्ध व्हॅक्सीन तयार करतात. पण या वर्षी हा "स्वाइन" व्हायरसचा अंदाज व्हॅक्सीन बनवताना करता आला नव्हता.)
(पुढच्या वर्षीसाठी स्वाईन फ्लू व्हायरससाठी लस बनवण्याचे काम बरेच पुढे सरकले आहे. लस बनवणार्यांच्या मनात एक प्रश्न आहे, की या मध्य-वर्षी आलेल्या स्वाईनफ्लू बरोबर आणखी एक वार्षिक फ्लू सुद्धा पसरेल का? म्हणजे पुढच्या हिवाळ्यात दोन लशी द्याव्यात की एकच?)
बहुतेक वर्षांत अशा "नव्या" व्हायरसमध्ये अति-घातक असण्या/नसण्याची दोन मुख्य (आणि विरुद्ध टोकांची) कारणे असतात.
१. पहिले टोक : तो मिश्र-व्हायरस बहुतेक प्रमाणात मागच्या वर्षीच्या मानवी व्हायरसपासून बनलेला असतो, म्हणून मागच्या वर्षीच्या व्हायरसने बारीक-सारीक सर्दी झालेले लोक (म्हणजे जवळजवळ आपण सगळे) काही अर्धवट प्रमाणात त्याचा प्रतिरोध करायला आधीच समर्थ असतो.
२. दुसरे टोक : तो मिश्र व्हायरस बहुतेक मागच्या वर्षीच्या बिगर-मानवी व्हायरसपासून बनलेला असतो, आणि मागच्या वर्षीसुद्धा मानवाच्या रक्तात कुचकामी असल्यामुळेच तो बिगर-मानवी राहिलेला असतो. या वर्षी पक्षी->मानव किंवा डुक्कर-> मानव अशी एखादी केस झाली तरी मानवांमध्ये असा व्हायरस फारसा पसरू शकत नाही. अशी परिस्थिती गेल्या काही वर्षांतल्या "बर्ड-फ्लू"ची झाली होती, हे आठवत असेल. पक्ष्यातून तो एखाद-दुसर्या कमजोर वृद्ध मानवाला होई, पण त्यापुढे पसरत नसे.
म्हणजे टोक १, किंवा टोक २ असले तर तितकी मोठी साथ येऊ शकत नाही.
या वेळचा व्हायरस बहुतेक प्रमाणात गतवर्षीच्या डुकराचा आहे, म्हणून मानवांपैकी कोणालाच मागच्या वर्षीपासून अर्धवट संरक्षण नाही. पण एका मानवाकडून दुसर्या मानवाकडे पसरू शकतो, इतपत "माणसाळलेला" आहे. म्हणजे वरील कुठलेच "सुरक्षित" टोक नाही अशी खतरनाक स्थिती.
म्हणूनच डब्ल्यू-एच-ओ, सी-डी-सी वगैरे आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय संस्था अत्यंत सजग झाल्या आहेत.
वरील कारणामुळे हा व्हायरस सर्वत्र पसरणार, असे दिसते आहे. पण अति-प्रसार म्हणजे अति-मृत्यू नव्हे!
एखादा व्हायरस-प्रकार खूप पसरूनसुद्धा प्रत्येकाला फक्त सौम्य सर्दी-पडसेच देईल (सौम्य).
दुसरा एखादा प्रकार मात्र जालिम आजार उत्पन्न करेल. (जालिम)
या वेळचा एच१एन१ व्हायरस सौम्य आहे की जालिम आहे, याबद्दल कोणालाच माहिती नाही. यू.एस.मध्ये शेकडो लोकांना बाधा झाली पण एकच मृत्यू झाला आहे. मेक्सिकोमध्ये शेकडा-दोन-शेकडा मृत्यू झाले आहेत - पण लागण किती लोकांना झाली होती? याबद्दल मेक्सिकोमधील आरोग्यखात्याकडे माहिती नाही. जर लाखोंनी संख्येने लागण झाली असेल आणि ९९.९९% सौम्य असेल तरी १००-२००-१००० मृत्यू दिसू शकतील. तरी सौम्यच. जर काही थोड्या हजारांनाच लागण झाली असेल, आणि त्यातही १००-२०० मेले तर हा भलताच घातक म्हणावा लागेल. पण मुळात किती लोकांना लागण झाली याबद्दल कल्पना नसल्यामुळे आपण "सौम्य की घातक" प्रश्नाचे उत्तर देऊच शकत नाही, ही पंचाईत झालेली आहे. (मेक्सिकोच्या आरोग्यखात्यातील या विभागाचे उपप्रमुख डॉ. लोपेस-गातेल यांच्याशी जूनमध्ये माझी थोडीशी चर्चा झाली तेव्हा हे मत बोलले गेले.)
