अचानक पुणे-३० कट्टा

बिपिन कार्यकर्ते's picture
बिपिन कार्यकर्ते in जनातलं, मनातलं
16 Apr 2009 - 12:51 pm

मागच्या काही दिवसांपासून पुण्यनगरीत मुक्काम आहे. पुण्यात आलो तसे मिपाकर मित्रांचे फोन यायला सुरूवात झाली.

"काय मग? कधी भेटताय?"
"पुण्यात आलास, कळवत पण नाही. बघून घेऊ आम्ही पण."
"या वेळी भेटायचंच बरं का, मागच्या वेळी टांग दिलीस."

एक ना दोन. मलापण भेटायचंच होतं मिपावरच्या काही महान, थोर इ.इ. व्यक्तिमत्वांना. काल थोडा वेळ मिळाला म्हणून जरा फोनाफोनी केली दुपारी. परा, दाढे डॉक्टर आणि श्रावण मोडक एवढे मासे गळाला लागले. म्हणलं, आधी पराला भेटू. तिथून डॉक्टरकडे जाऊ आणि मग मिष्टर मोडकांना भेटू. थोडका आणि आटोपशीर कार्यक्रम ठरवून निघालो.

पुण्याच्या जगप्रसिद्ध 'पुणे-३०' परिसरात पोचलो. परंपरेला जागून रिक्शावाल्याने 'निंबाळकर तालमीसमोर' असं सांगून सुद्धा मस्तपैकी २-३ चौक पुढे नेऊन "आता कुठे जायचं?" असं विचारलं. "अहो, निंबाळकर तालीम कुठे आहे?" असे विचारल्यावर, "ती काय मगाशीच गेली की मागं" असं म्हणून आधी एक पिचकारी मारली आणि मग माझ्याकडे अतिशय क्षुद्रत्वदर्शक कटाक्ष टाकला. त्या संपूर्ण क्रियेत एवढी ताकद होती की मी किती वेंधळा आहे याची मला परत एकदा जाणीव झाली. (साधारणतः ही जाणीव फक्त घरातच होते एरव्ही).

मग परत पराला फोन केला. ऑनलाईन इन्स्ट्रक्शन्स घेत आलो एकदाचा त्या तालमीसमोर. आता, परा या प्राण्याचे जालिय उपद्व्याप एवढे भारी आहेत आणि परत निंबाळकर तालमीसमोर वास्तव्य असल्यामुळे पराची एक इमेज माझ्या मनात होतीच. मी बराचवेळ तसला कोणी मानवप्राणी दिसतो आहे का हे शोधतोय. फोनवर आम्ही दोघेही एकमेकांना "अरे मी बरोब्बर तालमीच्या समोर आहे" असे सांगत होतो पण एकमेकांना दिसत काही नव्हतो. मग थोडा वेळ "ढूंढो ढूंढो रे" झाल्यावर मला एकदम रस्त्याच्या पलिकडच्या बाजूला एक "नन्हासा, छोटासा, प्यारासा, एवढुस्सा" बालक वजा माणूस फोनवर बोलताना आणि शोधक नजरेने इकडे तिकडे बघताना दिसला. मी अंदाजाने त्या दिशेला कूच केले आणि त्याची नजर माझ्या दिशेने वळताच, हात वर करून हलवला. तो पण लगेच हसला. आम्ही भेटलो एकदाचे!!!

मग तिथून जवळच असलेल्या त्याच्या नेटकॅफेवर गेलो. हा माणूस नेहमी "माझ्या कॅफेत आलेल्या सुंदर मुली" वगैरे शब्दप्रयोग वापरत असतो. त्यामुळे मला जाम उत्सुकता लागली होती. पण तिथे बघतो तर काय.... शुकशुकाट. आणि एक माणूस चूपचाप कोपर्‍यात बसला होता.

आमच्या गप्पा सुरू झाल्या. थोड्या वेळाने मी त्याला हळूच विचारले, "अरे त्या सुंदर मुली वगैरे दिसत नाहीत रे." म्हणतो कसा, "अहो त्या नवीन माणसं दिसली तर जरा बिचकतात." त्याला माहीतच नव्हतं की आम्ही पण जालावर वावरताना असंच काही बाही फेकत असतो. पण म्हणलं जाऊ दे. कशाला उगाच आपल्या कंपूतच लफडी करा. प्रतिसाद वगैरे तसे इमाने इतबारे आणि चांगले देतो हा परा. हा विषय ताणून धरला आणि याने प्रतिसाद द्यायचे बंद केले तर? आपलंच नुकसान. गप्प बसलो.

