एंजल्स & डेमन्स ...

छोटा डॉन's picture
छोटा डॉन in जनातलं, मनातलं
8 Jun 2009 - 9:29 pm

डॅन ब्राऊनच्या गाजलेल्या व अत्यंत आवडलेल्या "दा विंची कोड" ह्या चित्रपटानंतर ज्याची आतुरतेने वाट पहात होतो तो "एंजल्स & डेमन्स" काल चित्रपटगॄहात जाऊन पाहिला, त्याच्या आधीच पुस्तक मिळवुन पुर्वाभ्यास केला होता त्यामुळे चित्रपट पहाताना जास्त मज्जा आली ...
जरुर आणि जरुर पहावा असा हा चित्रपट आहे.

टीप : स्पॉयलर्स नाहीत, बिनधास्त वाचा ... ;)

***********************************************

चित्रपटची सुरवात होते ती २ अत्यंत वेगळ्या जगातल्या आणि वेगळ्या पातळीवरच्या घटनांमधुन, धर्म आणि विज्ञान ह्यातल्या महत्वपुर्ण घडामोडींवर प्रकाश टाकुन चित्रपट सुरु होतो.

रोममध्यल्या "व्हॅटिकन सिटी"मध्ये सध्या पदावर असलेल्या "पोप"चे निधन होते व त्यानुसार आवश्यक असलेल्या सर्व प्रथा पाळुन पुढील धर्मसत्ता सांभाळणार्‍या एका नव्या पोपची निवड करणार्‍या "कॉन्क्लेव्ह" ह्या कार्यक्रमाची आखणी केली जाते. जुन्या पोपचा वैयक्तीक आणि सर्वात जवळचा सेवक असलेला धर्मगुरु ज्याला "केमरलिंगो" ह्या नावाने ओळखले जातो तो कार्लो व्हेन्ट्रेसा ह्या विधीची सुरवात करतो. ह्या विधीसाठी संपुर्ण जगातुन ख्रिश्चन धर्माचे अत्युच्च असे १६५ कार्डीनल्स हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात, आख्ख्या जगभरातला मिडिया ह्या संपुर्ण विधीचे थेट प्रक्षेपण करण्यासाठी रोममध्ये हजर असतो व त्यांना सोबत असते ती लाखो श्रद्धाळु ख्रिश्चन धार्मिक लोकांची.
ह्या घडामोडींपासुन अत्यंत दुर व अत्यंत तटस्थ अशा एका "सर्न (European Organization for Nuclear Researc)" नावाच्या जिनेव्हामधल्या संस्थेमध्ये मात्र वेगळीच धांदल उडाली असते. "हे विश्व देवाने बनवले आहे, मर्त्य मानवाला शुन्यापासुन नविन काही ( Creation of Something from Nothing ) बनवणे शक्य नाही " ह्या संकल्पनेला तडा देणारे काम इथे चालु असते, शात्रज्ञ लिओनार्डो व्हेट्रा ह्यांच्या मार्गदर्शनाखाली "अँटीमॅटर" तयार करण्यात येतो, ही मानवाची नवीच झेप. ज्या देवाने घडवलेल्या "बिग बँग" प्रक्रियेतुन विश्व निर्माण झाले त्यावेळी तयार झालेल्या अँटीमॅटरचे यशस्वी उत्पादन मानव पुन्हा करतो हीच महत्वाची घटना. मात्र हा अँटीमॅटर अत्यंत किमती, अत्यंत जोखमीचा व अत्यंत स्फोटक अशी त्याची ख्याती.
ह्या घटनेनंतरच काही तासांमध्ये ह्या कडेकोट सुरक्षा असलेल्या प्रयोगशाळेतुन डॉ. व्हेट्रांची अत्यंत गुढ हत्या होते व हत्या करणारा खुनी बहुमुल्य आनि धोकादायक असे "अँटीमॅटर" त्याच्या सुरक्षा करणार्‍या कॅनिस्टरसह घेऊन तिथुन गायब होतो.

ह्या दोन्ही घटनांपासुन मानसीक व शरिरीकपणे अत्यंत दुर असलेल्या हॉवर्डमधील सिम्बोलॉजिस्ट ( मराठी शब्द ? ) व इतिहासतज्ज्ञ प्रा. रॉबर्ट लँग्डन यांना स्वीस गार्डकडुन ( व्हॅटिकन सिटीचे रक्षक ) "अत्यंत आणिबाणीची परिस्थीती" असे सांगुन तातडीचे बोलावणे येते.
इकडे व्हॅटिकनमध्ये दाखल झालेल्या कार्डिनल्सपैकी अत्यंत महत्वाचे आणि भविष्यातले पोप होऊ शकणार्‍यापैकी ४ कार्डिनल्सचे अत्यंत गुढ पद्धतीने "अपहरण" झालेले असते. अजुन एक गोष्ट म्हणजे सुरक्षेसाठी लावलेल्या एका कॅमेर्‍यामध्ये सर्नमधुन चोरी गेलेले "अँटीमॅटर" दिसलेले असतात. अपहरणकर्त्याने फोन करुन ४ कार्डिनल्सच्या दर तासाने एक ह्या पद्धतीने त्यांच्या सार्वजनिकस्थळी खुनाची व सर्वात शेवटी अँटीमॅटरचा वापर करुन संपुर्ण व्हॅटिकन नष्ट करण्याची धमकी दिली असते. अपहरणकर्ता स्वतःची ओळख "इल्युमिनाटी * ( खाली थोडे विस्तारीत स्पष्टीकरण देतो ) गटाचा सदस्य" म्हणजे "व्हॅटिकन चर्चचा महान,अत्यंत जुना परंतु ताकदवान आणि हुशार शत्रु" अशी करुन देतो.

