'रमलप्रतिमा (भाग २) अर्थात नवीन काही AI चित्रे ( Prompt सह)

चित्रगुप्त's picture
चित्रगुप्त in जनातलं, मनातलं
17 Jun 2024 - 10:02 pm

यापूर्वीच्या सांजशकुनाच्या रमलप्रतिमा: एक नवाच उद्योग (भाग-१) दिलेल्या चित्रांनंतर गेल्या काही दिवसात आणखी बरेच प्रयोग केले, त्यापैकी काही चित्रे:

चित्र १.
.

चित्र २.
.
A cinematic view of a picturesque landscape featuring an ancient castle in greek architectural style. The castle, standing majestically atop a huge cliff is surrounded by thick forest of various kind of trees and bushes. a pond reflects the castle. The sky above is dark, cloudy with morning sun, 3d render, cinematic

चित्र ३.
.

चित्र ४.
.
प्रॉम्प्टः amazon warriors with long golden brown hair draped in fur and deer skin clothes attacking a gigantic monster with their spears and swords. a thick forest with cliffs and a great cascade in the background. evening sun illuminates the scene. 3d render, cinematic, photo

चित्र ५.
.
a dark fantasy picture featuring a mysterious woman in white saree holding a burning candle slowly walks on a dark mysterious forest track. a foggy back ground and dark cloudy sky. fearful ruins in the background forest., 3d render, cinematic

चित्र ६.
.
a jungle girl with clothings made of fur and deer skin fighting a lion in shallow water surrounded by forest at sunset. there is a cascade and a huge oak tree with twisted branches at distance. there are rocks and cliffs in the background. thick creepers hanging from the trees. a deadly crocodile with open jaw approaches the girl in water and an elephant in distance. golden evening glow dominates the scene., 3d render, cinematic, illustration, photo, dark fantasy

चित्र ७.
.
A 3D cinematic rendition of a magical forest scene. A massive oak tree dominates the landscape, with twisted branches. a beautiful girl with long black hair in ancient greek attire sits under the tree playing enchanting melodies on harp. Beneath the tree, a pristine water pond mirrors the scene and is home to a couple of graceful swans. The backdrop features a serene morning sky with clouds, a distant waterfall, and dramatic cliffs. all bathed in a glowing golden light.

चित्र ८.
.
cloudy dark sunset. huge cliffs and trees in far distance. a forest with different types of twisted trees. a cascade running though rocks. a narrow trail running from the bottom of image to the cliffs at a long distance. a small pond with reflections near the cascade. ancient hindu temple at distance. a Thai Apsara with gold ornaments and crown dancing in the forest. the whole atmosphere is bathed in a golden glow.

चित्र ९.
.
प्रॉम्प्टः A captivating image depicting an ancient hindu king with a gold crown and full gold ornaments walking through the bustling streets of ancient hindu temple compex. Surrounded by hindu women, men, peacocks and elephants. he exudes wisdom and authority. His subjects admire and respect him, The scene is bathed in warm, golden light, and the architecture and clothing styles convey a sense of hindu antiquity and grandeur., illustration, 3d render, cinematic

चित्र १०.
.
A stunning 3D render of seven hindu goddess-like women wearing full ornaments and flowers, each in different poses - standing, sitting, and walking along a lush jungle trail. The pond nearby reflects their ethereal beauty and the grand trees with twisted branches create a mystical atmosphere. The cloudy evening sky emits a warm, golden light that illuminates the distant cliffs and spreads a soft glow across the entire scene., cinematic, 3d render

चित्र ११.
.
A stunning 3D render of seven Greek goddess-like women in draped garments, each in different poses - standing, sitting, and walking along a lush jungle trail. The pond nearby reflects their ethereal beauty and the grand trees with twisted branches create a mystical atmosphere. The cloudy evening sky emits a warm, golden light that illuminates the distant cliffs and spreads a soft glow across the entire scene., 3d render, cinematic

चित्र १२.
.
HINDU BHARATANATYAM DANCER WITH a beautiful smiling face SILK SAREE AND FULL ORNAMENTS DANCING near an ancient hindu temple complex . a lake, mountains, waterfall in background. coudy morning sky, sunrise., photo, illustration, 3d render, cinematic

चित्र १३.
.