आता काय करुया असा विचार चालला होता. लॉर्ड टिंग्यापण सध्या पुण्यनगरीत आले आहेत असे कळले होते. त्यांना विचारू म्हणून फोन केला. तर ते नेमके जवळपासच होते. पुण्यात 'तुळशीबाग' नावाचे एक प्रेक्षणीय स्थळे पाहण्याचे स्थळ आहे. तिथे हे 'थोडा स्वार्थ थोडा परमार्थ' करत फिरत होते. (परमार्थ म्हणजे काही बुजुर्ग मंडळींना खरेदी निमित्त सोबत देत होते आणि स्वार्थ म्हणजे.... हॅहॅहॅ, कळलंच असेल तुम्हाला. समझा करो यार!!! ) आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी पटकन आमच्या पर्यंत पोचायचे मान्य केले.

तेवढ्यात डॉक्टरांचा फोन आला. "कुठे पोचलात?" बोलाचालीत असं कळलं की आम्ही जिथे होतो तिथून डॉक्टरांचा दवखाना फक्त २ मिनिटांच्या अंतरावर होता. पराला घेऊन तिथेच जाऊ, आणि लॉर्डसाहेबांना आणि मोडकसाहेबांना पण तिथेच बोलावू असा बेत ठरला. पराला विचारले "किती वाजता दुकान बंद करतोस रे?" त्यावर त्याने "तुम्ही म्हणत असाल तर आत्ता बंद करतो" असे अतिशय भावनापूर्ण आणि आवेशपूर्ण उत्तर दिले. काय हा कंपूचा महिमा. ज्या माणसाला मी आयुष्यात पहिल्यांदा प्रत्यक्ष भेटतो आहे, त्याने असे बोलावे, ते पण पुणे-३० मधे!!! मला अतिशय म्हणजे अतिशयच भरून का काय म्हणतात तसे आले. मोठ्या कष्टाने मी माझ्या भावनांना (भावना = मनाची एक स्थिती, पराच्या कॅफेतल्या सो कॉल्ड सुंदर मुलींपैकी एक नव्हे.) आवर घालून त्याला म्हणले "बाबारे!!! असं नको करू. तुझे चालू दे." पण त्याला धीर कुठला. लगेच शटर डाऊन करून आम्ही निघालोच.

डॉक्टरांचा दवाखाना खरंच अगदी जवळच होता. ते वाटच बघत होते. आम्ही घुसलो आत आणि मस्त गप्पा सुरू झाल्या. डॉक्टरांच्या सुंदर आणि सुसज्ज दवाखान्यात मला तेवढ्यात दुसर्‍या महायुद्धावरची दोन खूपच सुंदर आणि भली थोरली पुस्तकं सापडली. गप्पा त्या विषयावर वळल्या. डॉक्टरांचा या विषयावरचा व्यासंग केवळ थक्क करणारा आहे. आणि त्या व्यासंगापोटी त्यांनी किती उद्योग केले त्याची कहाणी त्यांच्या तोंडून ऐकायला पाहिजे. या विषयावर कोणतेही नवीन पुस्तक पुण्यात आले की त्यांना फोन जातो दुकानदाराचा.

इतक्यात मोडकसाहेब पण आले. कोणत्याही मदतीशिवाय त्यांनी डॉक्टरांचा दवाखाना बरोब्बर शोधून काढला. हा माणूस हाडाचा "शोधक पत्रकार" आहे, प्रश्नच नाही. ;) कमी पण मार्मिक बोलणं हा यांचा गुणविशेष. अतिशय बारीक नजर आणि जबरदस्त निरीक्षणशक्ती.

तेवढ्यात डॉक्टरांनी त्यांनी हाताळलेल्या अवघड केसेसचा आणि त्यावर केलेल्या शस्त्रक्रियांच्या रंगीत छायाचित्रांचा संग्रहच उघडला. त्यातल्या छायाचित्रांना केवळ "भयानक" हेच विशेषण लागू पडेल. मी आणि टिंग्यातर तिथून निघायच्या बेतात आलो होतो. (बहुतेक) शंकराचार्यांनी मानवी शरीराचे "रक्तामांसाचा चिखल" असे वर्णन केले आहे. समोर जे काही दिसत होते त्यावरून ते १००% बरोबर आहेत हे दिसतच होते. डॉक्टरांची मास्टरी जबडा आणि जबड्याशी संबंधित भागांच्या शस्त्रक्रियांवर. नाना प्रकारच्या केसेस त्यांनी यशस्वी पणे हाताळल्या आहेत.

धमालपंत देशमुखांची गढी तिथून जवळच असल्याचे स्मरण आम्हाला झाले. मग त्यांना फोन गेला. रिवाजाप्रमाणे १० वेळा रिंग झाल्याशिवाय फोन उचललाच गेला नाही. उगाच डिस्टर्ब नको व्हायला या उदात्त हेतूने आम्ही फोन बंद करणार एवढ्यात त्यांनी फोन उचललाच. आम्ही सगळे इतक्या जवळ जमलो आहोत हे ऐकल्यावर तर ते अस्वस्थच झाले. "कपडे घालून (खरं म्हणजे त्याना कपडे बदलून असे म्हणायचे होते, चुकून होतात चुका बोलताना गडबडीत, आपण सांभाळून घ्यायचं) आलोच" असे म्हणून ते तडक निघालेच. अल्पावधीत तेही पोचले. गप्पांना रंग चढला. डॉक्टरांनी त्यांच्या नवीन कॅमेर्‍याने आमचे फोटो वगैरे काढले.

