ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी.
त्या:- खुरुजीईईईईईई..
मी:- खाय? (आपलं ते हे..)काय?
त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!!
मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका!
त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का?
मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही!
त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!)
मी:- विचारा! (प्लेड!)
त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!)
मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स)
त्या:- हु हु हु हु हु हु! तसं नै, एक धार्मिक कार्यक्रम आहे. (गुगली)
मी:- असं का!(वेल लेफ्ट)
त्या:- त्यात मला एक मदत हवी होती. मंजे सल्ला हवाय!
मी:- (अश्या काही महिलांचे पूर्वानुभव गृहीत धरून!) प्रतिसल्ला 200 रुपये दर पडेल.
त्या:- (आश्चर्याने..) हो का!?
मी:- हो!
त्या:- (दर पाहून महिलेने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला..)माझ्या मुलाची अमुक अमुक जननशांत आहे. त्याला मी नऊवारी घातली तर चालेल का?
मी:- (हल्ली हा असलाही गुरुजींना विचारायचा खास प्रश्न असू असतो,हे गृहीत धरून..) धुतलेले कोणतेही कपडे चालतील.
त्या:- पण ते सोवळ्यात (पूजेला) चालतील का?
मी:- स्वच्छ , धुतलेले तेच सोवळे, असं (बाहेर वादात ) आपण सांगतो की नै?
त्या:- हो..
मी:- मग झालं तर!
त्या:- पण नऊ-वारीत जास्त शक्ती असते ना?(टणाटण मेंदूफ्राय संघटना)
मी:- (ही प्रकरणे समजवण्या बाहेरची असतात,या कचकाऊन आलेल्या पूर्वानुभवाला स्मरून..) आहो साधी नाही,विद्युतशक्ति असते. तुम्ही नऊवारी फिक्स करा.
त्या:- (काहीसे मो-हरून!) माझी रेशमी-सिल्कची आहे..चालते ना?
मी:- आता आधी पैसे द्या मग पुढे बाकीची माहिती(अकाउंट डिटेल्स देतो..व 150च रुपये जमा होतात,50शेवटी हे आम्हाला कळते)
त्या:- बसायला लोकरीचे आसन घेतात ना?( त्याच सं-घटनेची किरपा,म्हणून हे प्रश्न!)
मी:- हो हो, लोकरच.(ब्याद लवकरात लवकर जावी म्हणून..) पण बसण्यापूर्वी आधी दोरीच्या उड्या मारायच्या असतात!
त्या:- अय्या!
मी:-अय्या नाही,उड्या
त्या:-किती?
मी:-(इथेही धार्मिक संख्याच सांगावी हे होतकरू नवपुरोहितानी लक्षात ठेवावे!) 10,28, कींवा 108!
त्या:- मी 108 मारीन
मी:-(मनात- 1008 सांगायला हव्या होत्या!) उत्तम,फक्त नन्तर आसनावर बसलात की पूजेला आलेले गुरुजी सोडून कुणाच्याही बोटाला बोट नखाकडून पूर्व-पश्चिम स्पर्श करा.
त्या:- त्यांनी काय होईल..?
मी:-विद्युतशक्तिचा अनुभव येईल.
त्या:- बरं बरं! ठीक आहे. ठेंक्यु!
मी:- 50रुपये?
त्या:- हे काय , पाठवले की!
मी:-(जाता जाता..) हो..आणि नऊवारी घालू नका,नेसा हं!!!
----------------------------------------
अतृप्त...
प्रतिक्रिया
9 Mar 2020 - 12:59 pm | ज्ञानोबाचे पैजार
अरेरे अशाने गुरुजी लोकांवरचा यजमानांचा विश्वास उडून जाईल.
पैजारबुवा,
9 Mar 2020 - 2:05 pm | अत्रुप्त आत्मा
9 Mar 2020 - 3:27 pm | प्रचेतस
हे तुम्ही रंगवलेलं दिसतंय.
बाकी लेखन नेहमीप्रमाणेच मस्त.
9 Mar 2020 - 9:27 pm | अत्रुप्त आत्मा
@हे तुम्ही रंगवलेलं दिसतंय. ~~~ खोच कळ्ळी!![http://www.sherv.net/cm/emoticons/playful/rebellious-sticking-out-tongue-smiley-emoticon.gif](http://www.sherv.net/cm/emoticons/playful/rebellious-sticking-out-tongue-smiley-emoticon.gif)
9 Mar 2020 - 4:04 pm | कंजूस
त्यामुळे शुगर व्हाडते?
9 Mar 2020 - 4:20 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गुरुजींकडे भरपूर अन्भव आहे, व्यवस्थित लिहिलं तर ते उत्तम लेखन पाडू शकतील.
असं वल्लीसेठ, अनौपचारिक बैठकीत बोलल्याचं आठवतं.
बाय द वे, लेखनाला उत्तम सुरुवात. येत राहा, लिहिते राहा.