मागण्या ???
मागण्या काहीच नसतात व काही तडजोड ही तो नाकारतो, त्याच्या मते जे चर्चने ४०० वर्षापुर्वी ४ शास्त्रज्ञांच्या हत्या करुन व त्यांच्या मॄतदेहाची सार्वजनिकस्थळी विटंबना करुन जे क्रौर्य दाखवले त्याचा हा सरळसरळ "सुड" आहे, सुड घेताना त्यात कसलीही तडजोड अथवा सौदा होऊ शकत नाही.
ह्याच परिस्थीतीची उकल करण्यासाठी, अपहरणकर्त्याचा व अँटीमॅटरचा शोध घेण्यासाठी प्रा. रॉबर्ट लँग्डन आणि सर्नमधील शात्रज्ञ "व्हिटोरिया व्हेट्रा" हे व्हॅटिकन सिटीमध्ये दाखल होतात. ह्या सर्व शोध सत्राची व व्हॅटिकनमध्ये घडणार्‍या इतर धार्मिक घटनांचे नेतृत्व स्वतः "केमरलिंगो" हा धार्मिक अधिकारी करत असतो.

आता सुरवात होते अनेक गुढ, धक्कादायक, अंगावर रोमांच आणणार्‍या घटनांना ....
रॉबर्ट लँग्डनच्या मते जर अपहरणकर्ते खरोखर इल्युमिनाटी गटाचे सदस्य असतील तर त्यांची स्वतःची अशी एक पद्धत आहे आणि ती काटेकोरपणे पाळण्याबद्दल इल्युमिनाटींची ख्याती आहे. ह्या जगाची निर्मीती "पंचतत्वांमधुन" झाली ह्यावर अत्यंत गाढा विश्वास असणारे‍या इल्युमिनाटी त्यांच्या संदेशात व कार्यक्रमात ह्या पंचतत्वांचा जरुर वापर करत असल्याने त्या दिशेने शोध घेतल्यास आपण नक्की त्यांना पकडु असे लँग्डनला वाटते. इल्युमिनाटींच्या पद्धतीनुसार ४ खुन व अँटीमॅटर्चा स्फोट ह विवीक्षित ठिकाणीच होणार व ते शोधण्यासाठी अपल्याला एक "कोडे सोडवावे" लागेल असा लँग्डनचा विश्वास असतो, एका खुणेवरुन दुसरी, त्यावरुन तिसरी असे शोधत जाऊन आपण त्या अपहरणकर्त्यापर्यंत जरुर पोहचु असे लँग्डन सर्वांना पटवुन देतो.
ह्या शोधसत्राचा पहिला दुवा हा "व्हॅटिकन अर्काईव्ह्ज"मध्ये असलेल्या महान खगोलतज्ज्ञ गॅलेलियोच्या "सत्याचा नकाशा (Diagramma della Verità : Diagram of Truth)" ह्या पुस्तकात मिळणार असल्याने सर्व नियम, रुढी, गुप्तता झुगरुन देऊन केमरलिंगो लँग्डनला ते पाहण्याची परवानगी देतात.
त्यात मिळालेल्या कोड्याची उकल केल्यावर त्यांना खुनाच्या पहिल्या जागेचा अंदाज येतो व ते धावत तिकडे पोहचतात, पण इथे मात्र त्यांच्या शत्रुने त्यांच्यावर सरळसरळ मात केलेली असते. पंचतत्वांमधल्या पहिले तत्व असलेल्या "जमिन" याचा उपयोग करुन पहिल्या कार्डिनलची हत्या करण्यात आली असते व त्याचा मॄतदेह तिथे पडला असतो.
इथे असलेले "एंजल्सचे पुतळे" आणि "पंचतत्वे" ह्यांच्यातील संबंधच आपल्याला पुढचा दुवा देतील ह्या धारणेतुन लँग्डनचे शोधकार्य चालुच राहते ते मिळालेल्या संकेतांनुसार एका जागेवरुन दुसरीकडे धाव घेत असतात.
मात्र त्यांचे नशिब त्यांना साथ देत नाही, अजुन २ कार्डिनल्सची पंचत्त्वांनुसार "हवा व अग्नी" ह्यांचा वापर करुन अत्यंत निर्घुण हत्या होते व खुनी पळुन जाण्यात यशस्वी होतो.
चौथ्या आणि शेवटच्या कार्डिनल बॉजियांना वाचवण्यात लँग्डन यशस्वी ठरतो मात्र अत्यंत धोकादायक असा खुनी आणि त्याच्याबरोबर असलेले "अँटीमॅटर" ह्यांचा अजुन अजिबात पत्ता नसतो, ते गुढ अजुन कायमच असते.

