हा लेख एक पुरुष का लिहितोय असा प्रश्न कदाचित तुम्हाला पड्ला असेल, सांगतो.
गेल्या आठवड्यात पण तेच झालं. पुण्याबाहेरचे कुणी पाहुणे घरी आले कि त्यांना पुणेदर्शन करायचे असते. त्यात जर महिलामंडळ असेल तर मग विचारायलाच नको. तुळशीबाग म्हणजे तर अविभाज्य भाग. आणी आमचा रोल ठरलेला - "ड्रायवर". जुन्या हिंदी सिनेमाप्रमाणे "शंकर गाडी निकालो" अशी आज्ञा दिली जाते, आम्ही आपले गुमान पाण्याच्या बाटल्या घेतो आणी गाडी तुळशीबागेपर्यंत न्यायची ते पण रविवारी, ह्या विचारानेच धास्तावतो, पण "चिडचिड करायची नाही, पाहुण्यांना काय वाटेल" असा विचार करत गाडी चालवण्यास सज्ज होतो.
आमच्या मातोश्री आणी ईतर महिला मंडळास घेऊन ३ वाजता निघायचे होते ते ४ वाजता घरातुन निघालो. सिग्नल, ट्रॅफिक आणी झोपेतुन उठुन रस्त्यावर फिरणार्या निरपराध, निरागस लोकांचा जीव वाचवत आम्ही मंडईजवळ पोहोचलो, आता नेहमीप्रमाणे पार्किंग चा त्रास. जुन्या बहुमजली पार्किंग्साठी उपलब्ध असलेल्या बाबु गेनु वाहनतळ ईमारतीपर्यंत पोहोचण्यासाठी गोगलगायीला लाजवेल अशा वेगात वाटचाल करत होतो. एंट्रंसला जागा मिळताच गाडी वळविली आणी समोरचा रखवालदार हाताने खुण करत सांगत होता कि "इकडुन एंट्री नाही, मागच्या रस्त्याने आत आणा" झाली का पंचाईत, माझ्या मागची पीएमपी बस "हॉर्न" नसल्याने नुसतीच गुरगुरत होती आणी आमच्या गाडीमुळे समोरुन बाहेर येणार्या मोटारीची कोंडी झाल्याने त्यातील बाजुला बसलेली स्त्री माझ्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती. जो या कोंडीतुन सर्वात पहिले बाहेर पडेल त्याला एक लाखाचे बक्षिस मिळणार आहे अशा आवेशात सर्वजण प्रयत्न करीत होते.काय करावे सुचेना थोडी जागा मिळाली गाडी पुढे घेणार त्यात एका रिक्षावाल्याने चान्स घेतला आणी आता परिस्थिती फारच बिघडली होती आणी नेहमीप्रमाणे माझं डोकं पेटलं होतं.
त्यात एक वयस्कर गृहस्थ देवासारखा आला आणी त्याने सर्वांना विनंती करत ती कोंडी मोकळी करुन दिली. मागे बसलेल्या महिला मंड्ळास ह्या सर्व गोष्टींशी काही एक कर्तव्य नव्हत, अखंड गप्पा सुरु होत्या.
जेवढी जागा मिळाली त्यात गाडी पुढे मागे घेऊन कसरत करत कशीबशी नव्या वाहनतळापर्यंत पोहोचविली, अर्थात तिथे १५-२० मिनिटे लागणारच होती आणी "तुम्ही जा तुळशीबागेत मी नाही येत" असे म्हणत मी सर्वांना गाडीतुन उतरवले. पाचव्या मजल्यावर जागा मिळाली, आणी परत जाताना गाडीसाठी पाच मजले चढुन यावे लागणार होते ही जाणीव झाली पण काहीही पर्याय नव्हता. गाडी लॉक केली आणी थोडं थंड पाणी प्यायलो, जरा हायसं वाटलं, एक युद्ध मी जि़कल्याची भावना उगाचच स्पर्शुन गेली.
