आमच्याकडे एक जुना रेडिओ आहे .झाली असतील त्याला घेवुन एक २६ - २७ वर्षे .आजही चांगला चालतो बापडा !.पण काय करणार, दोन वर्षापुर्वी आमच्या कोल्हापुरात २ खाजगी रेडिओ वाहिन्या(शुद्ध मराठीत चॅनेल) आल्या आणि हा बिचारा रेडिओ काहीही झाले तरी ती चॅनेल आपल्यावर लागु देईना ,मग काय तो गेला माळ्यावर!! आणि तेथे नवीन एक झकास रेडिओ आला. अहो काय भाग्य होत कोल्हापुरचं....इथे एकाच दिवशी दोन रेडीओ चॅनेल आली आणि तीही वेगवेगळ्या समुहांची आणि महत्वाचे म्हणजे दोन्ही प्रींट मीडीयातले. पुर्वी पुण्याला येणे म्हणजे मजा वाटायची. कात्रजच्या घाटातुन खाली येताना झकास पुणे बघायला मिळायचेच. आणि महत्वाचे म्हणजे इट्स हॉट करत रेडिओ ही ऐकायला मिळायचा ,काय अप्रुप वाटायचे तेव्हा..तसा ज्यादिवशी मिसळपाव सुरु झाले त्याच दिवशी हा रेडिओ आमच्या गावात आला.आणि सगळे या रेडिओचे फॅन झाले .अवघ्या आठवड्याभरात १०,००० चायना मेड रेडिओ खपले म्हणजे बघा ....
ही चॅनेल्स म्हणजे एक उत्तम पॅकेज होते. एकापेक्षा एक निवेदक्( हा काय म्हणतात त्याना आर .जे.) आणि त्याहुन भारी गाणी .सगळा बाजच वेगळा ,पॅकेजींग कसं असावे,कसे करावे हे त्याना माहित होतंच ,त्यानी ते ज्ञान नीट वापरले इतकच.....सकाळी सकाळी " सकाळचे सात वाजुन ५ मिनिटे झालेले आहेत्,मुंबई केंद्रावरील बातम्या आम्ही सहप्रक्षेपित करत आहोत" च्या ऐवजी . "हाय गाइज,, व्हॉट आर यु डुइंग.गुड मॉर्निंग" असा लाघवी आवाज ऐकु यायला लागला. मग सांगा ,तुम्ही फिदा व्हाल का नाही. मी ही झालो. तस ते गेंदी पॉप पेंदी पॉप जे का काय गाणे आहे ते मला नाही आवडले विशेष , कोणालाच नाही आवडले पण चॅनेल वाल्यानी लावले सारखे सारखे आणि आम्ही आनंदाने ऐकले त्यामुळे आपोपाच ते फेमस झाले,चांगली टॅक्ट आहे गाणी फेमस करायची , काय ती मजा .अहो बघता बघता लोकांच्या कानात फक्त आणि फक्त रेडिओच दिसायला लागले आणि अनेक लोक जणु बहिरे झाले ,तुम्हाला पटणार नाही अगदी शाळेतसुद्धा एखाद्या बोरिंग लेक्चरला मागच्या बेंचवर कानात "चक दे ओ चक दे इंडिया " वाजायला लागले. आणि मग कोणीतरी म्हणायचे हळुच सो दॅट्स द रेडीओ जनरेशन नॉव....
त्याच काय आहे ,हा खाजगी आकाशवाणी( रेडिओ )प्रकार खरच उत्तम होता. सरकारने परवानगी दिल्यावर पुन्हा रेडिओला नवसंजीवनी देण्याचे काम त्यानी फार चोखपणे पार पाडले .त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडेच .लोक " आजचे भाजीपाल्याचे दर" आणि "महिला विशेष " अशा कार्यक्रमाना कंटाळले होते ,त्यांना काहीतरी नवं हवे होते.आणि टीव्हीचाही इफेक्ट ओसरुन गेला होता. टाइम्स गृपने( माझ्या माहितीनुसार) हे पहिल्यांदा ओळखले आणि रेडिओ मिरची आली.काय रुपडे होते ना..एखाद्या म्हातारीने तर द्रुष्टच काढली असती मीठ मोहरीने.. यंग , एकदम स्टाइलीश बोलणारे आर जे, नवनवीन थिम्स ,फंटुश कार्यक्रम ,त्यामुळे सगळी लाइफ आपोआपच बदलली साध्यासुध्या आम्ही आपले दिवस काढतोय चे रुपांतर लाइफ जिंगालाला त झाले..लोकांना गाडीवरुन जाताना ,बससाठी वेट करताना,ऑफीसात काम करताना एक चांगला विरंगुळा मिळाला ...काहीकाही ऑफीसात तर मॅनेजमेंटनेच रेडिओ लावुन दिला .....खुप छान होते ते दिवस.....त्यात मग नवनवीन वाहिन्या येवु लागल्या ..प्रत्येकाचे एक स्वतःचे वैशिष्ट्य ..पण एक घोळ होता बरका !!सगळ्यांचा मेन टारगेट ऑडियन्स एकच होता ..युथ..पल्सर वरुन जाताना हा क्राउड एम पी थ्री लावायचा ,करिझ्मा वरुन फिरताना तेवढीच वेगवान असणारी गाणी ऐकायचा..मग तिथेच त्याला रेडिओ दिला तर ??तुफान चालली हि कंसेप्ट.. आजही चालत आहे....आणि पुढेही चालेल...