मग काही तज्ञ इतके साशंक का झाले आहेत? त्याचे कारण ठोस नसले तरी मिस्ट्री-स्टोरीच्या अर्धवट क्ल्यू सारखे आहे. जर मुळात व्हायरस सौम्य असेल, आणि लाखोंमध्ये काही शेकड्यांनाच मारत असेल तर त्यातल्या त्यात दुर्बळ वृद्ध आणि बालकेच मरतील, असे आपण "स्पेक्युलेट" करू. (हा सिद्ध-पुरावा नाही, नुसती आपली विचारांची अधिक शक्यता). मेक्सिकोमध्ये मात्र काही तरणेबांड रोगीसुद्धा मेले आहेत. म्हणजे हा घातक असेल का? अशी शंका येते. हा ठोस पुरावा नाही, पण डोळ्यात तेल घालून पुढच्या संकेतांकडे लक्ष देण्याचा इशारा आहे.
पुनश्च सारांश :
वैयक्तिक काळजीची वेळ अजून आलेली नाही, पण सरकारी पातळीवर ही आपत्कालीन स्थिती आहे.
24 Jul 2009 - 11:08 pm | पिवळा डांबिस
नाय, जरासा वात्रट प्रतिसाद देनार हुतो...
पन वरती घनंजय डाक्टरसायबांनी इक्तं डेटाल फवारलं की त्याच्यातच आमचा वात्रटपनाचा किडा मरून गेला!!!!!!!
:)
24 Jul 2009 - 11:26 pm | विकास
चांगला प्रतिसाद. फक्त आता अमेरिकेतील मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे हे माझ्या प्रतिसादावरून समजेल.
तरी देखील, "वैयक्तिक काळजीची वेळ अजून आलेली नाही, पण सरकारी पातळीवर ही आपत्कालीन स्थिती आहे." या विधानाशी पुर्ण सहमत!
25 Jul 2009 - 1:46 am | धनंजय
आताच सीडीसीच्या संकेतस्थळावर बघितले की ४३,७७१ केसेस नोंदलेल्या आहेत, आणि ३०२ मृत्यू आहेत. म्हणजे ~७/१००० दर. अगदीच कमी नाही.
पण खरे तर कित्येक पटीने अधिक लोकांना सौम्य सर्दी-पडसे झाले असेल, त्यांची नोंद डॉक्टराकडे होणार नाही, म्हणून सीडीसीकडेही नोंद होणार नाही.
तरी अगदी नीट लक्ष ठेवण्यासारखी परिस्थिती आहे - हा व्हायरस सारखा बदलत असतो, आणि हिवाळ्यापर्यंत अधिक जालिम होऊ शकेल (किंवा अधिक सौम्यही होऊ शकेल).
25 Jul 2009 - 1:47 am | मृदुला
युके मध्ये दिली जाणारी माहिती. साधा ताप असून एका आठवड्यात आपोआप बरा झाला नाही तर डॉक्टरांकडे जा असा सल्ला आहे.
25 Jul 2009 - 1:56 am | बिपिन कार्यकर्ते
इथे मध्य पूर्वेत हा प्रकार अजून एवढा झालेला नाहीये. पण तरीही विमानतळांवर येणार्या प्रवाशांवर लक्ष ठेवायला सुरूवात झाली आहेच. या चर्चेमुळे माहिती तर कळलीच पण आमेरिकेत याची दखल बरीच घेतली गेली आहे असे दिसते.
बिपिन कार्यकर्ते
25 Jul 2009 - 4:55 am | विकास
इथे मध्य पूर्वेत हा प्रकार अजून एवढा झालेला नाहीये.