खाली उतरलो, आता काय करायचे म्हणुन थोडे फिरुयात असे ठरवले. मागच्या वेळी तुळशीबागेत आत कधी गेलो होतो आठवत नाही, मी शक्यतो आत जायचे टाळतोच, नाहीतरी माझं काय काम तिथे. तरीपण काही नविन मंडळी आहेत, अंगावर सोन्याचे दागिने आहेत म्हणुन मी आत जायचे ठरवले, बॉडीगार्ड म्हणुन. आत जाताच एक वेगळाच अनुभव यायला लागला. असंख्य स्त्रियांचा सागरच जणु लोट्ला होता. चालायची म्हणुन सोय नव्हती. तरी मी त्या चक्रव्युहातुन मार्ग काढत आमच्या लोकांना शोधायला लागलो.
कानातले, गळ्यातले, हेअर पिन, पर्स, चपला, बांगड्या, ड्रेस मटेरिअल अशा चमचम्णार्या वस्तुंनी बाजार अगदी फुलुन गेला होती आणी त्यांची विक्री करणारे छोटे छोटे असंख्य दुकानदार आणी ह्या सर्व गोष्टींमधे जग विसरलेल्या अगदी पाच वर्षाच्या चिमुरडीपासुन वयोवृद्ध स्त्रिया. प्रत्येकीच्या चेहर्यावर एक वेगळाच आनंद, उल्हास आणी जग जिंकल्याचा भाव. दुकानदाराशी हुज्जत घातल्याशिवाय कोणतीही वस्तु घ्यायची नाही असा तुळशीबागेचा एक अलिखित नियम आहे आणी सर्वजणी ह्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत होत्या. दुकानदारांचे चेहरे मात्र निर्विकार होते, अर्थात त्यांना ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली असावी आणी त्यांनाही या नियमाबद्दल काही आक्षेप नव्हता. २०/- रुपयाची वस्तु आधी ६०/- रुपयांना सांगायची आणी मग निगोशिएट होत होत २५-३० रुपयांना विकुन मोकळं व्ह्यायचं हे सुत्र त्यांना पक्कं माहित असावं, मग स्त्रिया सुद्धा "साठ रुपये सांगत होता शहाणा, २५ रुपयाला घेऊन आले बघ" असे मैत्रिणिंना सांगायला मोकळ्या. अचानक काही परदेशी पर्यटक दिसले, ते सुद्धा पुण्याच्या या अजब दुनियेची मजा बघत होते, फोटो घेत होते, त्यांच्यातल्याच एका ललनेच्या हातात मी लालभडक रंगाच्या बांगड्या पाहिल्या आणी स्त्रिया पृथ्वीतलावर कुठेही गेल्या तरी सारख्याच याची खात्री झाली.
अरे हो, मी आमच्या महिला मंडळाला शोधायला आलो आहे हे विसरुनच गेलो. पुन्हा "यु" टर्न घेतला आणी एका दुकानात मला हे सर्व लोकं खरेदी करताना दिसले. मी त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिलो, तरी माझ्याकडे लक्ष नाही, "मनात म्हंट्लं किती प्रभाव या तुळशीबागेचा यांच्यावर" त्यानंतर मी १५ मिनिटे त्यांच्याबरोबर फिरत होतो आणी खोटं वाटेल पण माझ्याकडे कुणाचही लक्ष गेलं नाही. मी सुद्धा न बोलता चालत होतो. "ही पर्स केवढ्याला?" इति माझी मामेबहिण "१५० रुपये-दुकानदार" "नको मला" .
"अरे हे काय - जी वस्तु घ्यायची नाही ती विचारायची कशाला - मी" असो.. स्त्री जातीला प्रत्यक्ष देव समजु शकला नाही तिथे माझी काय कथा. दोन अडीच तासांचा तुळशीबाग महोत्सव एकदाचा संपला, बाहेर पडताना मी त्यांच्याबरोबर आहे याची त्यांना जाणीव झाली.
मग पाणीपुरी, भेळ, उसाचा रस यावर यथेच्छ ताव मारुन झाल्यावर पुन्हा ऑर्डर आली "शंकर गाडी निकालो"
आपला,
मराठमोळा.
प्रतिक्रिया
14 Jun 2009 - 8:20 pm | रेवती
वा!!
मस्त सफर तुळशीबागेची!
काही वाक्ये फार आवडली.
मागे बसलेल्या महिला मंड्ळास ह्या सर्व गोष्टींशी काही एक कर्तव्य नव्हत, अखंड गप्पा सुरु होत्या.
तुळशीबागेचा एक अलिखित नियम आहे आणी सर्वजणी ह्या नियमाचे काटेकोरपणे पालन करीत होत्या.
