नवरा बायकोचं भांडण
असं काहीच नसतं
तो म्हणतो पूर्व, ती म्हणते पश्चिम
बस एवढंच म्हणणं असतं
बघितलं तर ती ही एक गंमत असते
हाताबाहेर जाईल
एवढं ताणायचं नसतं
दोन चार दिवसांच्या अबोल्यानंतर
आपोआपच नरम व्हायचं असतं
वीजांच्या कड्कडाटानंतर पावसानं
धरणीला भिजवायचं असतं
तिनं हळूच
कुशीत शिरायचं असतं
त्यानं हळूवार
कुरवळायचं असतं
मायेच्या ओलाव्यात
नवीन जग फुलवायचं असतं
प्रतिक्रिया
6 Apr 2019 - 9:42 pm | दुर्गविहारी
छान !
9 Apr 2019 - 8:06 pm | निओ
.
10 Apr 2019 - 6:30 pm | खिलजि
अहो नेहेमी नवरोबानेच नरम रहायचं असतं
ताणायची तर बातच सोडा
ती बोलेल त्याच दिशेला मानायचं असतं
10 Apr 2019 - 7:15 pm | प्रसाद गोडबोले
एवढं करायची गरज नाही, एक " शेवंता" आणि एक "डबल बॅरल" शॉट गन असली की भांडणच होत नाही =))))
10 Apr 2019 - 8:31 pm | शेखरमोघे
जोडीला गालभर मिशा जरूर नाहीत? :०))
11 Apr 2019 - 10:54 am | खिलजि
हि मालिका छान झाली असती ,, अभ्यंकर शेठ उठून दिसतायत या मालिकेत पण खेदाने नमूद करावेसे वाटते कि या मालिकेत काहीच ताळमेळ नाही .. भूत दाखवलं असत तरी बिघडलं नसत , उलट त्याकाळच्या चालीरीती बघायला मज्जाच आली असती पण ते राणेंचं कार्ट बरळले आणि पार सत्यानाश करून टाकला या मालिकेचा ...
11 Apr 2019 - 10:35 pm | अन्या बुद्धे
छान!
Louise Armstrong आणि Emma Fritzgerald यांच्या एका जॅझ गाण्याची आठवण झाली.. लेट्स कॉल द होल थिंग ऑफ..