आता पुढे काय करायचे असा विचार चालू झाला. मिपामुळे एकत्र आलेल्या आम्हा सर्व दोस्तांना मैत्रीत अजून थोडा ओलावा यावा असे अगदी मनापासून वाटले. त्यामुळे तिथून बाहेर पडलो आणि जवळच एका पाणवठ्यावर दाखल झालो. सगळे जण आता अगदी मोकळेपणाने बोलत होते. तेवढ्यात टिंग्याने मला ३-४ वेळा काका म्हणून घेतले. त्याला वाटले मनाच्या त्या उत्फुल्ल स्थितीत मला कळणार नाही, पण मी ऐकलेच. असो, योग्य संधीची वाट बघेन मी. ;)

डॉक्टरांनी श्रीमान तात्यासाहेबांना फोन लावला. तेवढ्यात मोडकसाहेबांच्या ध्यानी आले की "अरे, आज तर बुधवार. तात्यासाहेब त्यांच्या बुधवारच्या व्रताच्या कर्मकांडात गुंतले असणार. डिस्टर्ब तर नाही होणार ना त्यांना?" पण तेवढ्यात मालकांनी फोन उचललाच. ते खरोखरच व्रताच्या पूजेत होते. पण तरीही त्यांनी आमच्या सगळ्यांशी अतिशय प्रेमाने वार्तालाप केला, मला जातीने वृत्तांत लिहिण्याची आज्ञा केली. आणि आम्ही त्यांना आमंत्रण न दिल्याबद्दल अंमळ माफक आशिर्वादपर प्रेमळ शब्दही उच्चारले. आम्हीही त्यांचे ते शब्द प्रेमाचे द्योतक समजून मस्तकी धारण केले. त्यासमयी ते त्यांच्या आवडत्या दरबारी व्यक्तीबरोबर असल्याने आम्ही त्यांना जास्त त्रास न देता फोन बंद केला.

स्वामींच्या अशिर्वादानंतर मग आम्ही दक्षिणदिग्विजयालंकृत बंगळूराधिपती श्रीमान १००८ श्रीमंत डानराव यांचा आशिर्वाद घ्यावा म्हणून त्यांना फोन केला. त्यांनी पण त्यांच्या उपस्थितीशिवाय कट्टा केल्या बद्दल माफक समज देत आम्हाला शुभेच्छा दिल्या. टिंग्याने पुण्याच्या पेशव्यांना फोन करायचा प्रयत्न केला पण बहुधा तो सफल झाला नाही. पुण्यातील प्रसिद्ध संत श्री आनंदयात्रीबाप्पु बालब्रह्मचारी यांना पण फोन करावा असे वाटले. पण धमालपंतांनी त्यात मोडता घातला. असो.

आता पर्यंत ओलावा बराच वाढला होता, तेव्हा आता काही उदरभरण करावे अशी चर्चा सुरू झाली. डॉक्टरांनी त्यांचे वजन (शाब्दिक!!!!!!!) वापरून पुण्यात जगप्रसिद्ध असलेल्या 'एस.पी. बिर्याणी'च्या थेट मालकालाच फोन लावला. आम्ही ५-६ जण येत आहोत, बडदास्त नीट ठेवली जावी अशी तंबी दिली. मग यथासांग पाणवठ्यावरचा मुक्काम आम्ही 'एस.पी.' मधे हलवला. एरवी खास लोकांसाठी रेड कार्पेट घालतात. पण इथे मात्र खूप उशीर झाल्याने दुकान बंद होत होते आणि सेवकवर्गाने ते रेड कार्पेट उअचलून घ्यायला सुरूवात केली होती.

पण तरीही डॉक्टरांच्या धाकाने एस.पी.च्या मालकाने आम्हाला मनसोक्त खाऊ घातले. बिर्याणी तर खरंच मस्त होती. गप्पा आणि बिर्याणी, दोन्ही हाणल्यावर आत्मा शांत झाला. धमालपंत खरंच खानदानी षौकीन माणूस. सुंदर पानाची व्यवस्था त्यांनी आधीच केली होती. सुंदर जेवणानंतर त्याहून सुंदर पान खायला घातले सर्वांना. एव्हाना बराच वेळ झाला होता. मंडळींना लांब पर्यंत जायचे होते. अजून बराच वेळ बसायची इच्छा होतीच पण शक्य नव्हते. केवळ मिपाच्या माध्यमातून एकत्र आलेलो आम्ही ६ जण नाइलाजाने एकमेकांचा निरोप घेऊन आपापल्या दिशेने चालू पडलो. एक, अगदी अचानक, ध्यानीमनी नसताना झालेला छोटेखानी पण मस्त कट्टा यथासांग पार पडला. आता परत येईन पुण्यात तेव्हा या सगळ्यांना भेटणे अनिवार्यच.