स्त्रिया पृथ्वीतलावर कुठेही गेल्या तरी सारख्याच याची खात्री झाली.
अजून असेच लेखन करावे ही विनंती.
रेवती
15 Jun 2009 - 10:56 am | पर्नल नेने मराठे
=))
स्त्री जातीला प्रत्यक्ष देव समजु शकला नाही तिथे माझी काय कथा
चुचु
14 Jun 2009 - 9:35 pm | पिवळा डांबिस
शंकर,
तुम ष्टोरी मस्त लिखेला हय!!! हमको आवड्या!!!:)
पण तुमच्याबरोबर असलेल्या स्त्रीसमूहात "तुमची बायको" ही कॅरेक्टर नव्हती असं दिसतं.....
छे, मग ते कसलं तुळशीबागेत जाणं? ते फक्त माणसं पोचवणं आणि त्यांना परत आणणं!!!!!:)
बायको बरोबर असली ना की मग या तुळशीबाग ट्रीपला एक अनोखं वेगळंच परिमाण लाभतं....
तिच्यासमवेत प्रत्येक दुकानात जाऊन आपल्याला शेजारी उभं रहावं लागतं, (कुल्फीआईस्क्रीम कोन, मोदकाचा साचा असल्या) प्रत्येक फालतू वस्तूवर मत द्यावं लागतं, आपल्यापेक्षा वयस्कर बायकांचे धक्के खावे लागतात!!!!
थोडक्यात, त्या तुळशीबागेतल्या दुकानदारांपेक्षा आपण जास्त केविलवाणे दिसतो!!!
नको रे बाबा हा पुरुषाचा जन्म अशी अवस्था होऊन जाते!!!!
खोटं वाटत असेल तर चतुरंगाला विचारा!!!!
:)
एनिवे, पुरूषजातीवर होणार्या अन्यायाला वाचा फोडल्यावद्दल अभिनंदन!!!
14 Jun 2009 - 9:53 pm | चतुरंग
मी तुळशीबागेत मोजून ३ वेळा गेलोय - एकदा बटाट्याचे साल सोलण्याचे यंत्र आणायला (ज्याने मी अजूनही बटाटे सोलतो! :S ), दुसर्यांदा घासणी आणायला (ज्याने मी अधून मधून डिशवॉशरने दगा दिलेली चिवट भांडी घासतो! :T ) आणि तिसर्यांदा पायजम्याची नाडी आणायला (जी वापरण्याचा योग अजून आला नाहीये!) :B
चौथ्यांदा जायला लागू नये अशी प्रार्थना करत होतोच तेवढ्यात बायको म्हणालीच बरं झालं पिडांनी आठवण केली ह्या खेपेला मोदकाचा साचा आणायचाय!! :D (वाचव रे बाबा गजानना!!) :O
(साचेबद्ध)चतुरंग
15 Jun 2009 - 2:46 pm | राघव
झक्कास!! पिडाकाका अन् रंगदा दोघांशीही सहमत!!
मी गेलोय बायकोबरोबर तुळशीबागेत!
अहाहाहा... काय ते अपूर्व दृश्य.. बायको एकेक वस्तू "बघत" भाव करत (न घेता) पुढे चाललीये.. अन् मी गुमान दोन (रिकाम्या) पिशव्या खांद्यावर टाकून मागे मागे जातोय!! हे दृश्य किमान १५-२० मिनिटे चालू असतेच. नंतर मात्र जो खरेदी चा भडिमार सुरू होतो.. त्यासम सजा तीच! :D
हा मराठमोळा अजून(ही) लग्न करण्याच्या तयारीत आहे म्हणजे काय ताकद आहे हो माणसाची!! ;)
(तुळशीबागग्रस्त) राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
14 Jun 2009 - 11:03 pm | रेवती
कुल्फीआईस्क्रीम कोन, मोदकाचा साचा असल्या
असं आहे काय? हे लक्षात ठेउन काकूला सांगायला हवं.
रेवती
15 Jun 2009 - 10:57 am | पर्नल नेने मराठे
काका
तुम्हि शिरिश कणेकरान्चे भाउ आहत का
=))
चुचु
14 Jun 2009 - 10:06 pm | बाकरवडी
काय राव तुळशीबागेत जाउन कावर्यांचे आईस्क्रीम (मस्तानी) नाही खाल्ले ?
