भाजी घ्या भाजी,स्वतःसाठी ताजी!

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
2 Jul 2020 - 3:59 pm

आज 3 महिन्यांनी गुलटेकडी मार्केटयार्डला गेलो (कित्ती सुख वाटलं म्हणून सांगू!? वारकऱ्यांना पंढरपूर, तैसे आम्हा मार्केटयार्ड!) उद्याच्या कामाची फुल फळ घेतली आणि भाजीत-शिरलो.

फळभाज्या 1किलोच्या आत मिळत नाहीत हे खरं आहे. पण पावशेर ते अर्धाकिलोला आपल्या लोकल बाजारातला जो दर पडतो, त्यातच त्या एक किलो येतात आणि फ्रेश येतात.कोलिटी ला 1नंबर! पालेभाज्याही निम्म्या किंवा त्याहून कमी दरात मिळतात.शिवाय ताज्या! मसाला म्हणजे-कोथिंबीर,मिरच्या,आलं,लसूण,कडीपत्ता,लिंबू ,पुदिना हे तर तिप्पट चौपट स्वस्त मिळतं. आता खाली आज आणलेल्या भाजीचा मार्केटयार्ड मधला दर व कंसात लोकल भाजी बाजाराचा तेव्हढ्याच काँटिटी चा दर टाकलेला आहे. तो पहा.

गावरान कोथिंबीर 1गड्डी-₹5 (20 ते 30)
गावरान कडीपत्ता,मोठ्ठी गड्डी- ₹8(20)
लिंबू 15 नग- ₹10(30)
पालक 1गड्डी- ₹10(20)
शेपू 4गड्डी-₹40 (60 )
लालभोपळा दीडकिलो- ₹30(90 ते 120 )
दोडका 1किलो-₹40(80 ते 120)
शेवगा 1किलो-₹30(80 ते 100)
टोमॅटो 1किलो-₹20(40 ते 60)
फ्लॉवर मोठा गड्डा-₹30(80 ते 100)
आळू 5पानी-5 गड्डी-₹20(50)
https://scontent.fnag1-1.fna.fbcdn.net/v/t1.0-9/fr/cp0/e15/q65/107102991_3064373616982237_2756672793218954264_o.jpg?_nc_cat=105&_nc_sid=110474&efg=eyJpIjoiYiJ9&_nc_ohc=NtrESTGyIHwAX8zm6BU&_nc_ht=scontent.fnag1-1.fna&tp=14&oh=b81db442d76d0e7bcbe6e2eb427539c1&oe=5F2273A3
वरील सर्व भाजी 223 रुपयात आली. 2वेळा केली तरी 10 दिवस पुरेल.
हीच सर्व भाजी आपल्या लोकल मार्केटमध्ये घ्यायची झाली तर 800 ते 1000 रुपये लागतात. शिवाय ताजेपणा व कोलिटी फारशी असण्याचा संभव नाही. उलट ती ताजी व उत्कृष्ट असेल तर त्यासाठी 10रु..पावशेराला 3 ते 5 रुपये अजून मागितले जातात,आणि वरून आपल्याला "तेच कसं योग्य आहे!" अशी समजही मिळते.
आमच्या लोकल भाजीवाल्यांचं एक रम्य धोरण आहे. ते मोअर सेल,मोअर प्रॉफिटच्या बरोब्बर उलट आहे. फेकून द्या पण विकू नका! किंवा सडवत सडवत विकत रहा,अस त्या धोरणाच मूलभूत गुपित आहे. त्याचं उत्तर या मार्केटयार्डच्या कुपीत आहे. बघा इचार करून!
(आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,लोकल भाजीवाल्यांचा आपल्याला करवून घ्यावा लागणारा मानसिक छळ थांबेल. शिवाय फळं फुलं देखील अशीच ताजी,उत्कृष्ट व स्वस्त मिळतात ती ही आणता येतील-मार्केटयार्ड, पुणे येथून.)
(आपणही आपल्या शहर/गावातल्या "मोठ्या बाजाराला" भेट देऊन पहा.)

आपलाच:-गुलटेकडी मार्केटयार्डातला:-पुणेरी आत्मा!

समाजजीवनमानअनुभवमतशिफारसमाहिती

प्रतिक्रिया

Cuty's picture

2 Jul 2020 - 4:20 pm | Cuty

छान ताज्या दिसताहेत भाज्या.
थोडे अवांतर- या कोरोना संक्रमणाच्या काळात भाज्या आणल्याबरोबर काहीजण नुसत्या पाण्याने धुतात तर काहीजण मिठाच्या पाण्याने. काहीजण कोमट पाणी वापरतात तर काहीजण मीठ आणि खायच्या सोड्याचे मिश्रण केलेल्या पाण्याने धुतात. नेमकी भाजी कशी धुवावी?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2020 - 4:33 pm | अत्रुप्त आत्मा

मीठ खायचा सोडा समप्रमाणात घेऊन (3लिटर पाण्याला 1/1चमचा. ) त्यात अर्धा(च) तास बुडवून नन्तर लगेच कपड्यावर टाकून वाळवणे.

