बाईपण भारी देवा

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
10 Jul 2023 - 12:45 pm

ट
माझं ठरलं होतं आता थेट पुष्पा २ बघायला थिएटरला जायचं.पण मैत्रिणी म्हणाल्या बाईपण भारी देवा या सिनेमाला जायचं.असे सगळे आनंदासाठी एकत्र येणार असतील तर मला उधाण येतं.मग सोमवारपासून गुरूवार पर्यंत रोज बुक माय शो चेक करत होते.गुरूवारी रविवारीच बुकिंग दिसायला लागलं.लगेच तिकिटे,बर्गर ,पोपकार्न सगळं बुक केलं.फर्मान सोडलं ट्रेंड नुसार गागल आणि नथ कम्पल्सरी घालून यायचं.रविवारी सगळे थिएटरला धडकलो.ले सेल्फी दंगा नी काय सुरू.डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.
पण पहिल्याच सिनला वंदना गुप्तेची तडफडार एन्ट्री दाखवून पुढे मौजच आहे हे समजलंच.
तर वंदना (शशी), रोहिणी हट्टंगडी(माई), सुकन्या (साधना),दीपा(चारू), सुचित्रा (पल्लवी), शिल्पा(केतकी) या सहा काकडे बहिणी.आता मध्यमवयीन स्वावलंबी मध्यमवर्गीय आहेत.बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे.
तडफदार शशी मंगळागौर स्पर्धेसाठी भाग घ्यायला टीम तयार करत असते.मग काय बहिणी एकमेकांपासून जवळ नसल्यातरी वैयक्तिक आयुष्यातल्या अडचणी सोडविण्यासाठी मंगळागौर स्पर्धा एक संधी म्हणून पाहतात.आणि हो हेच बाईपण भारीच एक महत्त्वाचं रूप आहे.वर्षांवर्षे चालणार्या नवरा बायको दोन चाकांच्या संसारात केव्हा बायको या चाकावर माघार,मन मारणं, मुलांच्या संगोपनाची,पै पाहूण्यांचा ,कधी आर्थिक नियोजन , पुरूषी अहंकाराची मर्जी सांभाळणे या सगळ्यांचा अतिरिक्त भार पडतो समजतच नाही.जरा यातून वेळ काढून बाई निसर्गालाही घट्ट बांधील आहे.वयात येणं,गर्भारपण, रजोनिवृत्ती याही गोष्टी तिला टाळता येत नाही.अशावेळी आपली स्वप्ने,आकांक्षा तिने बाजूला केलेल्या असतात.एका टप्प्यावर तिला त्या जुन्या स्वप्नांची जोड परत मिळाली तर तिच्या पंखात कमालीचे बळ येईल.ती खर्या अर्थाने बाई म्हणून जगेल.
मग काय मंगळागौर निमित्ताने जे एक एकेची समज गैरसमज,गिल्ट , वैयक्तिक अडचणी ढवळून निघतात.एकमेकींच्या मानसिक आधाराने त्या मार्ग काढतात आणि जिंकतात.
या सिनेमातील काही आवडलेल्या गोष्टी -
१.सिनेमात प्रत्येक पात्र समाजातील आढळणाऱ्या सगळ्या बायकांना समाविष्ट केलं आहे.एक घटस्फोटाच्या उंबरठ्यावर,एक मातृत्वापासून वंचित,सिंगल प्यरेंट,एक पुरूषी वर्चस्व असलेल्या घरातली, नवर्याच्या चुकांना पाठीशी घालत संसाराचा बोजा एकटी घेणारी,पैशावाल्या घरात किंमत नसणारी अगतिक,
ज्यामुळे सिनेमा बघणारी प्रत्येक बाई कोणत्या तरी एका किंवा एकापेक्षा जास्त पात्रात स्वतः ला रिलेट करते.आणि यामुळेच बायकांची प्रचंड साथ सिनेमाला मिळत आहे.
२.रजोनिवृत्तीवर भाष्य -अजूनही हा विषयावर अवेरनेस खुप कमी आहे.या बदलासाठी कसं सामोरं जायचं हे बायकांना ठाऊकच नाहीये.
३.गर्भपिशवी काढून टाकणे-ही आरोग्याची समस्या लहान वयापासून मोठ्या स्त्रियांपर्यत कोणालाही जाणवू शकते.बाईपणाच सर्वात मोठं वरदान गर्भ पिशवी आहे.ते शरीरातून बाहेर काढल्यावर स्वतः तिला आणि आजूबाजूच्या व्यक्तींना कमीपणा वाटू नये.
३.यातला एक संवाद "एक दिवस स्वतः चा तो बर्थडे आणि ३६४ दिवस कशाचे तर स्ट्रेस चे" खरोखर बायकांसारखा स्ट्रेस जगात कोणी घेत नाही.ते बायकांनी व्यायामाची जोड लावून दूर केलं पाहिजे.
४.ती जेव्हा स्वतः च्या पैशाने आय फोन घेते.स्वावलंबी असणं अधोरेखित करते.
५.नवरा अथवा कोणत्याच बळावर घट्ट बांधता येत नाही . अशावेळी अशा नात्यातून 'मोकळं ' होऊनच स्वतः साठी जगावं.
६.आपण बांध स्वतः हून बांधत राहिलो तर पुढच्या मुलींनाही/पिढीला ते बांध तोडायला अजून वेळ लागेल.विनाकारण छंदांना बांध नकोच.
७.रोहिणी हट्टंगडी आणि तिच्या सपोर्टिव्ह नवर्याचं बोडिंग खुपच छान दाखवलं आहे.
८.आणी ते शेवटचं गाणं "जय देवी मंगळागौर"जबरदस्त!काय सुंदर दिसल्या आहेत सगळ्या.खुपच गोड!शेवटी बाई ईश्वराची सौंदर्यवती,नाजूक देणगी या पृथ्वीवर आहे पण भारी बाईपण निभवायला देवाने तिला अद्भूत मानसिक ताकदही बहाल केली आहे.
टीप-पुर्ण लेखात स्त्री, स्त्रिया असा शब्द पुस्तकी न वापरता थेट सतत बायका शब्द वापरून भारी वाटलं!
-भक्ती
आम्ही भारी बायका :)
क

