(डबा)
आज पहाटे तो लवकर उठला
डबा उचलून धावत सूटला
लायनीताल्या लोकांना ढकलून दिले
दार जोराने बडवले
आताल्याला लवकर बाहेर बोलावले
जराही वेळ नाही असे सांगितले
आतले प्रकरण कुल वाटले
हालचालीच्या आवाजावरून मंद भासले
मनोमन स्वप्न रचले
वाटे आत गेल्यावर कोणी तरी म्हणावे
"अरे बाबा सावकाश आवर ,
होल वावर इज आवर"
आजची कथा अशी झाली
ज्याची बीजे त्याने कालच पेरली
काल त्याच्या खास मित्राने
बढती मिळाल्याचे सांगितले
बास ते एक कारणच झाले
त्याच्याकडून पार्टी मागायचे
दुपारचे जेवण बाहेर घ्यावे
मस्तपैकी चिकन हाणावे
पण घरच्या डब्याचे काय करावे?
हां! त्यातलेही चार घास खाउन घ्यावे
संध्याकाळी गजाभाऊ घरी आले
बायकोने नाक दाबत स्वागत केले
पदरा आडून सांगून पाहिले
पण याच्या डोक्यात नाही शिरले
रात्री परत वडे हाणले
बायकोला हे काही नवे नव्हते
रात्री गादीवर पडताना
तिने प्रश्न विचारला
"आज दिवसा भर काय चरला?
कशा कशावर आडवा हात मारला?"
त्याचे मन संतापले
पण लगेच स्वतःस सावरले
"बाहेर मी कितीही केली चराई ,
तरी तुझ्या हातची चव जगात मिळणे नाही."
इथेच त्याचा संयम संपला
आणि क्षणार्धात घोरायला लागला
ती समजून गेली उद्या सकाळी याचा नाही रहाणार स्वत:वर ताबा
म्हणून तिने रात्री झोपायच्या आधि पाणी भरून तयार ठेवला डबा
पैजारबुवा,
प्रतिक्रिया
5 Feb 2020 - 12:40 pm | प्रचेतस
=))
अआ गुरुजींच्या राखीव कुरणात शिरलात तुम्ही =))
5 Feb 2020 - 8:06 pm | पाषाणभेद
अर्रर्रर्र, पारच बाजर उठवीलाईसा बगा!
चित्रमय काव्य!
ठाकूरद्वारातील चाळीतला सीन आठवला.
7 Feb 2020 - 4:43 pm | टवाळ कार्टा
ख्या ख्या ख्या
9 Feb 2020 - 10:44 pm | चांदणे संदीप
बेक्कार... बेक्कार... महाबेक्कार डब्बा आणि डब्बेवाले पैजारबुवा. प्रचंड हस्लो =)) =))
प्रेरणेतच डबा मिळाल्यानंतर मग काय... तुफान फटकेबाजी!
_______/\_______
सं दी प
11 Feb 2020 - 7:51 am | विजुभाऊ
हा हा हा
पैजार बुवा. हसून हसून आमी बेजारबुवा झालोय
11 Feb 2020 - 3:02 pm | जालिम लोशन
झकास
14 Feb 2020 - 10:48 pm | सौंदाळा
जबरी
15 Feb 2020 - 12:37 am | गड्डा झब्बू
खत्री :-))