कदाचीत त्याचे कारण स्वाईन फ्ल्यू हा डुकरामुळे पसरतो हे असावे... आणि डुकराचे मांस मध्यपुर्वेतील धर्मांमधे त्याज्य आहे. किंबहुना त्यामुळेच ऐकीव माहीतीप्रमाणे इस्त्रायल मधे या नावावरून आक्षेप घेण्यात आला आणि म्हणून त्याला आता अमेरिकेत H1N1 flu असे म्हणतात. (H1N1 हे व्हायरसचे नाव आहे, त्याचा व्हिसाशी काही संबंध नाही :-) )
25 Jul 2009 - 7:47 am | नितिन थत्ते
धनंजय आणि विकास यांचे प्रतिसाद माहितीपूर्ण आहेत.
फक्त त्यात दरवर्षी फ्लूच्या लसी टोचणे वगैरे उल्लेखावरून ते पश्चिमकेंद्रित दृष्टीकोनातले वाटतात. म्हणजे दरवर्षीसाठी लस उपलब्ध असते पण यंदा हा नवा व्हायरस आल्याने लस उपलब्ध नाही म्हणून पॅनिक जास्त झाले असावे असे वाटते.
तसेही पहिल्या जगातल्या लोकांना भारतातील 'चांगले' (म्हणजे भारतात जे पिण्यायोग्य समजले जाते ते) पाणी प्यायल्यावरही जुलाब होतात. म्हणजे एकूणात चांगल्या स्थितीत रहात असल्याने रोगप्रतिकारशक्ती कमी असते. म्हणूनच कदाचित मृत्यू जास्त झाले असावेत.
भारतात तशीही फ्लूची लस घ्यायची पद्धत नाही. त्यामुळे या नव्या व्हायरसची लस नाही म्हणून पॅनिक करण्याचे कारण दिसत नाही.
मध्यंतरी सार्स नावाच्या अशाच एका रोगाची हाइप झालेली होती.
(काळजी घेणे केव्हाही योग्यच असले तरी काळजी करण्याची गरज नाही असे वाटते).
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
25 Jul 2009 - 8:41 am | विकास
फक्त त्यात दरवर्षी फ्लूच्या लसी टोचणे वगैरे उल्लेखावरून ते पश्चिमकेंद्रित दृष्टीकोनातले वाटतात.
अमेरिकेत नक्की आहे. मात्र सगळे घेतातच असे नाही... मी पण घेत नाही. असेही ऐकलेले आहे की एकदा घेतली की दरवर्षी घ्यावी लागते. (धनंजयला अधिक वैद्यकीय माहीती असू शकेल). प्रत्येक समाजाच्या म्हणून काही रुढी/परंपरा अर्थात ज्याला rituals म्हणतात त्या असतात. अमेरिकन समाजातील दरवर्षी लस घेणे ही एकप्रकारची ritual च आहे. मात्र त्याच्या मागचे कारण जे सांगितले आहे तसे वागणे कधीही श्रेयस्कर. अनुभवातून शहाणे होवून पुढे जाणे हे इथे जास्त आहे. मग ते एकदा फ्लू झाला म्हणून फ्लू ची लस असूंदेत, एकदा प्रदुषित पाण्यामुळे त्रास झाला म्हणता क्षणी आणलेला clean water act असूंदेत अथवा ९/११ मधे काय होते ते समजल्यावर राष्ट्राच्या सीमा आणि स्वार्थ सांभाळण्याची घेतलेली काळजी असुंदेत...
काळजी घेणे केव्हाही योग्यच असले तरी काळजी करण्याची गरज नाही असे वाटते
अगदी १००% मान्य. फक्त त्यात अजून एक भर म्हणजे काळजी करू नये म्हणत आपण निष्काळजी राहणे पण योग्य नाही.
25 Jul 2009 - 8:58 am | नितिन थत्ते
काळजी घेणे केव्हाही योग्य पण काळजी करण्याचे खरे कारण भारतात क्षयरोग आणि पटकीसारख्या रोगांशी लढण्याचा पैसा आणि मनुष्यबळ), या हाईपमुळे असल्या किरकोळ रोगांकडे वळवला जाईल हे आहे. (असे पूर्वी एच आय व्ही- एडस बाबत झालेले आहे).