मुक्तकचित्रपटप्रतिक्रियाआस्वादसमीक्षाविरंगुळा

प्रतिक्रिया

कंजूस's picture

10 Jul 2023 - 1:18 pm | कंजूस

सिनेमाला गर्दी होणारच.
बहिणी म्हटलं की तो ओलावा,ती माया हे सगळं हरवलंय..का? कारण प्रत्येकीने मनात एकमेकांविषयी अढी बनवली आहे. हे अमेरिकेत असतं ऐकून आहे पण भारतात?
शेवटचा फोटो जबरदस्त.
-----
पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?
-------
मिपाचे मध्यवर्ती केंद्र पिंचिंतून पुन्हा मराठवाड्यात सरकलं आहे. कधीकधी जळगावलाही जातं.

Bhakti's picture

10 Jul 2023 - 1:52 pm | Bhakti

पण भारतात?

हो मी भारतात अशाही केसेस पहिल्या आहेत.

पुरुष प्रेक्षकांनाही पाहता येतो का सिनेमा?

हो का नाही!Goggle सह सेल्फी घेणे जरुरीचे आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2023 - 2:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

पण खरे सांगु का? बाईच बाईपण एन्कॅश् (मराठी शब्द?) करणारे ईतके चित्रपट आले आहेत की आता शिसारी यायला लागलेय. अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा सगळ्यांची कथा ईथुन तिथुन सारखीच.

मला एक समजत नाही. बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय? लग्नाआधी मस्त मित्रांच्यात रमणारा, बीडिकाडी करणारा, विकांताला सॅक पाठीवर टाकुन ट्रेकला जाणारा नाहीतर बायकिंगला जाणारा मुलगा ,नवरा झाल्यावर यातले अर्धे छंद "छंद बायकोचा" सदराखाली सोडुन देतो. किवा "हिला विचारुन सांगतो" क्लबात सामील होतो. साधी दाढी ठेवायची की नाही यावरही गहन चर्चा होते. आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो. विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते. आणि परत येताना माउथ फ्रेशनर्,सेंट्,हॉल्स असे काय काय उपाय करावे लागतात. या अन्यायाचे परीमार्जन म्हणुन नंतर रुसवा काढण्यासाठी जे काय काय करावे लागते ते वेगळेच. हे सगळे उरकता उरकता वयाची चाळीशी पार होते आणि डोळ्यांना चाळीशी लागते. काही काहींना जोडीला बीपी,डायबेटीस आणि एक दोन स्टेंट सुद्धा साथीला येतात. बेडरूम ऐवजी हॉलमध्ये झोपण्याची सुरुवात होते,अणि शक्ती फक्त नजरेत उरते चक्षुचोxx करण्यापुरती.

ह्या सगळ्यावर एखादा चित्रपट निघेल काय?

विकांताला मित्रांबरोबर "बसायचे" तर कोण थापाथापी करावी लागते.