a 15th century Italian young woman with long golden brown hair is standing on a huge cliff, looking at various roman ruins in a valley beneath. there are many trees, a cascade, stream, rocks and bushes in the valley. sky is cloudy with setting sun which radiates a golden glow in the valley. we see her from the back . she wears corse clothes with pastel shades. we see her from back with her face in profile view. she touches her long hair flying with wind., 3d render, cinematic

चित्र १४.
.
A classical European-style oil painting set in the Roman era, where five graceful women with long, dark brown hair and smiling faces dance among ancient corinthian style pillars and other ruins. Dressed in corse renaissance style garments in shades of brown, blue, green, gray, and pale yellow, they exude elegance and charm. many Umbrella pine trees with numerous branches dot the landscape, The sky is a cloudy but a golden glow illuminates the scene, casting a warm and inviting atmosphere. In the distance, roman aqueduct , huge cliffs and and hills can be seen. cinematic, 3d render.

चित्र १५.
.
A stunning 3D render of Leonardo da Vinchi diligently painting the portrait of Mona Lisa sitting in front of him. Leonardo, who is depicted from behind, immersed in his work. The artist's wooden easel and palette are intricately detailed, and the soft, ambient light filters in through an old-fashioned window, illuminating the model while casting the artist into darkness. The interior is filled with rustic charm, and the picturesque mountain landscape behind Mona Lisa with a cascade and a massive tree can be seen through the window, adding a sense of serenity to this cinematic scene., cinematic, 3d render

चित्र १६.
.
A captivating and cinematic 3D render illustrates the enchanting scene of five curvaceous Hindu women in minimalist attire, adorned with delicate flower garlands. They gracefully dance amidst the shadows of a twisted forest, creating a mystical aura. In the distance, a serene waterfall cascades, and ancient Hindu temples and towering cliffs stand amidst the mist. The sky above, filled with a soft, golden glow, casts a dreamlike ambiance over the entire scene, as if these women are immersed in a magical realm. Their fluid, mesmerizing movements evoke a sense of timeless, ethereal beauty., 3d render, cinematic

चित्र १७.
.
A captivating, cinematic illustration of seven beautiful Hindu women in traditional hindu clothes and ornaments dancing forming a circle gracefully under a big banyan tree surrounded by twisted trees, a babbling stream with rocks, and peacocks on green grass. The sky above is filled with soft, gray clouds, with ancient temples visible in the distance. The overall atmosphere is serene and magical, as if the women are immersed in a dream-like landscape., 3d render, cinematic

चित्र १८.
.
A captivating, cinematic illustration of five beautiful, curvy french women in elaborate 15th century clothings and dancing gracefully in a lush forest surrounded by twisted trees, a waterfall in distance and a stream.The sky is cloudy and colorful. it is filled with soft, golden glow. there are ancient greek temples and cliffs visible in the distance. The overall atmosphere is serene and magical, as if the women are immersed in a dream-like landscape., 3d render, cinematic

चित्र १९.
.
BEAUTIFUL HINDU WOMAN WALKING ON A NARROW FOREST TRAIL SUROUNDED BY hanging branches of TREES, A STREAM WITH ROCKS, GRASS, CLOUDY EVENING SKY TEMLES IN DISTANCE, photo, illustration, cinematic, poster

चित्र २०.
.

लिओनार्दोच्या या चित्रासाठी खूप वेगवेगळे निर्देश लिहून अनेक चित्रे करावी लागली. शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले.

सर्वसाधारणपणे असे म्हणता येईल की माझ्या आवडीच्या विषयांपैकी निसर्गदृष्ये, इमारती, झाडे, आकाश वगरेंचे चित्रण कृत्रीम बुद्धीमत्तेस चांगले करता येत असले, तरी अजून व्यक्तिचित्रणात तेवढी सफाई येत नाही. ( इथे दिलेली चित्रे त्यातल्या त्यात बरी निवडून दिली आहेत. याखेरीज अगदीच वाईट आलेली खूप चित्रे आहेत) या विषयातले माझे हे अगदी प्राथमिक प्रयोग आहेत, जाणकारांनी मार्गदर्शन करावे, ही विनंती.
(क्रमशः)

संस्कृतीकलासाहित्यिकअनुभवमाहितीविरंगुळा

प्रतिक्रिया

भागो's picture

17 Jun 2024 - 11:46 pm | भागो

बघितली.
आता मला सांगा, सर, कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?