फुकट गेली ट्रीप !
निदान तुळशीबागेतल्या रामाला तरी जाउन यायचे!
असो. मस्त अनुभव!!!!!
:B :B :B बाकरवडी :B :B :B
14 Jun 2009 - 10:11 pm | प्राजु
काय राव तुळशीबागेत जाउन कावर्यांचे आईस्क्रीम (मस्तानी) नाही खाल्ले ?
फुकट गेली ट्रीप !
१००% सहमत. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
14 Jun 2009 - 10:10 pm | प्राजु
कोणी काहीही म्हणो.. पण प्रचंड चैतन्य आहे तिथे.
सगळ्यांत महत्वाचं म्हणजे २०-२५, २०-२५ रूपयाच्या कितीही वस्तू घेतल्या तरी फार पैसे खर्च झाले (झालेले असले तरी)आहेत असं वाटतच नाही. तिथल्या दुकानदारांची सहनशक्ती अफाट आहे.
पुण्यात गेलं की, तुळशी बागेला भेट न देता येणं केवळ अशक्य आहे.
:)
लेख आवडला. खूप खूप आठवणी जाग्या झाल्या.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
15 Jun 2009 - 12:12 am | पिवळा डांबिस
त्यात नवल ते काय?:)
१. सगळ्या स्त्रियांना तुळशीबाग चैतन्यपूर्ण वाटते.
२. प्राजु ही एक स्त्री आहे.
=>प्राजुला तुळशीबाग चैतन्यपूर्ण वाटते!!!
(आमीबी लॉजिकचं येक बुक फाडलंय, टराटरा!!!!:))
बाकी ते कावर्यांचं आईस्क्रीम मी खाल्लेलं नाहिये. ते अगदी मस्त, आऊट ऑफ धिस वर्ल्ड असेलही. मान्य आहे.
पण एक आईस्क्रिम खायला मिळतं म्हणून तुळशीबागेची सजा फार भयंकर आहे हो!!!!
हे म्हणजे नंतर आईस्क्रीम खायला मिळतं म्हणून हौसेनं घशातील टॉन्सिल्स काढून घेण्यापैकी आहे....
:)
14 Jun 2009 - 10:17 pm | आपला अभिजित
लहानपणी मी पुण्यात शनिवार पेठेतल्या आत्याकडे यायचो. संध्याकाळी जाम वैताग यायचा घरी. एकदा बहिणींचे `तुळशीबागेत' जायचे बेत चालले होते. मला वाटलं, सारसबाग- पेशवेबाग, तशीच तुळशीबाग!
बहिणींकडे हट्ट करून गेलो त्यांच्याबरोबर. तुळशीबाग हे एका बाजाराचं नाव आहे, हे कळल्यावर खचलोच होतो मी. तिथून कधी एकदा सुटका होतेय, असं झालं होतं.
तुळशीबागेशी पुन्हा संबंध आला, पुण्यात राहायला आलो, तेव्हा. सुटीच्या दिवशी आणि संध्याकाळी `धक्के' मारायला जाण्याचं आमचं फेवरेट ठिकाण होतं ते!
आता फक्त बायकोबरोबर खरेदीला जातो. किंवा तुळशीबागेचा गणपती बघायला!!
14 Jun 2009 - 10:18 pm | आपला अभिजित
पुण्यात गेलं की, तुळशी बागेला भेट न देता येणं केवळ अशक्य आहे.
हे बरीक खरे हो प्राजुताई!
14 Jun 2009 - 10:47 pm | टारझन
=))
=)) =))
=)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
एकदाच्च्च्च्च फक्त चुकुन चुकून आई बरोबर गेलो होतो !! त्या णंतर काणाला खडी !! आईणं नेक्स्ट टाईम न्यायला सांगितलं तर क्रेडिट कार्ड टेकवलं .. म्हंटलो हे चालवा !! आणि आम्हाला माफ करा :) तिकडचे बायकांचे सुसंवाद . .. चाराण्या-बाराण्याचं बार्गेनिंग .. सगळंच !!
मराठमोळा जी .. लेख आवडेश ...
15 Jun 2009 - 7:37 pm | अनामिक
तुळशीबागेत क्रेडीट कार्ड चालतं???