बरंय तुम्ही निदान बाहेर मित्रांबरोबर 'बसायला' जाऊ शकता.बायकांनी घरसंसार सोडून मैत्रिणींबरोबर जायचं कुठं " बसायला " तर अशा सिनेमांना :)
अजून उतारा आहे बघा घरातले बापलेक ही एकटीच गेली म्हणून नाराज होते.तेव्हा रात्री 'तरला दलाल' पाहिला.तो १००% पुरुषांची ही घुसमट दाखवतो.एका यशस्वी बाई मागे सपोर्टिव्ह नवराच असतो हे सांगतो.नक्कीच बघा 'तरला दलाल' नाव जरी बाईचं आहे पण बाजू नवर्याची आहे :)

साउथ चा ज्योतिकाचा मॅडम गीताराणी आणि श्रीदेवी चा इंग्लिश छान आहेत.

आपण कुठे झाडाखाली बसायला गेलो की बायका घरीच बसायला मोकळ्या होतात ना अड्डा जमवून.
बाकी एकट्यानेच बसायची हौस असेल तर तीही काहींच्या बायका सोय करतातच. बरणी स्टॉकमध्ये ठेवतात, त्यातले मोजून ठरल्या वेळी मांडून ठेवतात. फक्त अट एकच - गप्प बसायचं.

तर्कवादी's picture

10 Jul 2023 - 10:52 pm | तर्कवादी

बायकांचेच प्रश्न चघळायला लोकांना ईतके का आवडतात? की त्याला टी आर पी जास्त मिळतो म्हणुन? पुरुषांना काय प्रॉब्लेम्स नसतात काय?

असतील असेही चित्रपट पण आपण त्या दृष्टीकोनातून बघत नाही किंवा "पुरुषांच्या व्यथा मांडणारा" म्हणून वेगळं डोक्यावर घेत नाही. बाकी नायकाचा संघर्ष असतो बहुतेक चित्रपटांत पण तो घराबाहेरचा - समाजातला. पण त्यातून पुरुषांची व्यथा दाखवली आहे. जुने चित्रपट बघा गमन, घरोंदा ई.

आई आणि बायको यात पिसला जाउन शेवटी नको ती कट्कट म्हणुन ऑफिसात जास्त वेळ काढायला लागतो.

थोडा हलकाफुलका पण तरी वास्तववादी चित्रपट बघायचा तर "मातीच्याच चुली" हा चित्रपट बघू शकता.

बाकी हा चित्रपट जोरात चालला आहे, पैसा कमवतो आहे यामुळे एक मराठी चित्रपट पुन्हा एकदा यशस्वी होत आहे याचा आनंद साजरा करु ( अर्थात चित्रपट न बघताच). आणि स्त्रिया या चित्रपटाच्या निमित्ताने आनंद घेत आहेत, धमाल करतायत तर चांगलंच आहे. तितकीच थोडी चिडचीड कमी करतील :)

@भक्तीजी
प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ?
आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

Bhakti's picture

11 Jul 2023 - 10:26 am | Bhakti

@भक्तीजी
प्रेक्षकांत अंदाजे किती टक्के पुरुष होते ?
आणि फोटोतील तुम्ही कोणत्या ?

म्हणजे मला चारच पुरुष दिसले.माझ्या शेजारी मायलेकी होत्या.वृद्धाही खुप होत्या, त्यांपैकी शेवटी गाणं लागल्यावर एकांना नाचायचं होतं मी कोणी पटकन पुढे येईना,मी नाचले असते पण हुकलच.
ती यल्लो ड्रेसवाली दोन नंबरची बाई म्हणजे मी :)

शेर भाई's picture

11 Jul 2023 - 2:46 pm | शेर भाई

तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा, तस म्हणाल तर ‘नशीबवान’ पण असाच कुठलातरी गामसि (गाजलेला मराठी सिनेमा) आहे म्हणे, पण ते असो.
आपली अर्धांगिनी म्हणजे आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख संगम आहे असे नवरा जेव्हा मग अर्धांगिनी असे Hybrid Looks घेते आणि हो ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

Bhakti's picture

11 Jul 2023 - 4:06 pm | Bhakti

तुमचे हे फारच ‘नशीबवान’ बाबा,

हो अर्थातच :)

ह्यात नवऱ्याची पर्यायाने संसाराची बचत मात्र खूप म्हणजे खूपच होते.

आहेच मी समजुतदार!

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2023 - 11:13 am | चौथा कोनाडा

मातीच्या चुली खरोखरच अप्रतिम चित्रपट आहे.
सर्वांचाच अभिनय वाखणाण्या जोगा आहे.
पाहिला नसेल तर आवर्जून बघा.

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Jul 2023 - 4:00 pm | हणमंतअण्णा शंकर...

का यावी शिसारी.

मला वाटतं, मराठी मेनस्ट्रीम मध्ये ही खूप चांगली परंपरा आहे.

