नमस्कार मंडळी,
मला आपणास कळवायला अत्यंत आनंद होत आहे की मला जून २००९ मध्ये सुरू होणार्या अहमदाबादमधील भारतीय प्रबंधन संस्थान (IIM Ahmedabad) या संस्थेच्या प्रबंधनातील पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाला आहे.निकाल थोड्या वेळापूर्वी जाहिर झाला.माझा अभ्यासक्रम जून महिन्यात सुरू होईल आणि त्यापुढील दोन वर्षे चालेल.दरम्यानच्या काळात मिपावर कधी आणि किती वेळा येणे होईल हे सांगता येत नाही तरीही मिपा हेच माझे आंतरजालावरील मराठी घर असेल यात मला कसलीच शंका वाटत नाही.
मी या लेखात म्हटल्याप्रमाणे चांगला निकाल लागताच मिपावर जाहिर करत आहे. खुल्या प्रवर्गातून १९२ विद्यार्थ्यांना प्रवेश दिला गेला आणि मी त्यापैकी एक आहे याचा मला आनंद वाटतो.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
प्रतिक्रिया
10 Apr 2009 - 1:51 pm | मराठी_माणूस
अभिनंदन आणि शुभेच्छा
10 Apr 2009 - 1:55 pm | अवलिया
अभिनंदन आणि शुभेच्छा !! :)
--अवलिया
10 Apr 2009 - 2:35 pm | दशानन
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
10 Apr 2009 - 5:29 pm | परिकथेतील राजकुमार
अभिनंदन आणि शुभेच्छा !!
यशवंत व्हा ! किर्तीवंत व्हा !
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी
एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
10 Apr 2009 - 1:57 pm | निखिल देशपांडे
अभिनंदन
निखिल
आमचा सध्याचा संशोधनाचा विषय :- मुंबईतिल रिक्षांचे मिटर
10 Apr 2009 - 1:59 pm | नितिन थत्ते
अभिनंदन क्लिंटन्साहेब.
स्वगतः सोप्या मराठीत लेख न लिहिता आता जार्गन मध्ये लिहिणार की काय? :D
खराटा
(रंग माझा वेगळा)
10 Apr 2009 - 2:03 pm | प्रकाश घाटपांडे
क्लिंटन सायबा वाचुन आनंद जाहला. आय आय यम मधी त्ये मंबईच्या डबेवाल्या मान्सांना बी बोलावल व्हत म्हने! कंचही शिक्शन न घेता त्यांनी डब्यांच यवस्तापन चांगल राखल म्हनुन.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
10 Apr 2009 - 2:33 pm | वेताळ
खुपच गोड बातमी दिलीत आज तुम्ही. भविष्यात आमची आठवण ठेवा म्हणजे झाले. खुपच आनंद झाला आहे. भावी शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा.
वेताळ
10 Apr 2009 - 2:34 pm | अमोल खरे
आय आय एम मध्ये ऍडमिशन मिळणे हि किती कठीण गोष्ट आहे हे सर्वांनाच माहित आहे. तुमच्या ह्या यशाबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीकरिता खुप खुप शुभेच्छा.
10 Apr 2009 - 2:41 pm | विसुनाना
फार आनंदाची बातमी आहे.
10 Apr 2009 - 2:57 pm | विनायक प्रभू
एकदम खुश हुवा
10 Apr 2009 - 3:07 pm | धमाल मुलगा
हार्दिक अभिनंदन क्लिंटन :)
च्यायला, पण एक सांगा, ती सी.ए.टी. दिली होती का हो तुम्ही? ;)
मला तर सी.ए.टी.चं पुस्तकही उचलणं झेपलं नाही..मग आय.आय.एम.चा नादच सोडला आम्ही. म्हणलं, पुस्तक उचलायलाच झेपत नाही तर अभ्यास कुठुन झेपणार! :)
असो, पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन.
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::
10 Apr 2009 - 4:14 pm | भडकमकर मास्तर
लय बेष्ट...
अ भि नं द न !!!
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
10 Apr 2009 - 4:25 pm | विकास
ही बातमी वाचून एकदम आनंद झाला! या यशानिमित्त तुमचे अभिनंदन आणि होणार्या यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा! वेळ मिळेल तेंव्हा अवश्य संपर्कात रहा. आम्हाला विसरू नका!