हा,तर मी काय म्हणत होतो तर कोल्हापुरच्या आणि माझ्या रेडिओ लाइफबद्दल .....लोकाना फार आवडला हो तो नवीन बॉक्स ..चार चार तासांचे कार्यक्रम ,यंग,फ्रेश आर जे, वेगवेगळ्या मुलाखती अगदी जाहिरातीसुद्धा नव्या नव्या ....आणि त्यात भरीस भर म्हणजे नवीन गाणी तेही चोवीस तास ..अहाहा...टोमॅटो आणि मिरचीवर लोक फिदा झाले आणि कोल्हापुरकरांचे प्रेम म्हणजे काय,नादखुळाच असतय ..!!!! पहिल्या पहिल्यांदा तर अगदी आयुक्त आणि जिल्हाधिकार्यांची लाइव्ह मुलाखत ...डायरेक्ट प्रश्न ..काय भारी कार्यक्रम काढलेला ...लोक खुष ..मला प्रश्न पडला की आता नायक-२ मध्ये हिरोला टीव्ही रिपोर्टर न दाखवता आर जेच दाखवायला हवा... खुप छान चालले होते सगळे ....आजही चालु आहे ...... हा पण आता काहीतरी गोंधळ उडाला आहे.चित्र बदलले आहे, बदलत आहे, सगळच नाही पण काहीतरी फसलय हे खरे...
तर आता एवढे झाले आहे तरी काय ..आजही पोरे कानात कॉड घालतातच की .... पण आता तिथे पुन्हा जुनी गाणी वाजत असतात,रेडिओ नाही.. आर जे ने प्रश्न विचारल्यावर भराभरा एस एम एस करणारी लोक आता त्याकडे ढुंकुनही बघत नाही आहेत ...योग्यवेळी घडत आहे.नाहीतरी हे सगळे कधी ना कधी होणारच होते... होय ..कारण एकच अहे ..त्यांनी ज्याला उद्देशुन रेडिओ काढला त्या तरुणाइला ओळखायला ते चुकले ,ती तरुणाई नव्याची फॅन आहे ..पण रेडिओ स्वतःला बदलु शकला नाही... अँकर येस च्या जागी "यप" म्हणायचे खरे पण या सगळ्यात ते येस म्हणायलाच विसरले .बेसिकच विसरल्यावर काळाप्रमाणे बदलणार कसे आणि तिथेच चुकले.
