जवाबः शहरातला आणि खेड्यातला मुलगा

३_१४ विक्षिप्त अदिती's picture
३_१४ विक्षिप्त अदिती in जे न देखे रवी...
21 May 2009 - 8:25 pm

पाषाणभेद यांनी शहर किती वाईट आणि खेडं किती चांगलं हे इथे सांगितलं आणि मग मी विचार केला का बरं लोकं एवढं चांगलं खेडं सोडून शहरात येत असतील? नारायणगावच्या आसपास किंवा, ट्रेकच्या निमित्ताने अधूनमधून पाहिलेली खेडी माझ्या शहरी नजरेला अशी दिसली!

असेल तुझ्याकडे टीव्ही तरी
घरी तुझ्या वीज असते काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खात असशील तू भाकरी तरी
बरोबर भाजी मिळते काय?

नाय बॉ नाय नाय बॉ नाय

असेल तुझ्या गावात शाळा तरी
शाळेत शिक्षक असतात काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असेल तुझ्याकडे खेळायला जागा तरी
शेतकामातून फुरसत मिळते काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असेल तुझ्या गावात नदी तरी
पाणी तिचे आहे शुद्ध काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

खाते मी मंडईतले तरी आंबे
कधी तू हापूस चाखलास काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

असेल तुझ्या शिवारात खिल्लार तरी
दूध तुला प्यायला मिळते काय?

नाय रे नाय, नाय रे नाय

शहरात आहे माझ्या त्रासच फार
पण खेड्यात पोटाला मिळतं काय?

काहीच नाय, काहीच नाय!

मांडणीप्रकटनविचारवादविरंगुळा

प्रतिक्रिया

Dhananjay Borgaonkar's picture

21 May 2009 - 8:39 pm | Dhananjay Borgaonkar

अदिति तुझ खरच उत्तम observation आहे.
लैईईईए भारी...येउदे अजुन.

बिपिन कार्यकर्ते's picture

21 May 2009 - 8:42 pm | बिपिन कार्यकर्ते

मस्तच आहे. विडंबन. पण सत्याच्या खूप जवळचे.

बिपिन कार्यकर्ते

निखिल देशपांडे's picture

21 May 2009 - 8:55 pm | निखिल देशपांडे

असेच म्हणतो....
मस्त आहे विडंबन पण तेव्हढेच सत्य व स्वतंत्र कविता म्हणुन चालु शकणारे

==निखिल

टारझन's picture

21 May 2009 - 9:39 pm | टारझन

वा वा वा !!! यमी ताई ... झक्कास हो ... चालू द्या :)

मदनबाण's picture

21 May 2009 - 8:47 pm | मदनबाण

विडंबन आणि पाषाणभेद यांची कविता दोन्ही आवडले.

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

प्राजु's picture

21 May 2009 - 8:52 pm | प्राजु

१००% खरं आहे.
आवडली कविता. विडंबन नाही म्हणणार याला. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वामि's picture

21 May 2009 - 9:03 pm | स्वामि

सत्याच्या खूप जवळ जाणारी पण वास्तव याहूनही दाहक आहे.
आहे तुला मतदानाचा अधिकार जरी
मत तुला देता येते काय

आहे मत मांडायचे स्वातंत्र्य जरी
प्रशासनासमोर तुझे चालते काय

आहेत शाहू फुले आंबेडकर जरी
जात टाळून तुला जगता येते काय

असशील लाख बुद्धीवान तु
तुझ्या हुशारीला कोणी विचारतय काय

वाटल्या जरी स्पर्धापरीक्षा द्याव्या
मार्गदर्शन तुला कोणी करतय काय

दिवसाला पन्नास रुपये मजुरी मिळवून
तुला सुखाची झोप लागु शकते काय

या सगळ्या मध्ये मी नाय रे नाय टंकायची गरज आहे का?

ही नवीन विचार पटवून सांगणारी कविता आहे. फारच छान.

