कविल सकाळीच उपाशीपोटी शेतात मळणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शेताच्या बांधावरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. बांधाला बांध लागून असलेच शेजारी शेतकरी सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- पाभे
प्रतिक्रिया
26 May 2024 - 10:59 pm | चौथा कोनाडा
सुंदर ... वेगळ्याच प्रकारची मदत कथा !
कविल, कायरा, वृशांत, तान्या असली मराठी नावं वाचून अंमळ मौज वाटली.
भविष्यात उत्तर भारतीय मराठीभुमीत स्थायिक होऊन शेती करणार ?
28 May 2024 - 10:10 pm | पाषाणभेद
वेगळाच विचार. तशा अर्थाचे मागे लिहील्याचे आठवते आहे. शोधावे लागेल.
27 May 2024 - 5:14 am | कंजूस
संपर्क यंत्रणेचा उपयोग पिठामिठापर्यंत पोहोचला आहे. सकाळी फित्झा न खाता भाकरी खाण्याची संस्कृती/ परंपरा अजून पाळत आहेत.
( कविता आणि लक्ष्मणराव यांच्या मुलाचे नाव कविल असणार तसेच त्यांच्या सासू सासऱ्यांची नावे कावेरी आणि यशवंतराव असणार . )
28 May 2024 - 10:20 pm | पाषाणभेद
अद्याक्षरे घेऊन नवीन नाव तयार करणे डोक्यात जाते बघा.
27 May 2024 - 5:21 am | कंजूस
उच्च शिक्षण घेऊन प्रदेशात जाणाऱ्यांची नावं मकरंद, अनिरुद्ध, प्राची वगैरे पौराणिक असल्याचा फायदा असतो. नाळ ओळखता येते. गावातले शेती करणारे लोक मात्र मुलांची डिस्को नावे ठेवतात असं एका रत्नागिरीगिरीकराने सांगितलं होतं.
28 May 2024 - 10:23 pm | पाषाणभेद
आयुर्वेदीक डॉक्टरांची नावे तर हमखास पौराणिक असतात. आता ते नंतर आयुर्वेदीक डॉक्टर बनत असल्याने त्यांचे लहानपणी नावे कशी सार्थ ठेवली जात असतात हे आश्चर्य आहे.
27 May 2024 - 6:17 am | कर्नलतपस्वी
कविल ने तृप्ततेची ढेकर दिली हे विहंगम दृश्य बघून पलीकडील बांधावरच्या अप्पांना कायप्पाचा समाजाभिमुख उपयोग बघून गदगदून आले.
28 May 2024 - 10:26 pm | पाषाणभेद
प्रॅक्टीकली बांधाला बांध लागून असणारे अगदीच बारामतीचे असतात हे सत्य आहे. त्यामुळे समोरचा आप्पा नक्कीच आसूयेने हसला असेल.
27 May 2024 - 11:16 am | अनन्त्_यात्री
कविल सकाळीच उपाशीपोटी स्पेसशटल घेऊन 4JUN400PAAR ग्रहावर टीपी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय टेलीपोर्ट करावे या चिंतेत होती. घरातील स्पेसमील संपले होते.
माइंडशेअर कन्सोलकडे बघत तिने घरातील स्पेसमील संपल्याचे मनात म्हटले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायोपार्टनर तान्याला ते कळले. तिने वृशांतला YZ420 ग्रहावरील स्पेसमील उद्योगात काम करणारा आपला bio-offspring चिन्मय यास स्पेसमील कविलकडे टेलीपोर्ट करण्यास सांगितले.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. असलेच स्पेसनेबर सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- अश्मछेद
28 May 2024 - 6:34 am | भागो
अनन्त्_यात्री
भारीये हे.
28 May 2024 - 10:27 pm | पाषाणभेद
अनंत यात्री, तुम्ही दिवाळी अंकाची विज्ञान कथा याच बीज कथेवर आताच लिहायला घ्या. जबरा आहे.
27 May 2024 - 8:11 pm | मुक्त विहारि
आवडली...
28 May 2024 - 6:15 am | श्रीरंग_जोशी
नेहमीपेक्षा वेगळी लघुकथा आवडली.
