JRDTata : राष्ट्रपुरुष

महासंग्राम's picture
महासंग्राम in जनातलं, मनातलं
29 Nov 2020 - 9:54 pm

JRD जाऊन आज २७ वर्षे झाली.अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा दिवस, ना फारशा श्रद्धांजल्या, ना सोशल मीडियावर ट्रेंड्स. भारताच्या विकासात आमूलाग्र योगदान देणारा हा माणूस (केवळ JRD च नाही अनेक आदरणीय उद्योगपतींची नावं त्यात घ्यावी लागतील.) पण उद्योजकवर्गाला कधीही maker of modern India वैगेरे पदव्या जोडल्या जात नाहीत. अमेरिका घडवण्यात जे योगदान व्हँडरबिल्ट, रॉकफेलर, कॉर्नगी सारख्या प्रभूतींना दिलं जातं तसं भारतात कधी टाटा, बिर्ला वा अंबानी यांना दिलं जात नाही, त्याला कारण मोठं गमतीदार, पैसे कमावणे हे जणू पाप आहे आणि गरीबीतील कष्ट हे पुण्य यावर दीर्घकाळ पोसलेली समाजव्यवस्था.(ती असूनही भारतात साम्यवाद यशस्वी झाला नाही ही अजून एक गंमत.)

तर JRD यांच्या स्मृतिदिनानिमित्त हारतुरे घेऊन कार्यक्रम झाले नाहीत. ज्या काळात उद्योग करणं कठीण होतं त्या काळात त्यांनी तो केला, वाढवला, नीतिमूल्यांच्या चौकटी ढिसाळ होत असण्याच्या काळात त्यांनी स्वतःच्या मुल्यांना जोपासलं. विमान उद्योगांसारखी नवनवीन स्वप्न पाहिली, दाखवली आणि पुर्णही केली. पैसा कमावला परंतु सढळ हाताने दानही केला. आपलं सामर्थ्य दाखवण्याचा टाटांचा स्वभावगुण नाही. त्यामुळे ते लग्नात कुणा सिनेस्टार नाचवत नाहीत की चैनबाजीत दिवाळखोर होऊन परागंदा होत नाहीत. आपल्या साम्राज्याचे हे गुण JRD यांच्या वारसदाराने तितक्याच समर्थपणे सांभाळले.

आपल्याकडे फुटकळ कलावंतांना,भ्रष्ट राजकारण्यांना आणि क्रिकेटपटूंना जे वलय मिळतं ते 'अशा' लोकांना मिळत नाही, आज देशात 'आत्मनिर्भर भारत' ची घोषणा दिली जात असताना नवे नवे उद्योग पुढे येऊ घातले असताना आणि त्याचवेळी तरुणाईला झटपट पैसा कमवणारा 'हर्षद मेहता' आपला हिरो वाटू लागलेला असताना, जेआरडींसारख्या सचोटीच्या आणि प्रामाणिक राष्ट्रपुरुषाचे स्मरण करणं अगत्याचं ठरतं.

मांडणीवावरप्रकटनविचारप्रतिसाद

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

29 Nov 2020 - 10:10 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खर आहे. पण वलय वगैरे जे आर डी ना होतेच रे महासंग्रामा. मुख्य म्हणजे नेहरूंनी अनेक बाबतीत त्यांचा सल्ला घेतला होताच. सुरुवातीच्या काळात(१९४७-१९६५) मोठी कंत्राटे टाटा-बिर्ला वगैरेना दिली जायची ह्याचे कारण परमीट-राजच्या त्या काळात सत्ताधार्यांबरोबर जवळीक हे होतेच.
"स्वतःला टाटा-बिर्ला समजतोस का?" मध्यमबर्गातील कोणी पैशाची फुशारकी मारली की विचारला जाणारा प्रश्न असायचा.

फारएन्ड's picture

30 Nov 2020 - 1:03 am | फारएन्ड

वरच्या लेखाशी सहमत.

टाटा कंपन्यांमधल्या सर्व लोकांना जेआरडी टाटांबद्दल किती आदर असायचा ते एकदा त्यांच्या व्हिझिटच्या वेळी प्रत्यक्ष पाहिले आहे. असा आदर राजकीय नेत्यांनाही क्वचितच मिळतो.

दिगोचि's picture

30 Nov 2020 - 7:01 am | दिगोचि

जेआरडीचा म्रुत्यु फ्रान्स मधे झालाआधी काही दिवस ते तिथे जाऊन राहिले होते कारन त्याना आपल्य म्रुत्युचे स्तोम माजवायचे नव्हते. तरीहि त्यान्च्या म्रुत्युनन्तर भारतातून शेकडो नेते गेले होते.

कंजूस's picture

30 Nov 2020 - 7:14 am | कंजूस

खरंच.

साहना's picture

30 Nov 2020 - 11:22 am | साहना

फन सत्य : जे आर डी टाटा हे फ्रेंच नागरिक होते आणि त्यांनी फ्रेंच आर्मीत सुद्धा सेवा केली होती.