कित्येक वर्षे साधना करून शिकलेल्या चित्रकारांच्या नशिबात भविष्यात काय वाढून ठेवले आहे?
-- हा प्रश्न कला-निर्मितीशी संबंधित असेल तर केलेली साधना कधीच वाया जात नाही. नवनवीन साधने आत्मसात करत नवनवीन प्रयोग करत रहाण्यातून सृजनशीलतेचे क्षितिज आणखी विस्तीर्ण होत असते.
-- मात्र हा प्रश्न कलेतून पैसा मिळवण्यासंबंधित असेल, तर अमूक एका पद्धतीने काम करणारे कलावंत ती पद्धत कालबाह्य झाल्यावर अडचणीत येऊ शकतात.
मला स्वतःला आता कलेतून पैसा मिळवायचा नसल्याने माझ्यासाठी नवीन असलेल्या गोष्टी शिकणे खूप आनंददायक आहे. उदाहरणार्थ एकीकडे कृत्रीम बुद्धिमत्तेने निर्माण होणारी कला, तर दर दुसरीकडे तीन-चारशे वर्षांपूर्वीच्या युरोपियन चित्रकारांची पद्धत, या दोन्ही नवीन गोष्टी मी शिकतो आहे. गंमत म्हणजे या दोन्हीचे एकत्रिकरण करणेही शक्य, आणि खूप उपयोगीपण आहे.

कंजूस's picture

18 Jun 2024 - 5:47 am | कंजूस

जमलं आहे.

प्राथमिक प्रयोग एवढं देऊ शकतात आता तर आणखी पाच वर्षांत काय होईल.

कर्नलतपस्वी's picture

18 Jun 2024 - 7:38 am | कर्नलतपस्वी

पिक्चर मेकर,स्टोरी बोर्ड, स्टोरी बोर्ड प्लस, माया.... ते आज या टप्प्यावर पोहोचायला कित्येक दशके लागली.

तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.

तरी सुद्धा सध्यातरी पारंपरिक चित्रकलेला पर्याय नाही.

भाषे बरोबर कल्पनेचा विलास मात्र दिवसेंदिवस वाढत आहे.

बघुया काय पुढे होते ते.

दादासाहेब फाळक्यांनी सुरू केलेले छायाचित्रण आज कुठल्याकुठे पोहचले आहे याची कल्पना रामोजी चित्र सृष्टी बघितल्यावर स्पष्ट कल्पना आली व मानवाच्या सृजन आणी इच्छाशक्तीचे कौतुक वाटले.

चित्रगुप्त यांच्यापासून पेर्णा घेवून मी सुद्धा चित्रकर बनण्याचा प्रयत्न करत आहे.

आता १९६० सालच्या कन्यादान चित्रपटातील पी सावळाराम यांनी लिहीलेले गीत बदलायची वेळ आलेली दिसतेय.

मानसीचा चित्रकार तो
तुझे निरंतर चित्र काढतो

भेट पहिली अपुली घडता
निळी मोहीनी नयनी हसता
उडे पापणी किंचित ढळता
गोड कपोली रंग उषेचे भरतो

ममस्पर्शाने तुझी मुग्धता
होत बोलकी तुला न कळता
माझ्याविण ही तुझी चारुता
मावळतीचे सूर्यफूल ते करतो

तुझ्या परी तव प्रीतीसरिता
संगम देखून मागे फिरता
हसरी संध्या रजनी होता
नक्षत्रांचा निळा चांदवा झरतो

तसेही आता राजे राजवाडे,दिवाणखाने संपुष्टात आले आहेत. पारंपरिक चित्रकला परंपरेतून बाहेर पडू पहात आहे.