-अनामिक
15 Jun 2009 - 12:02 am | क्रान्ति
आवडला. आजकाल सगळीकडे सगळं काही मिळतं, पण लहानपणी तुळशीबागेत पाहिलेली तांब्या-पितळेची भातुकलीची भांडी, त्यातही पाणी तापवण्याचा बंब, पितळी स्टोव्ह वगैरेची अपूर्वाई अजूनही तशीच आहे, आणि त्यासाठी तुळशीबागेची एक तरी चक्कर होतेच पुण्यात आल्यावर! छान वर्णन केलंय.
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
15 Jun 2009 - 12:23 am | संदीप चित्रे
महिलामंडळाला 'हाँगकाँग लेन'मधे नेता येतंय का बघा (बहुधा जमणार नाहीच !) पण जर चुकूनमाकून जमलेच तर निदान तुमचा वेळ तरी बरा जाईल ;)
बाकी पिडाकाकांशी सहमत -- स्वतःच्या बायकोबरोबर तुळशीबागेत उत्साहाने गेलेला आणि तितक्याच उत्साहाने परत आलेला इसम माझ्यातरी पाहण्यात नाहीये!
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
15 Jun 2009 - 6:44 am | अवलिया
कात टाकलेला मराठ मोळा आवडला :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
15 Jun 2009 - 9:45 am | मैत्र
फारच नेमकं वर्णन केलं आहे :)
मागे बसलेल्या महिला मंड्ळास ह्या सर्व गोष्टींशी काही एक कर्तव्य नव्हत, अखंड गप्पा सुरु होत्या.
हे सगळ्यात जास्त आवडलं आणि पटलं !
आणि दुसरं म्हणजे -
बाहेर पडताना मी त्यांच्याबरोबर आहे याची त्यांना जाणीव झाली.
योगसाधना, संयम वाढविणे इ. साठी जाता येईल तुळशीबागेत :)
बाकी पिडाकाकांशी सहमत -- स्वतःच्या बायकोबरोबर तुळशीबागेत उत्साहाने गेलेला आणि तितक्याच उत्साहाने परत आलेला इसम माझ्यातरी पाहण्यात नाहीये! :D
काय अभ्यास काय अभ्यास ....
15 Jun 2009 - 3:01 pm | नितिन थत्ते
दुर्गाभुवन हे तुळशीबागेतच आहे का हो?
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Jun 2009 - 3:10 pm | धमाल मुलगा
सोबत येऊनही तु.बा.त न येण्याची इतकी उदारमनानं मिळालेल्या परवानगीची कदर न करण्याची अवदसा का आठवावी बॉ तुम्हाला? :(
आयला,
काय ते सोप्पं प्रकरण आहे राव? हॅ: जीवाचा पार चोळामोळा होऊन जातो.
एकतर तिथं आपल्यासारख्या एकट्यादुकट्या पुरुषाला पाहून तिथं आलेल्या त्या टारगट(जनरली अतिविशाल महिलामंडळाच्या सक्रिय कार्यकर्त्या!) बायका काय धक्के देतात, वर स्वतःच "डोळे फुटले काय? लाज बीज वाटते की नाही?" असली मुक्ताफळं उधळतात...त्यावर आपल्या बायकोची ती जळजळीत नजर आपलं पाणीपाणी करते....त्या टारगट काकवांना (काकू चं अनेकवचन!) ओरडून विचारावसं वाटतं "साला, मला काय चॉईस आहे की नाय? कै च्या कै काय बरळताय?" पण आपण तिथं अल्पसंख्यांक असल्यानं (आणि दुकानदार पुरुष असले तरी त्यांचे ग्राहक आपण नसुन स्त्रीया असल्याने ते "ग्राहक देव भवं" मोडमध्ये!!!!) असले अपमान मान खाली घालुन गिळावे काय लागतात :(
बरं, तिथं गेल्यावर एक बाई धडपणानं खरेदी करेल तर शपथ! कानात वारं शिरलेल्या वासरासारख्या उधळलेल्या असतात सगळ्या. लय भ्या वाट्टं भो आपल्याला तिथं गेल्यावर.
साहेब, हे फार चिल्लर प्रकरण आहे हो....आमची सौ, दहा दहा मिनिटं घासाघीस करते, आणि वर "जाऊदे, मला घ्यायचंच नाहीय्ये!" असं म्हणून पुढे निघते. हे असं दर तीन दुकानाआड एक ह्या रेशोने चालु अस्तं. आता बोला!!!