वाटल्यास पाषाणभेद यांच्या सवाल-कवितेला जवाबी-कविता म्हणावी. माझ्या मते हे विडंबन नव्हे. (अर्थात विडंबनाची नेमकी व्याख्या काय आहे, ते मला ठाऊक नाही.)

सुनील's picture

21 May 2009 - 9:29 pm | सुनील

(कंस काढायला हरकत नाही)
१००% सहमत.

फार तर शीर्षक बदलून - "शहरी आणि खेड्यातला मुलगा", असे देता येईल!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विनायक प्रभू's picture

22 May 2009 - 7:44 am | विनायक प्रभू

असेच म्हणतो

मेघना भुस्कुटे's picture

22 May 2009 - 9:17 am | मेघना भुस्कुटे

अगदी. खूप मस्त आहे जबाब. खेडं म्हणजे निर्मळ, सुंदर, निरोगी, बाय डिफॉल्ट ग्रेट हे जे काही समज असतात लोकांचे, त्यांना एकदम धोबीपछाड घातलाय. मजा आली!

शाल्मली's picture

21 May 2009 - 9:42 pm | शाल्मली

प्रत्येक कडवं पटतंय.
मस्त आधारित कविता.

मूळ कविताही आवडली.

--शाल्मली.

श्रावण मोडक's picture

21 May 2009 - 9:45 pm | श्रावण मोडक

कविता म्हणून प्रयत्न चांगला. त्यात मांडलेला अर्थ मात्र आशयपूर्ण आहे. सत्य आहे आणि म्हणून कटूही आहे.

रेवती's picture

21 May 2009 - 10:06 pm | रेवती

अगदी हेच मनात आलं पाषाणभेदसाहेबांची कविता वाचून.
अदिती, खूपच छान कविता.
('जवाब' हा शब्द वाचून तमाशामधले सवाल जवाब आठवले....खरं तर त्यांचा इथे संबंध नाही.)

रेवती

सूर्य's picture

21 May 2009 - 10:21 pm | सूर्य

सही जवाब :)

- सूर्य.

मीनल's picture

21 May 2009 - 10:34 pm | मीनल

ही अधिक वास्तविक वाटली.
पण पाषाणभेद यांची ही आवडली होती कविता.
मीनल.

लिखाळ's picture

21 May 2009 - 11:00 pm | लिखाळ

अदिती,
तुझ्या नीरिक्षणावर, अनुभवावर बेतलेली कविता फार आवडली.
कवितेतले वास्तव मात्र खिन्न करणारे आहे.

-- लिखाळ.

आनंदयात्री's picture

22 May 2009 - 9:10 am | आनंदयात्री

लिखाळरावांशी सहमत आहे. प्रतिकविता कारुण्यपुर्ण आहे.

स्वानन्द's picture

21 May 2009 - 11:09 pm | स्वानन्द

वा वा!

क्रान्ति's picture

21 May 2009 - 11:29 pm | क्रान्ति

अदिती, कमाल आहेस तू! काय लिहिलंस ग! शब्द न शब्द सही! कविता आवडली, वस्तुस्थिती पटली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा

भडकमकर मास्तर's picture

21 May 2009 - 11:45 pm | भडकमकर मास्तर

एकदम जमली आहे कविता.. :)

स्वामि चे वास्तवही दाहक.....
_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

मुक्तसुनीत's picture

21 May 2009 - 11:47 pm | मुक्तसुनीत

मला पाषाणभेद यांची मूळ कविता भाबडी वाटली. खेडे फक्त रम्यच आहे ; खेडेच केवळ रम्य आहे अशा प्रकारची विधाने भाबडी आणि स्वप्नरंजनात्मक असे म्हणायला हरकत नाही. प्रस्तुत "जवाबी" कविता या भाबडेपणाच्या पार्श्वभूमीवर सत्याचे दर्शन जरूर घडविते. पण त्यातला "टुकटुक" करण्याचा टोन थोडा खटकलाच. कवयत्रीला असे चिडवून दाखविणे अभिप्रेत नसावे. पण असा परिणाम प्रस्तुत कवितेतून (नकळत) निर्माण होतो ; जो अयोग्य ठरतो.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 May 2009 - 6:05 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या.