तुम्ही वर म्हटले तसे घडून आता खूप वर्षे झाली. तथाकथित 'मॉडर्न आर्ट' चा उगम आणि वाटचाल यातून झाली, त्यालाही आता अनेक दशके उलटलीत.
-- आता पुन्हा चक्र उलटे फिरून, आणि काही लोकांकडे अमाप पैसा आल्यापासून पुन्हा प्रासादतुल्य इमारती, हंड्या-झुंबरे, जुनी चित्रे-पुतळे, जुन्या शैलीच्या, उत्तम पॉलिश केलेल्या उंची लाकडाच्या फर्निचरने सजवलेले दिवाणखाने वगैरेची फॅशन येत आहे. इंदुरातील माझ्या परिचयातील दोन (सख्खे भाऊ असलेल्या) चित्रकारांना फ्रेंच प्रासादाबरहुकूम छतावर आणि भिंतींवर भव्य चित्रे, कुटुंबातील व्यक्तींची जुन्या पद्धतीची व्यक्तिचित्रे वगैरे रंगवण्याचे मोठे काम मिळालेले आहे.
मी आणि माझ्या मुलाने जुन्या बाजारातून एक ८०-९० वर्षे जुना, मोहोगनी लाकडाचा तुटका सोफा आणून त्याला स्वतः दुरुस्त करून, पूर्वीची कापूस भरलेली गादी काढून टाकून हुबेहुब तशी दिसणारी फोमची गादी घरी बनवून त्यावर जुन्या डिझाईनचे कापड आणून व्यवस्थित बसवले आहे. हे सगळे करायला एक आठवडा लागला.
आता लंबक पुन्हा उलट्या दिशेने जाऊ लागला आहे. माझ्यासारख्या 'जुने ते सोने' वाटणार्‍यांसाठी ही समाधानाची बाब आहे.

एका अस्सल चित्रकाराची दृष्टी मिळाल्याने कृत्रिम बुद्धिमत्तेने काढलेली चित्रे बहु सरस उतरली आहेत.

भागो's picture

18 Jun 2024 - 9:45 am | भागो

चित्र क्र ६
मला "भरत" च्या चित्राची आठवण आली.
ह्या वर्षीच्या मिपाच्या दिवाळी अंकातली चित्रे ही पण अशीच काढली असणार.
3d render, cinematicचा अर्थ फोड करून सांगणार का?

चित्रगुप्त's picture

18 Jun 2024 - 5:14 pm | चित्रगुप्त

यांचे नेमके अर्थ मलाही ठाउक नव्हते. चित्र बनवताना खाली विविध पर्याय असतात, त्यापैकी वेगवेगळे निवडले तर वेगवेगळे प्रभाव निर्माण होतात. सध्या मी निशुल्क वापरत असल्याने रोजच्या वापरावर मर्यादा आहे, त्यामुळे भरपूर प्रयोग करून बघता येत नाहीयेत. मी अंदाजाने हे दोन पर्याय निवडले होते. बरे झाले तुम्ही अर्थ विचारलात, त्यामुळे मी गुगलून बघितले, ते असे:
--- A 3D render is a computer-generated image (CGI) created from a 3D model using specialized software. The process of creating a 3D render is called 3D rendering, and it's the final step in the 3D visualization process. 3D rendering can be used to create photorealistic or artistic images of a variety of scenes and locations, including interiors and exteriors, landscapes, and structures.

--- Cinematic AI images are images created using artificial intelligence (AI) to mimic the style of cinematic photography. Cinematic photography is a style that aims to create images with depth and emotion that resemble movie stills.

भागो's picture

18 Jun 2024 - 5:25 pm | भागो

मी जेव्हा 3d शिकत होतो( Blender) ती इमेज आपल्याला तिन्ही अक्सिस मधून फिरवता येते. मला वाटले तस काही आहे कि काय. असेलही. नसेल तर पुढे मागे येईलही.
इन जनरल मला राजा रविवर्माची स्टाईल वाटली.

चौकस२१२'s picture

18 Jun 2024 - 7:03 pm | चौकस२१२

3D render
मुळात हे 3D model मधील निर्मित नाही , पॅरा मेट्रीक म्हणजे कॅड मध्ये जे करतात ते मग ते गाडी असो कि पुतळा असो

सुरिया's picture

18 Jun 2024 - 6:26 pm | सुरिया

कितीही एआय आलं. रंगानं हात बरबाटवायचा थांबला, स्काय इज द लिमिट सोडा, ब्रेन इज द लिमिट कमी पडायलं तरी बुढऊ पेंटरबाबू आपला थांबलेला काळ अन फ्यांटस्या सोडायला तयार नाहीत असं दिसतंय. त्याच त्याच बाया अन तीच ब्यागरांडं तर आधी प्यारीसातल्या पेंटिंगात आणि गेलाबाजार चांदोबात बघितल्याच आहेत की.
.
आर्टिस्ट आहात, अनुभवी आहात अन एआय हाताशी हाय तर बनवा की एखादी कालातीत काहीतरी. उगी तेच तेच काय.
एआय प्लस चित्रगुप्त हे कॉबोच कसे हिट्ट वाजले पाहिजे, बाकी स्क्रीप्टा बडवुन छान छान म्हणायला आम्ही हावोतच की.

