दोरीवरचे कपडे

पाषाणभेद's picture
पाषाणभेद in जे न देखे रवी...
4 Sep 2019 - 2:37 pm

दोरीवरचे कपडे

दोरीवर कपडे कसेही वाळत असतात
कपडे वाळत असतांना ते कसे दिसतात?

शर्ट कधी हॅंगरला चिमट्याने टांगलेला असतो
फाशी दिलेल्या कैद्यासारखा हालत असतो
(यावरूनच फाशीला इंग्रजीत हॅंग करणे म्हणत असतील.)

पॅन्टही अशीच असते हवेत तरंगत
दोन पाय आधांतरी भुतासारखे लटकत

नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे

साडी घालून घडी बसते वाळत
वा-याने तिचा पदर असतो हालत

किरकोळीच्या गोष्टी टॉवेल सॉक्स रुमाल
गणतीत नका घेवू बाकीचे कपडे आहेत कमाल

दोरीवर पडतात अंडरपॅन्ट बनियन ब्रा अन निकर
वाईट दिसतात, काढून घ्या, तसेही वाळतात लवकर

गाऊन उलटा असतो, खाली डोके वर पाय
त्यात बाई घातली अन गाऊन खाली सरकला तर काय?

कपडे वाळत असतांना आपण बाहेरून बघतो
पण वा-याची मात्र मजा असते, तो आतून पाहतो

- पाषाणभेद
०४/०९/२०१९

काहीच्या काही कविताफ्री स्टाइलमुक्त कवितारतीबाच्या कविताहास्यकवितामुक्तकविनोदमौजमजा

प्रतिक्रिया

खिलजि's picture

4 Sep 2019 - 3:11 pm | खिलजि

अहो मीच तो वारा

कुणालाच दिसत नाही तरी आहे मी खरा

मी तर बाबा कपडे घालतो

वाळायलाही आणि अंगावरही

मीच सुकवतो माझे कपडे

मोठे छोटे आणि तोकडे

मीच तो जो अलवार फुंकरतो ,गुदगुल्या करतो

मीच तो जो देतो इशारे

मीच तो जो शहरतो अंग सारे

मीच तो फुलवतो प्रेम सर्वदूर

मीच तो जो नेतो कपडे दूरदूर

मीच तो जो वाहतो कधी सैरभैर

मीच तो जो करतो सर्व कपड्यांची सैर

मीच तो जो पाहतो अंतरंगी

मीच तो जो छेडतो नक्षी सप्तरंगी

मीच तो असतो तरीही नसतो

मीच तो जाणवतो अन खुणावतो विज्ञानास

मीच तो वारा ,,, खट्याळ नाठाळ तरीही हवाहवासा

तुम्हा सर्वास

पाषाणभेद's picture

6 Sep 2019 - 1:55 am | पाषाणभेद

छान.
आपले आणि सर्व प्रतिसाद देणारे अन वाचन करणार्‍यांचे आभार.

जव्हेरगंज's picture

4 Sep 2019 - 4:04 pm | जव्हेरगंज

कहर!!

=))

महासंग्राम's picture

5 Sep 2019 - 11:39 am | महासंग्राम

जे बात

नाखु's picture

5 Sep 2019 - 12:03 pm | नाखु

तश्या वाळवणाच्या कविता प्रकार आहे तर!

कल्पना रोचक आहे.

वाचकांची पत्रेवाला नाखु

दुर्गविहारी's picture

5 Sep 2019 - 5:55 pm | दुर्गविहारी

पावसाचे पुन्हा दमदार पुनरागमन झाल्याने कवितेचे महत्व समजले. ;-)

चामुंडराय's picture

6 Sep 2019 - 8:15 am | चामुंडराय

छान, असा देखील एक विषय असतो तर !
आता ह्याचं इडंबन काय करायचं?
बारमधील बाटल्या?

पाषाणभेद's picture

7 Sep 2019 - 12:12 am | पाषाणभेद

विडंबन झाले तर ठिकच आहे. पण विडंबनात दारू डोक्यात जाते.
अर्थात ती वैयक्तीक आवड असू शकते.
पुर्वी लेखाचेही विडंबन यायचे.
पुर्वीचे मिपा राहीले नाही.

चित्रगुप्त's picture

15 Sep 2019 - 12:18 am | चित्रगुप्त

खूपच अर्थपूर्ण, अनोखी आणि गंमतशीर कविता.
.... पण .....
नाडीच्या परकरांची गोष्ट निराळी असते
भडक रंगाचे तंबूच वाटतात सर्कसचे...
सर्कशीचा तंबू एकखांबी असतो, त्यामुळे यातून आणखी काही गूsssssssढ वगैरे सुचवायचे आहे की कॉय, असा प्रश्न पडला आहे.

कविता पोचली प्रेरणा किंवा विडंबन करण्याची इच्छा आहे पण पाहू केव्हा मुहूर्त लागतो ते

बाकी

सर्कशीचा तंबू एकखांबी असतो

@ चित्रगुप्त :
प्रत्यक्षात दोन पावले असलेले चालते दुमडता येणारे खांब असतात परकरी तंबूला !!

दफोराव,निरिक्षण शब्दात छान उतरवले आहे !

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मेरा दिल तेरे लिये धड़कता है... :- Aashiqui

मस्तच!! आता वाळत घातलेले कपडे पाहिले की ही कविता आठवणार कायम :)