***

टीप : हा कट्टा खरोखरच अगदी अचानकच झाला. अजून बर्‍याच लोकांना भेटायची इच्छा होती / आहे. पण खूप उशीर झाला होता त्यामुळे जमले नाही. मिपाकरांनी राग मनी धरू नये.


परा आणि श्रावण मोडक हॅ हॅ करतांना


बिपिनदा अरबस्तानातल्या सुरस व चमत्कारिक गोष्टी सांगतांना


धम्या फोन केल्यावर घाई घाईत कपडे (आवश्यक ते) घालून आला.. शेजारी श्रावण मोडक


छोटा टिंगी मस्त केस बिस कापून श्टाईलीत पोझ देतोय..


एस-पीज मधली फस्क्लास दम बिर्याणी!


बिर्याणी चेपल्यावर सोलकढी आणि पान! बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात नाही..


बिर्याणीशी सामना करतांना श्रावण मोडक


स्वतः डॉक्टर

संस्कृतीसमाजमौजमजालेखबातमीअनुभव

प्रतिक्रिया

घाशीराम कोतवाल १.२'s picture

16 Apr 2009 - 12:59 pm | घाशीराम कोतवाल १.२

मस्त लिहिलेत धावता आढावा घेतलात

**************************************************************
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
कोणी पाजली तरच पिण्यात अर्थ आहे ,
स्वताच्या पैशाने प्यायला मी काय मुर्ख आहे ??

नंदन's picture

16 Apr 2009 - 1:02 pm | नंदन

वृत्तांत! पुरेपूर कोल्हापूरच्या कट्ट्याची आठवण झाली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

अवलिया's picture

16 Apr 2009 - 1:04 pm | अवलिया

मस्त धावता आढावा !

--अवलिया

छोटा डॉन's picture

16 Apr 2009 - 1:07 pm | छोटा डॉन

बिका, एकदम खणखणतीत वृत्तांत लिहला आहे. हसुन हसुन पडलो ...
(आयला आजकाल भरल्या पोटाने असे हासणे कठिणच जाते. असो.)

किती वाक्ये निवडुन त्याखाली स्मायली टाकु असे झाले आहे.
अवघा वॄत्तांतच उत्तम, मजा आली ...
( ओ मालक, कधी आमच्या गरिबांच्या बेंगलोर कट्ट्याचा वॄत्तांत लिहा. ;) )

------
(कट्टेकरी)छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

फोटो टाकलेत ते बरं केलंत.....काही थोर माणसांचे चेहरे बघायची संधी मिळाली.

विसोबा खेचर's picture

16 Apr 2009 - 1:11 pm | विसोबा खेचर

लेको असे अचानक कट्टे करता आणि आम्हाला जळवता काय?! :)

असो,

झक्कास वृत्तांत रे बिपिनदा! :)

तात्या.

मनिष's picture

16 Apr 2009 - 1:14 pm | मनिष

जरा आम्हाला पण फोन लावत जा की, पुण्यातच आहोत अजून! :)
असो! कट्टा मस्त रंगलेला दिसतोय, ;) बिपिनदा, अजून काही दिवस असशील पुण्यात तर भेटूया नक्की! एक अधिकॄत कट्टा करूया का शनिवारी?

स्वाती दिनेश's picture

16 Apr 2009 - 1:37 pm | स्वाती दिनेश

कट्टा जोरदार झालेला दिसतो आहे,
अरे पण गृहस्था, भारतात कधी गेलास तू अचानक?
स्वाती

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2009 - 1:45 pm | बिपिन कार्यकर्ते

अगं मी असा अचानकच जातो नेहमी भारतात. :)

बिपिन कार्यकर्ते

संदीप चित्रे's picture

16 Apr 2009 - 8:46 pm | संदीप चित्रे

इथे आम्ही अचानक भारतात जायचं म्हटलं तरी 'दिवस जाणं' काही चुकत नाही ...... वेळेतल्या फरकामुळे रे ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Apr 2009 - 1:41 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

बिका योग्य ठिकाणी "पान" मागितलंत ते बरं केलंत! परवा मला टेलिस्कोपसमोर उभे राहून "पान कुठे मिळेल" विचारत होता बिकाकाका!

अदिती
स्वाक्षरीत प्रत्येक वेळी 'पंच' असावा असं थोडीच आहे?

सुमीत भातखंडे's picture

16 Apr 2009 - 1:46 pm | सुमीत भातखंडे

मस्तं कट्टा आणि तितकाच रंगतदार व्रुत्तांत.
अप्रतिम.