10 Apr 2009 - 4:33 pm | क्लिंटन
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.
बाकी एकूणच समाजात MBA आणि त्यातूनही IIM च्या MBA विषयी काही मते असतात. हा कोण अमका?तो IIM चा ना मग तो तसलाच असणार! आता तसलाच म्हणजे कसा?तर स्वत:ला अतिशहाणा समजणारा आणि आपण स्वत: कोणत्या परिस्थितीतून आलो हे विसरून आपल्याच लोकांना तुच्छतेने वागवणारा! मंडळी, एक गोष्ट नक्की सांगतो की मी ’तसला’ नक्कीच बनणार नाही.आणि ’तसल्या’ लोकांमध्ये IIM मध्ये गेलेले आणि न गेलेले असे सगळेच लोक असतात. तसेच दुसरे सांगायचे म्हणजे मी एक चारचौघांसारख्या आशाआकांक्षा असणारा सामान्य माणूस आहे.मला पैशाचे महत्व नाही असे म्हणत संतपणाची झूल मी अजिबात पांघरलेली नाही.चांगल्या मार्गाने आणि इतरांना न फसवता मिळालेला पैसा मला नक्कीच हवा आहे आणि हे सांगताना मला कसलाही कमीपणा वाटत नाही. (स्वगत: पैशाची कहाणी उगीच का लिहिली?)
बाकी जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मिपावर वेगवेगळ्या विषयांवर माहिती करून देणारे लेख लिहायला मला आवडेलच.आणि हो ते आपल्या अस्सल मराठमोळ्या मायबोलीत साध्या शब्दात. बाकी विडंबन, कविता, ललित साहित्य अशा विषयांमध्ये मला शून्य गती असल्याने त्यावर लिहिता येणार नाहीच पण माझ्या आवडीच्या विषयांवर लिहायला जरूर आवडेल.
ध.मु, कॅट तर द्यावीच लागली.ती नसती दिली तर IIM ने उभे पण केले नसते.त्यामुळे ती परीक्षा द्यावीच लागली.काय करणार?
अवांतर-- IIM अहमदाबादने २४ फेब्रुवारी रोजी बंगलोरला मला निबंध लेखन आणि मुलाखतीसाठी बोलावले होते.२१ तारखेला मला मुंबईत अपघात झाला आणि डावा पाय गुडघ्याजवळ फ्रॅक्चर झाला.त्यावेळी उभे राहणेही अजिबात शक्य नव्हते आणि मी व्हिल-चेअरवरून निबंध लिहिला आणि मुलाखत दिली.तसेच पुण्याला परत आल्यानंतर छोटी शस्त्रक्रिया झाली.या सगळ्या गडबडीत तिकडे जायला मिळाले हीच मोठी गोष्ट होती.त्यामुळे हा सगळा अनुभव न विसरण्यासारखा आहे.
('तसला' न बनू इच्छिणारा) विल्यम जेफरसन क्लिंटन
10 Apr 2009 - 5:13 pm | सूहास (not verified)
मनापासुन अभिनद॑न,
>>>>चांगल्या मार्गाने आणि इतरांना न फसवता मिळालेला पैसा मला नक्कीच हवा आहे आणि हे सांगताना मला कसलाही कमीपणा वाटत ना>>>>
१००००००००००००००००००००० टाळ्या ह्या वाक्याला मनापासुन..
सुहास
" जाली॑द॑र जलालाबादी प॑खे मड॑ळ" च्या सर्व सदस्या॑ना शुभेच्छा ..
10 Apr 2009 - 4:49 pm | निळु
अभिनंदन !
10 Apr 2009 - 4:52 pm | भोचक
क्लिंटनसाहेब दणदणीत शुभेच्छा. बाकी चांगला अभ्यास करा नि छानपैकी पास व्हा.
(भोचक)
आमचा भोचकपणा इथेही सुरू असतो...
http://bhochak.mywebdunia.com/
10 Apr 2009 - 5:10 pm | शितल
क्लिंटनसाहेब,
तुमचे अभिनंदन,आणि पुढील वाटचाली करिता शुभेच्छा ! :)
10 Apr 2009 - 5:22 pm | प्रमोद देव
क्लींटन, मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी लक्ष लक्ष शुभेच्छा!