आपण तर साला एक विचार केलाय....त्या तुळशीबागेच्या सुरुवातीला एखादा गाळा विकत घ्यायचा आणि तिथं मस्त बियरशॉपी टाकायची...चार टेबलंही लाऊन द्यायची....भौ..."पत्नीकृपेकरुन तुळाशीबागपीडीत" पतीवर्गाचा किती मोठ्ठा अनुग्रह होईल आपल्यावर...इच्चार करा!!!
च्यायला, तिप्पट भावानं जरी दुकान विकत घेतलं तरी साला सहा महिन्यात गुंतवणूक सगळी 'नील' करुन प्रॉफीटमध्ये जाऊ राव :D
अवांतरः आपणांस झालेल्या त्या दु:खात सहभागी आहे.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
15 Jun 2009 - 6:50 pm | मस्त कलंदर
धम्याची धमी पण मिपावर आहे असं कुठंसं वाचलं होतं.. त्यामुळे सौं.ने हा प्रतिसाद वाचला असल्यास......... ????????? ;)
मस्त कलंदर..
नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
15 Jun 2009 - 7:03 pm | धमाल मुलगा
यायचं माझ्या दहाव्याचे लाडू खायला... :(
आयला, तुम्ही उपप्रतिसाद देऊन आता माझा तो प्रतिसाद बदलायचाही चान्स नाही ठेवला हो :(
हरकत इल्ले!
आपण तिला सांगू की 'त्या बियरशॉपीच्या' मार्केटींगसाठी मी निगेटिव्ह शेडेड स्क्रीनिंग करतोय ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
15 Jun 2009 - 7:42 pm | घाशीराम कोतवाल १.२
आपण तिला सांगू की 'त्या बियरशॉपीच्या' मार्केटींगसाठी मी निगेटिव्ह शेडेड स्क्रीनिंग करतोय
लेका माझ्या बियर शॉपी( अजुन चालु न झालेल्या) चि का वाट लावतोस बे अरे जरा धंदा तर करु देना बे सुखाने;)
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
6 May 2010 - 12:18 pm | विशाल कुलकर्णी
दोन तीन बायका विशेषतः सासु-सुना, किंवा मैत्रीणी किंवा बहिणी मिळून खरेदीला निघाल्या की कुठल्याही बाजाराची तुळशीबाग करून टाकतात हा आमचा अनुभव आहे. आमच्या आईसाहेब आणि सौ. दोघी मिळून दादरला रानडे रोडवर हल्ला करतात तेव्हा आम्ही गुपचूप डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड त्यांच्या हातात टेकवतो आणि आयडीयल गाठतो. तीन चार तासानंतर निवांत फोन करायचा ...झाले का? मग पलिकडून उत्तर येते.. झालेच अर्ध्या तासात आलोच.
त्यानंतर मग निश्चिंतपणे आयडीयलमधून बाहेर पडायचे आणि शिवाजीमंदीरच्या मॅजेस्टिकमध्ये घुसायचे. तासा दिड तासाने फोन येतो 'कुठे आहेस?' मग निघायचे.
गंमत म्हणजे चार-पाच तासात मिळून फक्त एखादी साडी , एखादा ड्रेस आणि फारतर इतर सटर फटर गोष्टी मिळून एक-दिड हजाराची खरेदी झालेली असते. तेवढेच सुख. O:)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
6 May 2010 - 3:48 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटतं सुप्रीम कोर्टात PL दाखल करायला हरकत नाही. जसे बाजारपेठेत पार्कींगची सोय आवश्यक आहे त्या प्रमाणे तुळशीबागेच्या बाहेर एक बीअर प्यायची व बसायची चांगली सोय व्हायलाच पाहिजे. सगळ्यांचेच कल्याण आहे त्यात. बायका मनसोक्त शॉपींग आणि आपण.............मनसोक्त गप्पा हं
:-)
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
15 Jun 2009 - 3:14 pm | पक्या
तुळशी बागेतले रामाचे मंदिर विसरलात हो. तिथे आत फारच छान , गार वाटते. बायकोला खरेदीला पाठवून ती परत येईपर्यंत आपण मंदिरात बसावे.
बाकी लेख छान.