दिपक's picture

16 Apr 2009 - 1:55 pm | दिपक

झकास वृतांत.. मस्तच जमला अचानक कट्टा :)

मैत्र's picture

16 Apr 2009 - 2:08 pm | मैत्र

करा... अजून कंपूबाजी करा आणि जळवा लेको !!! X( X( X( X(

नितिन थत्ते's picture

16 Apr 2009 - 2:49 pm | नितिन थत्ते

सारखं पुणे ३० - पुणे३० काय लावलंय हो बिपिनभौ.
अशानं आम्ही रागावू बरं का!!!!! =))

खराटा
(रंग माझा वेगळा)

घाटावरचे भट's picture

16 Apr 2009 - 2:51 pm | घाटावरचे भट

झकास कट्टा....अभिनंदन!!

llपुण्याचे पेशवेll's picture

16 Apr 2009 - 3:13 pm | llपुण्याचे पेशवेll

आयला येवढा मोठा कट्टा मिस केला मी . छ्या.... टिंग्याला झाडला पाहीजे माझा नंबर नीट न टिपल्याबद्दल. असो. कट्टा एकदम पुणे - ३० झालेला दिसतो आहे. :)

अवांतर: बिपीनदा किती दिवस आहात अजून पुण्यात? भेटू परत एकदा.

पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

पुढचा कट्टा कधी ?

- आहेच मी खडूस
पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत

बाकरवडी's picture

16 Apr 2009 - 4:52 pm | बाकरवडी

आम्हाला विसरलात राव !

चितळ्यांच्या दुकानातून बाकरवडी आणून खाल्ल्याचे लिहीले नाही !

असे का बाँ ! ;)

शाल्मली's picture

16 Apr 2009 - 5:00 pm | शाल्मली

झक्कासच झालेला दिसतोय कट्टा!
मस्त वृत्तांत.

--शाल्मली.

धमाल मुलगा's picture

16 Apr 2009 - 5:11 pm | धमाल मुलगा

अरे बिपिनदा, तू नुसतं पश्याच्या कॅफेवर घेऊन चल असं रिक्षावाल्याला सांगितलं असतंस तर त्यानं तुला आधी दंडवत घालुन प्रेमानं रिक्षात बसवून व्यवस्थित योग्य जागी सोडलं असतं :)

हा माणूस हाडाचा "शोधक पत्रकार" आहे, प्रश्नच नाही. Wink कमी पण मार्मिक बोलणं हा यांचा गुणविशेष. अतिशय बारीक नजर आणि जबरदस्त निरीक्षणशक्ती.

अगदी अगदी!!! पुर्ण सहमत!! अशक्य रसायन आहेत मोडकसाहेब :)

बाकी, डागदरांच्या दवाखान्यात आल्यावर त्यांच्या टेबलावरची दोन "World War II" असं लिहिलेली जवळपास माझ्या वजनाएवढीच जड पुस्तकं पाहुन मी बसल्याजागीच गार पल्डो होतो.

रिवाजाप्रमाणे १० वेळा रिंग झाल्याशिवाय फोन उचललाच गेला नाही.

=)) =)) अरे गप ना बाबा!

आम्ही सगळे इतक्या जवळ जमलो आहोत हे ऐकल्यावर तर ते अस्वस्थच झाले.

म्हणजे काय? होणारच की राव! इतके रथी महारथी जमलेले. 'कांटे'ची टीम अड्ड्यावर जमलेली आणि त्यात नेमकं महेश मांजरेकर नाही? ;)

"कपडे घालून (खरं म्हणजे त्याना कपडे बदलून असे म्हणायचे होते, चुकून होतात चुका बोलताना गडबडीत, आपण सांभाळून घ्यायचं) आलोच"

=)) =)) इच्चिभनं! आमचं आपलं "णो कॉमेंट्स"

बाकी, प.रा.सारखा दिलखुलास दोस्त सापडणं खरंच अवघड आहे. लॉर्ड टिंगी (पहिला) ह्याच्या पुनःदर्शनाने ऊर भरुन आला. आहो, काही झालं तरी साहेबाच्या देशातली माणसं ही..आमच्यासारख्या देशी गावंढळांना कोण अप्रुप असतं ह्यांचं (त्यात पुन्हा जर त्यांनी पेश्शल शिंगल माल्ट पाजली असेल तर जरा जास्तच ;) )

बाकी, ते दाढे डाक्टर म्हणजे बघा, गेल्या टायमाला मिशीसकट व्हतं, आन ह्या वक्ताला मिशी गायप!!!
हे म्हंजी गेल्या टैमाला रामप्रसाद दशरथप्रसाद शर्मा भ्येटलेलं आन् ह्याबारीला लक्की शर्मा असं वाटलं. :)

बिपीनदा तर काय, ऑलवेज रॉक्स.... (ऑन द रॉक्स नव्हे!!)