@ सुरिया: धन्यवाद. 'बुढऊ पेंटरबाबू' आवडले. आत्ता आठ दहा दिवसांपूर्वी हे माध्यम हाती लागून सुरुवात झाली आहे. अनेक प्रयोग करायचे आहेत. बघूया पुढे काय काय होते. अर्थातच मूळचे तैलरंगात चित्रे रंगवणे थांबवायचे नाहीच. सत्तरीत आल्यावर बालपणीचा 'गुजरा हुवा जमाना' हवाहवासा, पुन्हा जगावासा वाटू लागतो. 'आता नही दुबारा' हे बुद्धीला कळत असले तरी काळाचे चक्र उलटे फिरून आता कालबाह्य/दुर्लभ झालेल्या गोष्टींमधे पुन्हा रमावेसे वाटू लागते, हे नैसर्गिकच असते, आणि ते त्या अवस्थेला पोचल्यावरच कळते. काही अद्वितीय, हटके, (मुद्दाम ओढून ताणून -) 'कालातीत' वगैरे करून दाखवायची, आपण ग्रेट वगैरे आहोत असे सिद्ध करण्याची खाज आणि मानसिक गरज/रुग्णता माझ्यात तरी अजिबात नाही. ज्यांना असेल त्यांनी तसे अवश्य करावे.
-- बाकी नवनवीन क्षितिजांचा शोध घेत रहावा हे जरी खरे असले, तरी त्यात स्वतःची म्हणून असलेली आवड ही रहाणारच. त्यात गैर काही नाही. ज्यांना त्यात रस वाटेल त्यांनी बघावे, नसेल त्यांनी सोडून द्यावे. हा.का.ना.का.

सुरवातीला रोचक वाटले पण तोच तोच पण साहजिक लगेच जाणवतो त्यामुळे काही गोष्टीत वापरता येईल पण पुढे काय? आणि सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ
मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

मूळ चित्रकार आणि त्याची शैली आणि विचार हे मुळ

-- खरे आहे. परंतु रमलप्रतिमांमुळे अल्पावधीत नानविध शक्यतांचा शोध घेता येत असल्याने त्यांचा उपयोग करून घेत आपली कला परिपूर्ण करायला मदत मिळू शकते, माझा सध्या तोच प्रयत्न आहे.

सगळेच हे वापरयाला लागले तर मग काय अर्थ

सप्तसूर, सव्वीस वा अठ्ठेचाळीस मूळाक्षरे वगैरे सगळेच वापरत असले तरी प्रत्येकाच्या कुवतीप्रमाणे, प्रतिभेनुसार निर्मितीत फरक पडत जातो तसे यातही होईल.

चौकस२१२'s picture

24 Jun 2024 - 2:49 pm | चौकस२१२

नक्कीच प्रयोग करीत राहा ...पण एक चित्रांचा ग्राहक/ आवड असणारा ( मग ते स्थापत्य असो किंवा जाहिरात क्षेत्र असो ) म्हणून आलेली पहिली प्रतिक्रिया होती

कर्नलतपस्वी's picture

18 Jun 2024 - 8:58 pm | कर्नलतपस्वी

काही जरी झालं तरी प्लास्टिक फुलांवर खरी फुले ओव्हर राईड करणारच.

शशिकांत ओक's picture

18 Jun 2024 - 9:34 pm | शशिकांत ओक

या सगळ्या प्रकारात प्रॉम्ट कसे लिहावे? याची माहिती मिळाली. व्यक्तीला सजवायला, जितके जास्त वर्णन लिहून ठेवले पाहिजे. बाकीचे तपशील साजेसे दिले की चित्र बनते हे समजले.
मला यात विचारणा करावीशी वाटते की हे लेखी प्रॉम्ट लिहून देता देता आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?
कोणी असे प्रयोग केले असतील तर ते बघायला आवडेल.