15 Jun 2009 - 3:14 pm | पक्या
तुळशी बागेतले रामाचे मंदिर विसरलात हो. तिथे आत फारच छान , गार वाटते. बायकोला खरेदीला पाठवून ती परत येईपर्यंत आपण मंदिरात बसावे.
बाकी लेख छान.
15 Jun 2009 - 4:36 pm | प्रसन्न केसकर
लय भारी एव्हढेच म्हणतो.....
15 Jun 2009 - 4:58 pm | निखिलराव
" आपण तर साला एक विचार केलाय....त्या तुळशीबागेच्या सुरुवातीला एखादा गाळा विकत घ्यायचा आणि तिथं मस्त बियरशॉपी टाकायची...चार टेबलंही लाऊन द्यायची....भौ..."पत्नीकृपेकरुन तुळाशीबागपीडीत" पतीवर्गाचा किती मोठ्ठा अनुग्रह होईल आपल्यावर...इच्चार करा!!! "
ह्याला म्हणतात बिझनेस माईन्डेड.............
15 Jun 2009 - 5:09 pm | विसोबा खेचर
मराठमोळे काका,
आपण सुंदर लिहिलं आहे! :)
तात्या.
15 Jun 2009 - 6:30 pm | मराठमोळा
सर्व वाचकांचे धन्यवाद!!! :)
रेवतीताई,
तुमच्या विनंतीचा मान नक्की ठेवीन व अजुन दर्जेदार लिहिण्याचा प्रयत्न करीन. :)
पिडांकाका,
प्रतिसाद आवड्ला आणी पट्ला. माझी बायको त्यात नव्हती ह्याचे कारण म्हणजे मी अजुन अविवहित आहे. :)
चतुरंग शेटचा प्रतिसाद वाचुन खुप हसलो आणी लग्नाची भितीच वाटायला लागली आहे. ;)
चुचुताईंच्या तर स्माईली मधुनच सर्व भावना पोहोचतात. ;)
राघव,
तु पण हा तुळशीबागेचा अप्रतिम अनुभव घेतला असशीलच हे तुझा चेहरा सांगतो. लग्नानंतर लोकांच्या चेहर्यामधे विलक्षण बद्ल होतात नै? ;) ह. घे.
बाकरवडी, प्राजुतै,
मी कधीच तु.बागेत आत जात नाही, आणी आईस्क्रीम हा माझा प्रांत नाही. :)
अभिजीत साहेब,
तुमचाही येऊद्या एखादा लेख मग. :)
टारझन भौ,
तिकडे क्रेडीट कार्ड चालत नाही, २०-२५ रुपयांच्या वस्तुंना काय वापरणार कार्ड? शिवाय कार्ड वापरण्यात स्त्रियांना आनंद वाटणार नाही. हजार कप्पे असलेल्या पर्समधे ठिकठिकाणी ठेवलेले पैसे शोधुन ते वापरले जातात.
चित्रे साहेब,
हाँगकाँग लेन आणी तुळशीबागेत कमालीचा फरक आहे. :)
नाना,
कात टाकलेला म्हणजे तुम्हाला मी साप वगैरे आहे असे म्हणायचे आहे का? अहो कारण तुमचे लेखन क्रिप्टीक असतं हो, कळायला थोडं जड जातं ;)
ध. मु.,
प्रतिसाद एक्दम झकास आणी बियर शॉपीची आयडीया तर लैच भारी. :)
खराटा,
मला माहित नाही हे दुर्गाभवन कुठे आहे ते.
बाकी क्रांती तै, पक्या, निखिलराव आणी तात्या आणी अव्यक्त वाचकांचे मनःपुर्वक आभार!!!
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
16 Jun 2009 - 12:37 am | chipatakhdumdum
भाउ तुम्ही कम्पूचे मेम्बर झालात, बर का..
15 Jun 2009 - 6:38 pm | सूहास (not verified)
बाग मस्त फुलविली आहेस....
सुहास
15 Jun 2009 - 6:42 pm | नितिन थत्ते
>>नाना,
कात टाकलेला म्हणजे तुम्हाला मी साप वगैरे आहे असे म्हणायचे आहे का? अहो कारण तुमचे लेखन क्रिप्टीक असतं हो, कळायला थोडं जड जातं Wink
हा हा हा. ते मध्यंतरी मास्तरांच्या संगतीत होते.
खराटा
(रंग माझा वेगळा)
15 Jun 2009 - 7:27 pm | अनंता
खिशाला कल्हई !!