आपलाच,
(कंपूबाज) ध मा ल.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

मुक्तसुनीत's picture

16 Apr 2009 - 5:33 pm | मुक्तसुनीत

वृत्तांत वाचला. श्रुति धन्य जाहल्या ! मूळ वृत्तांत आणि प्रतिक्रियांचे कारंजे जोरदार ! काही व्यक्तींचे फोटु पहिल्यांदा पाह्यले. मोडकांची दाढी लय भारी वाटली बॉ ! :-)

पुणे-३० मधला दिलखुलासपणा ...तिथे चापलेली बिर्याणी ..ओले केलेले घसे. आणि काव्यशास्त्रविनोदेन मित्रांबरोबर घालवलेला काळ... हाय ! या दानासि , या दानाहून , अन्य नसे उपमान.
पीएल च्या "रावसाहेब" मधले ते प्रसिद्ध वाक्य लागू होते आहे : "त्यांनी व्यसने खूप केली. परंतु त्यांचे सगळ्यात मोठे व्यसन म्हणजे माणसं ! माणसं जवळ नसली की चैन पडायचे नाही त्यांना !" (काय खरं का नाय मिष्टर कार्यकर्ते ! ;-) )

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2009 - 5:50 pm | बिपिन कार्यकर्ते

काय करू भाऊ? हे व्यसन जबरदस्तच आहे... ;)

बिपिन कार्यकर्ते

शितल's picture

16 Apr 2009 - 5:37 pm | शितल

बिपीनदा,
वृत्तांत मस्त लिहिला आहेस रे.
प-या जास्त उपवास करतो वाटते .;) धम्या नेहमी प्रमाणे धबाधबा हसत आहे..;) बिपीनदा शाळा घेत आहे..;) आणि टिंगी बद्दल काय बोलावे.. हॅ हॅ हॅ करणे कसा विसरला तो.. ;)
फोटो ही मस्त.
अदितीच्या प्रतिसादातील फोटो ही मस्त. :)

बिपिन कार्यकर्ते's picture

16 Apr 2009 - 5:52 pm | बिपिन कार्यकर्ते

त्याला खूप झापला आम्ही, तुला त्रास देतो म्हणून. मग पश्चात्ताप झाला त्याला म्हणून गप्प आहे तो. ;)

बिपिन कार्यकर्ते

परिकथेतील राजकुमार's picture

16 Apr 2009 - 6:02 pm | परिकथेतील राजकुमार

हेहेहे ( ह्या पुढे असेच हसावे लागणार )

हा माणूस नेहमी "माझ्या कॅफेत आलेल्या सुंदर मुली" वगैरे शब्दप्रयोग वापरत असतो. त्यामुळे मला जाम उत्सुकता लागली होती. पण तिथे बघतो तर काय.... शुकशुकाट. आणि एक माणूस चूपचाप कोपर्‍यात बसला होता.

बिका येणार हे कळल्यामुले सर्व 'सौंदर्यस्थळांना आम्ही आधीच सावधगीरीची सुचना देउन ठेवली होती. त्यातुन टिंग्या पण येतो आहे म्हणाल्या बरोब्बर आम्ही कॅफेच लवकर बंद करायचा निर्णय घेतला ;)

प्रतिसाद वगैरे तसे इमाने इतबारे आणि चांगले देतो हा परा. हा विषय ताणून धरला आणि याने प्रतिसाद द्यायचे बंद केले तर? आपलंच नुकसान. गप्प बसलो.
कसल कसल ! काल खिशाला अज्जीबात हात न लावता आम्ही 'इमाने इतबारे' दिलेल्या सगळ्या प्रतिक्रीयांचे कष्ट वसुल केले. घसा ओला केल्यावर थोडे फार (थोडेफारच) पैसे शेअर करावे असा विचार होता परंतु तेव्हड्यात डॉक्टरसाहेबांनी 'वरचे पैसे' राहुद्यात असे म्हणल्या बरोब्बर आम्ही आमचे पाकिट म्यान केले. (सदाशिव पेठ -३०) (ह्या पुढे डॉक्टरांच्या लेखावर लक्ष ठेवावे लागणार)

देशमुख राजे गढीतुन तातडीन निघाले परंतु आमच्या पर्यंत थोडे आरामातच पोचले ;) आल्यावर त्यांनी लगेच मैफिलीचा ताबा घेउन टाकला हे.सां. न.ल.

टिंग्यापंत आमच्याकडे पाठ करुन आम्हाला शोधत असल्याने त्यांना शोधुन काढण्यात बराच वेळ गेला. त्यांनी सारखे मला 'तुला आधी कुठेतरी पाहिले आहे , पाहिले आहे... असे बर्‍याचदा ऐकवले. ज्या पोलिस चौकी बाहेर आपण माझी वाट पाहात उभा होतात तिथे आतच माझा फोटो टांगला आहे ही आठवण मी त्यांना अज्जीबात करुन दिली नाही. पण टिंग्याला काहि शंका आली असावी कारण आल्यापासुन परत जाईपर्यंत तो त्याची 'सॅक' अगदी उराशी बाळगुन बसला होता.

