व्हेलेंटाईन्स डे...२

प्राजु's picture
प्राजु in जे न देखे रवी...
10 Feb 2008 - 1:23 am

पहिल्या भागात पान उलटावे लागत असल्यामुळे इथे सुरू करत आहे. आपण सगळ्यांनी पुन्हा भरभरून लिहावे हीच विनंती..

तुझ्या डोळ्यांतल्या नभी
माझे स्वच्छंदी विहरणे
निळ्या मेघात दाटूनी
सरीतूनी बरसणे..

- प्राजु

चारोळ्याप्रेमकाव्यकविताप्रकटनप्रतिसादप्रतिक्रिया

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

10 Feb 2008 - 1:42 am | इनोबा म्हणे

मलाही सय झाली आहे
तूझ्याशिवाय जगायची
कारण तूही करुन घेतली आहेस
कोरडेपणाने वागायची

-इनोबा
सय=सवय

प्राजु's picture

10 Feb 2008 - 1:47 am | प्राजु

छान आहे चारोळी ...
पण ..
मला वाटतं , सय याचा अर्थ आठवण.
(उदास कविता लिहू नयेत, असे मी पहिल्या भागांत लिहिले होते इथे वेगळे लिहावे लागेल बहुतेक.)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2008 - 10:35 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु
आम्हाला आपल्या चारोळ्या आवडतात.
अरे, पण आम्हाला उदास,हताश, निराश, रडणे,पडणे, अशा वेदनेच्याच चारोळ्या सुचतात ना ( सुचल्या तर )
तुम्ही आमच्यासारख्या एका प्रतिभावंत कवीला प्रतिबंध केलाय बॊ इथे :) ( ह. घे. )

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्राजु's picture

10 Feb 2008 - 8:24 pm | प्राजु

अहो, व्हॅलेंटाईन्स डे च्या निमित्त संत व्हॅलेंटाईनच्या चरणी या सगळ्या चारोळ्या अर्पण. मग त्यात उदासवाण्या चारोळ्या कशाला? आपल्याला ही छान लिहिता येतात.. अपण नक्की लिहाल दिलिपजी, याची खात्री आहे मला.

- प्राजु

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

10 Feb 2008 - 8:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

आम्हाला कितीही हरब-याच्या झाडावर बसवले तरी आम्हाला आनंदाच्या चारोळ्या सुचणार नाही.संत व्हॅलेंटाईन बाबाची जत्रा संपली की आम्ही लिहू आमच्या आरोळ्या :) तो पर्यंत आम्ही आपल्या सर्वांच्या सुरेख चारोळ्या वाचत राहू  !!!!

परप्रांतिय
दिलीपजी :(

प्राजु's picture

10 Feb 2008 - 2:01 am | प्राजु

तुझ्या ओठीचे गीत होऊन
मला झंकारून जाऊदे
तुझ्या नयनी आशेची
ज्योत लावून जाऊ दे

- प्राजु

इनोबा म्हणे's picture

10 Feb 2008 - 2:17 am | इनोबा म्हणे

गीत माझ्या मनीचे
तूझ्या ओठी येऊ दे
आनंदाशृ माझे
नयनी तुझ्या वाहू दे

प्राजु's picture

10 Feb 2008 - 3:21 am | प्राजु

हिमफुलांचा दुलईवरती
कोवळी किरणे पसरली
स्पर्शाने त्या मोहरून
फुले लाजेत विरघळली

- प्राजु

सुधीर कांदळकर's picture

10 Feb 2008 - 6:20 pm | सुधीर कांदळकर

सुरेख. आणखी येऊ द्यात.

प्राजु's picture

10 Feb 2008 - 8:21 pm | प्राजु

धन्यवाद.. सुधिरजी.

प्राजु's picture

10 Feb 2008 - 8:32 pm | प्राजु

फुलांनी फुलावे तरूवरी
खगांनी भुलावे नभावरी
पतंग जळतो ज्योतीवरी
काय लिहावे या प्रितीवरी???

- प्राजु

पिवळा डांबिस's picture

10 Feb 2008 - 11:20 pm | पिवळा डांबिस

तात्या दिवाना
अनुष्कावर मरतो
अनुष्कासाठीच
अहोरात्र झुरतो..

आपला,
(अनुष्का प्रेमी) तात्या.

प्राजु, तुझ्या आवाहनाने
खरंच कमाल केली
एका वधस्तंभाला
काव्याची पालवी फुटली..

