मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल आणि स्पर्धकांची ओळख
नमस्कार मंडळी,
लॉकडाऊनच्या कठीण काळात आपण पहिल्यांदाच काव्यलेखन स्पर्धा आयोजित केली होती. आपण भरभरून प्रतिसाद दिलात. याबद्दल आपले मन:पूर्वक आभार. एकूण ६३ कविता स्पर्धेसाठी आल्या होत्या. पहिल्या पाच कविता विजेत्या म्हणून घोषित करण्याचा विचार होता. मात्र एकूण आठ दहा कविता समान गुणांमुळे पहिल्या पाचात घेणे अशक्य होऊन बसले. तेव्हा पहिल्या तीन कविता विजेत्या म्हणून घोषित करत आहोत.
कवितांवर लॉकडाऊनचा फारसा प्रभाव आढळून आला नाही. कदाचित लोक आता लॉकडाऊनला सरावले असतील. अत्यंत उत्कृष्ट रचना यावेळेस वाचायला मिळाल्या. 'मी-वंदना' यांच्या दोन्ही कविता पहिल्या पाचामध्ये आहेत. त्याचे विशेष अभिनंदन.
असेच वेगवेगळे उपक्रम यापुढेही येत राहतील. तेव्हा मिपावर सक्रिय राहून आस्वाद घ्या.
पहिल्या तीन विजेत्या कविता पुढिलप्रमाणे :
मिसळपाव काव्यलेखन स्पर्धा २०२० : निकाल
स्थान
शीर्षक
लेखक
प्रथम
तृष्णा
प्राची अश्विनी
विजेत्यांचं दणदणीत अभिनंदन आणि सर्वच स्पर्धकांचे मनापासून कौतुक.
स्पर्धकांची ओळख :
SR
शीर्षक
लेखक
9
आता बदनाम झालो
डॉ.संतोष तांदळे
10
मी खुशाल आहे
डॉ.संतोष तांदळे
11
क्वार्टर मिळवाया डोकं..
अथांग आकाश
17
फरक
चांदणे संदीप
19
समर्थ
गामा पैलवान
23
..पुढे तिचा मी ईश्वर झालो..
कानडाऊ योगेशु
28
चंद्र माझ्या कुशित आहे
गणेशा
33
पथ स्वप्नांचे का
बिपीन सुरेश सांगळे
39
हे गगना तू मजला ताऱ्यांचे दान दे
खिलजि
40
पोपट
गामा पैलवान
46
प्रश्न उजेडाचे -- प्रश्न अंधाराचे
प्रसाद साळवी
47
नका जाऊ बाहेर लॉकडाऊनमधी राया (लावणी)
कानडाऊ योगेशु
49
......फूल/ पिस्तूल ठेविले.
प्राची अश्विनी
52
आपलं माणूस
राघव
53
शोधू जरा (गझल)
कुमार जावडेकर
54
पोहे मात्र सुरेख झाले
श्रीगणेशा
55
बिअर मात्र सुरेख होती
चामुंडराय
59
बरसती धारा
बिपीन सुरेश सांगळे
body {
background: url(https://i.postimg.cc/VL2Z9Chs/142193-blue-and-white-simple-background.jpg);
background-size: 2000px;
}
प्रतिक्रिया
25 May 2020 - 12:18 am | गणेशा
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन..
आयोजकांचे आभार..
या दोन स्पर्धे मुळे मी पुन्हा लिखाणाकडे वळालो..
शब्द झाले मोती.. आणि सायकलचा प्रवास लिहितोय..
हे फक्त तुमच्या मुळे.
तर मला वाटते विजेते कोणी असले तरी खरे बक्षिस मला मिळाले आहे.. लिहिण्याचे, अगदी 2010-11 सारखे.
या साठी मी मिपाचा आणि या स्पर्धेत कविता लिही सांगणाऱ्या वल्लीचा (प्रचतेस) कायम ऋणी राहील...
पहिली कविता आवडली नसेल कारण माझ्या आई.. मिटलेल्या श्वास या सिरीज मध्येच ती मोडते, त्यातील शब्द त्यात आले..
दुसरी कविता वल्ली ओळखू शकला नाही म्हणून तो मला पार्टी देणार आहे.. केव्हढे मोठे बक्षिस..