असे कसे चालेल हो ,मान्य आहे तुम्ही ट्रेंड सेटर आहात , युथ आयकॉन आहात हे पण मान्य .पण भाषा बदलायचा अधिकार तुम्हाला नाही. मृदु मृदु आवाजात सारखे ... हाय कोल्हापुर आय एम.......... हीअर.. हाउज लाइफ गोइंग?? .हे एकदा दोनदा म्हणायला ठिक आहे हो, पण सकाळपासुन संध्याकाळ पर्यंत तेच ऐकल्यावर लोक वेडे होणार नाहीत तर आणखी काय होणार ..आणि हो सर्वात कहर म्हणजे सकाळ सकाळी " तु मेरी अधुरी प्यास प्यास" लावल्यावर अगदी यंग जनरेशन तरी ऐकेल का हो??? पण त्यांना हा फरक समजलाच नाही . युथ आहे.. तीला हिच गाणी आवडतात.मग लावायची आपण ...हो . आवडतात खरी ! पण सकाळी सकाळी हे गाणे ऐकुन आमचा पप्पु क्लासमध्ये चाललाय ,तर काय होईल त्याचे किंवा संध्याकाळी कुठे तरी देवळात आरती चालु आहे आणि त्याचवेळी पानाच्या ठेल्यावर आशिक बनाया आपने लगले आहे ..कोण ऐकेल हो रेडिओ .......बरं हे झाले गाण्याबाबतीत, पण बाकिच्याबाबतीतही तसेच... अँकर अर्धा अर्धा तास काय बोलतोय तर मी आज गुलाबी टी शर्ट घालुन आलेलो आहे .... आणि आता पुढचा आर जे येणार आहे निळा ड्रेस घालुन ....... अरे गाढवानो,तुम्ही करा की फॅशन शो आम्ही कुठ नाही म्हणतोय्..पण तो आम्हाला दाखवायची आय मीन सांगायची गरज काय ... आणि प्रश्न पण काय विचारणार तर म्हणे भारत स्वतंत्र कधी झाला ? एस एम एस करा , ****** या क्रमांकावर ..वा ,काय चालु आहे ..नंतर विचारतील की आज या या मालिकेत हे हे पात्र काय करेल आणि आम्ही एस एम एस करायचा ..काय तुम्ही काय राजे लागुन गेलात का काय???जा गेलात उडत.....(पब्लिक ऐसाहीच होत्या है भाई)
अजुन एक गोष्ट ती म्हणजे हे चॅनेल लोकप्रीय झाले ते त्यांच्या भन्नाट आयडीयांमुळे ...काय एक एक मुलाखती ऐकायला मिळायच्या पहिल्यांदा..कोल्हापुरात बसुन आर जे घेणार शानची मुलाखत.. लय भारी वाटायचे हो.. पण साउंड पॅच अप केलेला आहे हे किती दिवस लपवणार.आणि मुलाखत पण कशी.. परवा एक मुलाखत घेताना बघितली म्हणजे माझ्या जवळच्या मित्राची होती म्हणून त्यांच्या ऑफीसात गेलो होतो ..अवघी ३ मिनिटे त्याने मुलाखत दिली आणि आम्ही बाहेर पडलो पण तीच मुलाखत कट -कट करत ..कुठे हे गाणे ऐकव ..अर्धा अर्धा तास जाहिराती लाव करत तीन तास त्यानी चालवली... एवढा वेळ एखादे च्युंइगगम पण कोण चघळत नाही ...आणि त्यात ते अँकर पण कायच्याकाय प्रश्न विचारतात..मुलाखत चालु आहे कलादिग्दर्शकाची आणि प्रश्न काय तर आजची आय पी एल ची मॅच कोण जींकेल ..मानल बाबा..अति तिथे माती म्हण त्याना माहितच नाही आहे वाटते .कसे माहित असणार त्याना "नाचता येइना अंगण वाकडे म्हणजे काय ते समजत नाही पण Bad workman always blames his tool s समजते..बाकी ठिकाणी काय आहे माहित नाही पणकोल्हापुरात तर कळस आहे.एका चॅनेलने खेडेगावातल्या ऑडियन्सला टारगेट करायचे ठरवले ..म्हणून तो अँकर इतका अशुद्ध बोलायला लागला की बास...शेवटी शेवटी तर तो आपणच्या जागी आपन म्हणायला लागला.....याउलट हे गायस ,हे गायस करणारा एक कार्टा होता .....त्याला जणु सगळे जणेगाईच वाटायचे वाटते ..असला किंकाळायचा अगं आई ग..पण काढले त्याला..कसे आहे ना पुण्या मुंबईकडे महिन्याला एक एक चॅनेल निघते ना ..मग इकडची सगळी जातात तिकडे ..आणि मग इथे उरतात सगळे दोन नंबरचे... परवा एकाला स्कोर सांगायला घेतलेले होते. पण त्या बिचार्याला अजुन स्कोर असे नीट मह्णता येत नव्हते.. परवा तर भारत -वेस्ट इंडीज मॅचला तो मह्णत होता भारताचा स्कोअर आहे १५७ .. म्हणजे आम्ही स्कोर तुझ्या तोंडुन ऐकला म्हणून चार रना जास्त काय ..भारीच की ....
किती लफडी म्हणून सांगु.. सर्वात जास्त म्हणज्ते घंटासींग प्रकरण ...कोल्हापुरातल्या कॉपी़कॅटनी बाबुराव बोलतोय नावाने तसाच कार्यक्रम काढला ...कय पण तो मुर्ख बोलतो...
एक संवाद असा होता की
निवेदकः " ताई ,प्रवीण आहे का घरी.....!"
फोनवरील य्वक्ती: " नाही तो बाहेर गेलाय"
निवेदकः " आहेर आणायला ,अहो प्रकाश असा कसा बाहेर जाईल ,तो जाईबरोबर जाणार होता ना"
फोनवरील य्वक्ती " आता ही जाई कोण ?"
