सलीम मन्सुरांचा मुस्लीम सत्यशोध
लेखनप्रकार (Writing Type)
सलीम मंसूर हे भारतीय वंशाचे कॅनेडियन प्राध्यापक आहेत. राज्यशास्त्र आणि इस्लाम आणि मुस्लीम सत्यशोध आणि प्रबोधनाच्या दिशा हा त्यांच्या लेखन आणि व्याख्यानांचा मुख्य विषय आहे. त्यांची सर्वच मते मला पटली असे नाही पण भारतीयांना त्याबाबत मनन आणि चर्चा करणे आवडू शकेल असे वाटते. या पेक्षा अधिक माहिती देण्या पेक्षा युट्यूब लिंक्स देतो. त्यातील ११ मार्च २०१८ ची युट्यूबवरील मुलाखतच प्रथम पहावी. त्यातील कुराण तुलनेचे एखादे वाक्य नीट समजले नाही तर 'त्यांच्या' भावना बिवना दुखावल्या बिघवल्याची उगाच कटकट नको म्हणून पूर्ण युट्यूब इकडे देत नाही केवळ दुवाच देतो पण हि ११ मार्च २०१८ ची मुलाखत प्रथम पहावी. (जिथे जिथे त्यांनी 'वेस्ट'(पश्चिम) किंवा कॅनडा शब्द वापरले आहेत त्या ठिकाणी भारत शब्द योजून कल्पना करावी.)
अजून एक मुलाखत 26 Jan 2016 म्हणजे आधीची आहे ती इथे देतोय तरीपण ११ मार्च २०१८ ची मुलाखत प्रथम पहावी आणि नंतरच हि मुलाखत पहावी. दोन्ही मुलाखती पहाताना एखाद्या हिंदी सिनेमाचा वेळ खर्च होईल पण तुर्तास इट इज वर्थ एवढेच सांगू शकतो.
त्यांच्या उर्वरीत लेखनाची यादी इंग्रजी विकिपीडिया लेखात उपलब्ध दिसते. आणि त्यांचे काही लेखन गुगल व गूगल बुक्सवर उपलब्ध असावे. इतर काही लेखनाचा प्रबोधन विषयक लेखात दखल घेणार आहे पण त्यांच्या या दोन युट्यूब मुलाखती स्वतंत्रपणे विचारात घेण्याची आवश्यकता वाटली. मुलाखतीत ते काय आणि का म्हणताहेत ते समजण्यासाठी त्यांची मुलाखतीचे भाग एक पेक्षा अधिक वेळा ऐकावी लागू शकतील किंवा त्यांचे गुगलवर उपलब्ध लेखन चाळावे लागू शकते.
मी आधी म्हटले तसे इथे त्यांच्या दिलेल्या युट्ञूब दुव्यांवरुन किंवा त्यातील त्यांच्या मतांवरुन माझी मते ठरत अथवा जुळत नाहीत हे पुन्हा एकदा लक्षात घ्यावे. धागा चर्चा सहभाग दोन्ही युट्यूब मुलाखती पाहिल्यानंतरच अपेक्षीत आहे.
* अनुषंगिका व्यतरीक्त अवांतरे टाळणे आणि चंद्र बघायचे सोडून चंद्र दाखवणार्याचे बोट बघणे टाळण्यासाठी अनेक आभार.
* चर्चा सहभागासाठी अनेक आभार , उत्तरदायीत्वास नकार लागू.
प्रतिक्रिया
मागा जी ,
पुर्वग्रह स्वस्थ बसू देत नाहीत
का?
अहंकार या विषयावर मार्गदर्शन करावे
अहंकार
__/\__
माहितगार लिहा हो अजून !!!!!!!
सोप्प नाही असं लिहन त्या साठी
सॉरी सॉरी इति गटणे :D
__/\__
हे पण पहा एकदा.
__/\__
मूळच्या पाकीस्तानी माणसाच्या