मूळ कवितेत आईस्क्रीम आणि बोरं यांची तुलना मात्र अवाजवी वाटली, मला दोन्ही गोष्टी आपापल्या जागी आवडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या कवितेचा विचार केला.
पण ही कविता वाचून फक्त 'आवडली' अशा प्रकारचे प्रतिसादही टोचून गेले.

मराठी_माणूस's picture

22 May 2009 - 8:36 am | मराठी_माणूस

शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं

ह्याचे कारण कवितेतल्या प्रत्येक 'प्रश्ना'त दडलेले आहे.

सहज's picture

22 May 2009 - 8:44 am | सहज

>शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या.

विचार योग्यच. तरीही एकंदरीत दोन्ही कविता जरा करुणच.

विकास's picture

22 May 2009 - 9:03 am | विकास

>>>तरीही एकंदरीत दोन्ही कविता जरा करुणच.

मान्य

नितिन थत्ते's picture

22 May 2009 - 11:14 am | नितिन थत्ते

>>चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही.

चिडवून दाखवणे अभिप्रेत नसणारच. एक म्हणजे मूळ कविताही खरोखरच्या खेडुताने लिहिलेली नसावी. आपण सारेच जण शहरी असून खेडेगावाविषयी एक प्रकारची उत्सुकता ठेवून असतो. ही कविता खरोखरच्या खेडुताला ऐकवली तर त्याला हिणवल्यासारखे वाटू शकेल (त्याचवेळी खरोखरच्या खेडूताला मूळ कविता वाचूनही आनंद होणार नाही)

खराटा
(रंग माझा वेगळा)

ऋषिकेश's picture

21 May 2009 - 11:48 pm | ऋषिकेश

मस्त! कोणीतरी सत्य मांडलं की छानच वाटत

ऋषिकेश
------------------
प्रेमात पडण्यासाठी गुरुत्वाकर्षणाची काय आवश्यकता? ;)

चन्द्रशेखर गोखले's picture

22 May 2009 - 6:52 am | चन्द्रशेखर गोखले

ही एक स्वतंत्र कविता आहे अस वाटलं . मुळात पाषाणभेद यांची कविता वाचलेली नव्हती आणि आदितीच्या प्रस्तावनेकडे ही लक्ष गेलं नाही त्यामुळे हा परिणाम झाला . खुप छान तसेच प्रखर वास्तव साध्या सोप्या शब्दात परिणामकारकरित्या मांडण्यात आलेले आहे !

अवलिया's picture

22 May 2009 - 8:15 am | अवलिया

वा! मस्त !!

--अवलिया

आनंद घारे's picture

22 May 2009 - 9:00 am | आनंद घारे

मला दोन्ही कविता चांगल्या वाटल्या. 'आहेरे' आणि 'नाहीरे' अशा दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही ठिकाणी राहतात. एकीकडचा 'आहेरे' वर्ग आणि दुसरीकडचा 'नाहीरे 'वर्ग यांची तुलना केल्यास त्यातली आहेरे वर्गाची बाजू चांगली वाटणारच. त्यांची सरासरी काढली तर शहराची बाजू सध्या जड वाटते, त्यामुळे खेड्यातून शहराकडे माणसांचे लोंढे येत आहेत, पण ही परिस्थिती बदलायला पाहिजे.

आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/

दशानन's picture

22 May 2009 - 9:14 am | दशानन

ख त रा !

जबरदस्त यमे !
आवडली कविता.... विडंबन नाही तर कविता म्हणूनच आवडली.

थोडेसं नवीन !

सँडी's picture

22 May 2009 - 9:17 am | सँडी

कवितेतील शब्द मस्त!

वरील स्थिती शहर-खेडं यातील नव्हे तर गरीब श्रीमंतामधील दरी दाखविते असे वाटते.

