माझे आई-बाबा दर शनिवारी मारुतीला जातात. मी Agnostic Theist या categoryत मोडत असल्यामुळे मला कधी आग्रह करत नाहीत ते! पण आज म्हटलं, जाऊया आपणपण, तेवढंच सकाळी लवकर उठणं होईल!
हे मंदिर अक्कलकोट तालुक्यातल्या गौडगाव (बु.) या गावात आहे. सोलापूरपासून बसने पाऊण तासावर. दर शनिवारी-रविवारी सकाळी ६:२० पासून दर अर्ध्या तासाने बसेस असतात. बरोबर ७ ला पोचलो आम्ही गावात. ४:३० लाच उठावे लागले होते! माझ्या मानाने फ़ार म्हणजे फारच लवकर! पण सकाळच्या ताज्या हवेत बाहेर पडल्यावर सगळा कंटाळा पळून गेला. बसमध्ये पण खिडकीची जागा मिळाल्यामुळे आपण तर बाबा खूष होतो!
या मंदिराबद्दल महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि (त्यामुळे) जाग्रुत आणि नवसाला पावणारा म्हणून याची ख्याती आहे. शनिवार असल्यामुळे साहजिकच गर्दी बरीच होती. आणि त्यात भर म्हणून गावातले लोक "आम्ही काय इथलेच" म्हणून रांगेत घुसत होते! मानवबळाच्या कमतरतेमुळे गर्दीचे नियोजन नीट होऊ शकत नव्हते. काळाबरोबर ते सुधारेल अशी आशा आहे.
मूर्ती अतिशय सुंदर आहे. गाभार्यात आतपर्यंत जाता येते. सतत ध्वनिक्षेपकावर हनुमान चालिसा, स्तोत्रे चालू असल्यामुळे वातावरण प्रसन्न असते. साधारण एक तास लागला आम्हाला दर्शनाला. बाहेर आलो तर बस उभीच होती. ९:३० पर्यंत घरी पोचलोसुद्धा.
थोडक्यात, सोलापूरकडं कुठं आलात तर या मंदिराला भेट द्यायला हरकत नाही!
ता. क.: Camera नेला नसल्यामुळे छायाचित्रे टाकता आली नाहीत.
प्रतिक्रिया
26 Apr 2009 - 7:17 am | प्राजु
एका चांगल्या स्थळाची माहिती करून दिलीत.
थोडी अजून सविस्तर माहिती दिली असतीत तर आणखी आवडलं असतं वाचायला. म्हणजे तिथल्या गावाबद्दल.. आजूबाजूच्या परिसराबद्दल.
किंवा मंदीराचा आणखी काही इतिहास असेल तर त्याबद्दल.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
26 Apr 2009 - 1:53 pm | सनविवि
कौतुकाबद्दल आभार! :)
मंदिरात जेमतेम १ तास होतो मी, त्यातला बराचसा वेळ रांगेत उभा. त्यामुळे मंदिराच्या आणि गावाच्या इतिहासाबद्दल जास्त माहिती मिळवता आली नाही. शिवाय मंदिरात कुठे माहितीफलक दिसला नाही. अजूनेकदा जाण्याचा मानस आहे, तेंव्हा जरूर माहिती काढेन.
27 Apr 2009 - 3:26 pm | प्रमेय
चला सुरुवात तरी झाली आहे. चांगला लिहिला आहेस लेख.
तुझ्या इंग्रजी लिखाणापेक्षा मराठी वाचणे जास्त आवडेल मला...
पुलिये.
29 Apr 2009 - 6:14 am | सनविवि
धन्यवाद :)
27 Apr 2009 - 3:48 pm | दवबिन्दु
नारल व्हायला का?
.
अब्बी ऊठी अण्डा बनायी पकायी खायी और आयी। आँ, पैचान कौन । नई रे, चंदा भी नई, सोनि भी नई, अबे खुफियापनती क्या कर रहा है, ज्युली बोल रहि हू मै, शेखरअन्ना है?
29 Apr 2009 - 6:16 am | सनविवि
व्हय व्हय...नारल, तेल..सगळं व्हायलं!! :D
27 Apr 2009 - 4:14 pm | मिसळभोक्ता
बाहेर आलो तर बस उभीच होती. ९:३० पर्यंत घरी पोचलोसुद्धा.
काय सांगताय काय ? खरोखरच जागृत मारुती आहे.
(अधिक माहितीसाठी प्रभूमास्तरांना भेटा.)
-- मिसळभोक्ता
29 Apr 2009 - 6:17 am | सनविवि
=))
27 Apr 2009 - 8:32 pm | सुनील
लिहिलय बरं पण फारच त्रोटक.
स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे ...... हेमाडपंथी बांधकाम आहे
हे पटत नाही. हेमाडपंत होऊन गेले १३व्या शतकात आणि रामदासस्वामी १७व्या. हेमाडपंतांनंतरदेखिल हेमाडपंती देवळे बांधण्याची प्रथा सुरू होती का? आणि मुख्य म्हणजे "हेमाडपंती बांधकाम" म्हणजे नक्की काय?
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
29 Apr 2009 - 6:26 am | सनविवि
माफ करा, हेमाडपंथी बांधकाम म्हणजे काय हे मला नीट explain करता येणार नाही. महाजालावर पण जास्त माहिती मिळत नाहीये, कोणाला माहिती असल्यास सांगावे. (मी ती ओळ लेखामधून काढून टाकतोय.)
पण तुमच्या दुसर्या प्रश्नाचे मात्र मी उत्तर देऊ शकतो. हा दुवा बघा - http://timesofindia.indiatimes.com/Thane/The_Kopinishwar_Mandir/articles...
हेमाडपंथी ही हेमाडपंतांनी काढलेली बांधकामशैली आहे. ती त्यांच्या काळानंतर पण प्रचलित होती.
29 Apr 2009 - 12:23 pm | प्रदीप
ह्यांबद्दल येथे सविस्तर लेख वाचा.
आपला लेख आवडला, अजून सविस्तर असला पाहिजे होता असे वाटते.
29 Apr 2009 - 10:06 pm | सनविवि
अरे वा! दुव्याबद्दल धन्यवाद!
27 Apr 2009 - 8:45 pm | परिकथेतील राजकुमार
गौडगावचा जाग्रुत मारुती असे शिर्षक आहे पण लेखात जागृती विषयी एकही दाखला आढळत नाही.
या मंदिराबद्दल महत्वाच्या गोष्टी म्हणजे स्वत: समर्थ रामदासांनी मारूतीची प्रतिष्ठापना केली आहे आणि (त्यामुळे) जाग्रुत आणि नवसाला पावणारा म्हणून याची ख्याती आहे.
फक्त रामदासांनी (मिपावाले नाही) प्रतिष्ठा केली आहे म्हणुन ?? हे पटले नाही.
परा(म)दासी
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
29 Apr 2009 - 6:32 am | सनविवि
असं लिहिण्याचं कारण म्हणजे कुठलेही देवस्थान जाग्रुत असतं असं मी मानत नाही. मुळात देवाची प्रार्थना करुन, पूजा करुन, त्याला नाऱळ, तेल वगैरे वाहून तो आपली इच्छा पूर्ण करतो हेच मला पटत नाही.
स्वतः रामदासांनी प्रतिष्ठापना केल्यामुळे लोकांना असे वाटू लागले असावे की हा मारुती जाग्रुत आहे आणि काही योगायोगांनी तो समज द्रुढ होत गेला असावा.
29 Apr 2009 - 1:34 pm | जागु
फोटो टाकला असता तर बर झालं असतं.