28 May 2024 - 7:02 am | चित्रगुप्त
इंटरनेटीवर हुडकून ज्यांची नावं ठेवली गेली, त्या कायरा - मायरा - तान्या - वृशांत - कविल एक्सेट्रांची जनरेशन आता ऑर्गेनिक, ग्लुटेनफ्री, जीएमओफ्री, लो क्यालरी, देसी फार्मिंग करू लागलीय हे बघून भडभडून येऊन गद्गद झालेलो आहे. आता ताबडतोब ऑर्ग्यानिक जीएमओफ्री लेमोनेड प्यायल्याशिवाय गत्यंतर नाही.
-- जियो पाभे, लिहीत रहा (सुटा) आता.
28 May 2024 - 10:29 pm | पाषाणभेद
खरोखर, ही नावे मी इंटरनेटवर हुडकूनच लिहीली!
तुम्हाला कसे समजले?
29 May 2024 - 2:53 am | चित्रगुप्त
हल्लीची तरूण पिढीतील कपले (म्हणजे पस्तिशीतल्या तरूण मुला-मुलींचे शेवटी एकदाचे 'मॅरिनेट' पद्धतीने जुळलेले लग्न ( 'नेट' वरून जुळलेले ) झाल्यावर आणखी चार-पाच वर्षांनी पहिल्या बाळाची चाहूल लागली, की 'मॅटर्निटी फोटोशूट' जेंडर रिव्हील', 'बेबी शॉवर' वगैरें होते त्याआधीच इंटरनेटवर 'बेबी बॉय नेम्स' किंवा 'बेबी गर्ल नेम्स' सर्चायला सुरूवात होते, तेंव्हा हमखास ही आर्विल - शार्विल- कायरा - मायरा नावे सापडतात (आमच्या लहानपणी होतीच की 'सायरा बानू' - तीच, 'मेरे यार शब्बा खैर' वाली )
-- आणखी हैट म्हणजे याचा अर्थ काय, असे विचारले की हे विष्णुचे, गणपतीचे किंवा देवीचे नाव आहे असे सांगून समोरच्याची बोलती बंद केली जाते (असेल बुवा 'विष्णुसहस्रनामा' पैकी एकादे. कुणास ठाऊक)
आणि ती ब्येनी फोटोग्राफरं पण काय काय क्लुप्त्या काढतात बघा. फोटोशूटच्या वेळी काय तर म्हणे मुलाचे किंवा मुलीचे बूट्/स्यांडल समोर ठेवायचे, कॅमेरा त्यावर फोकस करायचा, आणि लांब ती गर्भारशी बया झाडाला टेकून उभी रहाते, आणि तिचा बाप्प्या समोर गुडघे टेकून बसत तिच्या वाढलेल्या पोटाचे चुंबन घेत असतो, त्यांना 'औटॉफ फोकस ठेवायचे -- या सगळ्या 'आयडियाज' पण नेटवर मिळतात बरंका, बघा सर्चून, 'मॅटर्निटी फोटोशूट आयडियाज' )
उदाहरणार्थ खालील फोटू बघा:
असो. कुठे भाकरीचे पीठ आणि कुठे गर्भारशी बायांचे फोटो. प्रतिसादायला बसले, की आमचे तारू कुठल्याकुठे भरकटते, आणि कैच्याकै प्रतिसाद प्रसवते, ते असे. असो.
28 May 2024 - 7:07 am | भागो
कथा आवडली.
मला वाटतंय कि कथा उपरोधिक आहे. म्हणजे लोकांकडे मोबाईल घ्यायला पैसे आहेत, सिम साठी पैसे आहेत पण भाकरीचे पीठ विकत आणायला नाहीयेत.
असे काही आहे का?
28 May 2024 - 10:31 pm | पाषाणभेद
कसं आहे ना की google नाव आधी ठेवल्या गेले अन नंतर त्याचा लाँगफॉर्म लोकांनी निरनिराळ्या अर्थाचा बनवला गेला. तसेच आहे हे.
28 May 2024 - 5:36 pm | चौथा कोनाडा
कविल सकाळीच उपाशीपोटी काव्य संमेलनात कविता सादर करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी जेवण काय न्यावे या चिंतेत होती. भाकरीचे पीठ संपले होते.
व्हाटस अपवर तिने पीठ संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास शासकीय ग्रंथालयातून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळ भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर जेवणार होता. तिचे मन भरून आले. घराला घर लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- भेपा
28 May 2024 - 10:35 pm | पाषाणभेद
तान्या वृशांतला "साहित्याने काय पोट भरणार आहे का?" अशा अर्थाचे बोलली.