25 May 2020 - 8:25 am | प्रचेतस
तुला आमरसाचे एक फुल ताट लागू आहेच. :)
25 May 2020 - 10:46 am | प्राची अश्विनी
तुम्ही, चांदणे संदीप .. तुम्ही प्रत्येक कवितेवर प्रतिसाद दिलात. खूप आवडलं.
हे तुमच्या कडून मी शिकले. पुढच्या वेळी नक्की अंमलात आणेन.
25 May 2020 - 11:22 am | गणेशा
तू बोल ग तै .. बिनधास्त.
तुम्ही म्हणाले की, अर्धी लाकडे सरणावर गेल्या सारखे वाटते.. बाकी काही नाही...
:-))
बाकी तुझी कविता खूपदा वाचली होती...
लिहित चल असेच कायम..
25 May 2020 - 12:20 am | गणेशा
बऱ्याच कविता मला आवडल्या होत्या, कोहम मी तेंव्हाच माझी विजेती कविता घोषित केली होती ती पहिल्या तीन मध्ये आल्याने छान वाटले.
25 May 2020 - 12:25 am | मोगरा
सर्व स्पर्धकांचे अभिनंदन!
आणि माझ्या सारख्या,
कविता न देता हि प्रामाणिक पणे वाचणार्यांचे हि आभार. ;)
25 May 2020 - 10:57 am | प्राची अश्विनी
आभार!!:)
25 May 2020 - 12:44 am | तिरकीट
25 May 2020 - 12:44 am | तिरकीट
25 May 2020 - 12:45 am | तिरकीट
सर्व विजेत्यांचे अभिनंदन आणि कवितेला दाद देणाऱ्या सर्व वाचकांना मनापासून धन्यवाद
25 May 2020 - 8:29 am | प्रचेतस
ह्या स्पर्धेमुळे अनेक उत्तमोत्तम कविता वाचता आल्या. ह्याबद्दल सर्व कवी, कवयित्री, साहित्य संपादक आणि मिपा व्यवस्थापन ह्या सर्वांचे आभार आणि अभिनंदन. कविता लिहिता येत नसल्याची खंत नेहमीच जाणवते.
व्यवस्थापनाने आता छायाचित्रणाचीही एक स्पर्धा घ्यावी अशी त्यांना आग्रहाची विनंती.
25 May 2020 - 9:31 am | गणेशा
नक्कीच घ्या अशी स्पर्धा...
हा नक्की घ्या अशी स्पर्धा...
जाता जाता, वरील तीन कविते व्यतिरिक्त काही कविता मनात घर करून गेल्या त्यांची नावे देतो
सगळी आठवत नाहीत पण ह्या सुद्धा कविता विशेष आवडल्या मला ..
प्रश्न उजेडाचे, सांजवेळ, वसंत, हे गगना, आस, करवली..
25 May 2020 - 9:32 am | गणेशा
बोल्ड शेवटची लाईन केली होती वरची कशी झाली?
25 May 2020 - 9:29 am | अत्रुप्त आत्मा
विजेत्यांचे अभिनंदन. :)
25 May 2020 - 9:37 am | चांदणे संदीप
निकाल आला!
माझ्या आवडत्या दोन कविता विजेत्या झाल्या हे पाहून अतिशय आनंद झाला. प्राची अश्विनीतैंच्या कवितेला मी गुणगुणण्याच्या नादात गुणच दिले नव्हते.
सर्व विजेत्यांचे अभिनंदन व स्पर्धकांचे आभार! सर्व स्पर्धकांना पुढील स्पर्धेसाठी आताच शुभेच्छा!
आता नव्या स्पर्धेची वाट बघणे आले. :)
सं - दी - प
25 May 2020 - 10:40 am | प्राची अश्विनी
:). चालतय. कविता आवडली त्यासाठी धन्यवाद!:)
25 May 2020 - 10:42 am | प्राची अश्विनी
सर्व स्पर्धकांचे ,विजेत्यांचे अभिनंदन. अनेक सुंदर कविता वाचायला मिळाल्या. आयोजकांचे आभार.
25 May 2020 - 11:00 am | गवि
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. व्यक्त झाल्याबद्दल.
विजेत्यांचे आणखी विशेष अभिनंदन.