मोडक साहेबांनी जुने ठेवणीतले काही किस्से सांगुन बहार आणली. एकुणच त्यांचा सदस्य परिचय बघुन आश्चर्य वाटले :)

डॉक्टरां विषयी जास्ती काहि लिहित नाही कारण मग मला न्युनगंड आल्यासारखे वाटायला लागेल. फक्त आर.डीं. चे चाहते म्हणून त्यांनी खास कलकत्याहुन मागावलेली दुर्मीळ दिनदर्शीका ज्यावर आर.डीं. चे अतिशय दुर्मीळ फोटो आहेत, वर्ल्ड वॉर नावाचे प्रकरण ज्यानी आमची सातवी/आठवी/नववी हि शालेय वर्षे हिरोशीमा नागासाकी केली... त्या विषयावर डॉक्टर , बिपीनदा ह्यांची चर्चा ऐकुन साला हे आपल्याला इतिहास शिकवायला का न्हवते असे वाटुन गेले ;) त्या चर्चेत मध्येच थोडासा भाग घेउन टिंग्यानी आम्हाला आमच्या 'अशीक्षीत' पणाची जाणीव अजुन तिव्रतेने करुन दिली ;)

बिकां तर काय भेटल्या भेटल्याच एकदम आपले वाटुन गेले. त्यांना काय किंवा इतर कोणालाच काय, पहिल्यांदा भेटतोय असे जाणवलेच नाही. एका सुखद कट्ट्याबद्दल ह्या सगळ्यांचे मनापासुन आभार.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

मृगनयनी's picture

17 Apr 2009 - 10:26 am | मृगनयनी

बिपिन'दा.... एकंदर तुमचा कट्टा छानच झाला म्हणायचा!
:)

आपल्या पुढच्या दौर्‍यात आम्ही आपणास नक्की भेटू! :)

अवांतर :

१. ब्रिटिश टिन्गी उर्फ ब्रिट्स... खूपच सात्विक चेहर्‍याचा वाटतो. :)
२. प. रा. ला सारखं कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय! (ईस्पेशली सुजाता' कोल्ड्रिन्क च्या आसपास! ) :-?

असो....
:)

युद्ध माझा राम करणार | समर्थ दत्तगुरु मूळ आधार |
मी वानरसैनिक साचार |रावण मरणार निश्चित ||
|| इति अनिरुद्ध महावाक्यम् ||

रेवती's picture

16 Apr 2009 - 6:12 pm | रेवती

अचानक कट्ट्याचा अचानक वृत्तांत.:)
बिपिनभाऊंची लेखनशैली चांगली आहेच,
त्यातून सगळे दोस्तलोक भेटल्यावर जरा ज्यास्तच आनंद झालेला फोटूत दिसला.
प रा ने माझा अंदाज साफ चुकवला.
आधी वाटलं हा माणून उंच धिप्पाड असणार....
(हलके घेणे).

रेवती

Where are the Mipa ladies and Gals gone ?? :?
अन हे काय बिप १ आठवड्या पासून कोकलते आहे मी.. की भक्ती ला भेटायचे आहे अन तुला ही तर गुपचुप कट्टा पण केलास ??
~ वाहीदा

प्राजु's picture

16 Apr 2009 - 6:50 pm | प्राजु

टिंग्याचा आणि जबडे... आपलं दाढे साहेबांचा फोटो दिसत नाहीये.. ;)
बिर्याणी एकदम सुंदर! दृष्ट काढावी अशीच.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

विनायक प्रभू's picture

16 Apr 2009 - 6:56 pm | विनायक प्रभू

मी प्रतिक्रिया देणार नाही.

दशानन's picture

16 Apr 2009 - 7:35 pm | दशानन

म्या बी !


जय कोल्हापुर ! जय महाराष्ट्र !
जय गुडगांव ! जय हरयाणा !

संदीप चित्रे's picture

16 Apr 2009 - 8:02 pm | संदीप चित्रे

अचानक घडलेल्या भेटीगाठी आणि गप्पांच्या मैफिलींची मजा वेगळीच असते.
पुढच्या वेळी पुण्याला गेल्यावर एस्.पीज.ची बिर्याणी मस्ट आहे !!!
------
धम्या लेका आता लग्न होऊन खूप महिने झाले की !
माझ्या लग्नानंतर दीड महिन्यातच मला वाढीव मापाच्या पँट शिवाव्या लागल्या होत्या :)
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

धमाल मुलगा's picture

17 Apr 2009 - 3:03 pm | धमाल मुलगा

मुळात देवानं आमचं प्रॉजेक्ट सँक्शन करतानाच एफ.एस.आय. इतका कमी ठेवला होता, की वाढून वाढून त्यात वाढ ती किती होणार? चाळीतल्या दोन खोल्यांचा महाल तर नाही ना होऊ शकत? :)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