अगदी कुंकू पासून ही परंपरा आहे. दोघी, वजनदार, गुलाबजाम, बिनधास्त, अगबाई अरेच्चा , जाउबाई जोरात, झिम्मा, आणि आत्ताचा बाईपण भारी देवा. नावे केवळ वानगीदाखल आहेत. बिनधास्त सारखा प्रयोग अजून कुठे झालाय हे ऐकिवात नाही. एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 11:32 pm | इपित्तर इतिहासकार

आता त्या गेल्यात सिनेमा पाहायला तो आहे स्त्रियांवर तर परीक्षणात तरी त्यांनी कश्याला सुवर्णमध्य साधावा हो ?

त्यांना जे जसे दिसले त्याचे त्यांनी परीक्षण केले आहे. विषयवस्तू सिनेमा परीक्षण आहे, मराठी सिनेमात स्त्रीवादी ओव्हरटोन असणाऱ्या कथा, पुरुष प्रताडना इत्यादी विषय घेण्याचे नैतिक (?) बंधन लेखिकेने का पाळावे म्हणे ??

प्रत्युत्तर देणे किंवा पुरुषांचे विषय हाताळायचे असले चित्रपट परीक्षण करून तर पोष्टर बॉईज बराच आधी रिलीज झाला आहे अन् मिपावर त्याचे परीक्षण वगैरे पण दिसलेले नाही. घ्या मनावर !

उगाच शिसारी येणे इत्यादी प्रतिसाद अस्थानी वाटले म्हणुन बोललो बुआ.

वैयक्तिक न घेणे.

घेतल्यास आमचा निरुपाय अन् तुमची चिडचिड, घ्या बापडा !

- मेरी लेखणी मेरा अभिमान विचार समर्थक

(नवप्रतिसादकर्ता) ई ई

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 11:36 pm | इपित्तर इतिहासकार

एकतरी दुसरी भारतीय सिनेसृष्टी दाखवा असे सिनेमे करणारी.

आसामी चित्रपटसृष्टी आहे एक तसली सशक्त... अगदीच स्त्रीवादी नाही पण कोनीकार रामधेनु (रामधेनु हे इंद्रधनुष्याचे असलेले आसामी भाषेतील सुंदर काव्यात्मक नाव) (बालसुधारगृहात असलेल्या बालगुन्हेगारी ग्रस्त बालकांवर असलेला सिनेमा), शागोरोलोई बोहू दूर (it's a long way to sea), पोखी असे काही सिनेमे पाहून माझे हे मत बनलेले आहे.

हे जवळपास सगळे सिनेमे युट्यूबवर उपलब्ध असावेत असे वाटते. अवश्य लाभ घ्या.

कर्नलतपस्वी's picture

12 Jul 2023 - 6:55 am | कर्नलतपस्वी

एक चित्रपट नाही तर कमीत कमी तुनळी तो बनती है.

कपिलमुनी's picture

10 Jul 2023 - 2:00 pm | कपिलमुनी

सध्या हा पिक्चर सुपरहिट आहे. समस्त महिलावर्ग घोळक्याने जातो आहे.

चौथा कोनाडा's picture

10 Jul 2023 - 2:29 pm | चौथा कोनाडा

लै भारी ......

लेख स्टार्ट : गॉगलवाल्या नथीधारीणी

लेख एण्ड : गॉगलवाल्या नथीधारीणी
BBDNATH

नुसतं सेलीब्रेशन .... लै भारी.

झकास! हा चित्रपट पहायला जाण्याची अजिबात शक्यता नाही पण त्याचा परिचय आणि शेवटचा फोटो आवडला 👍

जेपी's picture

10 Jul 2023 - 3:53 pm | जेपी

काल सगळ्या मित्रांच्या स्टेटस ला फॅमिली सकट पिक्चर ला गेल्याचे दिसत होते.आज तिकीट काढलीत घरच्यांसाठी . पाहूया आवडतो का ?

वामन देशमुख's picture

10 Jul 2023 - 5:31 pm | वामन देशमुख

परिचय आवडला.

या आठवड्यात -

सौ आणि तिच्या मैत्रिणींना घेऊन जायचं आहे.

आई आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन जायचं आहे.

वीस किलोमीटर अंतरावरच्या त्या थिएटरला दोन वेगवेगळ्या विजिट्स् करायच्या आहेत!

- Mumma's boy & wife's hubby
Vamz
'

राजेंद्र मेहेंदळे's picture

10 Jul 2023 - 7:41 pm | राजेंद्र मेहेंदळे

वरच्या प्रतिसादात हेच म्हणत होतो. जेव्हा सासु -सूना एकत्र बसुन असे चित्रपट एंजॉय करु शकतील तो सुदीन.

