म्युचल फंडाचे प्रकार, म्युचल फंडात गुंतवणूक का करावी, योजना कशी निवडावी थोडक्यात म्युचल फंडाबाबत विस्तृत माहिती देण्यासाठी मी मराठी मध्ये एक नवीन व याप्रकारचे पहिलेच संकेतस्थळ बनविले असून या ठिकाणी आपण सभासदत्व घेऊन आपल्या प्रतिक्रिया नोंदवू शकता तसेच म्युचल फंड गुंतवणुकी संदर्भात प्रश्न विचारू शकता व चर्चेतही सहभागी होऊ शकता. येथे टिचकी मारून आपण संकेतस्थळावर जाऊ शकता. तुमचा सहभाग आम्हाला सुधारणा करण्यास मदतच करेल.
सदानंद
प्रतिक्रिया
22 Jul 2009 - 7:59 pm | रामदास
जाउन फेरफटका मारला.
संकेतस्थळ आवडले.
22 Jul 2009 - 8:10 pm | सदानंद ठाकूर
प्रतिक्रिये बाबत धन्यवाद.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
22 Jul 2009 - 8:12 pm | अवलिया
वा ! मस्त !!
आत्ता वरचेवर पाहिली आहे... निवांतपणे विस्तृत वाचन नक्की करतो.
सुरेख उपक्रम :)
--अवलिया
22 Jul 2009 - 9:43 pm | निळु
साइट आवडली. मराठीतील अर्थविषयक पोर्टल ची कमतरता पुर्ण करेल . all the best
-निळु
22 Jul 2009 - 10:11 pm | दशानन
छान संकेतस्थळ व सुंदर माहीती.
* बाकी एक प्रश्न
https://ifa.mututalfundsindia.com/
हि साईट उघडत नाही आहे.. कारण ही साईट उपलब्ध नाही आहे... असा संदेश येत आहे.
तुम्ही कुठल्या कंपनी बरोबर रजिस्टर्ड आहत ???
ते ही संकेतस्थळावर लिहा.
*
http://noentryloadmutualfund.com/
हे संकेतस्थळ तुमचे आहे काय ??
* तुम्ही व्यवहार विषयक साईट (जाहिरात) येथे देत आहात.. तुम्ही मिपाची परवानगी घेतली आहे काय ?
* http://paisalo.com/ व http://www.mutualfundconsultantindia.com/ हि साईट देखील तुमची आहे... ;)
वेगवेगळ्या साईट तयार करण्यामागचा उद्देश सांगाल का ???
* सुचना - जो पर्यंत योग्य ती माहीती मिळत नाही तो पर्यंत सदर संकेतस्थळापासून गुंतवणूक करताना सावधानी बाळगावी.
+++++++++++++++++++++++++++++
22 Jul 2009 - 11:20 pm | सदानंद ठाकूर
बाकी एक प्रश्न
https://ifa.mututalfundsindia.com/
हि साईट उघडत नाही आहे.. कारण ही साईट उपलब्ध नाही आहे... असा संदेश येत आहे.
लिंक देतान एक चुक झाली होती आता दुरुस्त केली आहे.
गुंतवणूकीचा तपशिल पहाण्यासाठी सुविधा आहे जी म्युचलफंडस इंडिया कडून विकत घेतली आहे. जी आमचे गुंतवणूकदाराना मोफत आहे.
Noentryloadmutualfund.com हि माझीच इंग्रजी मधे याच विषयावरिल साइइट आहे.
Paisalo.com हे नांव रजि. आहे तेथे माहिती भरणे आहे.
http://www.mutualfundconsultantindia.com/ हि साईट मी प्रयोगीक तत्वावर केली होती ती या साइटला रिडायरेक्ट केलेली आहे.
* तुम्ही व्यवहार विषयक साईट (जाहिरात) येथे देत आहात.. तुम्ही मिपाची परवानगी घेतली आहे काय ?
मी मि.पा.चे लेखन विषयक नियम लेखन करण्यापूर्वि वाचले व त्याला अनुसरुनच लेखन केले आहे.
निरनिराळे साइटव्दारे नविन साइट प्रमोट करणे हे करावेच लागते व तशी ती सर्वच आर्टिकल साइट व्दारे आम्ही करतच असतो.
व्यवसायाचा भाग म्हणूनवेगवेगळ्या साइट केलेल्या आहेत.
मला वाटते कि आपले समाधान होऊ शकेल.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
23 Jul 2009 - 9:31 am | दशानन
धन्यवाद.
समाधान झाले.
+++++++++++++++++++++++++++++
22 Jul 2009 - 10:22 pm | विकास
आत्ताच संकेतस्थळ पाहीले. एकदम माहीतीपुर्ण आहे! शुभेच्छा!
23 Jul 2009 - 10:18 am | घाशीराम कोतवाल १.२
सदानंद साहेब फॉन्टचा आकार वाढवा तुमच्या साईट्चा डोळ्यांना
त्रास होतो बघताना
**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती
23 Jul 2009 - 10:57 pm | सदानंद ठाकूर
आपली सुचना योग्य वाटली म्हणून फॉन्टचा आकार वाढवला आहे.
सदानंद
आनंदाने जगा, जगण्यात आनंदच आहे, आनंदाचे वाटप करा.
मला अन्यत्र भेटण्याची जागा
23 Jul 2009 - 12:44 pm | Dhananjay Borgaonkar
ठाकुर साहेब तुमचा उपक्रम आवडला. माहिती विस्त्रुत दिली आहे.
एकच विनंती आहे..क्रुपया फाँट जरा मोठा आणि चांगला द्या वापरा..
वाचायला जरा त्रास होत आहे.
@तात्या..
तात्यानु..अशी वेगवेगळ्या विषयाची संकेतस्थळ आपण मिपा वर जोडली तर..
23 Jul 2009 - 12:52 pm | विसोबा खेचर
चांगली कल्पना आहे..
तात्या.