25 May 2020 - 11:13 am | ज्ञानोबाचे पैजार
विजेत्यांचे अभिनंदन आणि या पडद्या मागे राबणार्या हातांचे मनापासून कौतुक.
लॉकडाउनच्या काळात कामाचा व्याप अतिशय वाढल्याने स्पर्धेत कविता देता आली नाही तसेच मतदानही करता आले नाही.
पण आता सगळ्याच्या सगळ्या कविता वाचणार आहे आणि कच्चा माल सापडला की मग....
पैजारबुवा,
25 May 2020 - 11:40 am | चांदणे संदीप
लौकर... लौकर. =))
सं - दी - प
25 May 2020 - 7:57 pm | पाषाणभेद
पैजारबुवांप्रमाणेच ऐन लॉकडाऊन काळात काम वाढल्याने कविता लिहीणे तर दुरच पण येथे येणे आणि वाचन करणे देखील झाले नाही. प्रतिसाद किंवा गुणही देता आले नाही. सर्व स्पर्धक कवि मित्त्र क्षमा करतीलच. कालपासून कवितांचा आस्वाद घेणे चालू केले आहे.
दुसरे असे की या कोरोनामुळे अन त्यातील बातम्या, लॉकडाऊन मधील परिस्थिती कामाचा बोजा यामुळे मनावर एक मळभ साचले आहे. एकप्रकारचे औदासीन वातावरण तयार झालेले आहे हे नक्की.
हि असली केवळ कवितांसाठी स्पर्धा घेवून मिपाचा अभिमान वाटला. मागे जे लिहीले तेच येथे लिहीतो की - कवितांना, कवींना हलके घेण्याचा समाजाचा समज आहे. साहित्यात तसे पाहिले तर प्रथम कविताच तयार झाली असावी, मग गाणे कथा आल्या असाव्यात. कविता इतक्या विविध स्वरूपात असतात की त्यात आयुष्याचे गणित सापडते. मनाची मोकळीक, नवविविध रस, समाजाचे प्रतिबिंब, मानवाचे स्वभाव गुण आदींची उधळण कवी शब्दांद्वारे करत असतो. एकाच कवितेतून कितीतरी निरनिराळे अर्थ सापडू शकतात. जस जशी कवीता कळत जाते तसतसे अंगावर रोमांच येतात. एकादा गूढ अर्थ असलेली कविता वाचून मेंदूत वेगळेच रसायन स्त्रवू लागते. माणूस भावनाशील होतो. हे सारे कवितेमुळे घडते. मग कविता श्रेष्ठच आहे की.
एक वेगळाच विचार मनात येतो आहे. समाजात अनेक हानिकारक घटना घडतात. अशा घटनांना मानवी स्वभाव कारणीभूत असतो. कोठेतरी ती घटना घडविणारा दुखावला गेलेला असतो त्याची परिणीती त्याचा बिघडलेला स्वभाव होण्यात होते. तर असले बदलणारे स्बभाव काही प्रमाणात कमी करण्यासाठी त्या व्यक्तीच्या शालेय अभ्यासक्रमात केवळ कविता असणारा अभ्यासक्रम वेगळा राखायला हवा. किंबहूना त्या व्यक्तीच्या जाणिवा प्रगल्भ झाल्या त्या वयात म्हणजेच दहावी नंतरच्या काळात अन बारावी किंवा प्रथम वर्षाच्या अभ्यासक्रमात कविता हा विषय - मग तो विद्यार्थी कोणत्या का फॅकल्टीचा असेना - समाविष्ट करायला हवा.
मिपा कविता स्पर्धेचे एक वैशिष्ठ मला आवडले ते म्हणजे स्पर्धेत कवितांचे रचनाकार यांचे नाव नसणे. होते काय की नावाचे लेबल आले की मग कवितांचा आस्वाद घेण्यात अडथळा वाचकांना येतोच पण परिक्षकांनाही पेच पडतो. त्या त्या रचनाकाराच्या मागील कविता, त्याचे वलय यामुळे इतर सर्वांगसुंदर कवितांना न्याय मिळत नाही. ते येथे टाळले गेले आहे.
स्पर्धेत सहभागी झालेल्या कवी मित्रांचे हार्दिक अभिनंदन. स्पर्धेत विजेत्यांचे दुप्पट अभिनंदन.