खूप मोठ्ठा होशील. तथास्तु!
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
10 Apr 2009 - 7:09 pm | टिउ
मस्त बातमी...अभिनंदन! :)
10 Apr 2009 - 8:14 pm | चतुरंग
एका अतिशय उच्च दर्जाच्या शैक्षणिक संस्थेत प्रवेश मिळवल्याबद्दल क्लिंटन तुमचे अभिनंदन!
मिपावर येत रहाच कारण आता तुम्हाला लेख लिहायला नवनवीन विषय मिळतील आणि आम्हालाही त्या विषयांची ओळख होईल!
तुमच्या पुढच्या वाटचाली करता अनेक शुभेच्छा! :)
चतुरंग
10 Apr 2009 - 9:36 pm | कुंदन
तुमच्या पुढच्या वाटचाली करता अनेक शुभेच्छा! !!
10 Apr 2009 - 9:43 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अभिनंदन ! पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा !
-दिलीप बिरुटे
11 Apr 2009 - 3:26 am | मदनबाण
व्वा. अतिशय आनंद झाला,,,क्लिंटनराव अयसेइच आगे बढो !!! :)
मदनबाण.....
I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.
11 Apr 2009 - 4:49 am | नंदन
चांगली बातमी. मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
11 Apr 2009 - 5:55 am | रेवती
आपले अभिनंदन व पुढील शैक्षणीक यशासाठी शुभेच्छा!
जमेल तेंव्हा व जमेल तसे मिपावर येत रहा. आपले तिथले अनुभव वाचायला आवडतील.
अश्या चांगल्या समजल्या जाणार्या शिक्षणसंस्थांबद्दल नेहमीच भीतीयुक्त आदर असतो,
त्याबद्दल काही वाचायला आवडेल (जमल्यास लिहा).
रेवती
11 Apr 2009 - 6:03 am | विंजिनेर
ज्या शिक्षण संस्थेत फक्त स्वतःच्या बुद्धीमत्तेच्याच जोरावर प्रवेश मिळवता येतो तेथे आपण प्रवेश मिळवलात ह्याबद्दल तुमच्या कष्टाला/बुद्धीमत्तेला सलाम आणि
पुढील वाटचालीनिमित्त शुभेच्छा!
विंजिनेर
--
कळप-मनोवृत्तीचा सूक्ष्म अभ्यास करण्यात आम्ही गढलेलो असल्यामुळे कंपूबाजी करायला आमच्याकडे वेळ नाही
11 Apr 2009 - 6:21 am | मीनल
अभिनंदन.
शुभेच्छा.
मीनल.
11 Apr 2009 - 6:35 am | समिधा
पदव्युत्तर प्रोग्रॅम (MBA) साठी प्रवेश मिळाल्याबद्द्ल अभिनंदन
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
11 Apr 2009 - 7:12 am | रामदास
आपले आर्थीक विषयावरचे लेख वाचत होतो.त्यावरून वाटले की तुमचं पो.ग्रॅ.करून झालेलं आहे.
कॉल लेटर परत एकदा वाचा .त्यांनी तुम्हाला शिकवायला बोलावलं असेल कदाचीत.
11 Apr 2009 - 7:34 am | आनंदयात्री
अभिनंदन रे क्लिंट्न .. मोठ्ठा म्यानेजर हो .. सवताचीं कंपणी काढ अन मला पण मोठ्ठ्या पगाराची नौकरी दे :)
11 Apr 2009 - 7:34 am | यन्ना _रास्कला
आमाला विसरलतात तरी चालेल पन आमच्ये जालिंदर बाबान्ला विसरु नका. ;)
अभिनदंन
11 Apr 2009 - 11:03 am | पिवळा डांबिस
श्री. क्लिंटन,
आय आय एम अहमदाबादच्या एम बी ए मध्ये प्रवेश मिळाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन!!!!!
फक्त एक लक्षात ठेवा.......
मॅनेजमेंट स्कूलमध्ये शिकलेल्या कोर्सपेक्षा रियल कोर्पोरेट लाईफ हे फार वेगळं असतं......