निवेदकः " अहो दाई हो,तुमच्या म्हशीची नाव जाई आहे काय ,सारखे जाई जाई करताय"
असल्या टुकार जोकवर आम्ही हसायचे होय?? आणि त्यासाठी त्या बिचार्याना पिडायचे...महत्वाच्या कामातुन त्रास द्यायच्या.....अताशा लोक पण त्याला ओळखु लागलेत ....परवा त्याने एकाला फोन लावला..
निवेदकः " हा अमित ना , प्रविण बोलतोय"
फोनवरील य्वक्ती " हा बोल प्रविण कुमार, काय रे पैसे खाल्लेस का काय ,मॅच चालु असताना बाहेर बसुन मला फोन करत आहेस ते..'
या नंतर त्या फोनवरील माणसाने त्याला असे काही खिजवले ना त्याला, की बिचार्याला फोन मध्येच कट करावा लागला..असंच झाले पाहिजे.. आता मीही माझा नंबर पाठवला आहे.. फोन आलाच तर २५ स्पेशल शिव्यांची लिस्ट करुन ठेवली आहे .. बिचारा असा शिव्या खाणार आहे ना की त्याला कार्यक्रमच बंद करावा लागेल.. पण मीतरी काय करणार त्याला त्याच्याच भाषेत शांत केले पाहिजे ना...
बर आम्ही तुमची एवढी सगळी थेर ऐकतो ,त्या सुद का सुड(कोणत्या जन्मीचा सुड उगवतोय देव जाणे)च्या लग्नाच्या गोष्टी अर्धा अर्धा तास ऐकतो , का तर तुम्ही चांगली गाणी लावाल म्हणून पण कसले काय आणि कसले काय , दस कहानिया केला असाल हो तुम्ही स्पाँसर, पण म्हणून दहा मिनिटेही न चाललेल्या त्या चित्रपटातली गाणी तुम्ही दिवसाला दहा वेळेला लावणार... बरं, आमच्याकडे दोनच चॅनेल आहेत त्यामुळे फार बदलता पण येत नाही लगेच ....परवा महिनाभर तर फार पंचाइत झाली होती त्यांची ..नवीन गाणी नाहित आणि हे जणू काही परदेशातुन आले आहेत ना आणि श्रीलंकेत कार्यक्रम करत आहेत त्यामुळे मराठी गाणी ऐकवायला यांना लाज वाटते ना.. चायला कन्नड गाणी लावताय आणि मराठी नाही होय ,थांबा कार्यकर्त्यानाच बोलवतो. हा तसे एक चॅनेल लावते मराठी गाणे ..पण ती गाणी अशी असतात की ऐकल्यावर झोपच यावी ..जणु काही चांगली गाणी यांना मिळतच नाहीत नालायक कुठले.....रात्री जुन्या गाण्याचा कार्यक्रम लावतात आणि झोप येइल इतके बडबडल्यावर एखादे गाणे लावतात ती गाणी पण ठरलेली,कधी कधी तरी दोन्ही ठिकाणी एकच गाणे चालु असते .सगळेच फालतु ....
त्याचे काय आहे ,मधुन मधुन चांगले वागता तुम्ही ..नाही असे नाही,चांगले प्रयोग करता आणि चांगली गाणीपण लावता ..पण तुमचे जरा जास्तच होत आहे ...शेवटी तुम्ही काय तत्त्वज्ञ नाही आहात हो ,तुमचे आम्ही ऐकायला.. आमचे मनोरंजन करताय तुम्ही म्हणुन लोक मानतात तुम्हाला ......पण बास करा तुमची बकबक ..अहो आमच्याइथे एक पव्या आहे..केमिकल लोचा झाला आहे बिचार्याच्या डोक्यात..काहीही बरळत असतो बिचारा... पण साला तो पण काय भारी बोलतो ,थप्पड मारल्यागत बोलतो, नाहीतर तुम्ही ......शेवटी ठरवलय आता ..तुमचे चॅनेल तुम्हालाच लखलाभ ..कधी तरी ऐकु मोबाइलवर पण आम्हाला आपले एफ एम परवडले, त्याचा अर्थ निदान फुकटात मरा असा तरी नाही आहे ...तेपण बदललेत आता आणि ते नाही बदलले तरी चालेल तुमच्या त्या तिरकस टाईम चेक पेक्षा आता" संध्याकाळचे सहा वाजले आहेत आता ऐकुया' भावतरंग 'हे आवडायला लागलय आम्हाला" तुम्हाला जमत नाही असे ,काहीही झाले तरी तुमचे अँकर काही अमीन सयानी होवु शकत नाहीत. .. आम्ही बदललोय आता, ही खाजगी चॅनेलही बदलतील ,काळाप्रमाणे वागतील तर ठिक ! नाहीतर उगाच खबर बखर सारखे कार्यक्रम काढुन जुन्या पेपरमधल्या बातम्या सांगण्यापेक्षा नव्या जगाला नीट समजुन घ्या आणि हे सगळे झाल्यावर सांगा आम्हाला.... तोपर्यंत मी आमचा जुना रेडिओ खाली काढला आहे ..नीट चालतोय तो अजुनही........