25 May 2020 - 12:16 pm | स्वच्छंद
25 May 2020 - 12:39 pm | चौथा कोनाडा
सर्व कविचे अभिनंदन आणि प्रतिसादकांचे विशेष कौतुक !
विजेत्यांचे आणखी विशेष अभिनंदन.
25 May 2020 - 1:38 pm | बिपीन सुरेश सांगळे
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन..
मिपा आयोजकांचे खूप आभार..
25 May 2020 - 1:38 pm | बिपीन सुरेश सांगळे
छान उपक्रम होता . कौतुकास्पद !
25 May 2020 - 1:40 pm | बिपीन सुरेश सांगळे
एक नम्र सूचना
ज्या कविता आवडल्या नाहीत , त्यावर प्रतिक्रिया देताना थोड्या संयमी हव्यात .
25 May 2020 - 2:01 pm | नूतन
सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन
25 May 2020 - 8:11 pm | मनिष
सगळ्याच विजेत्यांचे आणि सहभागी कवींचे मनापासून अभिनंदन.
माझेही मत गणेशा सारखेच आहे. माझीही त्यानिमित्ताने एक कविता लिहून झाली (तसेही माझे मराठी लिखाण सुरू करण्यापासून आतापर्यंत सुरू ठेवण्याचे बरेचसे श्रेय मिपाचे आहे). त्याच्याच एका धाग्यावर त्याला एकदा 'कविता परत येईल तुझ्याकडे' असं संगितलं होतं प्रतिक्रियेत. तो परत लिहिता झाला हे फार छान झालं.
थोडं कवितांविषयी - मला ज्या कविता भावल्या, भिडल्या त्यांच्याविषयी आवर्जून लिहिले. काही कविता सुरेख होत्या, पण विषय मला स्वतःला फार नाही भावले, म्हणून राहू दिले. शिवाय वाईट लिहिण्यापेक्षा न लिहिलेलं बरं असं मला वाटतं. असो.
ज्यांच्या कविता आवडल्यात त्यांचे जूने लिखाण वाचून पहा - विचारांचा रोख आणि खोली लक्षात येईल. लिहिणारा त्याच्या कवितेत लपू शकतच. नाही असे सुरेश भट म्हणायचे. तसेच कविंचे लिखाण कसे बहरत जाते हेही बघता येईल. असो.
मला 'देता निरोप तुजला' ही स्वच्छंदची कविता खूप आवडली, तसेच 'गणेशा' आणि 'चांदणे संदीप' यांच्या उमद्या प्रतिक्रियाही आवडल्या. त्यांचे पुढचे लिखाण मी उत्सुकतेने वाचेन. जिते रहो, लिखते रहो!!!
25 May 2020 - 9:26 pm | गणेशा
धन्यवाद !
दिवस उलटले, कॅलेंडरची पानं बदलली
वसंत सरला, ग्रीष्मधग माथ्यावर आली
झाडांची पानं गळून गेली,
धुंदावणारी स्वप्नगंधा कोमेजून गेली.
दग्ध पळस, रक्तवर्णी जिव्हांनी फुत्कारला,
हे किती छान होते..
हे असे विचार असणारा माणूसच इतरांच्या लिखाणाला कायम न्याय, प्रोत्साहन आणि चालना देऊ शकतो..
लिहित रहा तुम्ही पण
25 May 2020 - 10:50 pm | स्वच्छंद
स्पर्धेसाठी टाकताना शेवटच्या ओळीतील नाव लपविण्यासाठी थोडे बदल करावे लागले. आणि दुसऱ्या गझलेतील शेवटचा शेरच काढून टाकावा लागला. त्यामुळे थोडी विस्कटलेली वाटली असावी. पण आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद
25 May 2020 - 10:53 pm | स्वच्छंद
सर्व विजेत्यांचे अभिनंदन. खूप दिवसांनी लिहिता झालो या स्पर्धेच्या निमित्ताने. त्यामुळे मिपा चेही आभार.