तेंव्हा बिझिनेस फंडाज स्कूलमध्ये जरूर शिका पण आपली विचारशक्तीही जागृत ठेवा.....
नुसत्या बिझिनेस जार्गनवर जाऊ नका, हाच कळकळीचा सल्ला......
आपला,
पिडां
पी एच डी, एम बी ए
11 Apr 2009 - 12:03 pm | प्रदीप
आणि शुभेच्छा.
तुमच्या लेखांवरून तुम्ही उत्कृष्ट 'मॅनेजमेंट मटेरिअल' आहात हे लक्षात आलेच होते. सवडीनुसार येथे जरूर लिहीत चला. अनेकविध विषयांवरील आपल्या, जबाबदारीने लिहीलेल्या लेखांची वाट पहातो.
--प्रदीप
ता. क. : कधीमधी जमेल तसे लालू ह्यांच्या रेल्वे व्यवस्थापनाबद्दलही लिहा. (आय. आय. एम., अहमदाबादने त्यांचे विशेष कौतुक केले होते, त्या अनुषंगाने तेथे ह्या विषयावरील माहिती तेथे असेलच, म्हणून ही विनंति करत आहे. ही त्या विषयावरील अधिक फर्स्ट हँड माहिती कळावी हा प्रामाणिक हेतू आहे, कसलाही कुजकटपणा चुकूनही अभिप्रेत नाही).
12 Apr 2009 - 12:30 pm | क्लिंटन
नमस्कार मंडळी,
परवापासून अभिनंदनाचे एकावर एक फोन येत होते आणि अनेक भेटायला आले. त्या गडबडीत मिपावर मधून मधून ५-१० मिनिटे यायला मिळाले.मी आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छांचे संदेश वाचले आणि त्याबद्दल मी आपला आभारी आहेच.कोणाही माणसाला मोठं व्हायला स्वत:च्या प्रयत्नांबरोबरच इतरांच्या शुभेच्छांचीही गरज असते.आणि मिपाकरांच्या शुभेच्छा माझ्याबरोबर आहेत याची पूर्ण खात्री आहे.त्याबद्दल आपले आभार मानावेत तेवढे थोडे.
माझा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यावर सगळे काही मार्गी लागले की मिपासारख्या व्यासपीठांवरील किंवा इतर कोणालाही माझ्या विषयाशी संबंधित कसलेही मार्गदर्शन लागले तर ते मी नक्कीच देईन याची खात्री बाळगा.त्यासाठी लागणारा अनुभव आणि ज्ञान मला माझ्या अभ्यासक्रमात मिळेल अशी अपेक्षा आहे.एकूणच एकमेकांना सहकार्य आणि मदत करून आपण सगळेच पुढे जाऊ शकू.
आपल्या सर्वांच्या शुभेच्छांबद्द्ल पुन्हा एकदा आभार.
---विल्यम जेफरसन क्लिंटन
12 Apr 2009 - 8:21 pm | हरकाम्या
क्लिन्टन साहेब अभिनंदन, आपल्या पुढिल वाट्चालीस माझ्या हार्दिक शुभेच्छ्या . मिपावर भेटत रहा.
मी तुमच्या लेखांची वाट पाहीन .
12 Apr 2009 - 3:26 pm | जयवी
क्लिंटन......तुझं मनापासून अभिनंदन :)
इतक्या उच्च शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी तू प्रवेश मिळवलास..... तुझं कौतुक वाटतं. तुझ्या पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा :)
12 Apr 2009 - 7:02 pm | गणा मास्तर
लक्ष लक्ष शुभेचछा !!!
तुम्ही त्यातले बनणार नाही हे वाचुन बरे वाटले.
आणि हो पिडाकाकांचा सल्ला लक्षात राहु द्यात.
- गणा मास्तर
भोकरवाडी (बुद्रुक)
12 Apr 2009 - 9:37 pm | बट्ट्याबोळ
तोडलस लेका!!!
ल्हय भारी !!! तिकडे जाऊन पण जिंक !!
मजा कर ....
13 Apr 2009 - 3:45 am | संदीप चित्रे
आयल्ला..... आय आय एम अहमदाबाद म्हणजे डोक्याने 'उच्चभ्रू' लोकांची जागा... चला पुढे मागे ओळख ठेवा साहेव :)
हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा !
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com