नितिन थत्ते
(पूर्वीचा खराटा)
27 Jul 2009 - 3:28 am | पाषाणभेद
कालच्या (२६ जुन) सकाळच्या छापील आव्रुत्तीनुसार WHO च्या प्रवक्त्याने येत्या महिन्याभरात या रोगाविरुद्ध लस तयार होवू शकेल असा दिलासा दिला आहे.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड
7 Aug 2009 - 10:01 pm | बहुगुणी
गेल्या महिन्याभरात भारतात स्वाईन फ्लू च्या केसेस वाढत आहेत असं बातम्यांवरून दिसतं. गेल्या २४ तासांत २३ नवीन केसेस आधिकृत रीत्या आढळलेल्या आहेत, ११ NCR (नॅशनल कॅपिटल रीजन) मध्ये (८ दिल्ली, २ नॉइडा, १ गुरगांव - यांपैकी ३ डॉक्टर्स आहेत), ८ पुण्यात (यांत १ आयुर्वेदिक डॉक्टर आहे) तर ४ मँगलोर मध्ये आहेत. गेल्या पंधरवड्यात पुण्यात पहिल्या बळी पडलेल्या रुग्णाची नोंद झाली आहे (१४ वर्षांची रीदा शेख), काल एका विद्यार्थिनीला स्वाईन फ्लूचं निदान झाल्याने पुण्याचं सिंबायोसिस कॉलेज ८ दिवस बंद करण्यात आलं आहे.
इतकं घडत असूनही, जिथे विश्वासार्ह माहिती मिळायला हवी, असं भारत सरकारचं अधिकृत संस्थळ शोधलं तर नवीनतम माहिती [प्रेस रीलीज] जून पर्यंतच आहे. त्यानंतर उद्भवलेल्या केसेस ची एकत्रित माहिती कुठे मिळेल?
7 Aug 2009 - 11:36 pm | चैतन्यकुलकर्णी
वाचा.
http://cdc.gov/h1n1flu/qa.htm
आणि
http://timesofindia.indiatimes.com/NEWS/India/Has-H1N1-virus-mutated-Man...
प्रतिकारशक्ती वाढवणे हाच सध्या चांगला उपाय आहे. (माझे मत)
सध्या पुण्यात केल्या जाणार्या सरकारी तपासणीसाठी किती फी आहे?
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
8 Aug 2009 - 12:30 am | बहुगुणी
>>>वाचा.
http://cdc.gov/h1n1flu/qa.htm
मी ही प्राथमिक माहिती २४ जुलै ला या धाग्याच्या सुरूवातीलाच दिली होती, पण ती पुन्हा उधृत केल्याने पुन्हा वाचन होईल तर बरंच.
>>>आणि
http://timesofindia.indiatimes.com/NEWS/India/Has-H1N1-virus-mutated-Man...
तसंच व्हायरस म्युटेट होण्याची भीतीही मी वर व्यक्त केलीच होती.
"या दोन औषधांना अजून तरी virus चा विरोध (resistance) develop झालेला नाही, म्हणून आजमितीला ही औषधं लागू पडत आहेत; या औषधांच्या अति-वापराने (किंवा अर्धवट वापराने) अशी विरोध-प्रवृत्ती H1N1 virus मध्ये निर्माण होऊ शकते हे भीती आहेच."
पण केवळ एका केस वरून तसं म्युटेशन झालेलं आहे असं मानणं कठीण आहे, खात्री करण्यासाठी DNA sequencing करता येईल, भारतात बर्याच ठिकाणी हे सहज शक्य आहे (उदाहरणार्थ, हैदराबादची केंद्रीय प्रयोगशाळा).
माझा मुख्य प्रश्न आहे तो जून नंतरच्या स्वाईन फ्लू च्या केसेसची माहिती आणि त्या माहितीचे periodic (दर आठवड्याचे वगैरे) updates कुठे मिळतील?
8 Aug 2009 - 8:50 am | अमृतांजन
वैयक्तिक काळजी:
http://www.who.int/csr/disease/swineflu/en/
http://www.who.int/csr/resources/publications/Adviceusemaskscommunityrev...
http://www.who.int/gpsc/5may/How_To_HandWash_Poster.pdf
http://www.who.int/csr/disease/swineflu/frequently_asked_questions/what/...