Cuty's picture

2 Jul 2020 - 4:57 pm | Cuty

मीसुद्धा मीठ आणि सोडाच वापरते पण नेमके प्रमाण माहीत नव्हते.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

2 Jul 2020 - 10:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

भाज्या अगदी ताज्या आणि हिशेब अगदी पटला. खायचा सोडा वापरल्याने कोरोनापासून संरक्षण होतं की मनाचं समाधान होतं. आम्ही पण मीठाच्या पाण्याने भाज्या धूतो...पण केवळ समाधानाचा भाग. शास्त्रीय माहिती नाही.

-दिलीप बिरुटे

वेगळ्याच विषयावरचा लेख आवडला हो!!

जेम्स वांड's picture

2 Jul 2020 - 5:21 pm | जेम्स वांड

गुरुजींनी एकदम "कांदा मुळा भाजी" करून टाकलं काम! त्या एकुलत्या एक फोटोत हारीनं लावून ठेवलेली भाजी लैच मनमोहक वाटली !

चौथा कोनाडा's picture

2 Jul 2020 - 5:36 pm | चौथा कोनाडा

मस्त !
कोविड मंदीकाळात फिफायतशीर संधी !

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2020 - 5:41 pm | अत्रुप्त आत्मा

हही हही ! खरं आहे.
पण मी पूर्वीपासून आणतो यार्डातन भाजी. आमचं फुलांसाठी जाणं असतंच.

गामा पैलवान's picture

2 Jul 2020 - 5:42 pm | गामा पैलवान

अहो अतृप्त आत्मा, करा चैन! खा! रोज शिकरण खा! मटार उसळ खा! ;-)
आ.न.,
-गा.पै.

भाजी मस्त फ्रेश दिसतेय.

पण पावसाळ्यात कसं करणार ?

प्रचेतस's picture

2 Jul 2020 - 8:14 pm | प्रचेतस

2वेळा केली तरी 10 दिवस पुरेल.

हे वाक्य शीर्षकाशी विसंगत आहे. १० दिवस पुरणारी भाजी ताजी कशी असेल ब्वा?

अत्रुप्त आत्मा's picture

2 Jul 2020 - 11:01 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif
http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif http://www.sherv.net/cm/emoticons/playful/blowing-raspberry-smiley-emoticon.gif

कपिलमुनी's picture

2 Jul 2020 - 11:31 pm | कपिलमुनी

ओम ताज्याभाज्याय फटं स्वाहा !

आपण 2 घरात किंवा 3 घरात मिळून ठरवून दर आठवड्याला जरी अशी भाजी आणली तरी पैसे वाचतील,कोलिटी मिळेल,

वाटली चार घरात. म्हणजे ताजीच . तीन दिवसांनी आणि कुणी जाणार, यांना देणार. असा सहकार आहे हो.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2020 - 6:58 pm | अत्रुप्त आत्मा

बिना सहकार-नही उद्धार!

वीणा३'s picture

2 Jul 2020 - 11:47 pm | वीणा३

चांगली माहिती आणि मस्त दिसत्ये फोटो मधली भाजी. हे माझ्या आई-बाबाना सांगायला पाहिजे. ते दोघे नेहरू चौकात (मंडई च्या इथे कुठेतरी, नक्की माहित नाही) कुठल्यातरी वारी सकाळी ६-७ वाजता ताजी भाजी मिळते म्हणून जातात.

अत्रुप्त आत्मा's picture

3 Jul 2020 - 5:28 am | अत्रुप्त आत्मा

@ते दोघे नेहरू चौकात -- नेहरू चौक म्हणजे छोटर मार्केटयार्ड. ते ही सगळ्या दृष्टीने छान आहे. पण तिथे जमणारी गर्दी महान आहे. म्हणून कोरोना काळात नको वाटते. मार्केटयार्ड मध्ये अंतर ठेऊन फिरणं शक्य आहे.

अत्रुप्त आत्मा's picture

5 Jul 2020 - 12:36 pm | अत्रुप्त आत्मा

सर्वेषाम् धन्यवादम्.
http://www.sherv.net/cm/emoticons/smile/free-happy-smile-smiley-emoticon.gif

Prajakta२१'s picture

19 Jul 2020 - 5:51 pm | Prajakta२१

https://sevenmantras.com/
ह्या website वरून भाजी मागवण्याचा कोणाला अनुभव आहे का?
भाज्यांचे दर अर्थातच महाग आहेत
८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला
फळांची बास्केट -४५० ला
मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2020 - 7:27 pm | अत्रुप्त आत्मा

@८ ते ९.५ किलो ची बास्केट -५२५ ला - हा त्यांना 180 ते 220 रुपयाला बसणारा माल आपल्याला 350 ला व अधिक काँटीटीमध्ये मिळू शकतो.. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.)