प्रसाद गोडबोले's picture

10 Jul 2023 - 11:42 pm | प्रसाद गोडबोले

ह्या चित्रपटाविषयी माहीत नाही पण
बाईपणा बद्दल आलेला खरा लोकोत्तर चित्रपट म्हणजे हा :

https://www.youtube.com/watch?v=B4jnpLZ8XzM

=))))

मार्कस हा चित्रपट मी वयाच्या फार उशीरा टप्पावर पाहिला. माझ्या लेकीला मी अशीच बोल्ड बनवणार आहे, आम्ही तर तरुणपणी बोरं...संस्कारी काकूच होतो :(

प्रसाद गोडबोले's picture

11 Jul 2023 - 9:40 pm | प्रसाद गोडबोले

उपरोधिक प्रतिसाद.

माफ करा पण माझा प्रतिसाद उपरोधिक होता =))))
वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.

अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

Bhakti's picture

12 Jul 2023 - 7:06 am | Bhakti

वयात येत असलेल्या मुलींनी कसे वागु नये ह्याचा उत्कृष्ठ नमुना आहे तो चित्रपट. मी पाहिला तेव्हा पोट धरुन हसलो होतो.

ओह,मला तर कळतच नव्हता तो सिनेमा,या पोरी वेगळच करत आहेत एवढेच कळलं.परत बघावा लागतोय.

अर्थात , इतर मुली तसे वागत असल्यास आम्हाला आनंदच आहे , आमची कशालाच हरकत नाही ;)

अजून १० वर्षांनी बघा, सगळं मोकाट होणार आहे ;)

गवि's picture

11 Jul 2023 - 6:00 am | गवि

मंगळागौर स्पर्धा?

ओके. एकूण अंदाज आला.

बाकी जाता जाता.. यातील जवळपास सर्व नायिका ऑलरेडी सिनियर सिटिझन्स आहेत असे वाटते. मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??!

:-))

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2023 - 8:25 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>> मंगळागौर स्पर्धा?
ओके. एकूण अंदाज आला.

महिला आणि त्यांच्या सण-उत्सवाकडे पाहण्याची एक पारंपरिक दृष्टी या 'ओके' मधून आणि 'एकूण अंदाज आला' या शब्दामधुन दिसला. एखाद्या महिलेने एखाद्या विषयावर भरभरून बोलल्या नंतर 'बरं' असं म्हणून तो विषय संपवणारी एक पुरुषीपणा इथे डोकावला असे वाटून गेले.दोन हजार तेवीस मधेही अजुन महिलांना क्रमांक दोनवरच बघतो असे वाटले. समजून घेणे, त्यांच्या विषयांशी एकरूप होणे, एक पुरुष म्हणून किती अवघड असते असे वाटले.

-दिलीप बिरुटे

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 8:52 am | प्रचेतस

सहमत. मला पण गवि हे पुरुषसत्ताक पद्धतीचे समर्थन करणारे असतील असे वाटले नव्हते.

का आले हे ? आय मीन.. आले का हे? या या. बसून घ्या. आप आये... आता संस्कृतीला काही धोका नाही उरला..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2023 - 9:03 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>> गवि हे पुरुषसत्ताक पद्धतीचे समर्थन करणारे असतील असे वाटले नव्हते.

सहमत. मूडऑफ़.

-दिलीप बिरुटे

गवि's picture

11 Jul 2023 - 9:05 am | गवि

मूडऑफ़

काही वेगळे असेल तेव्हा सांगत चला हो.. ;-))

Grishma B.'s picture

11 Jul 2023 - 10:44 am | Grishma B.

1+

मध्यम वयीन, मेनोपोज वगैरे बरेच मागे पडले असावे अशा वयाच्या. पण शेवटी चित्रपट आहे. त्यात सलमान, अक्षय चालतात तर यांनी काय घोडे मारलंनीत..??!

:-))

ओह,गवि आपल्यामुळे चूक लक्षात आली.मध्यम वयीन नाही तर ४१ ते ६५ वयोगट आहे बहिणींचा.सर्वात छोटी वय ४१ हिच्याबाबत मेनोपोज दाखवला आहे.मोठ्या रिटायर्ड दाखवल्या आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2023 - 8:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

चित्रपटाची ओळख छान करून दिलीय. चित्रपटात आवडलेल्या गोष्टी कोणत्या त्याबद्दल लिहिलेलं आवडलं. सातत्याने तुम्ही वेगवेगळ्या विषयावर लिहिता, लिहिते राहा.

बाकी चित्रपट मोबाइल वरु सुरुवात करून पंधरा मिनीटानंतर सोडून दिला. नंतर बघू म्हणून. मैत्रीण म्हणाली पूर्ण बघितल्यावर चित्रपट असता तर, माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.

बाकी नथी गॉगल्स वाला फोटो लै भारी.

