बुरा न मानो होली है! (एक Holy लेखण!)
लेखनप्रकार
ढिश-क्लेमर:- वाचकांना शीघ्र फलप्राप्ती व्हावी म्हणून (व आज होळी असल्यामुळेही..) सदर प्र-संग थोडा रंगवून टाकलेला आहे,मूळ रंगासह! ह्याची दखल घ्यावी.
त्या:- खुरुजीईईईईईई..
मी:- खाय? (आपलं ते हे..)काय?
त्या:- तुमचा नंबर द्या ना...प्लल्लल्लीईईईईईईज!!!
मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका!
त्या:- हही हही हही ही.. गुरुजी तुमचा नंबर मिळेल का?
मी:- कशाला ? (ब्याद टळावी म्हणून!) आपण माझ्या क्लायंट नाही!
त्या:- बरं! हितेच एक सांगाल का- (प्लिईईईईज!)
मी:- विचारा! (प्लेड!)
त्या:- माझ्या ना घरी एक इव्हेंट करायचाय(फुलटॉस!)
मी:- काय मॅनेजमेंट करू? (सिक्स)
त्या:- हु हु हु हु हु हु! तसं नै, एक धार्मिक कार्यक्रम आहे. (गुगली)
मी:- असं का!(वेल लेफ्ट)
त्या:- त्यात मला एक मदत हवी होती. मंजे सल्ला हवाय!
मी:- (अश्या काही महिलांचे पूर्वानुभव गृहीत धरून!) प्रतिसल्ला 200 रुपये दर पडेल.
त्या:- (आश्चर्याने..) हो का!?
मी:- हो!
त्या:- (दर पाहून महिलेने डायरेक्ट मुद्द्याला हात घातला..)माझ्या मुलाची अमुक अमुक जननशांत आहे. त्याला मी नऊवारी घातली तर चालेल का?
मी:- (हल्ली हा असलाही गुरुजींना विचारायचा खास प्रश्न असू असतो,हे गृहीत धरून..) धुतलेले कोणतेही कपडे चालतील.
त्या:- पण ते सोवळ्यात (पूजेला) चालतील का?
मी:- स्वच्छ , धुतलेले तेच सोवळे, असं (बाहेर वादात ) आपण सांगतो की नै?
त्या:- हो..
मी:- मग झालं तर!
त्या:- पण नऊ-वारीत जास्त शक्ती असते ना?(टणाटण मेंदूफ्राय संघटना)
मी:- (ही प्रकरणे समजवण्या बाहेरची असतात,या कचकाऊन आलेल्या पूर्वानुभवाला स्मरून..) आहो साधी नाही,विद्युतशक्ति असते. तुम्ही नऊवारी फिक्स करा.
त्या:- (काहीसे मो-हरून!) माझी रेशमी-सिल्कची आहे..चालते ना?
मी:- आता आधी पैसे द्या मग पुढे बाकीची माहिती(अकाउंट डिटेल्स देतो..व 150च रुपये जमा होतात,50शेवटी हे आम्हाला कळते)
त्या:- बसायला लोकरीचे आसन घेतात ना?( त्याच सं-घटनेची किरपा,म्हणून हे प्रश्न!)
मी:- हो हो, लोकरच.(ब्याद लवकरात लवकर जावी म्हणून..) पण बसण्यापूर्वी आधी दोरीच्या उड्या मारायच्या असतात!
त्या:- अय्या!
मी:-अय्या नाही,उड्या
त्या:-किती?
मी:-(इथेही धार्मिक संख्याच सांगावी हे होतकरू नवपुरोहितानी लक्षात ठेवावे!) 10,28, कींवा 108!
त्या:- मी 108 मारीन
मी:-(मनात- 1008 सांगायला हव्या होत्या!) उत्तम,फक्त नन्तर आसनावर बसलात की पूजेला आलेले गुरुजी सोडून कुणाच्याही बोटाला बोट नखाकडून पूर्व-पश्चिम स्पर्श करा.
त्या:- त्यांनी काय होईल..?
मी:-विद्युतशक्तिचा अनुभव येईल.
त्या:- बरं बरं! ठीक आहे. ठेंक्यु!
मी:- 50रुपये?
त्या:- हे काय , पाठवले की!
मी:-(जाता जाता..) हो..आणि नऊवारी घालू नका,नेसा हं!!!
----------------------------------------
अतृप्त...
वाचने
18283
वाचनखूण
प्रतिक्रिया
22
पवित्र गाय....
In reply to पवित्र गाय.... by ज्ञानोबाचे पैजार
(No subject)
मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका!
In reply to मी:- कृपया लाडीकपणे बोलू नका! by प्रचेतस
@हे तुम्ही रंगवलेलं दिसतंय. ~
त्यामुळे शुगर व्हाडते?
छान.
In reply to छान. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Yes sir. :)
अर्थहीन जिल्बी, यापेक्षा
In reply to अर्थहीन जिल्बी, यापेक्षा by उपेक्षित
@अर्थहीन जिल्बी :- यात काय
In reply to @अर्थहीन जिल्बी :- यात काय by अत्रुप्त आत्मा
काय अर्थहीन आहे हे न सांगता
In reply to @अर्थहीन जिल्बी :- यात काय by अत्रुप्त आत्मा
सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा
In reply to सगळच अर्थहीन आहे, बालीशपणा by उपेक्षित
उपेक्षित निरर्थक आत्मकुंथक
In reply to उपेक्षित निरर्थक आत्मकुंथक by अत्रुप्त आत्मा
वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप
In reply to वाटलंच होत आत्म्कुन्थान टाईप by उपेक्षित
मससस्त! जमलं जमलं! कुंथा
किकिकिकि आपलं खिखिखिखि..;)
=))
धर्माचे आचरण आणि रक्षण
In reply to (No subject) by संगणकनंद
:) :P
In reply to (No subject) by संगणकनंद
अजून १ आत्मकुंथक आला. =))
In reply to अजून १ आत्मकुंथक आला. =)) by अत्रुप्त आत्मा
अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना"
In reply to अंधश्रद्धायुक्त "गोष्टींना" by संगणकनंद
असोच्च!
In reply to अजून १ आत्मकुंथक आला. =)) by अत्रुप्त आत्मा
आत्मकुंथन = ?