-खोडकर डांबिसकाका

रविराज's picture

11 Feb 2008 - 5:05 am | रविराज

खरे तर मला अजुन मराठी टाइप करण्यात मी पुरेसा पारंगत नाहीये. त्यामुळे चारोळी आवडली तरी मी कमेंट द्यायचा आळस करतो. पण खोडकर डांबिसकाकांची चारोळी वाचुन अ़क्षरशः हसता हसता पुरेवाट झाली. :-)

प्राजु's picture

11 Feb 2008 - 8:04 pm | प्राजु

अलका, अचला, विश्वमोहिनी
रूप गर्विता गजगामिनी
मुग्धा, कामिनी, अभिसारिणी
प्रेमसवरूप तू, जगत् जननी......

- प्राजु

किशोरी's picture

11 Feb 2008 - 4:13 pm | किशोरी

तुझ्या एका नजरेने
अशी काय जादु घडली
तुझ्या प्रेमाची धुंदी
माझ्या मनावर चढली

वरदा's picture

11 Feb 2008 - 5:31 pm | वरदा

प्राजु, किशोरी सहीच...

प्राजु's picture

11 Feb 2008 - 8:27 pm | प्राजु

वा.. किशोरी, खूपच छान. लिही अजूनी.

- प्राजु

llपुण्याचे पेशवेll's picture

11 Feb 2008 - 10:09 pm | llपुण्याचे पेशवेll

लिहील्यावर चारोळिला
मजला हे कळले होते
बाटलीत फक्त आता
घोट दोनच उरले होते

-असुरावादी
पुण्याचे पेशवे

ऋषिकेश's picture

12 Feb 2008 - 3:08 am | ऋषिकेश

घोट दोनच उरले होते
तेही होते दु:खाश्रु
तुच नवा हा चषक भरला
हिंदकळती आनंदाश्रु

(ही थोडी पाडलेली चारोळी वाटतेय नाहि;) )
-ऋषिकेश

llपुण्याचे पेशवेll's picture

12 Feb 2008 - 3:54 am | llपुण्याचे पेशवेll

तू सहजच येऊन येथे
भरलास चषक मदिरेचा
त्या मदिरेतून भिनतच जाई
हा कैफ जवानीचा.
(पाडलेल्या चारोळीनंतर केलेली 'बळचं' चारोळी)
पुण्याचे पेशवे

रविराज's picture

12 Feb 2008 - 5:26 am | रविराज

भरलेला विलोभनीय तो
पुन्हा एकदा रिकामा झाला
वेडे मन माझे विचारी
घेउ का मी अजुन एकच प्याला.

-रविराज

(माझा ही एक प्रयत्न)

रविराज's picture

12 Feb 2008 - 7:14 am | रविराज

अतीव सुंदर पाहुन तो प्याला
एकच हल्लकल्लोळ झाला
संडे आहे, उद्याचे टेंशन कशाला
मनसोक्त घे तू, नको आवरु स्वतःला

-रविराज

प्राजु's picture

12 Feb 2008 - 8:42 am | प्राजु

नकोस पाहू अशी
राणी, नशा चढेल गं..
काळोख्या अमावसेत
चांदणं पडेल गं..

- प्राजु

जुना अभिजित's picture

12 Feb 2008 - 9:44 am | जुना अभिजित

हे म्हणजे एकदम झकासच.

ष्री, बेडेकरपेक्षा लोहगड, पुरंदरपायथ्याची मिसळ चापणारा अभिजित

किशोरी's picture

12 Feb 2008 - 10:26 am | किशोरी

आमावस्येच्या चांदण्यांना
लागली चंद्राची चाहुल
जेव्हा माझ्या आयुष्यात
तु टाकलेस प्रेममय पाऊल

(जमल की!!लग्न नाही हो,चारोळी लिहीणे जमले,मला आता थोड थोड जमायला लागल आहे :))
धन्यवाद वरदा,प्राजु !!)

प्राजु's picture

12 Feb 2008 - 7:45 pm | प्राजु

चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते.
"अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय..

- प्राजु

अव्यक्त's picture

13 Feb 2008 - 12:45 am | अव्यक्त

तु मम अधराची बासुरी...
घेशि लकेरि नानापरी अन गाशी सुस्वरी,
तव झन्कारीशी तारा मम अन्तरि...
सान्ग ना केव्ह होशि तु मम ह्रुदयाची अन्तुरी...

प्राजु's picture

13 Feb 2008 - 12:53 am | प्राजु

अव्यक्त,
आपण आपली चारोळी संपादन केलित त्याबद्दल मी आभारी आहे.
आपण चांगले लिहिता, ही चारोळी सुंदर आहे. अशिच तुमची प्रतिभा फुलत राहुदे.
वरचेवर इथे येत रहा आणि हा गोफ विणायला मदत करत रहा.

