ढवळ्या शेजारी पवळा बांधला
वाण नाही पण गुण लागला
एकदा सुट्टीवर गेलो होतो. टाईमपास म्हणून डॉक्टर मित्राच्या दवाखान्यात बसलो होतो. बऱ्यापैकी गर्दी होती. रोगी येत होते, मित्र त्यांना तपासून औषधे गोळ्या, इंजेक्शन इ. देत होता. मला पण बर्यापैकी वैद्यकीय क्षेत्रात अनुभव म्हणून त्याच विषयावर अधून मधून गप्पा चालू होत्या.
मित्र रोगी तपासत असताना मी रोडवर येणारे जाणारे बघत आपले मनोरंजन करत होतो. कुणी ओळखीचा आसेल तर हाय,हॅलो. कधी आला,कधी जाणार टाईप विचारपूस. एखादा खुपच जवळचा असेल तर विचारायचा 'कधी बसायचे'......
रस्त्यावर बराच वेळ झाला एक तरूण, चिंताग्रस्त चेहर्याने येरझार्या घालत होता. सुरवातीला वाटले असेल कुणीतरी, पण बराच वेळ शतपावली केल्या सारखे फिरताना बघून असे वाटले की बहुतेक याला डॉक्टरला भेटायचंय. पण मग येत का नाही?
असो, दुपारचे दोन वाजायला आले होते. गर्दी जवळ जवळ संपली,शेवटचा रोगी बघून निघूयात असे म्हणत मित्र तपासायच्या खोलीत गेला.
शेवटचा रोगी निपटून आता आम्ही निघणार, तोच तरूण घाईघाईत आत शिरला.'डॉक्टर एक मिनिट प्लीज!'.मित्र त्याला घेऊन आत तपासायला गेला.
आता मात्र माझे कुतूहल शिगेला पोहचले होते. मित्राने त्याला वाटेला लावले. आता त्या तरुणाचा चेहरा थोडा रिल्याक्स वाटत होता. त्याने पण घाईघाईत काही नोटा मित्राच्या हातात कोंबल्या आणी जवळ जवळ पळतच बाहेर पडला.
"काय झालंय रे त्याला?", बराच वेळ फेऱ्या मारत होता.
मित्र हसत हसत म्हणाला त्याला 'फेडस' झालायं.
डोकं गरगरलं,मला हा आजार माहीतीच नव्हता. कदाचित काही नवीन संशोधन झाले असावे म्हणून म्हणलो "जरा समजवून सांग ना, मला माहीत नाहीये,नवीन आहे का?" मित्र पुन्हा एकदा जोरात हसला. "एक व्हिटामीनचे इंजेक्शन,काही व्हिटामीनच्या गोळ्या, आणी सात दिवस उपास सांगीतला आहे. आठवड्यात बरा होईल".
अरे पण आजार काय?
मित्र म्हणला नवीनच लग्न झालयं, आताच मधुचंद्रा वरून परत आलाय. काल पासुनच त्रास होतोय,हनीमून मस्त झाला पण आता बॅटिंग करताच येत नाहीये.आसे बकरे येतात,गुपितच ठेवायचं असते म्हणून परवलीचा शब्द.भरपुर फि देतात वर आशिर्वाद सुद्धा. पि आर वाढवतात ते वेगळेच.
😎
फेडस म्हणजे......
Post Honeymoon Erectile Dysfunction Syndrom
आता उपास कुठला ते लक्षात आले.
आम्ही दोघेही हसत हसत दैनै बाये मुड करत घराकडे निघालो.
ह्म्म....
दुनिया झुकती है झुकानेवाला चाहिये!!!!!!
खरचं गरज आहे का?
कोण शिकवते कळ्यांना
कसे, केव्हां उमलायचे
कोण शिकवते पानांना
केव्हां कसे गळायचे
ऋतुराज वसंत येता
झाडे बहरून येती
निसर्ग चक्र फिरता
होती फुले कळ्यांची
श्वानास कसे कळते
मास भादव्याचा आला
खरचं गरज आहे का?
हे सर्व शिकवावयाची
बुद्धिमान मानवाला!!!
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
धन्वंतरी कशाला
हे सर्व शिकवण्यास
मग मित्र मैत्रिणीं कशाला?
फक्त पार्टी झोडण्यास!!!!!
(फक्त दारू ढोसण्यास)
ह्म्म ......
असे हा सहावा वेद
न लगे संथा कुणाची
का भांबावलास तू रे
ही कस्तुरी तुझ्याच पाशी
अदृष्य सापळे हे
का पळे तू उगाच
जे पाहिजे ते
आहे जवळ तुझ्याच
कधी समजेल या खुळ्यांना
जे पाहिजे ते
आहे त्याच्याच पाशी
-कवी चाहूल
३१-९-२०२२, मुहुर्त- स्टॅ टा दु २:४१
प्रतिक्रिया
26 Sep 2022 - 3:59 pm | तर्कवादी
अफाट !!
26 Sep 2022 - 4:31 pm | कर्नलतपस्वी
मनापासून आभार.
26 Sep 2022 - 4:32 pm | कर्नलतपस्वी
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
26 Sep 2022 - 4:32 pm | कर्नलतपस्वी
जानुके आपुली
आदम आणी ह्व्वाची
स्वर्गातूनच शिकून आली
कला फळे चाखायची
26 Sep 2022 - 10:03 pm | आनन्दा
31 / 9 च्या प्रतीक्षेत!!
_/\_
26 Sep 2022 - 10:41 pm | कर्नलतपस्वी
पोलीसा पेक्षा पण बारीक निरीक्षण करताय की राव.
खुनी,चोर,दरोडेखोर लगेच पकडताल.
सॅल्युट.
मोबाईल मुआ दांडीयामुळं बिथरलाय.
27 Sep 2022 - 8:30 am | मुक्त विहारि
भारी किस्सा आहे...
27 Sep 2022 - 1:50 pm | राजेंद्र मेहेंदळे
व!!कविता आवडली.
पण तरीही वयाच्या काही टप्प्यांवर काही जणाना सेक्सॉलॉजिस्ट्ची मदत लागु शकते. जसे आपण ईतर डॉक्टरांकडे(डोळे/दात्/ईतर तक्रारी) त्या त्या वेळी जाउन सल्ला/ औषधे घेतो तसेच. त्यामुळे"खरच गरज आहे का?" याचे उत्तर होय असु शकते.