-दिलीप बिरुटे

माझ्याही मैत्रिणीला चित्रपट लैच आवडला. किती बोलू आणि किती नै.

मैत्रीणीबरोबरच तुम्ही चित्रपट बघायला हवा होता मग कदाचित तुम्हालाही आवडला असता.

सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 9:02 am | प्रचेतस

सोबतच पहिला असणार. कोई शक? पंधरा मिनिटांनी फक्त यांनी चित्रपट बघणे बंद केले असा अर्थ समजून घे नीट.

शनायेना. बाकी तुमचे हे तर्क स्वानुभवातून आलेले दिसतात. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Jul 2023 - 9:09 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखक आपल्या धाग्यावर नवे प्रतिसाद बघायला येतो अशा अवांतर प्रतिसादांनी आनंदावर वीरजन पड़ते. अवांतर कमी करा रे..!

धागा लेखिका अवांतर प्रतिसाद लिहीणा-यांना क्षमा करतील यात काही वाद नाही.

-दिलीप बिरुटे

चांगलाच दंगा घातलाय -))) असू द्या!

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 8:54 am | प्रचेतस

चित्रपट परिचय आवडला, सध्या तुफान चाललेला दिसतोय. ह्याच्या वाढलेल्या शोंमुळे द फ्लॅश आणि इंडियाना जोन्स-डायल ऑफ द डेस्टीनीचा पत्ता कट झाला आणि हे चित्रपट पाहायचे राहूनच गेले.

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Jul 2023 - 11:53 am | राजेंद्र मेहेंदळे

पण येत्या दिवसात बार्बी च्या ओघात ओपनहायमर बघायला विसरु नका म्हणजे झाले

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 11:59 am | प्रचेतस

नै नै, मी तर मिशन इम्पॉसिबल- डेड रेकनिंगचे टिकिटही बुक केलेय :)

राजेंद्र मेहेंदळे's picture

11 Jul 2023 - 12:04 pm | राजेंद्र मेहेंदळे

पाहील्यावर धागा टाका

प्रचेतस's picture

11 Jul 2023 - 12:08 pm | प्रचेतस

नै हो, परिक्षण लिहिणं जमत नै.

नोलनचा Openheimer पण येतोय कोणी पाहिला तर सांगा.

हा सिनेमा समजायला सोपा जाईल ..

काही ज्येष्ठ मिपाकर इथे अवांतर करताना पाहून मान शरमेने खाली गेली. मी नावे घेऊ इच्छित नाही पण खेद वाटलाच. असो.

या धाग्यावरील अवांतर आणि विनोद बाजूला ठेवून अल्प स्पष्टीकरण.

स्त्रियांनी मंगळागौर किंवा हळदीकुंकू किंवा अन्य काहीही साजरे करून आनंद अवश्य घ्यावा. आणि घेतातच. थांबतात की काय सूचनेसाठी?!! तर ते एक असो.

एक सोहळा, सण, एकत्र येण्याचे निमित्त म्हणून एखादी प्रथा जपणे वेगळे आणि मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय आणि त्या दिशेने जाताना इतर गुंफण ही कथारचना स्त्रियांचे अत्यंत स्टिरीओटायपिंग करणारी आहे हे कोणाला जाणवत नसेल तर किंचित आश्चर्य. आपल्या टिव्ही वरील असंख्य सिरीयल्स स्त्रियांना (आणि पुरुषांनाही) stereotype करून बनवल्या जातात हेही खरेच. ते जाणवते की नाही हा वेगळा भाग. पण त्या तुडुंब लोकप्रिय होतात हेही तितकेच खरे. So people get what they enjoy हे अंतिम सत्य मान्य करावेच लागते.

लेखाबद्दल अर्थातच यातील काही लागू होत नाही हे वेगळे सांगणे नलगे. धन्यवाद..

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Jul 2023 - 6:26 pm | हणमंतअण्णा शंकर...

मंगळागौर स्पर्धा हेच चित्रपटातील कथेचे / स्त्रीचे अंतिम ध्येय

चित्रपटात असे काहीही नाही आहे गवि.

इन्फॅक्ट, त्या स्पर्धेचा फायनल रिझल्ट देखील कळत नाही.

अगदी निमित्त आहे ते फक्त. चित्रपट त्याहून सटल आहे.

चित्रपट न बघता मत बनवणे हे चुकले. मान्य. मी फक्त या परिक्षणातील वाक्ये वाचून मत बनवले.

चांदणे संदीप's picture

11 Jul 2023 - 12:23 pm | चांदणे संदीप

सोशल मिडियावर तसेच टीव्हीवर याचे जोरदार प्रमोशन दिसतच होते. तुमच्या लेखाला पाहून आता खात्री झालीये. या विकांताला घरच्या सर्वांना घेऊन जाईन.