- प्राजु

अव्यक्त's picture

13 Feb 2008 - 1:22 am | अव्यक्त

ती स्फोटक, ती दाहक...
ती भेदक, ती मारक
नव्हे ती मोहक, ती प्रेरक
ती उद्बोधक, ती स्मारक...

...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त

प्राजु's picture

13 Feb 2008 - 1:33 am | प्राजु

चारोळि तर सुंदरच आहे पण त्यापेक्षाही..

...व्यक्त होवु पाहणारा अव्यक्त

हे जास्ती छान वाटले.

- प्राजु

नंदन's picture

13 Feb 2008 - 4:03 am | नंदन

सुधीर मोघे यांच्या 'लय' पुस्तकातील ही चारोळी. येथे स्वरचित चारोळ्या द्यायच्या असल्या, तरीही या धाग्याच्या संदर्भात चपखल वाटली म्हणून देण्याचा मोह आवरला नाही.

ना सांगताच तू मला उमगते सारे
कळतात तुलाही मौनातील इशारे
दोघात कशाला मग शब्दांचा बांध?
कळण्याचा चाले कळण्याशी संवाद

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

वरदा's picture

13 Feb 2008 - 4:50 am | वरदा

छानच आहे...थँक्यू नंदन...

वरदा's picture

13 Feb 2008 - 4:55 am | वरदा

डोळ्यांनी तुझ्या
प्रेमतुषार उधळले
पापण्यांनी माझ्याही
ते अलगद झेलले.....

किशोरी's picture

13 Feb 2008 - 5:23 pm | किशोरी

>>चारोळी छान पण अगं अमावस्येच्या चांदण्याना.. असं नको कारण अमावस्येला चांदणे नसते.
"अमावस्येलाही चांदण्यांना" असं करून बघ कसं वाटतंय..
हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद

आठव पहिली भेट आपुली
नयन गुजगोष्टी करी
मनातील भाव बोलुन गेल्या
बरसणार्‍या श्रावण सरी

प्राजु's picture

13 Feb 2008 - 9:19 pm | प्राजु

हो प्राजुजी हे छान आहे,सुधारणे बद्द्ल धन्यवाद

जी मत कहिये जी... वैसे तो आजकल बिस्कीट को भी पारले-जी कहते है... पर आप मुझे प्राजक्ता या प्राजु ही कहिये किशोरीजी । (

- प्राजु (जी)
- प्राजी... :)))

स्वाती राजेश's picture

13 Feb 2008 - 7:41 pm | स्वाती राजेश

प्रथम प्राजुला धन्यवाद.
वरदा, किशोरी यानाही प्राजुला साथ दिल्याबद्दल.
नंदन, अव्यक्त,अभिजीत, रविराज, धनंजय, विनायक आणि ऋषिकेश
यांना धन्यवाद. तुमच्या मुळे इतक्या सुंदर चारोळ्या वाचायला मिळाल्या.:)

वर्षाव प्रेमाचा आज व्हावा
असा दिवस हा अति खास व्हावा
बघुनि आपले प्रेम ते ...
स्वर्गातुनि व्हेलेंटाईन संत तो अवतरावा ....

- सागर

प्रेमधारांत चिंब भिजवुनि मजला
का नयन तुझे हे लाजले....
ओढ याच दिसाची तुजला
का अधर तुझे हे थरथरले ...

- सागर

वरदा's picture

13 Feb 2008 - 8:38 pm | वरदा

सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता...सहीच...किशोरी खूपच छान...

सागर's picture

14 Feb 2008 - 7:17 pm | सागर

सगळेच एकदम प्रोफेशनल झालेत आता

वरदा,

तुमच्या मनात सगळ्या ओळी (खरेतर चारोळ्या) उतरल्या म्हणजे सगळे प्रोफेशनल समजायला हरकत नाही ...
दर्दीपणा असेल तरच त्या कविता...तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते....
तेव्हा प्रोफेशनल कॅटेगरीत आल्यामुळे आनंद झाला...

(चित्रपटासाठी गाणी लिहिण्यासाठीच्या ऑफरची वाट पाहणारा ) सागर

प्राजु's picture

13 Feb 2008 - 9:20 pm | प्राजु

सागर,
किती छान लिहिल्या आहेत चारोळ्या तुम्ही. खरचं खूप आवडल्या..

- प्राजु

सागर's picture

14 Feb 2008 - 6:54 pm | सागर

धन्यवाद प्राजु,

खरंतर चारोळ्या हा माझा प्रांत नव्हता. पण म्हटलं पहावं करुन :)
आता चारोळ्याही करायला हरकत नाही.... (म्हणजे मी अजून त्रास देणार सगळ्यांना.... हा हा हा....)