समुहाने घेण्याची काळजी:
http://www.who.int/csr/disease/swineflu/guidance/communities/en/index.html
राज्यपातळीवरील काळजी:
http://www.who.int/csr/disease/swineflu/guidance/national_authorities/en...
9 Aug 2009 - 9:37 pm | वेदश्री
स्वाईन फ्लूसंदर्भात उत्तम माहिती मिळाली या धाग्यातून. विकास, धनंजय आदींना धन्यवाद.
9 Aug 2009 - 10:34 pm | घोडीवाले वैद्य
स्वाईन फ्लूबाबत सरकारी पातळीवर फारच अनास्था आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत शाळा बंद करण्याबाबत आणि अन्य ठोस निर्णय घेण्यात आलेला नाही. सरकारला जनतेची काळजी नाही हेच यातून स्पष्ट होते. वृत्तपत्रांनी राज्य सरकारला धारेवर धरायला हवे.
10 Aug 2009 - 12:16 am | चैतन्यकुलकर्णी
http://www.medindia.net/news/Doctors-Say-Homeopathy-may-Cure-Swine-Flu-5...
आमच्या ओळ्खीतल्या होमिओपथीच्या डॉक्टरांना विचारलं असता त्यांनी होमिओपथीने वेळ लागेल अस सांगितलं आहे. जर लक्षणांची तीव्रता अधिक असेल तर अॅलोपथीच वापरावी लागेल.
शोध घेत रहा ... उत्तमतेचा, नाविन्याचा आणि सत्याचा!
10 Aug 2009 - 11:21 am | केशवसुमार
१.Erandwane:Nalstop Chowk,near padale
palace,karve road, pune-4. Contact: Dr. Sarita
Ganala,Phone:9764000939.
२.Anandibai Narhar Gadgil
hospital:Near mhatre Bridge,Dattawadi.Contact,Dr.Jyotsna Khole,
Phone:9422987953.
३.Balaji Rakhmaji Gaikwad Hospital:
Opposite Lingayat Creamatorium,Timber market Ganj Peth.
Contact:Dr.Sandhya Bahule.
४.Kalavatibai Mavale
Hospital:283,Near Modi Ganpati,Narayan Peth. Contact:Dr.Nila
Limaye.Phone:9881385015.
५.Mamasaheb Badade
Hospital:558 Nana Peth Mutton market,Laxmi Road,Nana Peth.
Contact:Dr.Swati Joshi.
६.Hutatma Babu Genu
Hospital:529 Raviwar Peth,Sonya Maruti Chowk,Laxmi
road.Contact:Dr.Dinesh
Bende.Phone:9421018878
७.Siddhart Hospital:Opposite
Vishrantwadi Police Chowki,Alandi Road.
Contact:Dr.Bhagwant
Ghagare.Phone:9423004811
Shivshankar Pote
८.Hospital:Near Padmavati Pumping Station,Satara Road,Sahakarnagar.
Contact: Dr.Vidhya Rajwade.Phone:9422520930.
Junglerao Kondiba Amrale
९.Hospital:565 Shivajinagar,Near Income Tax
Building.Contact:Dr.Aparna
Gokhale.Phone:982321410
Baburao Genba Shewale
१०.Hospital:47 Aundh Road Khadki. Contact:Dr.Madhuri
Gore.Phone:9823224789
Damodar Raoji Galande Patil
११.Hospital:Kalyaninagar,Near Don Bosco school,Shastrinagar,Yerwada.
Contact:Dr.Ujjwala
Khisti.Phone:9730571404.
१२. Dr.Kotnis Arogya Kendra:Gadikhana,Near Mandai,Shukrawarpeth. Contact:Dr.Asmita
Bhoi. Phone:9850992960
Bapusaheb Genuji Kapdepatil
१३.Hospital:Demko Colony Koregaon Park.Contact:Dr.Jaya Bhondve.
Phone:9922504428
१४.Rohidas Kirad Hospital:Burudi
bridge,Bak lane,Ganesh Peth.Contact:Chandrashekhar
Gujar.
१५.Jayabhai Nanasaheb Sutar Maternity Home:Near Gujrat
colony,Kothrudgaon.Contact:Dr.Shyam Satpute.
Phone:9823217047