चैत्रगौर

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
9 Apr 2009 - 7:05 am

चैत्रगौरीचं हळदीकुंकू करायचंय, सगळ्या सुगरण ताया स्वैपाकघरात गुन्तल्या, तेव्हा म्हटलं, आपण लिम्बू-टिम्बू कंपनीनं गौर सजवावी. पहा आवडतेय का!
गाई कोकीळ भूपाळी सखे तुझ्या स्वागताला
इंद्रधनूचे तोरण शोभे तुझ्या गाभा-याला

घाल रात्रीचे काजळ, माळ वेणीत चांदणे
चंद्रकोरीची काकणे, दंवबिंदूंची पैंजणे

सोनसळीचा पदर, सांजरंगाची पैठणी
गर्भरेशमी आभाळशेला पांघर साजणी

सूर्यकिरणांनी रेख भाळी कुंकवाची चिरी
गळा नक्षत्रमण्यांची माळ खुलू दे साजिरी

गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती

जाईजुईचा मांडव, त्यात चंदनाचा झूला
ये ग सये चैत्रगौरी, सख्या झुलविती तुला

कविताप्रकटनविचारसद्भावनाप्रतिसादआस्वाद

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

9 Apr 2009 - 7:16 am | विसोबा खेचर

अप्रतीम कविता, अत्यंत श्रीमंत शब्दयोजना!

अन्य शब्द नाहीत!

तात्या.

अनामिक's picture

9 Apr 2009 - 4:11 pm | अनामिक

हेच म्हणतो,

-अनामिक

बेसनलाडू's picture

10 Apr 2009 - 1:06 am | बेसनलाडू

सहमत आहे.
(वैशाखी)बेसनलाडू

मनीषा's picture

9 Apr 2009 - 7:20 am | मनीषा

... छान सजली आहे .

मदनबाण's picture

9 Apr 2009 - 7:27 am | मदनबाण

रूपलावण्य हे तुझे, जशी मदनाची रती
ओठांवरी उगवती, गालांवरी मावळती
सॉलिट्ट्ट्ट्ट्ट्...

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

प्राजु's picture

9 Apr 2009 - 7:35 am | प्राजु

अतिशय सुंदर! केवळ सुंदर!
शब्द भांडार जबरदस्त आहे. :)
जियो!!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

उमेश कोठीकर's picture

9 Apr 2009 - 7:43 am | उमेश कोठीकर

काय शब्दवैभव आहे. जबरदस्त. कुबेराची खाणच जणू. क्रान्ति,सलाम.

स्मिता श्रीपाद's picture

9 Apr 2009 - 10:44 am | स्मिता श्रीपाद

सुरेख सजलेली गौरीची आरास डोळ्यांसमोर उभी राहिली...:-)
मस्तच कवीता...

-स्मिता

अविनाशकुलकर्णी's picture

9 Apr 2009 - 11:12 am | अविनाशकुलकर्णी

आहहा..काय सुंदर प्रासादिक रचना..मन खुष झाले....केवळ अप्रतिम..अफाट शब्द भांडार..

अवलिया's picture

9 Apr 2009 - 12:16 pm | अवलिया

सुंदर ... मस्त :)

--अवलिया

जागु's picture

9 Apr 2009 - 12:20 pm | जागु

वा वा, सुंदर

सुमीत भातखंडे's picture

9 Apr 2009 - 12:40 pm | सुमीत भातखंडे

खूपच छान कविता.

जयवी's picture

9 Apr 2009 - 3:46 pm | जयवी

अहा....... अगं किती सुंदर...!!

अक्षरशः मढवलंस तू चैत्रगौरीला तुझ्या शब्दालंकाराने......... !! मस्त !!

"आभाळशेला" खूप आवडला :)

मीनल's picture

9 Apr 2009 - 4:37 pm | मीनल

मस्त कविता.
मीनल.

समिधा's picture

10 Apr 2009 - 1:55 am | समिधा

सजलेली चैत्रगौर अगदी डोळ्यासमोर आणलीस. खुपच सुंदर शब्द वापरले आहेस..
गो-या तळव्याला लाव चैत्रपालवीची मेंदी
कर आकाशगंगेला तुझ्या भांगातली बिंदी

मस्त =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

शितल's picture

10 Apr 2009 - 3:07 am | शितल

सुंदर काव्य रचना
चैत्रगौर तुझ्या शब्दांनी सुंदर सजली आहे. :)

चन्द्रशेखर गोखले's picture

12 Apr 2009 - 7:12 pm | चन्द्रशेखर गोखले

++++१

राघव's picture

24 Oct 2024 - 10:43 pm | राघव

अफाट शब्दरचना आणि कल्पक योजना! _/\_

विठ्ठल मूर्ती सारखीच.

तुझी मुर्त सुंदर देवा सजवितो सुरात

-राम उगांरावकर