25 May 2020 - 11:05 pm | स्वच्छंद
अलीकडे बरेच कवी गझल रचताना मी ही पाहतोय त्यामुळे काही मान्यवरांनी याकडे दुर्लक्ष केलेले जाणवले. खऱ्या गझल काराला नियमात थोडाही भंग झालेला चालत नाही किंवा ते या रचनेला गझल मानतच नाही, हे ही माहीत आहे. माझा हा आवडता प्रकार आहे म्हणून लिहली आणि लिखाणाची सुरुवातच आहे त्यामुळे सांभाळून घ्याल ही अपेक्षा. आपल्या सूचना मोलाच्या ठरतील म्हणून सूचनांचे स्वागत आहेच.
26 May 2020 - 7:09 am | गणेशा
गझल लिहिणार्यांचे मला खुप अप्रूप वाटते..
इतकी शब्द संपदा योग्यरित्या कसे लिहू शकतात ते..
सुरेश भट तर आपले आवडीचे, त्यावेळी त्यांची 3-4 जी पुस्तके होती ती वाचली होती.. वा..
येऊन जा जराशी... पण मस्त होती. मला ती जास्त आवडली होती.
---
मला तर गझल लिहायचे म्हंटले की मासे खातो तसे होते
म्हणजे मासे आवडतात, पण काटे काढता येत नाही..
आणि मासे खायला बसले की काटे काढण्यातच भूक मरून जाते...
हे असे आमचे हाल, मग इतर कसे पटकन मासे खातात, आणि सगळे गार होऊन गेल्यावर आमचे सुरु, ते हि आस्थे आस्थे..
खारे मासे कि गोडे मासे असले हि मी करत नाही, कारण पहिली वेलांटी का दुसरी वेलांटी याचा पण विचार मला जमत नाही..
26 May 2020 - 7:19 pm | मनिष
ग़ज़ल आवडत असेल तर हे नक्की वाचा असे सुचवतो (जाहिरात) - ग़ज़ल का सफ़र..
26 May 2020 - 1:45 am | सचिन
सर्व कविता लिहिणाऱ्यांचे अभिनंदन आणि आभार. .
विजेत्यांचे खूप खूप अभिनंदन.
ही संपूर्ण स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल पडद्यामागच्यांचे आणि प्रतिसाद व मते देणार्यांचे विशेष आभार आणि कौतुक !!
26 May 2020 - 7:19 am | श्रीगणेशा
सर्व कवींचे अभिनंदन, आभार.
सगळीकडे प्रतिक्रिया देता आल्या नाहीत पण सर्व कविता हळू हळू वाचत आहे.
विजेत्या कवींनी (आता समजलं हे) माझ्या साध्या-सुध्या कवितेला दाद दिली (धन्यवाद), अगदी बक्षीस मिळाल्या सारखे वाटले :-) पुढील लिखाणास प्रोत्साहन मिळाले.
तृष्णा कवितेवर भाष्य करण्याची माझी अजुन शब्द कुवत नाही. कवीला कोपरापासून नमस्कार /\
कोहम मोजक्या शब्दांत कवींनी का लिहावे हे सांगून जाते.
स्वतः च्या अनुभवाशी प्रामाणिक राहून योग्य शब्दांची सांगड घातली तर त्यातून येणारे काव्य हे नेहमी नावीन्यपूर्ण आणि सर्जनशीलच असेल. कवींना दिशा दाखविण्यासाठी कवीचे विशेष अभिनंदन, आभार.
आई कविता विशेष भावली. कवितेत वर्णिलेल्या प्रसंगी मन स्तब्ध, निशब्द होतं. ते शब्दात मांडणं कठीण. कवीचे विशेष अभिनंदन, आभार.
26 May 2020 - 11:15 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
सर्वच कविता नंबर वन होत्या, वाचतांना आनंद वाटला.
सर्वांनीच नियमित लिहिते राहीले पाहिजे.
-दिलीप बिरुटे
26 May 2020 - 12:15 pm | चिगो
सर्व विजेत्यांचे अभिनंदन..
26 May 2020 - 1:24 pm | कौस्तुभ भोसले
सर्व विजेत्यांचे आणि स्पर्धकांचे अभिनंदन..
आयोजकांचे आभार..
27 May 2020 - 10:55 am | रातराणी
सर्व विजेत्यांचे अभिनंदन :) विजेत्या तिन्ही कविता नितांत सुंदर आहेत! आणि या तीन कविता जिंकून दिल्याबद्दल चोखंदळ रसिक वाचकांचेसुद्धा अभिनंदन!!