एक संवाद ..भाग १..( मी आणि ती)

भडकमकर मास्तर's picture
भडकमकर मास्तर in जनातलं, मनातलं
15 Mar 2009 - 4:19 pm

एका नातेवाईकाच्या लग्नसमारंभामध्ये होणार्‍या बायकोला घेऊन आलेल्या मुलाचा लग्नघरात तिच्याशी झालेला संवाद....
_____________

मगाशी भेटल्या त्या सगळ्या आत्या माझ्या..त्या बर्‍या आहेत..
म्हणजे?
भोचक प्रश्न कमी विचारतात..
असं होय? पण मला नाही हं सगळी माणसं लक्षात राहायची...
जमेल तशी थोडीथोडी ठेव लक्षात...
ओके..
तशी आमच्याकडे चक्रम माणसांची कमी नाही...
असू दे.. मला सवय आहे..
हे बघ, ती जी दिसतेय ती ...
कोण?
अगं, ती काय...पैठणी घातलेली...
हॅ..ती काय पैठणी आहे होय?
नसेल मग.. मला वाटलं, लग्नात घातलेल्या कुठल्याही झगमगत्या साडीला पैठणी म्हणतात.
काहीही काय?
बरं चुकलं..
पण कुठाय ती?
ती काय...मोरपंखी साडी...
ती होय? काय छान केस आहेत नाही तिचे?
कुठे? कापून तर ठेवलेत...
कापलेत?
हो..
कोण म्हणतोय्स तू ?
अगं..इकडे बघ..ती... आत्ता मोबाईल पर्समध्ये ठेवतेय..
ओह ती होय? तिची काय मोरपंखी साडी आहे होय?तो अंजिरी रंग आहे...
हा अंजिरी आहे?
मग ?..मोराच्या पंखांचा रंग असा असतो?
मग कसा असतो?
हा अंजिरीच आहे...
बरं बाई... अंजिरी काय मोरपंखी काय, तेच ते..
तेच ते?कमाल आहे हं...तू रंगांधळा नाहीस ना रे?
मग? तुला काय उगीच सिलेक्ट केली काय मी?
तू हलकट आहेस..
थँक यू..
अरे तिला कुठे तरी पाहिलंय.
कुठे? ती मुंबईत असते आता..तू कुठे पाहणार?
...हां..आठवलं... ही सीरियलमध्ये काम करते का रे?
ह्यॅsss.. काहीतरीच काय?
'अवघाचि...' मध्ये हिनं काम केलं होतं..
हे काय असतं?
सीरियल आहे...
त्या बांदेकर बाईंची का?
नाही नाही.. ती वहिनीसाहेब...
हं.. सगळ्या सारख्याच...
नाही हं.. 'अवघाचि ..'छान असते..
बरं बाई छान असते..
का ? एकदम माघार घेतलीस ते?
मग? होणार्‍या बायकोसमोर किती वाद घालायचा त्याला मर्यादा असतात..
आणि नंतर?
नंतरचं नंतर बघू..
पण आपण कुठे टिपिकल नवरा बायको होणार आहोत? आपलं प्रेम असणार ना एकमेकांवर?
हं...अगं इतपत आशावाद ठेवलाच पाहिजे..
पण तरी अवघाचि छानच असते..
असते ना... हो ना... मान्यच करतोय ना...
असं नाही.. खरं खरं मान्य करशील तू एक दिवस...
बरं बघू... मी मराठी सीरियल कशाला बघतोय?
मग काय बघतोस रे तू?
मी? .. बातम्या बघतो.. क्रिकेट बघतो... आणि रोडीज आणि स्प्लिट्सव्हिला
शी..!
शी काय? छान छान मुली असतात..दिल्ली आणि चंदीगडच्या... मज्जा येते..
मी कशाला मुली बघू?
तू मुलगे बघ ना त्यातले..
काही गरज नाहीये.. अरे ती बघ,निघाली वाटतं.. ... मी तिला भेटून येते ...
कशाला ? असूदेत..
का?
जाउदे ना..
पण का?
ती मोठी स्टोरी आहे...
मग सांग...
थोडक्यात सांगतो...ही तशी माझी चुलतबहीण लागते.. वडलांच्या मावसभावाची मुलगी...
म्हणजे सोमनाथकाकांची?
नाही... मोहनकाकांची...
मोहनकाका म्हणजे सुरतचे ना?
सुरतचे ब्रिजेशकाका..हे इथलेच..पुण्यातले.. त्यांची माझी चांगली दोस्ती आहे... यायचे घरी नेहमी... भेळ खायला न्यायचे.
हिचं सांग रे लवकर...
सांगतोय ..घाई नको.. माझी लिन्क तुटते...
बरं सॉरी..
तर ही लहानपणापासून स्वत:ला अति शहाणी समजायची..