वृशांत लगोलग चिन्मयकडे गेला व त्याला ग्रंथालयाबाहेर काढले.
29 May 2024 - 6:23 pm | चौथा कोनाडा
चिन्मयने काव्य संमेलनात गेला अन कविलला एका बाजुला घेतले अन त्याला भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा दिला. कविलने समाधानाने ढेकर दिली अन चिन्मय निश्चिंत झाला. त्यानं पुन्हा ग्रंथालयाचा रस्ता पकडला... कारण त्यांनं निघताना तान्या वृशांतला सांगितलं " माजी संमेलन स्वागताध्यक्ष कौतुकराव ढाले देशमुख यांनी सांगितलं होतं तु जेमतेम थातूरमातूर अभ्यास करुन कुठलं तरी पुस्तक लिही, मी ते विद्यापीठाकडं पाठवतो अभ्यासक्रमात लावायला" मग काय आपण प्रतिष्ठित साहित्यिक होणार या विचारानंच चिन्मय सुखावला.
29 May 2024 - 7:29 am | निनाद
भाकरीचे पीठ व चटणीचा ठेचा वाचून मन भरून आले पाभे!
आमचा प्रयत्न...
--
कविल सकाळीच उपाशी मनाने लायब्रीत वाचणी करण्यास गेला होता तर कायरा कविल साठी कथाबीज काय न्यावे या चिंतेत होती. नवकथेचे बीज संपले होते.
व्हाटस अपवर तिने बीज संपल्याचे स्टेटस टाकले. त्यानंतर लगेचच वृशांतची बायको तान्याने ते स्टेटस बघितले आणि तिने वृशांतला आपला मुलगा चिन्मय यास इंग्रजीच्या क्लासवरून कॉल करून बोलावून घेतले. त्याचेजवळचा नवकथेचे बीज व कांदंबरीचा ठेवा कायराकडे पाठवीला.
कायरा आता चिंतामुक्त होती. कविल आज पोटभर लिहिणार होता. तिचे मन भरून आले. भिंतीला भिंत लागून असलेच शेजारी साहित्यिक सर्वांना मिळोत अशी तिने प्रार्थना केली.
- का बे?
29 May 2024 - 8:02 am | पाषाणभेद
हे देखील छान आहे. माडगुळर गीतरामायण लिहायला बसले की त्यांच्या सौ. अगरबत्ती, वगैरे असले प्रसन्न वातावरण करत. (हे आपले सिगरेटी पेटवत.) कायरा तसली बायको आहे.
29 May 2024 - 8:52 am | कर्नलतपस्वी
काविल कालिंदी एक्स्प्रेस ने कानपुर ला चालला होता. काळ्या जोगतीणीने कायराला बजावले कालरात्री आमावस्येला कषाययोग आहे.काविलने कानपुर ला जाणे य्योग्य नाही. त्याला थांबव.
काविल आगोदरच प्रवासाला निघून गेला होता. कायराचे मन भय कंपीत झाले व काविल च्या आठवणीने कंठ दाटून आला.
आता कायरा काय करणार,....
तीने कायप्पावर स्टेटस टाकले.
वृषांतचे काका कळमोडी स्टेशनवर कलेक्टर होते. तान्याने त्यांना कळवले. काकांनी काविलला कळमोडी स्टेशनवर उतरून घेतले.
हे कायराला कळाल्यावर कायरा भयमुक्त झाली.
भाकरीचं पिठ आणी कल्पनांची किरकीरी जेव्हढी जास्त मळली जाते तेव्हढी भाकरी कुरकुरीत होते.
29 May 2024 - 9:46 pm | नठ्यारा
सदर कथा 'रबरीचं पाकीट' असं शीर्षक योजून अश्लील अवतारात सहजपणे पुनर्लेखित करता यावी.
-नाठाळ नठ्या
29 May 2024 - 11:01 pm | पाषाणभेद
लिहा तुम्ही,
वाचू आम्ही.
30 May 2024 - 12:54 am | नठ्यारा
अहो पाभे,
मी देखील बाकीच्यांप्रमाणे सभ्यतेचा बुरखा पांघरला आहे. ;-) आता काय सांगू तुम्हांस असभ्यांच्या व्यथा .... !
-नाठाळ नठ्या