@फळांची बास्केट -४५० ला - ही त्यांना 150 ते 200 ला मिळते. आपल्याला 220 ते 300 पर्यंत आणि तेही दुप्पट काँटीटी मधे मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.)

@मिनी बास्केट ३-४. ५ किलोची २९० ला-- ही त्यांना 90 ते 140ला मिळते.. आपल्याला 100 ते 160 मध्ये व अधिक काँटीटी मध्ये मिळू शकते. (गुलटेकडी,मार्केटयार्ड पुणे येथील रेट नुसार.)

गुलटेकडी मार्केटला चिंचवडहून येण्याजाण्याचा पेट्रोल खर्च-
बाईक- २०० रु
कार- ३७५ रु.
(आजच्या पेट्रोल भावानुसार रु ८६.५६)

गुलटेकडी मार्केटला चिंचवहून येण्याजाण्याचा लागणारा वेळ-
साडेतीन तास (जाणे,येणे भाजी घेणे यानुसार)

गुलटेकडी मार्केट मध्ये भाजी घेण्यात असलेली करोनाची रिस्क-
प्रचंड (आजच्या करोनाच्या रुग्णांनुसार)

५२५ रु ची भाजी ऑनलाइन थेट घरपोच आल्यामुळे आपला खर्च होणारा वेळ- शून्य

५२५ रु ची भाजी ऑनलाइन आणण्यामुळे करोना होण्याची शक्यता- नगण्य

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2020 - 11:44 pm | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/trollface/my-little-pony-trolling-smiley-emoticon.gif

कं-ट्रोल

प्रचेतस's picture

21 Jul 2020 - 10:15 am | प्रचेतस

स्वस्तता महत्वाची की सुरक्षितता सांगा बरे?

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 10:46 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emo/happy/really-happy-smiley-emoticon.png

Gk's picture

23 Jul 2020 - 10:09 pm | Gk

ऑन लाईन ने रिस्क नगण्य होते

महाभारतातील परीक्षित राजाची कथा

भाजी पाल्याच्या घावूक बाजारातील दर आणि किरकोळ विक्रीचे दर ह्या मध्ये प्रचंड तफावत असते हे अगदी खरे आहे.
भाज्यांचे दर कमी झाले तरी किरकोळ विक्रेते दर कमी करत नाहीत हे पण सत्य आहे.
पण शहरात असे होलसेल मार्केट थोडीच असतात .
आता मुंबई चा विचार केला तर दादर मध्ये अजुन सुद्धा होलसेल मार्केट आहे.
पूर्ण शहर करता ते एकच आहे.
तिथे जावून भाजी खरेदी करणे खूप फायद्याचे आहे 100 रुपयाची वस्तू तुम्ही 30 रुपत्का खरेदी करू शकता प्रचंड पैसे वाचतात.
मग अडचण काय आहे.
1) खरेदी करण्याची वेळ पहाटेची असते .
2) घरापासून ते लांब असतात
3) वेळेचा अभाव.
ह्या तीन कारण मुळे लोक कंटाळा करतात
नाही तर ताजी,स्वस्त भाजी तिथे मिळते.
आताच्या परिस्थिती मध्ये ते योग्य नाही गर्दी असते त्या मुळे संक्रमण होण्याचा धोका जास्त.
बाकी पेट्रोल चा खर्च वजा केला तरी भाजी स्वस्त च मिळते

अत्रुप्त आत्मा's picture

20 Jul 2020 - 11:48 pm | अत्रुप्त आत्मा

कशाला समजावून सांगितले? सररररर्व काही पुरेपूर व नीट माहीत असलेली व्यक्ती आहे ती!
------------------------------------------------------
ट्रोलर-कं-ट्रोलर:- http://www.sherv.net/cm/emoticons/trollface/all-the-troll-smiley-emoticon.gif आत्मा

प्रचेतस's picture

21 Jul 2020 - 10:14 am | प्रचेतस

अत्रुप्तजी आत्मा, तुम्ही प्रथम माझ्या मुद्द्यांचे खंडन करून दाखवा बरे, मग पुढे बोलू.

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 10:47 am | अत्रुप्त आत्मा

http://www.sherv.net/cm/emoticons/fans/cheerleader-smiley-emoticon.gif

Gk's picture

23 Jul 2020 - 10:08 pm | Gk

इ

Prajakta२१'s picture

21 Jul 2020 - 12:10 am | Prajakta२१

धन्यवाद
'सध्याच्या काळात' ------हे दोन शब्द मनात आले कि ऑनलाईन डिलिव्हरी च योग्य वाटते

अत्रुप्त आत्मा's picture

21 Jul 2020 - 12:11 am | अत्रुप्त आत्मा

हम्मम्म... खरं आहे.