इकडे चर्चच्या रुढीनुसार नव्या पोपच्या निवडीसाठी आवश्यक असणारे "कॉन्क्लेव्ह" त्या ४ कार्डिनल्सच्या अनुपस्थिती सुरु झालेले असते व स्वतः केमरलिंगो सर्व परिस्थीतीवर बारीक लक्ष ठेऊन असतो. त्याच्या व्हिट्टोरिया व्हेट्राबरोबर झालेल्या चर्चेत आलेल्या शंकानुसार मरण पावलेल्या पोपच्या शरिराची पुन्हा तपासणी करण्यात येते व इथे आश्चर्याचा धक्का म्हणजे हा पोप नैसर्गिकरित्या मरण पावला नसुन त्यांची हत्या झाली आहे असा निष्कर्ष निघतो. हे एकुण प्रकरण गंभीर आहे, इल्युनाटींचा अजुन पत्ता नाही, अँटीमॅटरचा धोका अजुन आहे ह्या सर्व शक्यता लक्षात घेऊन केमरलिंगो कॉन्क्लेव्ह चालु असलेल्या "सिस्टीन चॅपेल" इथे धाव घेऊन, परंपर मोडुन, विधी थांबवुन तिथे असलेल्या सर्व कार्डिनल्सना सध्या घडत असलेल्या घटनांची कल्पना देऊन विधी थांबवण्याची विनंती करतो.
" देवावरची श्रद्धा मोठ्ठी की विज्ञानाचे अस्तित्व खरे ? संकटातुन तुम्हाला विज्ञान वाचवते की देवावरची श्रद्धा ? विज्ञान हे देवाच्या विरुद्ध आहे की ते परस्परांना पुरक आहेत ? न जाणो अजुन विज्ञान बाल्यावस्थेत असल्याने अत्यंत गहन असलेल्या देव आणि धर्माला समजण्यास नालायक ठरत असेल तर तो त्यांचा अक्षम्य गुन्हा मानायचा का ? ह्य विज्ञानप्रेमींना धर्माच्या प्रवाहात समावुन घेतले तर ते बरोबर नव्हे का ?"
असे एक भावुक व तात्विक भाषण करुन तिथे जमलेल्या सर्व काडिनल्सना विधी थांबवण्यची व इल्युमिनाटीबरोबर ( विज्ञानप्रेमी ) समझोता करण्याची घोषणा करण्याची विनंती करतो. पण त्याच्या हाती निराशा पडते, देवाच्या ताकदीवर गाढ श्रद्धा असलेले व देवच आपले रक्षण करेल ह्यावर प्रगाढ विश्वास असलेले "स्कुल ऑफ कार्डिनल्स" आपला कॉन्क्लेव्ह हा विधी पुढे चालु ठेवतात ...

काही वेळानंतर खुद्द "केमरलिंगो"वर खुनी हल्ला होतो, करणारा त्याच्या जवळचाच माणुस निघतो व तो "इल्युमिनाटीचा हस्तक" आहे असे ठरवुन त्याला ठार मारले जाते, खुद्द केमरलिंगो जखमी होतो.
इकडे खुनावरुंन खुणा, दुव्यावरुन दुवे शोधत असलेल्या लँग्डनला अखेरीस येश मिळते. ते अँतिमॅटर हुडकण्यात यशस्वी ठरतात, ते अँटिमॅटर असलेले कॅनिस्टर त्यांना सापडते व खुन्याचाही बंदोबस्त होतो ....

पण इथे अजुन एक नवा टर्न ...
अँटिमॅटर संभाळनार्‍या कॅनिस्टरची बॅटरी फक्त ५ मिनीटे शिल्लक राहिली असते, ते संपल्यावर आतल्या अँटिमॅटरचा व बाहेरच्या मॅटरचा संपर्क होऊन एक महाविस्फोट होण्याची शक्यता निर्माण होते, हातात असतात फक्त ५ मिनीटे व पणावर लावले असते अख्खे व्हॅटिकन सिटी, ख्रिश्चन धर्मातले सर्वोच्च अधिकारी, लाखो लोक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे लोकांचा धर्मावरील विश्वास ...

ही आव्हान पेलायला उपस्थित असतात स्वीस गार्डचे काही कडवे रक्षक, प्रा. लँग्डन, व्हिट्टोरिया व्हेट्रा आणि स्वतः केमरलिंगो ....

पुढे ???
पुढे काय होते ?
अँटीमॅटर संभाळले जाते की त्याचा स्फोट होतो ? स्कुल ऑफ कार्डिनल्सचा पोपसंबंधी काय निर्णय होतो ? आत्त्तापर्यंत अखंड कष्ट व परिश्रमाची उच्च पातळी गाठलेल्या प्रा. लँग्डन आणि केमरलिंगो यांचे काय होते ?
धर्मावरील श्रद्धेचा विजय होतो की विज्ञानातील सत्याचा ???

ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला थेटरमध्ये चित्रपट पहुनच मिळतील. आत्ता मी इथे काही लिहणे म्हणजे "मिस्टरी स्पॉईल" करण्यासारखे होईल, तेव्हा आपण हा चित्रपट जरुर थेटरमध्येच पहावा.
माझ्याकडुन इतकेच....

शौर्य आणि क्रौर्य , धर्म व धर्मातील रुढीवरील विश्वास आणि विज्ञान , धोकेबाजपणा आणि पराकोटीची स्वामीनिष्ठा , सत्तापदांचा मोह आणि निरिच्छपणे केलेली सेवा, कमालीची गुप्तता आणि त्यांची उकल ह्या सर्वांचे सुम्दर मिश्रण असणारा हा एक नितांतसुंदर चित्रपट म्हणजे "एंजल्स आणि डेमन्स ", जरुर पहा आणि कसा होता ते मला आवश्य कळवा ...

धन्यवाद ...!!!!

* इल्युमिनाटी :

हा ख्रिश्चनिटीमधल्या चर्चया विरोधात असणार्‍या काही कडव्या लोकांच्या म्हणजे मेसन्सच्या गटामधला एक लहान गट, प्रामुख्याने ह्या गटात त्या त्या काळातले महान शात्रज्ञ, शिल्पकार, कलाकार, तंत्रज्ञ लोक वगैरे असत. ब्रदरहुड ह्या अजुन एका चर्चविरोधी गटाकडुन मिळणार्‍या मदतीमुळे अनेक नव्या संकल्पना ह्या इल्युमिनीस्ट लोकांनी मांडल्या. बव्हेरियन राजाच्या आर्थीक मदतीचा स्त्रोत अखंड चालु असल्याने ह्यांनी बरेच संशोधनात्मक कार्यही केले.
हे सर्व "विज्ञानवादी" लोक होते.
मात्र ह्यांचे संशोधन हे "बायबलमधल्या संकल्पनांच्या विरोधात" गेल्याने व्हॅटिकन चर्चच्या रोषास हे इल्युमिनाटिस्ट बळी पडले, ह्यांच्यावर बंदी आली व सदस्यांचे प्रचंड छळ झाले व अनेक हत्याही झाल्या ...
"गॅलालियो, केपलर, न्युटन,लिओनार्ड दा विंची, व्हिस्टन चर्चिल" वगैरे इल्युमिनीस्ट होते असा एक समज आहे ...
( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )

चित्रपटमतप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

निखिल देशपांडे's picture

8 Jun 2009 - 9:40 pm | निखिल देशपांडे

लै भारी परिक्षण रे डॉण्या.....
पुस्तक वाचलेच आहे त्यामुळे चित्रपट पण पहायचा आहे. तुझा लेख वाचल्या बंतर तर आता नक्किच बघावा लागेल.
"मेसन्स आणि इल्युमिनाटी" हा लेख लवकरच येवो
==निखिल

चकली's picture

8 Jun 2009 - 10:05 pm | चकली

उत्तम परिक्षण. चित्रपट पाहयलाच हवा
चकली
http://chakali.blogspot.com

विसोबा खेचर's picture

9 Jun 2009 - 10:24 am | विसोबा खेचर

उत्तम परिक्षण. चित्रपट पाहयलाच हवा

हेच बोल्तो..! डॉन्या, सुरेखच लिहिलं आहेस..

तात्या.

अबोल's picture

8 Jun 2009 - 10:17 pm | अबोल

दा विंची कोड प्रथम बघितला तेव्हा डोक्यावरुन गेला. मग त्याचे पुस्तक वाचले तेव्हा तो समजला.तो एक सु॑दर चित्रपट होता.
आता लवकरच हा चित्रपट पण बघायचाय

अंतु बर्वा's picture

8 Jun 2009 - 11:08 pm | अंतु बर्वा

मी सुद्धा पहिल्याच दिवशी पाहिला चित्रपट...
एवढ्या मोठ्या novel ला २ तासाच्या वेळेत बसवणे म्हणजे खरंच खुप कठीण आहे... पण एक छान प्रयत्न म्हणून पाहायला हवा (आणी Tom Hanks साठी...)

Da vinci कींवा angels and demons सारखे चित्रपट पाहण्यासाठी अशी काहितरी पार्श्वभुमी माहीत हवीचं. विशेषत: ज्यानी पुस्तक वाचलेले नाही त्यांच्यासाठी... ती तु थोड्क्यात परंतु सोप्या शब्दात मांड्ली आहेस... सो, गुड जॉब...

अनुप कोहळे's picture

9 Jun 2009 - 12:44 am | अनुप कोहळे

पुस्तक फार वर्षांपुर्वी वाचाले होते...३ किंवा ४....त्यामुळे थोडेच आठवते....
हम्म....परत वाचावे लागेल......

छान परीक्षण.....

टारझन's picture

9 Jun 2009 - 12:56 am | टारझन

थँक्स रे डाणू ... आपल्याला बी पाहायचा होता पिक्चर ..
परिक्षणही उत्तम जमलाव .. असाच लिहीत राहिलास तर लवकरंच "सिद्धहस्त लेखक" होशील .. हां .. पण त्यासाठी तुला खोड्या अंमळ कमी कराव्या लागतील आं ..

विकास's picture

9 Jun 2009 - 1:23 am | विकास

परीक्षण आवडले!

हा चित्रपट मी देखील गेल्याच आठवड्यात पाहीला. दा विंचीच्या बाबतीत पुस्तक आधी वाचले असल्याने चित्रपट तितकासा आवडला नव्हता. येथे पुस्तक वाचायाला सुरवात केली आणि तितक्यात अचानक चित्रपट पहायला जाणे झाले. थोडक्यात पुस्तक वाचायच्या आधी चित्रपट पाहील्याने तो अधिक आवडला असे वाटते.

बबलु's picture

9 Jun 2009 - 1:56 am | बबलु

चित्रपट मलाही आवडला (दा विंची कोड चित्रपटातील चुका टाळल्याहेत). :)

पण पुस्तक मला जास्त आवडलं.
पुस्तकातले असंख्य बारकावे २ तासाच्या चित्रपटात बसवणं तसंही अवघडच.

परीक्षण मस्तच लिहिलंय. अभिनंदन.

....बबलु

llपुण्याचे पेशवेll's picture

9 Jun 2009 - 2:33 am | llपुण्याचे पेशवेll

आवडले... पुस्तक अर्धवटच म्हणजे १५० पाने वगैरे वाचले होते. :) बघू आता पूर्ण सिनेमा बघावा असा विचार आहे.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

भाग्यश्री's picture

9 Jun 2009 - 3:05 am | भाग्यश्री

छान लिहीले आहेस रे.. सगळा लेख अगदी आवर्जून परत वाचण्यासारखा झालाय!
पुस्तक दा विंचि पेक्षाही आवडते आहे.. त्यामुळे मुव्ही नक्कीच बघणार.. आणि या मुव्हीमधे चुकाही कमी केल्यात असं ऐकून आहे.. बघितल्यावर कळेल आता..

बायदवे, इल्युमिनातीचा तो अँबिग्राम पाहून आणि ती मजा कळल्यावर मी अवाक झाले होते !!

www.bhagyashree.co.cc

Nile's picture

9 Jun 2009 - 3:51 am | Nile

वा! मस्त परीक्षण!

मला नेहमीच वाटत, एखाद्या सुंदर पुस्तकाचा सिनेमा करण हे खुपच अवघड कामं. त्यात पुस्तकात जसा पात्र, वातावरन निर्मितीला वाव असतो तेवढा सिनेमात असत नाही. त्यामुळे पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे. :) )

डिस्कव्हरी चॅनेल वर नुकतेच दा विंची कोड व एंजल्स अ‍ॅन्ड डीमन्स यावर कार्यक्रम झाले. त्यात सर्व "संकल्पनांचा" (उदा. अ‍ॅन्टीमॅटर, इल्युमीनाटी, प्रायरी, वगैरे) व्यवस्थीत अभ्यास, आढावा घेण्यात आला, जरुर पहाण्यासारखे कार्यक्रम.