प्रतिक्रिया
14 Jun 2009 - 2:04 pm | गणा मास्तर
लै भारी रे विनायका,
अचुक निरिक्षण.....
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
14 Jun 2009 - 3:18 pm | टारझन
=)) =)) =)) हसुन हसुन मुरकुंडी वळली की रे ह्या विनोदाने =))
लेख पैल्यापेक्षा बेटर !!
अवांतर :
आपल्याला रेडिओ आवडत नाही !! लैच काही ऑप्शन नसेल तर ऐकतो .. मला तर मिर्ची काय न रेड एफएम काय .. सगळाच पकाऊ बाजार वाटतो ...
15 Jun 2009 - 9:23 am | दिपक
लै भारी!
पुर्वी मुंबईत "टाइम्स एफ-एम" नावाचे एकच रेडीओ चॅनेल होते. त्यावरचे "खत आपके गीत हमारे", "फोन आपके गीत हमारे" असे कार्यक्रम आवर्जुन ऎकायचो. तेव्हाचे आर-जेचें "चांदणी, राहत जाफरी आणि करन सिंह" आवाज अजुनही मिस करतो. आता सगळा बाजार झालाय.
15 Jun 2009 - 12:34 pm | बिपिन कार्यकर्ते
विन्या, लेका मस्त लिहिलंयस की रे... तुझ्यातला बदल सुखावह आहे. छान निरिक्षणं आणि खुसखुशितपणे मांडलं आहेस.
आजकाल या एफेमवाल्यांनी डोक्याला लै लै लै काव आणलाय. अखंड बडबड. पार वाट लावतात. मी मुंबईत असताना तर चक्क आकाशवाणी, विविधभारती वगैरे ऐकायचो गाडीत असताना. एफेम वर ती एक मलिष्का होती तीच जरा बरी होती. आणि मिरचीवर पण एक तो जीतूराज आहे ना तो पण बरा आहे. पण उगाच आणि सारखा सारखा हसून वात आणतो.
इथे दुबईमधे हिंदी एफेमची चंगळ आहे मात्र. ८९.१ वर रात्री १० नंतर फारूख म्हणून आहे, तो जुनी गाणी सादर करतो. तो अस्सलं सुंदर उर्दू बोलतो की बास्स... किती तरी वेळा मित्राच्या गाडीत रात्री जाऊन बसून ऐकलंय. आणि अजून एक एफेम आहे जिथे दिवसभर फक्त आणि फक्त गाणीच. ती सुद्धा ८० च्या आधीची. त्यामानाने भारतातील एफेम स्टेशन्स खूपच उथळ आणि पकाऊ वाटली.
बिपिन कार्यकर्ते
15 Jun 2009 - 12:49 pm | अभिज्ञ
विनायका,
चांगले लिहिले आहेस,तरीहि एक सांगावेसे वाटते कि
"बाबारे, आता एवढे एक वर्ष बाकि सर्व उद्योग बंद करून फक्त अभ्यासाकडे लक्ष दे.इथे मिपावर यायचा कितीहि मोह झाला,तरी त्याला बळी पडून अभ्यासाकडे दुर्लक्ष होउ देउ नकोस."
अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.
15 Jun 2009 - 1:37 pm | विनायक पाचलग
आपणा सर्वांचे मनापसुन आभार.
अभिज्ञ सर,
आपले म्हणणे मान्य आहे.
काल परवा जरा अभ्यासाचा लोड कमी होता,म्हणुन लिहिले बाकी काही नाही.
कृपा असावी
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
विनायक पाचलग
15 Jun 2009 - 7:03 pm | पर्नल नेने मराठे
स्वार्थाचा लवलेशही नसावा
गर्वाचा स्पर्शही नसावा
असा जन्म लाभावा कि देहच चंदन व्हावा......
मला हेच आवड्ले मात्र
चुचु
17 Jun 2009 - 10:46 pm | मिहिर
मस्तच लेख. उपमांचा अतिरेक नसलेला आणि वेगळ्या विषयावरचा लेख.
तुक्याची आवली नंतर आवडलेला तुझा लेख.