खिखिखि...हा तुमचा कौटुंबिक प्रॊब्लेम आहे..
तेही खरंच... पण ही अफ़ाट होती... काकूने फ़ार लाडावलेली.. ही फ़ार हुशार आहे, फ़ार हुशार आहे असं उगीचच कौतुक..
मस्त..
बारावीला बोर्डात येणार , बोर्डात येणार अशी हवा नुसती... पंचावन्न टक्के मिळाले हिला...
वा !!.. पास तरी झाली...
बाकीच्यांना आश्चर्यच वाटलं..मला आधीच अंदाज होता..कारण तोपर्यंत तिला नाटकाचा किडा चावला होता.
म्हणजे?
कॊलेजात नाटकवाल्यांच्या गॆंगमध्ये सामील झाली... ते लोक हुशार होते,
का?
त्यांच्या मते तिला फ़क्त नेपथ्य जमायचं..
पण नेपथ्य सुद्धा चॆलेंजिंग गोष्ट आहे..
तेच..तेच सांगून त्यांनी तिला बरोबर चढवून ठेवलं...हिला कधीच मेन रोल नाही..भरपूर कामं करून घेतली नुसती....
च च..
तर काय? नाट्यकलेची सेवा म्हणे..
खिखिखि
म्हणून हिला वाटलं, आपण आर्किटेक्ट व्हावं..पण अभ्यास केलेलाच नाही..
ऍडमिशन कशाला मिळतेय मग?
बरोबर...मग हिचं करीअर हेलकावे खात राहिलं.. हिला व्हायचं होतं नितीन देसाई तर आता सीरियलमध्ये फ़ुटकळ रोल करते...
आई गं..
त्यात मी एन्ट्रन्सला बरे मार्क पाडून आर्किटेक्ट झालो... मग हिची माझ्यावर खुन्नस ..
ई sss.तुझ्यावर का?
कारण आम्ही छोट्या गावाचे..लहानपणापासून हुशार म्हणून प्रसिद्ध नाही...तरी आता आर्किटेक्ट आहे..आणि तिला नाही जमलं.
हं.
मग काकू आणि ही सारखे मी दिसलो की काहीतरी कॊमेंट मारतात...
काहीही काय?
हो..आधी लक्ष दिलं नाही...पण मग काकाच एकदा वेगळा भेटायला येऊन सॉरी म्हणून गेला...
पण असं का? जेलसी?
असेल... आणि ती भयानक इन्सिक्योर आहे.... काही झालं की तिला वाटतं लोक तिलाच बोलताय्त...
बाप रे..
त्यावरून तिची सारखी भांडणं होतात... कुठेही..कोणाशीही...
म्हणजे?
अगदी बसमध्ये..थिएटरमध्ये... रस्त्यावर..
चल..
खरंच...त्यात तिनं नुकतंच घरातून भांडून हट्टानं लग्न केलेलं.
काय सांगतोस?
तो मुलगा तसा खूप चांगला आहे..सद्गुणी...पण काकूला अमेरिकन जावईच हवा होता..
खिखिखि
हसतेस काय ? खरंच...
खिखिखि खिखिखि.. तसा चांगला म्हणजे?
कारण हिनं बेचाळीस वयाचा अभिनेता पकडला...बिजवर
मग तुमच्याकडे भूकंपच आला असेल...
काका म्हणाला, तुझ्या निर्णयाची जबाबदारी घे आणि लावून दिलं त्यानं लग्न....
ही कधीची गोष्ट?
आत्ता..दोन महिने झालेत.. त्यामुळं एकूण तिचं काय चाललं आहे, कोणालाच ठाऊक नाही..
असं आहे होय सगळं...
आता तिला भेटण्यापूर्वी हे तुला माहित नको का?
हो रे..पण तिचीही काही बाजू असेलच की..
असेल ना... तुला कळली तर मलाही सांग समजावून..
सांगेनच...
पण जपून बोल हं तिच्याशी... ती कधीही भांडू शकते. तिरसट आहे ती...
तू चल की इंट्रो करायला...एकटीच कशी जाऊ?
जा की..
बरं नाही दिसत रे..
तू कधीपासून अशी चिंता करायला लागलीस?
ई ssss मला काहीच प्रॊब्लेम नाहीये रे.. मला आपली तुझ्या रेप्यूटेशनची काळजी..
बरं मग असं कर ..त्या नेहाला घेऊन जा...
कोण नेहा?
आता नाही का भेटून गेली? भयंकर बोलून डोकं खाते ती..
ओह ती..
हां तीच.. तिला नेलंस की तीच बसेल बडबडत..मग तुला चिंता नाही..
ओके... पण तू स्वत:च्याच बहिणीला इतका घाबरत असशील असं नव्हतं वाटलं..
खिखिखि ..मला नको उचकवूस... मी नाही भेटणार तिला..तूच भेट जा..