डॅन ब्राउनने अनेक खर्‍या गोष्टींपासुन सुरुवात करुन इतक्या सुंदर (काल्पनीक) कथा बनवल्या आहेत की त्याला सलाम करावासा वाटतो. उदा. अँटीमॅटर खरच CERN ने बनवलं आहे, त्याचा व्यवस्थीत त्याने अभ्यास केला, पण तेवढ्या अँटीमॅटर ने इतक नुकसान होउ शकत नाही असा ते बनवण्यार्‍या शास्त्रज्ञांचा दावा आहे. तसेच इल्युमिनाटी खरच होती आणी तिला फ्रेंच राज्यकर्त्यांनी (?) चर्चच्या मदतीने संपवली हे ही इतिहासकार मानतात, पण बाकी गोष्टी मात्र डॅनच्या कल्पनाशक्तीची उदाहरणं. :)

आनंदयात्री's picture

9 Jun 2009 - 10:05 am | आनंदयात्री

>>पुस्तक वाचलेल असेल तर बर्‍याचदा सिनेमा तेवढा परिणाम करत नाही. (अपवाद फक्त गॉड्फादर सारख्यांचे

कांगो , अ‍ॅना अँड द किंग ऑफ सयाम हे असेच काही आधी कादंबरी नंतर चित्रपट असे पाहिलेले चित्रपट.

परिक्षण छान आहे डान्या .. कर्मठतेच्या विरुद्ध असलेल्या मेसनरी चळवळी बद्दल जरुर टाक.
(चळवळ शब्द किती भारतियीकरण करतो नाही ;) )

-
(आंतरजालिय मेसन)

किंग आंद्या सॉलोमन

सुबक ठेंगणी's picture

9 Jun 2009 - 4:28 am | सुबक ठेंगणी

मी पुस्तक वाचले नाहिये...पण तुझ्या परिक्षणावरून वाचावंसं वाटतं आहे...मनापासून धन्यवाद...

आणि भाग्यश्री म्हणते ती इल्युमिनातीच्या अँबिग्रामची मजा कोणती? का त्याच्यासाठी पुस्तक वाचू?

भाग्यश्री's picture

9 Jun 2009 - 8:03 am | भाग्यश्री

अगं तेव्हढ्याचसाठी पुस्तक कशाला..! तो इल्युमिनातीचा लोगो आहे ना? तो साधा सरळ वाच, आणि नंतर शीर्षासन करून वाच.. दोन्हीकडून वाचता येतो.. त्याप्रकारच्या आकृतीला अँबिग्राम म्हणतात..

www.bhagyashree.co.cc

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 2:49 pm | बिपिन कार्यकर्ते

नविनच माहिती कळली. अँबिग्राम बद्दल. धन्यवाद.

अवांतर: एक शंका आहे. शीर्षासन करण्यापेक्षा स्क्रीन उलटा करून वाचले तर चालेल का? ;)

बिपिन कार्यकर्ते

आनंदयात्री's picture

10 Jun 2009 - 3:10 pm | आनंदयात्री

तोडलनं तोडलं तुम्ही !!
काय प्रश्न सोडवलाय तुम्ही .. आपल्या बुद्धिप्रामाण्यवादाला स ला म !!

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 3:46 pm | बिपिन कार्यकर्ते

'नीड इज द मदर ऑफ इन्व्हेन्शन' हे वाक्य ऐकलंच असेल तुम्ही. आता आम्हाला ते उलटंपालटं करून तर बघायचं आहे पण शीर्षासन? हॅहॅहॅ, अंमळ कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत. म्हणून ही आयडिया.

क बोल्तो? चालंन का?

बिपिन कार्यकर्ते

भाग्यश्री's picture

10 Jun 2009 - 10:08 pm | भाग्यश्री

जे सोप्पं जाईल ते करा! :) मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स! =))

http://www.bhagyashree.co.cc/

छोटा डॉन's picture

10 Jun 2009 - 10:56 pm | छोटा डॉन

>>जे सोप्पं जाईल ते करा! मी शीर्षासन करूनच वाचते अँबिग्राम्स!

हरे राम ...!!!
छोट्या छोट्या गोष्टींसाठी लोक किती डोके खाजवतात हे पाहुन आश्चर्य वाटले. कोणी शिर्षासन करुन वाचतो तर कोणी स्क्रीन उलटी फिरवुन वाचतो ....
पण साधे उपाय कुणाला सुचत नाहीत ...

मी एक सुवर्णमध्य देतो ...
काय करायचे की स्क्रीन आहे ती तुर्तास जमिनीशी "४५ डिग्री" अंशाचा कोन करुन सेट करायची, व्यव्स्थीत उभी रहात नसल्यास स्क्रीनला भोके पाडुन त्यात दोर्‍याने ओवुन ती छताशी टांगा, पण कोन हा "४५ डिग्री" हवा.
त्यानंतर तुम्ही स्वतः जमिनीशी "१३५ डिग्री"चा कोन करुन उभे रहा, ते कसे करायचे ते आम्ही नाही सांगणार, सगळे आम्हीच सांगितल्यावर तुम्ही काय करणार
झाले, आहे काय आणि नाही काय ?
हीच प्रक्रिया कोन आपटुपालटुन केली तरी चालते ...

सोप्पं आहे की नाही ?

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवलिया's picture

9 Jun 2009 - 6:38 am | अवलिया

उत्तम परिक्षण.
आवडले, येवु दे अजुन असेच सुरेख लेखन :)

--अवलिया

तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु

घाटावरचे भट's picture

9 Jun 2009 - 6:39 am | घाटावरचे भट

परीक्षण आवडले.

सहज's picture

9 Jun 2009 - 7:15 am | सहज

परिक्षण अतिशय आवडले.