आपण आधी तयार केलेल्या कलाकृतीला चढवून तिला जास्त नटवायला कुठल्या ॲपवर शक्य आहे का?

यासाठी बहुत काळापासून फोटोशॉप तर आहेच, बाकी आणखीही असतीलच.

चित्रगुप्त's picture

18 Jun 2024 - 9:57 pm | चित्रगुप्त

प्रॉम्ट कसे लिहावे हाच यात कळीचा मुद्दा आहे. नेमके कोणते शब्द/वाक्य कोणत्या क्रमाने लिहायचे, कोणत्या तांत्रिक बाबी सांगायच्या वगैरेवर मार्गदर्शक लेख, व्हिडियो वगैरे आहेत, ते हळूहळू बघणार आहे. तुम्ही जर काही वाचले-बघितले तर ते इथे अवश्य लिहा.
तुमच्या शिवकालीन युद्धतंत्र वगैरेवरील लेखनासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

चौथा कोनाडा's picture

19 Jun 2024 - 5:22 pm | चौथा कोनाडा

जबरदस्त चित्रं आहेत !
चिगु साहेबांच्या प्रयोगशीलतेला परिस सापडला आहे..
य लेखाच्या निमित्ताने प्रॉम्प्ट कसे लिहितात, त्यांचा क्रम, योग्य शब्द जुळवणी याची चुणु़क मिळाली !
ही नविन इंटरेस्टींग लेखमाला वाचानिय अ‍ॅज वेल बघणीय होणार यात शंका नाही !

आगे बढो चित्रगुप्त साहेब !

पॅट्रीक जेड's picture

21 Jun 2024 - 6:43 pm | पॅट्रीक जेड

सुंदर चित्रे.

बिपीन सुरेश सांगळे's picture

23 Jun 2024 - 10:57 pm | बिपीन सुरेश सांगळे

चित्रगुप्तजी ,

भन्नाट !

वकील साहेब's picture

24 Jun 2024 - 12:01 pm | वकील साहेब

आपण अपलोड केलेल्या एखाद्या फोटो वर आपल्या आदेशानुसार संस्कार करून नवीन इमेज ideogram बनवून देते का ? असेल तर ते कसे साध्य करावे ?

Ideogram वर सध्या तरी तसे करता येत नाही असे दिसते.

आधीच्या फोटोवर, विशेषतः व्यक्तीच्या फोटोवर बेमालूम संस्करण करून नवीन फोटो किंवा व्हिडिओ बनवून देणे यात बरेच कायदेशीर आणि नैतिक इश्युज आहेत. कोणतीही मुख्य प्रवाहातील लेजिट कंपनी असे फीचर (उपलब्ध असले तरी) वापरायला देणार नाहीत. इतक्यात तरी. पण या तंत्रात प्रवीण असलेले लोक स्वतः खटपट करून तसे बनवत असतातच.

यात मुख्य समस्या डीप फेक टाईप व्हिडिओजची आहे. कोणाचे नग्न, बदनामीकारक चित्र किंवा त्याहून वाईट म्हणजे कोण्या समाजाच्या भावना दुखावणारे शब्द तोंडात घालून व्हिडिओ बेमालूम बनवले तर सध्या तरी बरेच मोठे नुकसान होऊ शकते. लोकांना अशा फेक गोष्टींची सवय व्हायला वेळ लागेल.

वकील साहेब's picture

1 Jul 2024 - 3:37 am | वकील साहेब

Whatsapp अपडेट केलं तर whatsapp च नवीन फिचर असलेली जांभळी रिंग तुमच्या whatsapp च्या होम स्क्रीन वर दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर Meta AI नावाची नवीन चॅट बॉक्स ओपन होईल. इथे तुम्ही chat got ला विचारतात तसे अनेक प्रश्न विचारू शकतात. त्याची तात्काळ उत्तरे मिळतात.
आणि त्याहून गंमत म्हणजे ideogram सारख्या प्रतिमाही बनवून मिळतात. त्याही अगदी त्वरित.
त्यासाठी फक्त एक करायचं promt लिहितांना सुरवातीला फक्त imagine एवढा शब्द लिहायचा बस.
Ideogram जसे 4 Result देते तसे meta ai फक्त एकच result देते. पण तोही छान असतो.
मी गम्मत म्हणून चित्रगुप्त यांच्या promt कॉपी करून तिथे टाकून पहिल्या. हाती आलेल्या प्रतिमा खूपच छान होत्या.
इथे डकवता येत नाहीये. पण तुम्ही स्वतः अजमावून पाहू शकता.