क्रमशः
__________________________
आता पुढचा संवाद ती भांडखोर बहीण आणि होणारी बायको..

कथानाट्यविनोदमौजमजाविचारविरंगुळा

प्रतिक्रिया

श्रावण मोडक's picture

15 Mar 2009 - 4:28 pm | श्रावण मोडक

चालू द्या. आम्ही वाचतोय. हसतोय. लोक आमच्याकडे विचित्र नजरेनं बघताहेत...

बिपिन कार्यकर्ते's picture

15 Mar 2009 - 4:47 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच म्हणतो. आता ज्या लोकांचे धागे हापिसातून उघडायचे नाहीत त्यात तुमचे नाव टाकले आहे. __||__

=))

बिपिन कार्यकर्ते

विजुभाऊ's picture

15 Mar 2009 - 6:25 pm | विजुभाऊ

हा आणखी एक षटकार........................................

आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं
जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं.
ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं
तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........विजुभाऊ सातारवी

विनायक प्रभू's picture

15 Mar 2009 - 4:32 pm | विनायक प्रभू

अवघाची मास्तर

सुनील's picture

15 Mar 2009 - 4:33 pm | सुनील

छान. येउदे पुढचे!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

आंबोळी's picture

15 Mar 2009 - 4:43 pm | आंबोळी

मास्तर लै बेष्ट.....
पुढचे भाग पटापटा येऊद्यात.

ते क्रमशः नंतर पुढचा लेख २ दिवसात टाकायचा मागे नियम झाला होता मिपावर... तेव्हढे लक्षात ठेवा...

अवांतरः ह्या लेखातले बाण विशिष्ठ दिशेने जातायत का मलाच आपल उगाच भास होतायत?

आंबोळी

भडकमकर मास्तर's picture

16 Mar 2009 - 2:36 pm | भडकमकर मास्तर

अवांतरः ह्या लेखातले बाण विशिष्ठ दिशेने जातायत का मलाच आपल उगाच भास होतायत?
भास ..केवळ भासच हे... :W
साधी सरळ गोष्ट आहे प्रोफेसरसाहेब...

______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

सौमित्र's picture

15 Mar 2009 - 4:56 pm | सौमित्र

अन्जिरी आणी मोरपन्खी :)
आम्हा पुरुषान्ना फक्त बेसिक बारा रन्ग माहीत अस्तात. बाकीचे रन्ग अनि रन्गछटा नाही कळत बुवा...
एकदा आमच्याकडे आई आणी बाबान्चे एकदा यावर च डीस्कशन झाले होते.
त्यामध्ये 'रामाग्रीन', 'पीच', 'ओला आम्सूली', 'वाळका आम्सूली' अशा अनेक रन्गछटा होत्या...
:)

भडकमकर मास्तर's picture

15 Mar 2009 - 10:05 pm | भडकमकर मास्तर

'रामाग्रीन', 'पीच', 'ओला आम्सूली', 'वाळका आम्सूली'

हे भारी आहे.. :O
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/

गणपा's picture

15 Mar 2009 - 4:59 pm | गणपा

मास्तर मस्त चालालय संवाद. येउदे लवकर पुढचे भाग.. 8>

नंदन's picture

15 Mar 2009 - 5:24 pm | नंदन

पहिला भाग मस्त जमलाय. हा फॉर्मही छान आहे. पुढल्या भागांची वाट पाहतो.

