सत्याच्या खूप जवळ जाणारी पण वास्तव याहूनही दाहक आहे.
आहे तुला मतदानाचा अधिकार जरी
मत तुला देता येते काय
आहे मत मांडायचे स्वातंत्र्य जरी
प्रशासनासमोर तुझे चालते काय
आहेत शाहू फुले आंबेडकर जरी
जात टाळून तुला जगता येते काय
असशील लाख बुद्धीवान तु
तुझ्या हुशारीला कोणी विचारतय काय
वाटल्या जरी स्पर्धापरीक्षा द्याव्या
मार्गदर्शन तुला कोणी करतय काय
दिवसाला पन्नास रुपये मजुरी मिळवून
तुला सुखाची झोप लागु शकते काय
या सगळ्या मध्ये मी नाय रे नाय टंकायची गरज आहे का?
ही नवीन विचार पटवून सांगणारी कविता आहे. फारच छान.
वाटल्यास पाषाणभेद यांच्या सवाल-कवितेला जवाबी-कविता म्हणावी. माझ्या मते हे विडंबन नव्हे. (अर्थात विडंबनाची नेमकी व्याख्या काय आहे, ते मला ठाऊक नाही.)
(कंस काढायला हरकत नाही)
१००% सहमत.
फार तर शीर्षक बदलून - "शहरी आणि खेड्यातला मुलगा", असे देता येईल!
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
अगदी हेच मनात आलं पाषाणभेदसाहेबांची कविता वाचून.
अदिती, खूपच छान कविता.
('जवाब' हा शब्द वाचून तमाशामधले सवाल जवाब आठवले....खरं तर त्यांचा इथे संबंध नाही.)
रेवती
अदिती, कमाल आहेस तू! काय लिहिलंस ग! शब्द न शब्द सही! कविता आवडली, वस्तुस्थिती पटली.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***
अग्निसखा
मला पाषाणभेद यांची मूळ कविता भाबडी वाटली. खेडे फक्त रम्यच आहे ; खेडेच केवळ रम्य आहे अशा प्रकारची विधाने भाबडी आणि स्वप्नरंजनात्मक असे म्हणायला हरकत नाही. प्रस्तुत "जवाबी" कविता या भाबडेपणाच्या पार्श्वभूमीवर सत्याचे दर्शन जरूर घडविते. पण त्यातला "टुकटुक" करण्याचा टोन थोडा खटकलाच. कवयत्रीला असे चिडवून दाखविणे अभिप्रेत नसावे. पण असा परिणाम प्रस्तुत कवितेतून (नकळत) निर्माण होतो ; जो अयोग्य ठरतो.
चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही. शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या.
मूळ कवितेत आईस्क्रीम आणि बोरं यांची तुलना मात्र अवाजवी वाटली, मला दोन्ही गोष्टी आपापल्या जागी आवडतात, त्यामुळे अशा प्रकारच्या कवितेचा विचार केला.
पण ही कविता वाचून फक्त 'आवडली' अशा प्रकारचे प्रतिसादही टोचून गेले.
शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं
ह्याचे कारण कवितेतल्या प्रत्येक 'प्रश्ना'त दडलेले आहे.
>शहरात खरोखर लोकांनी येऊन रहावं असं काही नाही तरीही प्रचंड प्रमाणात खेड्यांकडून शहराकडे स्थलांतर होताना दिसतं. ते का याचा विचार करताना दिसलेल्या काही गोष्टी मांडल्या.
विचार योग्यच. तरीही एकंदरीत दोन्ही कविता जरा करुणच.
>>चिडवून दाखवणे अजिबात अभिप्रेत नाही.
चिडवून दाखवणे अभिप्रेत नसणारच. एक म्हणजे मूळ कविताही खरोखरच्या खेडुताने लिहिलेली नसावी. आपण सारेच जण शहरी असून खेडेगावाविषयी एक प्रकारची उत्सुकता ठेवून असतो. ही कविता खरोखरच्या खेडुताला ऐकवली तर त्याला हिणवल्यासारखे वाटू शकेल (त्याचवेळी खरोखरच्या खेडूताला मूळ कविता वाचूनही आनंद होणार नाही)
खराटा
(रंग माझा वेगळा)
ही एक स्वतंत्र कविता आहे अस वाटलं . मुळात पाषाणभेद यांची कविता वाचलेली नव्हती आणि आदितीच्या प्रस्तावनेकडे ही लक्ष गेलं नाही त्यामुळे हा परिणाम झाला . खुप छान तसेच प्रखर वास्तव साध्या सोप्या शब्दात परिणामकारकरित्या मांडण्यात आलेले आहे !