Whatsapp चे Meta AI काही बाबतीत जास्त चांगले आहे असे दिसले. उदाहरणार्थ मानवाकृती ideogram पेक्षा जास्त चांगल्या येतात. दर दिवशी अमूक इतकी चित्रे असे काही बंधनही नाही, one more version असे लिहीले की पुन्हा आणखी एक नवीन चित्र मिळते. त्यात सुधारणांसाठी पण लिहून पाठवू शकतो, पण नेमक्या त्याच सुधारणा होतीलच असे नाही. काही वेडेवाकडे, चुकीचे पण होते.
आधी /image असे लिहून मग इंग्रजीत prompt लिहायचा आणि मेसेज पाठवायचा.मिनीटभारात एक चित्र येते. मात्र ते चौरसाकारच असते. लांबट उभे वा आडवे मिळत नाही.

.

.
द्वारका समुद्रात बुडतानाचे दृष्य.

.
-- नच सुंदरी करु कोपा, मजवरी धरी अनुकंपा.

.
भीम - दुर्योधन गदायुद्ध.

दोघांचे चेहरे एवढे सारखे कसे ? ( जरी भाऊ असले तरी ) तुम्ही इनपुट काय दिले होते ?
एकाला ३ रा हात?

आणि काही
- प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो?
-बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ? समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?

तुम्ही मांडलेले मुद्दे योग्य आहेत.
१. चेहरे कसे येतील यावर आपले काहीही कंट्रोल नाही (मलातरी जमलेले नाही) हे जे गदायुद्धाचे चित्र इथे दिले, त्यासाठी अनेकदा प्रॉम्प्ट बदलून जी चित्रे येत गेली, त्या सर्वात काही ना काहीतरी चुका होत्याच, शेवटी त्यातल्या त्यात हे बरे वाटले. कशात दोघांना चारचार हात, चार गदा, कशात गदांना दोन्हीकडे गोलाकार डोकी (किंवा जे काही म्हणतात ते) गदा वाट्टेल तश्या धरलेल्या, शेवटी वैताग आला.
बरेचदा पात्रांचे चेहरे चिनी-जपानी प्रकारचे, माना वाट्टेलतश्या वळलेल्या, हातांचे बोटे कमिजास्त किंवा चुकीची, असा सगळा घोळ असतो. मी फुकटवाले कॄबु वापरतो त्यामुळे असे होते का ते ठाऊक नाही. कदाचित टर्मिनेटर याविषयी सांगू शकतील.तीन हात वाले फक्त हेच होते, बाकीच्यात किमान चार-चार तरी होते. यातला मागच्या बाजूचा एक हात मी फोटोशॉपमधे मिटवला, पण ते चित्र इथे चढवता आले नाही.
२. - प्रश्न या सर्व चित्रात सूर्य का असतो?
उत्तरः ती माझी वैयक्तिक आवड आहे. मुळात मला संध्याकाळची वेळ, संध्याकाळची चित्रे लहानपणापासून आवडतात. आकाशातले रंग, ढग, मावळता सूर्य, हळू हळू गडद होणारा आसमंत, लांब सावल्या, इमारतींवर, झाडा-खडकांवर रेंगाळणारे सूर्याचे शेवटले सोनेरी किरण वगैरे अजूनही फार रम्य वाटतात. काहीतरी सरत आलेले, संपत आलेले असल्याची भावना हुरहुर निर्माण करते, ती आवडते.
३. बहुतेक चित्रे "पौराणिक" किंवा तत्सम शैलीतील वाटतात ? इनपूट मुळे का काही वेगळे कारण ?
-- मुख्यतः वैय्यक्तिक आवडीमुळेच. ग्रीक-रोमन पुराणकथांवरील महान युरोपियन चित्रकारांची चित्रे हा माझ्या आवडीचा विषय. पॅरीस, रोम, फ्लॉरेन्स वगरेच्या संग्रहालयांमधे खजिनेच आहेत त्या चित्रांचे. कितीदाही बघितले तरी दर वेळी त्यात नवीन काहीतरी दिसते. भारतीय पुराणावरील कांगडा, गुलेर, बसौली, बूंदी, किशनगड वगैरे शैलीची चित्रेही अद्भुत वाटतात. लहानपणी बघितलेली 'चांदोबा' तील चित्रे तर फार सुंदर असायची. (त्यामानाने रविवर्मा सामान्य वाटतो)
'भीम-दुर्योधन गदायुद्ध' असा विषय घेऊनच रमलचित्र बनवायचे (१९६० च्या सुमाराचे चांदोबाच्या मलपृष्ठावरील ते चित्र अजून लक्षात आहे), असे ठरवून प्रयत्न केला, ते बरेच कठीण असल्याचे दिसून आले. मुळात 'गदा' ला इंग्रजीत काय म्हणतात तेच ठाऊक नव्हते, Mace हा शब्द सापडला. तो वापरला तर मोठ्ठा घण्/हतोडा येऊ लागला. मग त्यात 'mace with big spherical head' असे केल्यावर नुस्ता साधा दांडा आणि त्यावर गोल फुटबॉलएवढा गोळा. असे करता करता वैताग आला.
त्या मानाने 'हेलन ऑफ ट्रॉय' वगैरे युरोपियन विषय घेतले तर फार सुंदर चित्रे बनतात असा अनुभव आला.