अवांतरः
आजकाल शहरातही वरिल स्थिती दिसुन येते.
(कवितेतील ओळींनुसार क्रमाने:)

विजेचे भारनियमन.
स्नॅक्स ने घेतलेली भाजी-भाकरीची जागा.
'महागलेले' शिक्षण.
बिल्डर/राजकारणी लोकांनी बळकावलेली खेळाची मैदाने.
फुटलेल्या व अशुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या जलवाहिन्या.
(खेड्यातुनच येणारा हापूस.)
खेड्यातुनच येणारे (पण शहरात आल्यानंतर भेसळयुक्त होणारे) दुध.
शहरातही पोटापाण्यासाठी वणवण करणारेही भरपुर.

अमोल केळकर's picture

22 May 2009 - 9:22 am | अमोल केळकर

दोन्ही कविता सद्य परिस्थितीची जाणीव करुन देणार्‍या आहेत
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

दिपक's picture

22 May 2009 - 9:38 am | दिपक

दाहक सत्य. प्रत्येक ओळीतुन एकवीसाव्या शतकातही खेडे अजुनही किती मागासलेले आहे हे मांडले आहे. अप्रतिम !

अदितीताईंचे आणि त्यांना एवढी सुंदर कविता करण्याची प्रेरणा मिळाली म्हणुन पाषाणभेद या दोघांचे आभार. :)

अरुण वडुलेकर's picture

22 May 2009 - 10:16 am | अरुण वडुलेकर

जवाब नहीं|

गावाकडाच्या लोकांचे प्रॉब्लेम्स शहरातल्या लोकाना कळणार नाहीत.
पुणे मुम्बै सारख्या शहरात जहिरातींचे बोर्ड्स ढणाढणा वीज जाळत असतात्.पण गावाकडे लोडशेडिंगच्या नावाखाली पाणीपुरवठाकरणारी भरायलादेखील वीज नसते. पीठाची गिरणी सुद्धा बंद असते.मुलांना अभ्यास करण्यासाठीही उजेड नसतो.
शिक्षणाचा दर्जा काय असतो हे कुठल्यही खेड्यात गेल्यावर कळते. बायका मुलीना दोन घागरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.
शेतीसाठी वीज लागतच नाही असे सरकारला वाटत असावे.
आरोग्य सेवेबद्दल तर बोलायलाच नको.
शहरातल्या मुलाना जे सुखासुखी सहज मिळते ते मिळवण्यासाठी खेड्यातल्या मुलाना जिवाचा आटापिटा करावा लागतो.

भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही

मराठमोळा's picture

22 May 2009 - 10:37 am | मराठमोळा

दोन्ही कविता आपआपल्या जागी बरोबर आहेत.
शहर आणी गाव दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणी तोटे आहेत. पण शेवटी माणसाला हवे असते ते समाधान आणी आनंद. काहींना गावात मिळतो तर काहींना शहरात तर काहींना कुठेच नाही. हे चालायचेच.

पाषाणभेद यांची कविता शहरी माणसांना न मिळणारा आनंद दाखवते तर अदितींची कविता त्याउलट खेड्यातले तोटे, त्यामुळे या दोन्ही कवितांची तुलना करणे योग्य ठरणार नाही.

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

स्नेहश्री's picture

22 May 2009 - 11:12 am | स्नेहश्री

कवित झक्कस आहे. पुर्वी आईने वाढदिवसाला "विजया वाड"यांचे एक छोटे "झिप्री" नावाचे पुस्तक घेवुन दिले होते.
तुझी कविता वाचुन "झिप्री आणि सोहा" ची आठवण झाली.
कविता खरच छान आहे.

--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी

परिकथेतील राजकुमार's picture

22 May 2009 - 11:25 am | परिकथेतील राजकुमार

एकानी ग्रामीण नजरेतुन दिसणारे शहर दाखवले आहे तर एकाने शहरी नजरेतुन खेड्याकडे बघितले आहे.

शेवटी अंदाज अपना अपना हेच खरे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

वेताळ's picture

22 May 2009 - 12:51 pm | वेताळ

वास्तववादी कविता आहे तुझी. मनाला सगळे पटते
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