मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

JRDTata : राष्ट्रपुरुष

महासंग्राम · · जनातलं, मनातलं
JRD जाऊन आज २७ वर्षे झाली.अनेकांच्या विस्मृतीत गेलेला हा दिवस, ना फारशा श्रद्धांजल्या, ना सोशल मीडियावर ट्रेंड्स. भारताच्या विकासात आमूलाग्र योगदान देणारा हा माणूस (केवळ JRD च नाही अनेक आदरणीय उद्योगपतींची नावं त्यात घ्यावी लागतील.) पण उद्योजकवर्गाला कधीही maker of modern India वैगेरे पदव्या जोडल्या जात नाहीत. अमेरिका घडवण्यात जे योगदान व्हँडरबिल्ट, रॉकफेलर, कॉर्नगी सारख्या प्रभूतींना दिलं जातं तसं भारतात कधी टाटा, बिर्ला वा अंबानी यांना दिलं जात नाही, त्याला कारण मोठं गमतीदार, पैसे कमावणे हे जणू पाप आहे आणि गरीबीतील कष्ट हे पुण्य यावर दीर्घकाळ पोसलेली समाजव्यवस्था.(ती असूनही भारतात साम्यवाद यशस्वी झाला नाही ही अजून एक गंमत.) तर JRD यांच्या स्मृतिदिनानिमित्त हारतुरे घेऊन कार्यक्रम झाले नाहीत. ज्या काळात उद्योग करणं कठीण होतं त्या काळात त्यांनी तो केला, वाढवला, नीतिमूल्यांच्या चौकटी ढिसाळ होत असण्याच्या काळात त्यांनी स्वतःच्या मुल्यांना जोपासलं. विमान उद्योगांसारखी नवनवीन स्वप्न पाहिली, दाखवली आणि पुर्णही केली. पैसा कमावला परंतु सढळ हाताने दानही केला. आपलं सामर्थ्य दाखवण्याचा टाटांचा स्वभावगुण नाही. त्यामुळे ते लग्नात कुणा सिनेस्टार नाचवत नाहीत की चैनबाजीत दिवाळखोर होऊन परागंदा होत नाहीत. आपल्या साम्राज्याचे हे गुण JRD यांच्या वारसदाराने तितक्याच समर्थपणे सांभाळले. आपल्याकडे फुटकळ कलावंतांना,भ्रष्ट राजकारण्यांना आणि क्रिकेटपटूंना जे वलय मिळतं ते 'अशा' लोकांना मिळत नाही, आज देशात 'आत्मनिर्भर भारत' ची घोषणा दिली जात असताना नवे नवे उद्योग पुढे येऊ घातले असताना आणि त्याचवेळी तरुणाईला झटपट पैसा कमवणारा 'हर्षद मेहता' आपला हिरो वाटू लागलेला असताना, जेआरडींसारख्या सचोटीच्या आणि प्रामाणिक राष्ट्रपुरुषाचे स्मरण करणं अगत्याचं ठरतं.

वाचन 7067 प्रतिक्रिया 0