विवाहित पुरूषांसाठी मौनव्रतासारखे दुसरे व्रत नाही . ;)
16 Jun 2009 - 9:16 am | अवलिया
नाना,
कात टाकलेला म्हणजे तुम्हाला मी साप वगैरे आहे असे म्हणायचे आहे का? अहो कारण तुमचे लेखन क्रिप्टीक असतं हो, कळायला थोडं जड जातं
छया ! ख-याची दुनियाच नाही !!
आता कुणाकडे तरी शिकवणी लावावी साधे, सोपे, सरळ कसे लिहायचे याची !
कोणी शिकवायला तयार आहे का?
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
16 Jun 2009 - 11:09 am | जागु
वा लेख आवडला. मी मागच्या महीन्यात गेले होते. पण जी जुनी तुळशीबाग आहे त्यात गर्दिच नसते. बाहेर भरपुर गर्दि असते.
17 Jun 2009 - 1:30 pm | मसक्कली
आपल्याला बुआ सगले पुरुश लोकन्चे प्रतिसद लई आवड्ले.........
हा हा हा =)) =)) =)) =)) आनुभव घेतल्याशिय कलत नहि ना :))
पन मुख्य करन म्हनजे त्यन्च्या खिशला खडाआ पडतोना....... ;) म्हनुन जास्त घबरतत............म्हनजे वैतगतात.... ~X( ............. =))
मनत म्हनत आसतिल साल येउन कय उपयोग नहि.....आपल्याकदे तर लक्शच नसत.....आहे सोबत कि हरवला...नि वरुन खिसा खालि होतो..... :''(
नहि का........... :))
पन मला काय म्हनायचय कि लगन झालेल्या पुरुश मन्द्ळीना कि, ते जे पहिजे ते खरेदि केल्यावर आपलि बयको खुश होते ना ,तिच्या चेहर्यावरचा आनन्द बगा कि राव....काय आहे कि कधि कधि बायकोला प्न खुश करव ना कि बग बाइ मि आज तुझ्यासटी वेल दिलाय......म्हनजे तिला प्न जनिव होते कि खरच बाइ मझ म्हनन रखला......आरे सुखि सन्सरचा गदा चलवयचा आसेल तर महिन्यतुन १ दा तरि बयकना स्व्तहुन तुलशि बगच दर्शन घडून द्या.......... ;) आनि वेल नसेल तर सरल पिसे द्या नि आल्यवर कौतुकने विचरा काय खरेदि केलस आज............!!
असो.......हे काय सगल्यनाच पतन्यासरख नाहि म्हना........
पोरिन्सथि सन्गु इचिते कि पुरुशना खरेदिला कधि नेउ नका..........जाम वैतगतात.....म्ग मधिच बोलतत आग किति दुकन फिरतेस घे पट्कन १ कच दुकानतुन.............!!मग आपलि चिड्चिड होते मनासरख खरेदि करता नाहि येत.....ना....
सरळ पैसे घ्या नि आपली वेळ सान्गा.....येवध्या वेलेत येयिल.........मि... :)
पन पुरुशाना एक सन्गवस वातत आहे कि......
कधिहि सन्गितलेल्या वेलेवर येयिल यचि आपेक्शा करु नका..........
कारन उशिर हा होतोच.......
१-१.३० तास जस्तिचा धरुन चलयचा.............(हि टीप खास बयकोचि किवा प्रियसिचि वाट बघनार्यसाटी आहे. :D )
तुमि हि तिकडे उभे रहुन कन्तालु नका............हे १ कच आस थिकन आहे जिथे तुम्हला सगल्या प्रकारच्या परि....बगायला भेततिल......ते पन एकच वेळेला....... ;;) ;) त्यामुले तुमि पन आनद घ्या....वितगु नका...... :))
17 Jun 2009 - 7:25 pm | रेवती
किती अभ्यासपूर्ण प्रतिसाद आहे हा!;)
सल्ले चांगले दिलेत सगळ्यांना!
अगदी शुद्ध (मनाने हो!;)) लिहिलय सगळं!
रेवती
19 Jun 2009 - 1:08 pm | मसक्कली
धन्यवाद............!!
रेवति ताइ......... ;) डॉन्ट माईअण्ड हा........ :))
मन्डळ आभरि आहे.................. :)