-दिलीप बिरुटे
12 Mar 2020 - 7:39 pm | अत्रुप्त आत्मा
Yes sir. :)
9 Mar 2020 - 5:19 pm | उपेक्षित
अर्थहीन जिल्बी, यापेक्षा अकुच्या जिलब्या बऱ्या
9 Mar 2020 - 6:45 pm | अत्रुप्त आत्मा
@अर्थहीन जिल्बी :- यात काय काय अर्थहीन आहे? क्रुपया सांगा.
11 Mar 2020 - 8:22 pm | अत्रुप्त आत्मा
काय अर्थहीन आहे हे न सांगता आल्यामुळे तुमचंच नाव अर्थहीन झालं. स्वतःच स्वतःला उपेक्षित ठेवलत!
13 Mar 2020 - 5:27 pm | उपेक्षित
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा आणि बळबळ इनोद निर्मितीचा केविलवाणा प्रयत्न, विशेष म्हणजे तुमचे काही धागे सोडले तर हा तुमचा बालीशपणा वारंवार दिसून येतो,
पूर्वी कुणीतरी तुम्हाला तुमच्या त्या बालिश स्मायल्यान्बद्दल ठणकावले होते आणि ते सारखे सारखे स्पांडू-पांडू चा जप केल्याबद्दल पण कानपिचक्या दिल्या होत्या.
असो वयक्तिक काहीही नाही पण अप्पाच्या मिसळीबद्दल लिहिणारा अतृप्त आत्मा जास्ती भावतो म्हणून बोललो. ;)
14 Mar 2020 - 7:53 am | अत्रुप्त आत्मा
उपेक्षित निरर्थक आत्मकुंथक प्रतिसाद!
14 Mar 2020 - 5:13 pm | उपेक्षित
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप काहीतरी बालिश उत्तर येईल म्हणून कारण तुमच्याकडे उत्तर द्यायला काही नाही हे मला माहिती होत. :)
असो तुमच्या धाग्याच्या एकंदर व्यक्तिमत्वाला साजेसेच आहे म्हणा ते पाचकळ आणि बालिश ;)
15 Mar 2020 - 9:14 pm | अत्रुप्त आत्मा
मससस्त! जमलं जमलं! कुंथा अज्जून! :)
9 Mar 2020 - 5:41 pm | प्राची अश्विनी
किकिकिकि आपलं खिखिखिखि..;)
10 Mar 2020 - 1:03 am | टवाळ कार्टा
=))
14 Mar 2020 - 1:37 pm | गामा पैलवान
अत्रुप्त आत्मा,
तुम्ही जिला टणाटण मेंदूफ्राय संघटना म्हणता तिने बरीच उपयुक्त पुस्तकं प्रकाशित केली आहेत. त्यापैकी हे एक : धर्माचे आचरण आणि रक्षण
दुवा : https://sanatanshop.com/product/marathi-abiding-by-and-protection-of-dha...
जमल्यास वाचा म्हणून सुचवेन.
आ.न.,
-गा.पै.
14 Mar 2020 - 8:39 pm | उपेक्षित
:)
:P
15 Mar 2020 - 9:15 pm | अत्रुप्त आत्मा
अजून १ आत्मकुंथक आला. =))
16 Mar 2020 - 10:14 am | संगणकनंद
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" आधुनिक काळातील गोष्टींचा मुलामा देऊन त्यालाच "सुधारणा" म्हणत उदरनिर्वाह करण्याची दांभिकता हे खरे "आत्मकुंथन" होय.
तुमचा प्रतिसाद या लेखाशी आणि त्यावरील माझ्या प्रतिसादापुरता मर्यादीत ठेवला असता तर वरील ओळी खरडल्या नसत्या. मात्र तुम्ही तुमच्या कुवतीप्रमाणे तुमच्याच मेंदूतून निघालेला "आत्मकुंथन" शब्द वापरला त्यामुळे मला नाईलाजाने हे लिहावे लागले.
16 Mar 2020 - 11:18 am | अत्रुप्त आत्मा
असोच्च!
16 Mar 2020 - 1:21 pm | गामा पैलवान
अत्रुप्त आत्मा,
एक शंका आहे. हे आत्मकुंथन ही नेमकी काय भानगड आहे? नाय म्हणजे मला काय म्हणायचे आहे की, स्वत:चे स्वत:लाच कुंथावे लागते ना? मग आत्म हा उपसर्ग कशासाठी?
कुंथण्याचे उपकंत्राट देण्यासंबंधी मी तरी कधी काही ऐकले नाही. तुम्हांस काही माहिती असल्यास कृपया विदित करावी. 'अत्रुप्त आत्मा' या तुमच्या सदस्यनामाचा आत्मकुंथनाशी काहीतरी संबंध असावा असे वाटते आहे. तेव्हा जिज्ञासूंचे शंकानिरसन कराच, ही प्रेमळ विनंती.
आ.न.,
-गा.पै.