- मुळात कृत्रीम बुद्धिमता अल्पावधीत ही चित्रे कशी बनवते, हे कुणी जाणकारांनी व्यवस्थित समजावून सांगितले तर कदाचित अशा सगळ्या प्रश्नांवर प्रकाश पडेल, आणि मार्ग सापडेल. तोपर्यंत जमेल तशी खटपट करायची. त्याचाही हळू हळू कंटाळा येईल बहुतेक.
४. समजा सिहासन चित्रपटा किंवा सामना चित्रपटाची कथा किंवा पिंजरा ची कथा कथा दिली तर?
-- करून बघा. माझ्यात तेवढा उत्साह उरलेला नाही आता.

जेव्हा एखादे शहर कायमचे समुद्रात बुडते तेव्हा एखाद्या तुफानात प्रचंड मोठ्या लाटांनी बुडत नसून अनेक वर्षे हळुहळू पाण्याची पातळी वाढत वाढत ते कणाकणाने पाण्याच्या पातळीच्या खाली जात असावे. तुफानी लाटांनी पाणी शहरात भरले तरी ते ओसरून जाईल.

चित्रगुप्त's picture

1 Jul 2024 - 3:19 pm | चित्रगुप्त

द्वारका समुद्रात बुडाली त्या प्रसंगाचे जुन्या ग्रंथांमधून काय वर्णन केले आहे ते सांगण्यासाठी प्रचेतस याना विनंती.

प्रचेतस's picture

2 Jul 2024 - 6:25 am | प्रचेतस

द्वारका समुद्रात बुडाली ह्याचे वर्णन केवळ दोन तीनच श्लोकांत महाभारतकारांनी केले आहे.

तत्सागरसमप्रख्यं वृष्णिचक्रं महर्द्धिमत् |
उवाह रथिनां श्रेष्ठः पार्थः परपुरञ्जयः ||

निर्याते तु जने तस्मिन्सागरो मकरालयः |
द्वारकां रत्नसम्पूर्णां जलेनाप्लावयत्तदा ||

तदद्भुतमभिप्रेक्ष्य द्वारकावासिनो जनाः |
तूर्णात्तूर्णतरं जग्मुरहो दैवमिति ब्रुवन् ||

, याप्रमाणें अर्जुनामागून द्वारकेंतील सर्व माणसें बाहेर पडून वाट चालू लागलीं असतां मागें समुद्रानें आपल्या पाण्यांत रत्नसंपन्न अशी सर्व द्वारका नगरी बुडवून टाकिली. अर्जुन जसा जसा त्या नगरीपासून पुढें पुढें जाई, तसा तसा तो तो नगरीचा भाग समुद्र बुडवून टाकी ! तो अद्भुत प्रकार पाहून द्वारकावासी मंडळी 'काय हो हैं दैव!' असें म्हणत अधिकाधिक वेगानें पुढें जाऊं लागली.