टाटा विषयी प्रचंड आदर आहेच पण अतिशयोक्ती करू नये. पारसी मंडळी बद्दल सुद्धा प्रचंड आदरभाव आहेच पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती. अफीमच्या व्यवसायांत त्यांचा (पारसी लोकांचा ) विशेष भाग होता. त्यामुळे ह्या लोकांना सरकारी व्यवस्थेंत धंदे सुरु करणे सोपे गेले. आज सुद्धा सत्ताधाऱ्यांशी जवळीक असणारे लोक १०० कंपन्या आणि आम्हाला इकडे एक कंपनी चालवणे मुश्किल जाते.

अर्थांत ह्या लोकांत सुद्धा जे आर डी खूप कर्तृत्वान होते. नाही तर ते पप्पू किंवा बेबी पेंग्विन प्रमाणे सुद्धा बनू शकले असते !

महासंग्राम's picture

30 Nov 2020 - 11:35 am | महासंग्राम

जेआरडी १९०४-१९२८ फ्रेंच नागरिक होते १९२९-१९९३ ते भारतीय नागरिक होते. ज्या काळात अफिमचा व्यवसाय होत होता तो काळ सुद्धा लक्षात घ्यायला हवा. आणि पारशी मंडळींनी अफू निर्यात केली, त्यामुळे भारतात व्यसनाधीनता पसरली नाही.

पण ब्रिटिश सत्ताधाऱया मंडलनशी त्यांची जवळीक होती.

>> व्यवसायात हे करावंच लागतं. आजही हे होतं त्यात नवीन काही नाही.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Nov 2020 - 11:59 am | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे. व्यवसाय वाढवायचा तर जवळिक असावी लागते. पण तसे करूनही दानशूरता,मूलभूत संशोधन्,कर्मचार्याना कामावरून न काढणे वगैरे चांगले उपक्रमही टाटांनी राबवले हे विशेष. "नफ्यासाठी वाट्टेल ते" हे प्रकार केले नाहीत.राजकीय नेत्याना/युनियनच्या नेत्यांना टेबलाखालून पैसे दिले नाहीत म्हणून टाटांचे डझनावारी प्रकल्प रखडलेले होते.. हे टाटामधून निव्रुत्त झालेल्या एका व्यक्तीने आम्हाला सांगितले होते.

भारतीय अर्थ व्यवस्थेची पूर्ण वाट लावलेल्या मोदी अंध भक्त मंडळी नी चांगल्या धाग्यावर येवूच नये.
टाटा हे खूप ग्रेट व्यक्ती होते आणि त्यांचे वारस
पण great च आहेत.
त्यांना सामाजिक बांधिलकी ची पूर्ण जाणीव आहे
.
Bjp चे लाडके अंबानी , अदानी पेक्षा कित्येक पटित जास्त.

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

30 Nov 2020 - 2:35 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

२०१९ पर्यंत राजकीय पक्षांना देणग्या देण्यात टाटा समूह आघाडीवर होता रे राजेशा.
https://www.businesstoday.in/current/economy-politics/bjp-raised-over-rs...
PM Modi, Amit Shah have vision for India: Ratan Tata
https://economictimes.indiatimes.com/news/politics-and-nation/pm-modi-am...
पडद्यामागे बरेच काही घडत असते रे राजेशा. बील गेट्स काय, टाटा काय किंवा मूर्ती काय.. हे सगळेच लोक कर्तबगार पण संतपद्/देवत्व बहाल करण्याची गरज नाही असे ह्यांचे मत.

मराठी_माणूस's picture

30 Nov 2020 - 12:39 pm | मराठी_माणूस

टाटा ग्रुपला आपल्या समाजात जेव्हढा आदर आहे तेव्हढा क्वचीत दुसर्‍या कुणाला आहे.

दिगोचि's picture

1 Dec 2020 - 6:31 am | दिगोचि

100% सहमत. टाटा समूह गेली अनेक दशके देशासाठी काम करत आहे.

आदरणीय आणि अनुकरणीय व्यक्तिमत्व 🙏

सुबोध खरे's picture

3 Dec 2020 - 12:07 pm | सुबोध खरे

जे आर डी टाटा आपली अँबेसेडर स्वतः चालवत कुलाब्याला जात असत आणि जाताना कुणालाही लिफ्ट देत असत. टाटा मध्ये काम करणाऱ्या चपराशाला लिफ्ट देताना आमच्या वडिलांनी स्वतः पाहिलेले आहे. अत्यंत निगर्वी आणि साधा माणूस.

बाकी सिने नट आणि खेळाडू याना कमी काळात अफाट लोकप्रियता मिळते तशीच ती लाट उतरूनही जाते.

जे आर डी टाटा यांच्या इतका हृदयापासून असलेला आदर भारतभर सर्व प्रांतात डॉ ए पी जे अब्दुल कलाम वगळता फारच कमी लोकांना ( कदाचित रतन टाटा हे त्यांच्या जवळ जातील) मिळाला आहे.

देशासाठी केलेली असंख्य कामे TIFR सारख्या संस्था जनतेस अजून नीटशी माहित नाही हे दुर्दैव.