सिनेमा मनोरंजक आहे. ज्यांना मूळ कादंबरी, इतिहास फारशी माहीती नाही त्यांच्यासाठी हे परिक्षण नक्कीच उपयुक्त.

सायली पानसे's picture

9 Jun 2009 - 8:49 am | सायली पानसे

पुस्तक खुपदा वाचलेय पिक्चर पाहिन आता नक्की.
डॅन ब्राउन ची पक्कि फॅन आहे मी.
परिक्षण मस्तच.

बापु देवकर's picture

9 Jun 2009 - 9:19 am | बापु देवकर

परिक्षण आवडले...मेसन्स आणि इल्युमिनाटी च्या लेखाची वाट पाहातोय..

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jun 2009 - 9:47 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

डान्राव फक्कड जमलं आहे परीक्षण! आता पिच्चर पहावा लागणार!

(यँटीम्याटर असं बरणीत कसं भरतात कोण जाणे!)

नंदन's picture

9 Jun 2009 - 11:49 am | नंदन

सहमत आहे. मेझनरीवरील लेखाची वाट पाहतो.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

Nile's picture

9 Jun 2009 - 11:54 am | Nile

नाही! ते बरणीतही(कॅनीस्टर) फ्लोटींगच असतं असंच डॅन म्हणतो! (ह्यावर ही चर्चा केली होती डीस्कव्हरीवाल्यांनी)

छोटा डॉन's picture

9 Jun 2009 - 1:09 pm | छोटा डॉन

नाईलरावांचे म्हणणे बरोबर आहे ...

पुस्तकात वर्णन केल्याप्रमाणे आणि आंतरजालावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे खालील माहिती ह्यासंदर्भात उपयुक्त ठरेल ...

जेव्हा "लार्ज हैड्रोजन कोलायडर"मध्ये अत्यंत गतिमान(अलमोस्ट लाईट स्पीड ) अशा भारीत कणांची ( पोलराईझ्ड बीम्सची ) टक्कर घडवुन आणतात तेव्हा त्यातुन "मॅटर ( जे पॄथ्वीवर सगळीकडे अस्तित्वात आहे)" व "अँटीमॅटर ( ज्याचे अस्तित्व अवकाशात आहे, पॄथ्वीवर ते एकटे सापडणे शक्य नाही )" असे २ पदार्थ तयार होतात.
मग अतिशय उच्च ताकदीच्या व विरुद्ध प्रभार असलेल्या शक्तिशाली चुंबकाचा वापर करुन हे २ कण विरुद्ध दिशेला खेचले जातात की जेणेकरुन त्यांचा संयोग होणार नाही ...

आता कॅनिस्टरबद्दल ...
कॅनिस्टर म्हणजे काय तर एक शुद्ध बरणीच, मात्र ती आहे अतिशुद्ध अशा आयसोटोप्सची. बरणीचे मटेरियल हे "मॅटर"मध्येच मोडते. ह्या बरणीमध्ये अत्य्तंत शक्तिशाली निर्वात पोकळी तयार केली जाती. बरणीच्या २ टोकांना २ शक्तिशाली परंतु परस्परविरोधी प्रभार असलेले इलेक्ट्रोमॅग्नेट्स जोडलेल असतात.
त्यांची मॅग्नेटिक रेडियस करेक्ट कॅनिस्टरच्या केंद्रबिंदुपाशी एकमेकांना छेदते. म्हणजे ह्या बिंदुपाशी जाऊन जर तपासले तर इथे अतिशय उच्च निर्वात पोकळी आहे व दोन्ही बाजुला समान ताकदीने खेचणारे पोलराईझ्ड चुंबकीय क्षेत्र आहे.
जेव्हा "अँटीमॅटर" आत खेचले जाते तेव्हा एकाच बाजुचा प्रभार सुरवातीला सुरु असतो, जेव्हा हे केंद्रबिंदुपाशी येते तेव्हा दुसर्‍या बाजुचा तेवढ्याच शक्तिशाली मात्र विरुद्ध प्रभाराचे चुंबकीय क्षेत्र कार्यान्वित होते ते अँटीमॅटर बरणीच्या केंद्रबिंदुपाशी "सस्पेंडेड" रहाते, ते बरणीला अथवा कुठल्याच मॅग्नेटला स्पर्श करत नाही.

ते बरणीच्या आत "फ्लोटिंग" असते .....
अर्थात ही सर्व क्रिया अतिशीत तापमानातच केली जाते की जेणेकरुन अँटीमॅटरवर असलेला भार त्याच्या साठवणीसाठीच्या पातळीवर येईल...

जेव्हा चुंबकीत क्षेत्र नष्ट होते अथवा बंद केले जाते तेव्हा आतल्या अँटीमॅटरचा बाहेरच्या मॅटरशी संयोग होऊन एक "महास्फोट" होतो त्याला "इनहिलीशन" म्हणातात ....

"पार्टिकल फिजिक्स" हे माझे अभ्यासाचे क्षेत्र नसल्याने एवढीच माहिती मी देऊ शकतो. चु.भु.द्या.घ्या.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Jun 2009 - 2:58 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

म्हणजे त्यासाठी भारीत कणांचाच प्रतिपदार्थ लागेल.

थोडं थोडं समजतंय डान्राव. स्पष्टीकरणाबद्दल धन्यवाद.

आनंदयात्री's picture

10 Jun 2009 - 12:00 pm | आनंदयात्री

लार्ज हैड्रोजन कोलायडर वर केलेला हा अ‍ॅटॅक इल्युमिनाटी किंवा तत्सम गटाचे तर काम नसावे ??