मला दोन्ही कविता चांगल्या वाटल्या. 'आहेरे' आणि 'नाहीरे' अशा दोन्ही प्रकारचे लोक दोन्ही ठिकाणी राहतात. एकीकडचा 'आहेरे' वर्ग आणि दुसरीकडचा 'नाहीरे 'वर्ग यांची तुलना केल्यास त्यातली आहेरे वर्गाची बाजू चांगली वाटणारच. त्यांची सरासरी काढली तर शहराची बाजू सध्या जड वाटते, त्यामुळे खेड्यातून शहराकडे माणसांचे लोंढे येत आहेत, पण ही परिस्थिती बदलायला पाहिजे.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
कवितेतील शब्द मस्त!
वरील स्थिती शहर-खेडं यातील नव्हे तर गरीब श्रीमंतामधील दरी दाखविते असे वाटते.
अवांतरः
आजकाल शहरातही वरिल स्थिती दिसुन येते.
(कवितेतील ओळींनुसार क्रमाने:)
विजेचे भारनियमन.
स्नॅक्स ने घेतलेली भाजी-भाकरीची जागा.
'महागलेले' शिक्षण.
बिल्डर/राजकारणी लोकांनी बळकावलेली खेळाची मैदाने.
फुटलेल्या व अशुद्ध पाणी पुरवठा करणार्या जलवाहिन्या.
(खेड्यातुनच येणारा हापूस.)
खेड्यातुनच येणारे (पण शहरात आल्यानंतर भेसळयुक्त होणारे) दुध.
शहरातही पोटापाण्यासाठी वणवण करणारेही भरपुर.
दाहक सत्य. प्रत्येक ओळीतुन एकवीसाव्या शतकातही खेडे अजुनही किती मागासलेले आहे हे मांडले आहे. अप्रतिम !
अदितीताईंचे आणि त्यांना एवढी सुंदर कविता करण्याची प्रेरणा मिळाली म्हणुन पाषाणभेद या दोघांचे आभार. :)
गावाकडाच्या लोकांचे प्रॉब्लेम्स शहरातल्या लोकाना कळणार नाहीत.
पुणे मुम्बै सारख्या शहरात जहिरातींचे बोर्ड्स ढणाढणा वीज जाळत असतात्.पण गावाकडे लोडशेडिंगच्या नावाखाली पाणीपुरवठाकरणारी भरायलादेखील वीज नसते. पीठाची गिरणी सुद्धा बंद असते.मुलांना अभ्यास करण्यासाठीही उजेड नसतो.
शिक्षणाचा दर्जा काय असतो हे कुठल्यही खेड्यात गेल्यावर कळते. बायका मुलीना दोन घागरी पाण्यासाठी वणवण भटकावे लागते.
शेतीसाठी वीज लागतच नाही असे सरकारला वाटत असावे.
आरोग्य सेवेबद्दल तर बोलायलाच नको.
शहरातल्या मुलाना जे सुखासुखी सहज मिळते ते मिळवण्यासाठी खेड्यातल्या मुलाना जिवाचा आटापिटा करावा लागतो.
भर दुपारी उन्हात फिरताना तुम्हाला वळीवाच्या भिजलेल्या क्षणांची आठवण येत नसेल तर समजा की आयुष्यात तुम्ही रणरणत्या उन्हाची काहीली अनुभवलेलीच नाही
दोन्ही कविता आपआपल्या जागी बरोबर आहेत.
शहर आणी गाव दोन्हींचे वेगवेगळे फायदे आणी तोटे आहेत. पण शेवटी माणसाला हवे असते ते समाधान आणी आनंद. काहींना गावात मिळतो तर काहींना शहरात तर काहींना कुठेच नाही. हे चालायचेच.
पाषाणभेद यांची कविता शहरी माणसांना न मिळणारा आनंद दाखवते तर अदितींची कविता त्याउलट खेड्यातले तोटे, त्यामुळे या दोन्ही कवितांची तुलना करणे योग्य ठरणार नाही.
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
कवित झक्कस आहे. पुर्वी आईने वाढदिवसाला "विजया वाड"यांचे एक छोटे "झिप्री" नावाचे पुस्तक घेवुन दिले होते.
तुझी कविता वाचुन "झिप्री आणि सोहा" ची आठवण झाली.
कविता खरच छान आहे.
--@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@--
आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी
दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी
पण खुप काही देउन जातात हे
आयुष्यात पुढे जाण्यासाठी
ऊत्तम
छान!!!
छान!!!
वा वा वा !!!
विडंबन आणि
१००% खरं
फार छान
हे विडंबन नाही - (कंस काढायला हरकत नाही)
+१
१+
अगदी. खूप
छान!
प्रयत्न
अगदी हेच
सही जवाब -
वास्तविक
अदिती, तुझ्
सहमत
वा वा!
सलाम!
एकदम जमली
प्रतिक्रिया
चिडवून
शहरात
+१
मान्य
>>चिडवून
वा!!
वास्तव...
वा! मस्त !!
मला दोन्ही
ख त रा
कवितेतील
दोन्ही
दाहक
भन्नाट
गावाकडाच्या लोकांचे प्रॉब्लेम्स
दोन्ही
झिप्री.....
एकानी
खरच आहे अदिती तुझे