सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी. त्यातील कुराण तुलनेचे एखादे वाक्य नीट समजले नाही तर 'त्यांच्या' भावना बिवना दुखावल्या बिघवल्याची उगाच कटकट नको म्हणून पूर्ण युट्यूब इकडे देत नाही केवळ दुवाच देतो पण हि ११ मार्च २०१८ ची मुलाखत प्रथम पहावी. (जिथे जिथे त्यांनी 'वेस्ट'(पश्चिम) किंवा कॅनडा शब्द वापरले आहेत त्या ठिकाणी भारत शब्द योजून कल्पना करावी.)
अजून एक मुलाखत 26 Jan 2016 म्हणजे आधीची आहे ती इथे देतोय तरीपण ११ मार्च २०१८ ची मुलाखत प्रथम पहावी आणि नंतरच हि मुलाखत पहावी. दोन्ही मुलाखती पहाताना एखाद्या हिंदी सिनेमाचा वेळ खर्च होईल पण तुर्तास इट इज वर्थ एवढेच सांगू शकतो.
त्यांच्या उर्वरीत लेखनाची यादी इंग्रजी विकिपीडिया लेखात उपलब्ध दिसते. आणि त्यांचे काही लेखन गुगल व गूगल बुक्सवर उपलब्ध असावे. इतर काही लेखनाचा प्रबोधन विषयक लेखात दखल घेणार आहे पण त्यांच्या या दोन युट्यूब मुलाखती स्वतंत्रपणे विचारात घेण्याची आवश्यकता वाटली. मुलाखतीत ते काय आणि का म्हणताहेत ते समजण्यासाठी त्यांची मुलाखतीचे भाग एक पेक्षा अधिक वेळा ऐकावी लागू शकतील किंवा त्यांचे गुगलवर उपलब्ध लेखन चाळावे लागू शकते.
मी आधी म्हटले तसे इथे त्यांच्या दिलेल्या युट्ञूब दुव्यांवरुन किंवा त्यातील त्यांच्या मतांवरुन माझी मते ठरत अथवा जुळत नाहीत हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे. धागा चर्चा सहभाग दोन्ही युट्यूब मुलाखती पाहिल्यानंतरच अपेक्षीत आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणे आणि चंद्र बघायचे सोडून चंद्र दाखवणार्याचे बोट बघणे टाळण्यासाठी अनेक आभार.
* चर्चा सहभागासाठी अनेक आभार , उत्तरदायीत्वास नकार लागू.
प्रतिक्रिया
24 Jul 2018 - 10:42 pm | सोमनाथ खांदवे
तो सलीम मन्सूर त्या व्हिडिओ मध्ये काय म्हणतोय ते तुम्ही थोडक्यात सांगितले असते तर बरे झाले असते , होतंय काय आता नको व्हिडिओ नंतर बघू असा प्रत्येकजण विचार करतो , मग त्यामुळं प्रतिसाद पण नंतर येणार .
त्या पेक्षा सारांश थोडक्यात सांगितला तरी चालतो .
25 Jul 2018 - 7:25 am | माहितगार
खाली मार्कस आणि ट्रम्पचे प्रतिसाद पहा, लेखात काहीच लिहिले नाही केवळ युट्यूबवर सोडले तरी पुर्वग्रह स्वस्थ बसू देत नाहीत.
25 Jul 2018 - 1:19 am | प्रसाद गोडबोले
तुम्ही असले निरर्थक , शुन्य उपयोगिता असलेले धागे का काढता ? एकदाच तुम्ही हज यात्रा करुन या च , खाडकन डोळे उघडतील , शांततेच्या धर्माच्या सत्यस्वरुपाचे ज्ञान होईल. आणि मग तुम्ही ह्या विषयावर मौन धराल आमच्यासारखेच !
बाकी तुमच्या लेखनस्वातंत्र्य घाला घालण्याचा उद्देश नाही , पण ते तुम्ही तळटीप टाकलीत म्हणुन आम्हीही प्रतिसाद टाकत आहोत !
आपडी तापडी गुळाची पापडी
धम्मक लाडु तेल काढु
तेलंगीचे एकच पान धर गं बिब्बे माझाच कान
च्याव म्याव चाव म्याव
25 Jul 2018 - 7:57 am | माहितगार
मान्यवर आपण अनुभवी आणि काही चांगल्या ग्रंथांचे अभ्यासक आहात. आम्हास अहंकार या विषयावर मार्गदर्शन करावे हि नम्र विनंती, या निमीत्ताने आम्ही आमचा अहंकार तपसून पाहू असा विचार करतोय.
25 Jul 2018 - 9:41 am | प्रसाद गोडबोले
अहंकार
ओं असा जो उच्चार करतात त्याला ओंकार म्हणतात
स्वाहा असा जो उच्चार करतात त्याला स्वाहाकार म्हणतात
तसेच आपल्याला आपली प्रेयसी जर लाजून इश्श, नको, अत्ता नको असे म्हणत ' अहं अहं अहं ' असे करते त्याला अहंकार म्हणतात.
बाकी आता आकार उकार ऊकार(मोठ्ठा ऊ) वगैरे विषयांवर सविस्तर लेखन कधीतरी सवडीने ;)
25 Jul 2018 - 9:46 am | माहितगार
__/\__
25 Jul 2018 - 6:26 am | ट्रम्प
का तुम्ही त्यांच्या ज्ञानावर जळताय ?
आज मला समजतंय मराठी भाषेत मुलं नापास का होतात ?
मराठी किती जड भाषा होऊ शकते हे त्यांच्या कुठल्याही लेखामुळे कळते , सोप्प नाही असं लिहन त्या साठी मोठा व्यसंग लागतो .
माझ्यासारखे कित्तेक मिपावीर दररोज रात्री 10 नंतर त्यांचे लेख वाचायला घेतात . रात्री तुम्हाला कुठल्याही झोपेच्या गोळी ची गरज पडणार नाही , दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री ची पाच मिनिटे यांचे लेख वाचा थेट सकाळी च जाग येईल बघा तुम्ही पण हा प्रयोग करुन .
25 Jul 2018 - 7:57 am | प्रसाद गोडबोले
>>> मला आपल्या सारखा सखोल व्यासंग करायचा आहे - इति दवणे !!
=))))
25 Jul 2018 - 9:28 am | प्रसाद गोडबोले
सॉरी सॉरी इति गटणे :D
25 Jul 2018 - 8:18 am | माहितगार
__/\__
25 Jul 2018 - 11:39 am | विजुभाऊ
हे पण पहा एकदा.
25 Jul 2018 - 12:02 pm | माहितगार
__/\__
26 Jul 2018 - 8:31 am | माहितगार
मूळच्या पाकीस्तानी माणसाच्या दुष्कृत्याची कॅनडातील लेटेस्ट बातमी आहे. त्यांचे पुरोगामी त्या व्यक्तीच्या पाकीस्तानी मुळचे असण्यावर पांघरुण घालण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत अस बातम्या वाचून वाटते.