सं - दी - प

चांदणे संदीप's picture

14 Jul 2023 - 8:58 pm | चांदणे संदीप

कालच घरातल्या सर्वांना घेऊन गेलो होतो. तुफान गर्दी होती. आमच्या भागात एमआयडीसी ला गुरूवारी सुट्टी असते त्याच्यामुळेही असेल कदाचित. पण थिएटरमधल्या स्टाफसोबत बोलणे झाले तर त्यांनी सांगितले की आजच्याइतकी नसली तरी रोजच गर्दी होत आहे.

चित्रपटाबद्द्ल काय बोलायचे. इथे लेखात आणि काही प्रतिसादातून गोष्टी आलेल्याच आहेत. चित्रपटाला माझ्यातर्फे वरचा "सा"! :)

(उद्या 'मिशन'ला जायचे बाब्बा)

सं - दी - प

टर्मीनेटर's picture

14 Jul 2023 - 9:55 pm | टर्मीनेटर

जाउन या... जाउन या...
काल केलेल्या पापाचे क्षालन होईल 😀 😀 😀
जोक्स अपार्ट, आज पाहिला ब्वॉ 'मिशन'...अफलातुन आहे!

मुक्त विहारि's picture

11 Jul 2023 - 12:27 pm | मुक्त विहारि

परिक्षण आवडले....

सिनेमा अजिबात बघणार नाही...

चौथा कोनाडा's picture

11 Jul 2023 - 12:30 pm | चौथा कोनाडा

त्यापेक्षा मुवि तुम्ही मातीच्या चुली बघा असं रेकमेंड करीन.

मुक्त विहारि's picture

11 Jul 2023 - 5:49 pm | मुक्त विहारि

Avengers बरे ....

Bhakti's picture

11 Jul 2023 - 12:55 pm | Bhakti

Q
मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा

तर्कवादी's picture

11 Jul 2023 - 8:23 pm | तर्कवादी

मराठी पुरुषांनी ही नक्की पहावा

सगळ्या बायका, त्यातही म्हातार्‍या (त्यातल्या त्यात दीपा परब वगळता ) !! कोणता पुरुष आवडीने बघेल असा चित्रपट
एकवेळ ऋता दुर्गुळे, , शिवानी सुर्वे, पल्लवी पाटील, तेजश्री प्रधान, पूजा सावंत, मयूरी देशमुख (ही अलका कुबलची नवीन आवृत्ती वाटते, पण तरी आवडते) अशी स्टारकास्ट असती तर बघितला असता :)

हणमंतअण्णा शंकराप्पा रावळगुंडवाडीकर's picture

11 Jul 2023 - 5:07 pm | हणमंतअण्णा शंकर...

कालच पाहिला. आणि खरेच आवडला.

मंगळागौर स्पर्धेचे अप्रूप नाही. चित्रपटातही ती काही मेन थीम वगैरे नाही.

सगळ्यात जास्त कौतुक मला केदार शिंदेचे करावेसे वाटते.

अगदी चढत्या भाजणीने केदार शिंदेने चांगले सिनेमे दिले आहेत. महाराष्ट्र शाहीर नंतर अपेक्षा उंचावल्या होत्या. हा चित्रपट त्याचा सर्वोत्कृष्ट वाटला.

चित्रपट गल्ला जमवू लागले की असं म्हणायची प्रथा आहे. टीकाकार बसतात हात चोळत आणि निर्माते जातात बँकेत हसत. . . (हल्ली जावे लागत नाही पेन घेऊन ते सोडा. पण वाक्प्रचार उरलाय.)

आलो आलो's picture

13 Jul 2023 - 2:43 pm | आलो आलो

मस्त रिव्ह्यू आणि पोस्ट व फोटो जब्र्या !!
कालच आमच्या संस्थानाच्या तमाम महिला मंडळाला (एकूण ९ त्यात सर्वात तरुण म्हणजे मातोश्री व त्यांच्या सूना लेकी नाती अशा साधारण वय वर्ष ६१ ते १७) कोहिनूरच्या कॉनप्लेक्सला रात्री शो ला सोडणे व परत आणणे ही जिम्मेदारी अस्मादिकांनी अत्यंत मनस्वी पणे पार पाडली आहे .... ते सुद्धा रात्री मित्रांकडून आषाढ मास समारंभाचे अत्यंत आग्रहाचे निमंत्रण मन घट्ट करून अत्यंत कठोरपणे नाकारूण व त्याचे किती गंभीर (आर्थिक ) परिणाम आता सोसावे लागतील याची पूर्ण कल्पना असतांनाही... त्याग त्याग म्हणतात तो आणखी कशाला ... पण केवळ महिलांच्या आनंदासाठी....... छे छे आता आणखी काही सांगवत नाहीये सुज्ञांनी जाणून घ्यावे.
ता. क. बाकी ते नुस्त फिल्म बघायला जाण वेगळं नी या पिक्चर ला जाणं वेगळंच हो....नाही म्हंजे यांना सोडल्यावर जरा वेळ उगाच अळंम टळंम केल्यावर जीन्स वर नथीचा रुबाब बराच बघायला भेटला असो ...