;)

गोगोल's picture

10 Jun 2009 - 11:04 pm | गोगोल

बाकी मी बरेच दिवस तो शब्द लार्ज हार्ड ऑन कोलयडर असा वाचत होतो. एक दिवस चार चौघात जाहीर तसे बोलून दाखवले आणि लाज निघाली ;)

छोटा डॉन's picture

10 Jun 2009 - 11:20 pm | छोटा डॉन

तो शब्द हैड्रोजन नसुन "हैड्रॉन अथवा हैड्रोन" असा हवा आहे.
मुळ प्रतिसादातच माझ्याकडुन चुक झाली होती, नंतर खरडवह्यात चर्चा करताना योग्य शब्द सापडला.
पण उपप्रतिसाद दिला गेल्याने मला मुळ प्रतिसाद संपादित करण्याची सोय राहिली नाही ...

तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

11 Jun 2009 - 9:45 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

तर योग्य शब्द "लार्ज हैड्रॉन कोलायडर" असा आहे.

तुम्हाला हैड्रौन (hadron) म्हणायचं आहे का? ;-)

आमच्यात याचा उच्चार हॅड्रॉन करतात, काही लोकं हॅड्लॉन असंही म्हणतात.

शार्दुल's picture

9 Jun 2009 - 9:57 am | शार्दुल

पुस्तकही वाचेन आणि पिक्चरही पाहीन,,,,

( वाचकांना ह्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट असल्यास मी एक "मेसन्स आणि इल्युमिनाटी" ह्यांच्यावर सखोल भाष्य करणारा लेख टाकेन, अर्थात वेळ आणि गरज ह्यावर सर्व अवलंबुन असेल. मात्र खरोखर जाणण्याची इच्छा असेल तर जरुर लिहीन )
जरुर लिही,,,,

नेहा

विशाल कुलकर्णी's picture

9 Jun 2009 - 10:32 am | विशाल कुलकर्णी

डॉनराव, उत्कंठा वाढवलीत राव्..आता बघायलाच हवा हा सिनेमा.
ठांकु बर्का !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

आमचं नवीन पाडकाम : बोलावणे आले की.... भाग १: http://www.misalpav.com/node/8059
भाग २: http://www.misalpav.com/node/8085

मदनबाण's picture

9 Jun 2009 - 11:06 am | मदनबाण

उत्तम परिक्षण... :)
मी पण सध्या दोन नविन चित्रपट पाहिले.
१)आमिर :-- http://en.wikipedia.org/wiki/Aamir_(film)
२)आयर्न मॅन :-- http://ironmanmovie.marvel.com/
दोन्ही फार वेगळे चित्रपट आहेत...जमल्यास नक्की बघ. :)

मदनबाण.....

Love is a game that two can play and both win.
Eva Gabor

छोटा डॉन's picture

9 Jun 2009 - 11:24 am | छोटा डॉन

अर्थातच आमच्या स्वभावानुसार आम्ही आधी पुस्तक वाचले, नेटवरुन भरमसाठ माहिती गोळा केली आणि मग पिक्चर पाहिला ....
पण मला पिक्चर आणि पुस्तक ह्यांची तुलना नाही करु वाटत, एकाच गोष्टींवर बेतलेल्या असलेल्या तरी ह्या अगदी सर्वस्वी भिन्न गोष्टी आहेत असे मी मानतो ....

शिवाय एवढे क्लिष्ठ आणि महान पुस्तक "फक्त २ तासाच्या सिनेमात" बसवणे म्हणजे त्याच्या पटकथेवर अन्याय होतो, पण ते सहाजिकच आहे त्यामुळे नो ऑफेन्स.
स्वाभाविकच स्क्रीनच्या सोईसाठी चित्रपटात अनेक बदल केले आहेत.

१. पुस्तकात अत्यंत ताकदवान असणार्‍या विट्टोरिया व्हेट्रा इथे चक्क नगाला नग म्हणले तरी चालेल अशी दिसते.
२. सर्नचे प्रमुख मॅक्सम्युलर कोहलरांचे पात्र तर चक्क गायब आहे.
३. हॅसासिन अत्यंत साधा व सरळ दाखवला आहे.
४. पुस्तकात वर्णन केल्याच्या प्रमाणात क्रिप्टेक्स, व्हॅटिकन, सर्न आणि इतर चर्चेसचे डिटेल्स फक्त १० : २ ह्या प्रमाणात दाखवली आहेत, अर्थातच प्रॅक्टिकल लिमीटेशन्स हा मुद्दा महत्वाचा आहे ....
५. चित्रपटात बरीच रहस्ये अगदी सहज उकलतात, पुस्तकात पानेच्या पाने घातली आहेत.
६. चर्चचे कॉन्क्लेव्ह अत्यंत थोडक्यात पण तेवढ्याच प्रभावीपणे दाखवले गेले आहे, त्याचे कौतुक करावेच लागेल.
७. काही सार्वजनिक स्थळीवरचे मॉब शॉटच अत्यंत अप्रतिम ....

असो.
तुलना न करणे उत्तम, दोन्हीही आपापल्या परिघात श्रेष्ठच ...!!!!

एकच सांगतो,शेवटी अत्यंत उंचावरुन शुट केलेला एक "व्हॅटिकन सिटीचा" शॉट आहे, अत्यंत जबरदस्त ....
त्या शॉटसाठी चित्रपट पुन्हा पहायला हरकत नाही ...

अवांतर : मेसन्स, ब्रदरहुड, इल्युमिनाटी आणि चर्च ह्याबद्दलचा लेख शक्य तितक्या लवकर लिहतो. आपल्याला असलेल्या जिज्ञासेबद्दल आभार ....

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

अवांतरः व्हॅटीकनचा सेट उभा केला होता लेकाच्यांनी. :)

लेख येउद्या लवकर.

सुमीत's picture

9 Jun 2009 - 11:29 am | सुमीत

डॉन्या, मस्तच लिहिले आहे. मला वाटले होते की हा चित्रपट थोडासा "डाय हार्ड ३" च्या दिशेने जात असेल पण आतानाही वाटत, बघीतलाच पाहिजे आत हा सिनेमा.
" इल्यु मिनाती" बदल अजून लिहिच, वाट पहात आहे.