चतुरंग's picture

16 Apr 2009 - 8:23 pm | चतुरंग

बिका, पुण्यातला मुक्काम अंमळ सत्कारणी लावलेला दिसतोस!
नेहेमीप्रमाणेच चिमटे, टपल्या, कोपरखळ्यांचा मनमुराद वापर करीत लिहिलेला अनौपचारिक कट्ट्याचा खुसखुशीत वृत्तांत वाचून मजा आली.
'पाणवठा' शब्द आवडला! उन्हाळ्यात तर फारच गरज असते पाणवठ्यांची! ;)
एसपीज ची बिर्याणी एकदम झक्कास दिसतेय.
पराकडे बघून माझा त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलचा अंदाज एकदम बरोबर आल्याचा आनंद झाला! धम्याला काँपिटिशन आहे गडी! ;)
धम्याच्या चेहेर्‍यावरचे 'कमावलेले हसू' एकदम लाजवाब! :D
टिंग्या चेहेर्‍यावर सोज्वळपणाचे भाव आणण्याची पराकाष्ठा करताना हतबल झाल्यासारखा का दिसतोय? ;)
'बुल्गानिन मोडक' एकदम 'सीझन्ड' दिसताहेत! बसल्याजागी समोरच्याची बत्ती गुल करण्याचे कसब दाखवतोय त्यांचा चेहेरा! त्यांची दाढी एकदम झक्कास बॉ.
'डॉ. अमोल पालेकरांचा' दवाखाना एकदम चकाचक नवीन दिसतोय (ते बसलेत त्या खुर्चीचे प्लास्टिक कवर देखील अजून तसेच आहे!)

चतुरंग

श्रावण मोडक's picture

16 Apr 2009 - 8:41 pm | श्रावण मोडक

चतुरंगा, सीझन्ड या शब्दांतून काय म्हणायचंय ते कळलं बरं... ;)

धमाल मुलगा's picture

17 Apr 2009 - 3:07 pm | धमाल मुलगा

धम्याच्या चेहेर्‍यावरचे 'कमावलेले हसू' एकदम लाजवाब!

खरोखर...फक्त तुम्हीच आहात हो ज्यांनी खरं काय ते ओळखलं.
विदुषकाच्या रंगवलेल्या हसर्‍या चेहर्‍यामागची दु:खं वाचु शकणारे तुमच्यासारखे अगदीच विरळा....

=)) =))

>>धम्याला काँपिटिशन आहे गडी!
=))
आमची दोघांची युतीदेखील झालेली आहे म्हाराजा.... आम्ही दोघं मिळून टार्‍याला चेपणार आहोत. तो टार्‍याही आम्हा एकेकाला पाहुन टरटर करतो, पण आम्ही दोघं एकत्र असलो की भिजल्या मांजरागत गप असतो. ;)

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

धनंजय's picture

16 Apr 2009 - 8:37 pm | धनंजय

पुणे-३० मधला कट्टा - मस्तच वृत्तांत

मदनबाण's picture

16 Apr 2009 - 8:41 pm | मदनबाण

ह्म्म...परा एकदम हिरो दिसतो. :)
धमाल शेट पण जोरात हायेत...:)
टिंग्या कधी यतोस रे ठाण्याला मामलेदारची मिसळ चापायला ?
बिपिन भाऊ लय बिझी माणुस हाय तरी त्यांनी त्यांच्या अमुल्य वेळ पुणे ३० साठी राखुन ठेवला या बद्धल त्यांचे अभिनंदन !!! ;)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

विनायक प्रभू's picture

17 Apr 2009 - 6:58 am | विनायक प्रभू

काय सांगताहात राव.
पुणे ३० पत्ता शोधेपर्यंत माणुस ठाण्यावरुन दील्लीला पोचेल.
अचानक म्हणे.

भडकमकर मास्तर's picture

17 Apr 2009 - 7:46 am | भडकमकर मास्तर

खरं सांगायचं तर हे वाचताना " अगदी उत्तम चिडचिड" झाली...
.... चांगला कट्टा मिस झाला.
(बिकांनी डिसेंबर महिन्यात येतो येतो असं म्हणत टांग दिलेली होती ती जखम पुन्हा उघडी हो ऊन भळाभळा वाहू लागली) ;)
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

चित्रा's picture

17 Apr 2009 - 3:23 pm | चित्रा

फोटो, वृत्तांत आवडले.

अनिल हटेला's picture

17 Apr 2009 - 4:11 pm | अनिल हटेला

छोटेखानी कट्टा मस्तच झालाये !!

लेख आणी त्यावरच्या एक से एक प्रतीक्रिया जबरदस्त !!

अभिनंदन !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..