(स्वयंघोषित कवी) सागर

वरदा's picture

14 Feb 2008 - 7:06 pm | वरदा

तसेच स्कील असेल तरच प्रोफेशनल म्हणून काम करता येते

अगदी पटलं आणि तुमच्या चारोळ्यात ते स्किल अगदी खरंच छान दिसतंय..
मी उगाच टाईमपास म्हणून लिहायला लागले..तुम्ही आणि किशोरीचं तसं नाही असं म्हणायचं होतं मला...तुम्ही अगदी प्राजु सारखाच छान चारोळ्या करायला लागलात असं म्हणत होते.....

स्तुतिबद्दल धन्यवाद वरदा,

पण मला अजूनही असे वाटते की मी अजून तितका मुरलेला कवी नाहीये...
ती पातळी गाठण्यासाठी अजून बरीच मोठी वाटचाल करायची आहे.
सध्या मी केवळ बाल्यावस्थेतील कवी आहे. बाळसे धरायला थोडा वेळ लागेल...
आणि प्राजुंशी माझी तुलना होणे तर अशक्य आहे. त्यांच्या कविता वा लेखन बरेच प्रगल्भ असते....
मी येथे फक्त मिसळपावाच्या सागरात तरंगण्याचा प्रयत्न करतोय.... पट्टीचा पोहायला वेळ तर लागेलच

आणि तुम्हीही खरेच छान लिहितात. सतत लिहित गेलात तर नक्की नावाजलेल्या कवयित्री वा लेखिका व्हाल...
शेवटी वाचकांना मनापासून जे लिहिलेले असते ते भावते हेच खरे...
तुमच्या प्रोत्साहनाबद्दल मनापासून खूप खूप आभार.... तुमच्यासारख्या रसिकांमुळे तर कवी जन्मतात.... :)
धन्यवाद
सागर

वरदा's picture

14 Feb 2008 - 7:35 pm | वरदा

अहो तुम्ही पहीलीत तरी पोचलात मी अजुन शिशुवर्गात आहे कवितेच्या...
पण मी रसिक म्हणून छान आहे हे बाकी ऐकून बरं वाट्लं थँक्यू.....
ठीक तर आता अशाच छान चारोळ्या करत राहा...मी ही प्रयत्न करतेच.....

मी ही प्रयत्न करतेच.....

वरदा,
मग येऊ द्यात की अजून चारोळ्या (या वाक्यावरुनही चारोळी करायचा मोह आवरत नाही....)

ऐकून तुमच्या आरोळ्या
वाटाव्या वाघाच्या डरकाळ्या
येऊ द्यात की अजून चारोळ्या
त्या व्हॅलेंटाईनच्या उडो चिरफाळ्या.....

- सागर

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 9:13 pm | सुधीर कांदळकर

मिठाईवरिल चारोळ्या खाल्या आहेत. तुमची एकदम मिसळीतल्या तर्रीत मुरलेली वाटली.

सुधीरकाका,

अरे हो की..... मी हा विचारच नव्हता केला...
अस्सल मिसळपावी झणझणीत चारोळी नाही हाणणार तर कोण? :)

मनापासून अनेक धन्यवाद
सागर

विकास्_मी मराठी's picture

14 Feb 2008 - 7:45 pm | विकास्_मी मराठी

िव्कास०१५४
वाट तुझी,पावले माझी
सोबती माझा होशील का ??
चित्र तुझे,रंग माझे
रंगात माझ्या रंगशील का ????

पुष्कर's picture

14 Feb 2008 - 8:36 pm | पुष्कर

चित्रात तव त्या रंग माझे एकदा रंगून जा,
कुंचला घेऊन हाती चित्र ते माखून जा

वरदा's picture

14 Feb 2008 - 8:56 pm | वरदा

ठ्कास आणि पुश्कर बहोत खुब!

सृष्टीलावण्या's picture

19 Feb 2008 - 6:33 am | सृष्टीलावण्या

ते प्रतिभा की काय म्हणतात ते कुठून आणायचे... असो.

चारोळी नाही तरी मी केलेला उखाणा देत आहे.

एक अधिक एक मिळवेन,
संसाराचे गणित नीट जुळवेन,
मनात मात्र भिती एकच
कोणीतरी ह्यांना पळवेल.

चरोळी लहान आणी चवही नाही खास पण भावाचे(पैसे नाही) रन्ग उधळून आलेल्या या ओळी लाम्बलचक सन्स्कारभारती रान्गोळ्याची याद देऊन दाद घेऊन जातात. सन्त व्हलेन्ताईन बाबा पर्य न्त जातीलच
सर्व ओळीन्मधे पाय गुन्तलेली