स्वाती दिनेश's picture

9 Jun 2009 - 11:32 am | स्वाती दिनेश

डॉन्या,
परीक्षण मस्तच लिहिले आहेस,सिनेमा पाहणार, पहावाच लागणार आता..
स्वाती

मेघना भुस्कुटे's picture

9 Jun 2009 - 12:19 pm | मेघना भुस्कुटे

या लेखाकरता धन्यवाद रे डॉन्या तुला. आता सिनेमा आणि पुस्तक, दोन्ही 'मस्ट' आहेत! इतके दिवस नुसती चालढकल करत होते, आता दोन्ही पाहावंच लागेल!

परिकथेतील राजकुमार's picture

9 Jun 2009 - 12:34 pm | परिकथेतील राजकुमार

वाह डॉनराव वाह !
उच्च परिक्षण, आता लगेच टोरँट डाउनलोडला लावलाच पाहिजे.
तुमच्या पुढील लेखाची आतुरतेनी वाट पाहात आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

ऋषिकेश's picture

9 Jun 2009 - 1:49 pm | ऋषिकेश

हे पुस्तक म्हणजे खरंतर डाविंचीचा "प्रिक्वेल"(पुर्वार्ध?)! मात्र डाविंची नंतर (की मुळे?) प्रसिद्धी मिळालेलं.. माझं हे डाविंचीच्या आधीच वाचून झालं होतं तेव्हाच प्रचंड आवडलं होतं ..
हे पुस्तक वाचलेले असल्याने आणि ते खूप आवडल्याने चित्रपट बघावा की नाहि या द्विधेमधे होतो.
चित्रपट पुस्तक वाचणार्‍यांनाहि आवडलाय हे तुझ्या परिक्षणामुळे कळल्याने आता बघतोच :)

धन्यु!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

संदीप चित्रे's picture

9 Jun 2009 - 10:28 pm | संदीप चित्रे

पण आता सिनेमा बघावा म्हणतोय.
लेखासाठी धन्स रे डॉन्या...

अवांतर -- 'दा विन्ची कोड' जर ऑडियो बुक स्वरूपात मिळाले तर जरूर ऐका... पुस्तक 'वाचून कसे दाखवावे' ह्याचा उत्तम धडा आहे:)
त्याचप्रमाणे हॅरी पॉटर सिरीजमधल्या कुठल्याही पुस्तकाचे ऑडियो बुक.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्रियाली's picture

10 Jun 2009 - 5:34 am | प्रियाली

पुस्तक फार मागेच वाचले होते. ऐकलेही होते. चित्रपटही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. दा विन्चीपेक्षा जास्त आवडला. दा विन्चीही फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला होता. ;)

सध्या डॅन ब्राऊनचे नवे पुस्तक द लॉस्ट सिम्बल बुक करून ठेवले आहे. सप्टेंबरात मिळेल.

मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही.

असो. त्याने चित्रपटाला वेगळी खुमारी आली असती.

छोटा डॉन's picture

10 Jun 2009 - 11:16 am | छोटा डॉन

मूळ पुस्तकात असणारा सर्नचा अपंग प्रमुख आणि शेवटचे मुख्य रहस्य (ते ज्यांनी पुस्तक वाचले नाही त्यांच्या समोर उघड करणे योग्य नाही) चित्रपटात का गाळले गेले आहे याचा उलगडा झाला नाही.

अगदी करेक्ट प्रियालीताई, माझी चित्रपट पाहुन बाहेर आल्यावर फर्स्ट रिअ‍ॅक्शन अशीच होती.
सर्नचा प्रमुख मॅक्सम्युलर कोह्लर दाखवायला हवा होता, मजा आली असती ...
बाकी शेवटच्या रहस्याबाबत लिहणे योग्य नाही, की कसेबसे ते आवरतो आहे, चित्रपटात पहाणेच योग्य .....

मात्र हा चित्रपट व्यक्तिरेखांच्या बांधणीत जरासा कमी पडतो, अपवाद फक्त "केमरलिंगो"ची व्यक्तिरेखा. दा विंची कोड मध्ये जसे सर ली टिबींग, बेझु फाश, फादर अरिंगारोझा, खुनी सिलास जसे व्यवस्थित रंगवले गेले आहेत त्याची साफ कमी इथे जाणवते ...
शिवाय दा विंची मध्ये जसा "फ्लॅशबॅकचा" प्रभावी वापर करून "प्रायरी, ब्रदरहुड, टेम्पलर" वगैरे दाखवले होते व इतिहास सांगितला होता तसे इथे काहिच नाही. जर फ्लॅशबॅकचा वापर "इल्युमिनाटी" व त्यांचा इतिहास दाखवण्यासाठी केला असता तर पिक्चर नक्की अजुन भारी झाला असता ...
असो.

------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

सचीन जी's picture

10 Jun 2009 - 12:05 pm | सचीन जी

डॅन ब्राउन मस्तच लिहतो. मला त्याचे "डीजीटल फोर्ट्रेस" सगळयात जास्त आवडले. चार पुस्तकानंतर डॅन ब्राउनचे नवीन पुस्तक आलेच नाही. कोणाला माहीत आहे का पाचवे पुस्तक कधी येणार ते?

भाग्यश्री's picture

10 Jun 2009 - 10:11 pm | भाग्यश्री

वर प्रियालीने लिहीले आहे ना.. "लॉस्ट सिम्बॉल" सप्टेंबरात येते आहे..

http://www.bhagyashree.co.cc/

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Jun 2009 - 2:46 pm | बिपिन कार्यकर्ते

वा!!! लै भारी डान्राव. लेख आणि नंतर आलेली माहीती पण. पुस्तक वाचणं जमेल की नाही माहित नाही. चित्रपट बघावाच लागेल. टॉरेंट हाय का कुनाकडं?

बिपिन कार्यकर्ते