त्या बांदेकर बाईंची का?
नाही नाही.. ती वहिनीसाहेब...
हं.. सगळ्या सारख्याच..

- =))

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

घाटावरचे भट's picture

15 Mar 2009 - 7:03 pm | घाटावरचे भट

सहमत! तीन टाईम फोड दिया मास्तर आपने....

छोटा डॉन's picture

16 Mar 2009 - 8:29 am | छोटा डॉन

भटाशी सहमत.
लेखनाचा फॉर्म मस्त आहे, मज्जा येते आहे.

अजुन असेच येऊद्यात, पुलेशु.

------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

15 Mar 2009 - 5:33 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मास्तर, सह्ही सुरू आहे. मज्जा आली वाचायला. पुढचा भाग लवकर टाका.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

आपलाभाउ's picture

15 Mar 2009 - 6:20 pm | आपलाभाउ

नाहि आव्ड्;ल

मिलि॑द's picture

15 Mar 2009 - 8:04 pm | मिलि॑द

स॑वाद आवडले.

--मिलि॑द

प्रकाश घाटपांडे's picture

15 Mar 2009 - 8:12 pm | प्रकाश घाटपांडे

सगळी गंमतच हाय ब्वॉ. संवाद यकदम जंक्शन. येउं द्या सुदर्शन रंगंचावरती
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

श्रावण मोडक's picture

15 Mar 2009 - 10:21 pm | श्रावण मोडक

हे अट्टल पुणेरी पहा. शुभेच्छा दिल्या त्याही सुदर्शन रंगमंचावर येण्याच्या. बालगंधर्व, भरत, गेलाबाजार टिस्मा तरी? पण नाही. सुदर्शनमध्येच (फुकटात) दर्शन होतं ना... फारतर प्रयोग लावणारेच बाहेर बाकडं टाकून बसतात प्रवेशिका या गोंडस नावाखाली दहा-वीस रुपये गोळा करीत (त्यातून प्रयोगोत्तर खर्च तरी निघतो की नाही कोणास ठाऊक?) पुन्हा ते उघड्यावर. त्यामुळे खिडकीसारखी चेहरा नीट न दिसण्याची सोय नाही. तिथं लगेचच चेहराओळख पटते... पुढं कार्यभाग... काय प्रकाशराव? :)
(ह घ्या हे वे सां ला न)

अवलिया's picture

15 Mar 2009 - 8:54 pm | अवलिया

मास्तर लै भारी

अजुन येवु द्या :)

--अवलिया

लवंगी's picture

15 Mar 2009 - 10:22 pm | लवंगी

मजा आली वाचायला

मिसळपाव's picture

16 Mar 2009 - 2:35 am | मिसळपाव

मास्तर, मस्त जमल्येय भट्टि, पुढच्या भागाची फार वाट नका बघायला लावू.

शितल's picture

16 Mar 2009 - 5:21 am | शितल

मास्तर ,
संवाद भारी लिहिले आहेत.. एकदम... हसुन फुटायला होते ..
पुढच्या भागाची वाट पहात आहोत. :)

अडाणि's picture

16 Mar 2009 - 6:07 am | अडाणि

भट्टी (संवादांची हे वेगळं सांगायला नकॉ) जमलीय.... येवूद्या अजून.....बिगीबिगी...
-
अफाट जगातील एक अडाणि.

मुक्ता २०'s picture

16 Mar 2009 - 7:07 am | मुक्ता २०

लय भारी..!! :D

पुढचा भाग लवकर येउ द्या मास्तर... :D

--मुक्ता

विसोबा खेचर's picture

16 Mar 2009 - 8:55 am | विसोबा खेचर

भडकमकर मास्तर एकदम फार्मात! :)

येऊ द्या अजूनही...

आपला,
(भडकमकर मास्तरांचा फ्यॅन) तात्या.