आलो आलो's picture

13 Jul 2023 - 2:48 pm | आलो आलो

माहेरच्या साडी नंतर गृपा गृपाणे व कुटुंबाच्या कुटुंबाने (महिला सदस्य) एकत्र जाऊन पाहिलेला हाच एक चित्रपट असेल ...

धर्मराजमुटके's picture

13 Jul 2023 - 8:25 pm | धर्मराजमुटके

चित्रपटाचे परीक्षण उत्तम जमले आहे.
मी देखील स्वभार्या, भगिनी आणि बंधूभार्या यांना तिकीटे काढून देण्याचे पुण्यकर्म केले. मला तेवढेच चार तास (बायको नसतानाचा एकांत) मिळाला आणि मस्त ताणून देता आली. संपूर्ण चित्रपटगृहात मोजकेच लांबोडे होते असे कळाले.

आमच्या इकडे तर मराठी बायकांच्या नादी लागून इतर भाषिक बायका देखील हा चित्रपट पाहून आल्या.

अवांतर : चित्रपटाचे पोस्टर आणि चित्रपट पाहणार्‍या बायकांच्या नाकातील नथ वेगळ्या (डाव्या विरुद्ध उजव्या) नाकपुडीत आहे की सेल्फी मुळे मिरर इफेक्ट आला ते काही कळाले नाही.

इपित्तर इतिहासकार's picture

13 Jul 2023 - 11:24 pm | इपित्तर इतिहासकार

डम्बेल वर्क आऊट सुरू केल्यापासून बायकांनी रडायचं असतं हे मी विसरले आहे.त्यामुळे सिनेमात बायकांची फार रडारड असेल तर आपलं कसं होईल याची मला धास्ती होती.

ह्याचा काहीच संदर्भ लागला नाही. (बेंबटू मोड ऑन ऑफ)....

बाकी चित्रपट परीक्षण आवडले, व्यावसायिक परीक्षणे लिहिणे मनावर घ्या.

पुलेशु

Bhakti's picture

14 Jul 2023 - 10:47 am | Bhakti

स्त्री प्रधान सिनेमा, खुप भावनिक असेल असं वाटलं.पण या सिनेमात रडायला लागणार तोच एखादा सिन लगेच हसवतो :) त्यामुळे थिएटरमध्ये आपोआप जास्त रडू नाही आलं -))
मागच्या वाढदिवसापासून घरी डम्बेल वापरायला सुरुवात केली.बरीच स्ट्रेन्थ वाढली.हार्मोनमध्ये चांगले बदल होतात ! स्ट्रेन्थ ट्रेनिंगने त्याचा संदर्भ...
बायकांनी स्ट्रेन्थ ट्रेनिंग जरूर करावे,आनंदी हार्मोन वाढतात

इपित्तर इतिहासकार's picture

14 Jul 2023 - 10:05 pm | इपित्तर इतिहासकार

उत्तम उप्रकम... फिटनेस जर्नी करता हार्दिक शुभेच्छा.

जेवढी चर्चा झाली त्या मानाने चित्रपट पाहून निराशा झाली..
कथेत फारसा दम नसतानाही एवढा प्रतिसाद मिळतोय हे आश्चर्य आहे. मेनोपॉज, गर्भारपण इ. गोष्टी सतत चघळत बसणे म्हणजे स्त्रीत्वाचे over ग्लोरिफिकेशन वाटते मला तरी.

बाकी दुसरा फोटो जबरदस्त !!

एकूण पाच महिला लेखिका मिपावर उरल्या आहेत. त्यांना स्वातंत्र्य द्या.

गोरगावलेकर's picture

28 Jul 2023 - 11:19 am | गोरगावलेकर

आम्ही काही जणींनी ग्रुपने जाऊन पनवेलच्या थेटरात सिनेमा पहिला. आवडला. आम्हीही सहा बहिणी असल्याने असेल कदाचित. त्यातच पुतण्या येथील कर्मचारी असल्याने तिकिटे, पिझ्झा, बर्गर सर्व फुकट सोय झाली. तुमचा फोटो भारी. नथ आणि गॉगल नसल्याने आमचा फोटो बाद.
दोन दिवस उशिरा गेलो असतो तर पुतण्यासोबत मी सुद्धा तारकांबरोबर फोटो काढला असता ना!

सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद!