जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

देशपांडे१'s picture
देशपांडे१ in जनातलं, मनातलं
10 Mar 2009 - 9:16 pm

काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी. एव्हडेच काय स्वता: समिक्षकांना सुद्धा त्यांच्या समिक्षेबद्दल सांगता येणार नाही की, हेच काय ते व्यक्त कराचे होते का ?.
केंव्हाही समिक्षकाच्या भुमिकेत शिरून हवी तेव्हडी ओढाताण करून तर्क वितर्क माडणारे बरेच असुशकतील पण विषयाच्या केंद्रबिंदू पासून क्षितीजापर्यंत परीघ ओढ्ण्याची प्रतिभा फार थोड्या जाणकारांना लाभली आहे.
असे जाणकार समिक्षक कधिही 'समिक्षकाच्या' क्रुत्रीम व रुक्ष मुखवट्याआड लपत नाही म्हणूनच त्यांना एखाद्या ललित,काव्य,लेखनाचा वा कलाक्रुतीचा निख्खळ आनंद घेता योतो व व्यक्त करता येतो.

व्यक्तीमत्वात, समाजात जाणिव हि फार महत्वाची गोष्ट आहे. जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही .
एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते.
तुलनात्मक द्रुस्ष्टीकोणातून पाहता तर्क वितर्कांमुळे हि-याला पैलु पडण्या ऍवजी खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असु शकते.

माय मराठी हि हि-याहून तेजस्वी व सोन्याहून पिवळी आहे यात शंका नाही .पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते.

.... जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा

सन्मय देशपांडे

धोरणमांडणीप्रकटनविचारअनुभवसमीक्षा

प्रतिक्रिया

नरेश_'s picture

10 Mar 2009 - 9:40 pm | नरेश_

पुलेशु ;-)

सही /-

आगरी बोली - आगरी बाना.

chipatakhdumdum's picture

11 Mar 2009 - 1:05 am | chipatakhdumdum

ब्याटरी सापडली की मग बघतो प्रकाशाच..

चकली's picture

11 Mar 2009 - 2:38 am | चकली

काय म्हणायचे आहे ते नीटसे कळले नाही
चकली
http://chakali.blogspot.com

अनामिक's picture

11 Mar 2009 - 3:10 am | अनामिक

(प्रकाश) घाटपांडे काकांना देशपांडेकडे बोलावताहेत असे वाटत आहे :) !

अनामिक

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2009 - 9:36 am | प्रकाश घाटपांडे

आमच्यातल्या 'पांडे' हा लसावि समजावा कि मसावि?
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विंजिनेर's picture

11 Mar 2009 - 9:41 am | विंजिनेर

अर्थात मसावि.
पण देश आणि घाट रुढार्थाने एकच असल्यामुळे गणित सोडवणारा कोकणस्थ असेल तर तो लसावि होय... ;)
(तांदळाच्या आणि जोंधळ्याच्या भाकरी वर सारखंच प्रेम करणारा) विंजिनेर

प्रकाश घाटपांडे's picture

11 Mar 2009 - 9:21 pm | प्रकाश घाटपांडे

गणित सोडवणारा कोकणस्थ असेल तर तो लसावि होय.

=)) :
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

चिरोटा's picture

11 Mar 2009 - 9:43 am | चिरोटा

पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते
पण आजच्या जगात वाव मिळतोच आहे ना नवोदित लेखकाना?असन्ख्य व्रुत्त्पत्रे,टी.व्ही.,इन्टर्नेट ही माध्यमे पुरेशी आहेत ना?
मरठी समिक्षक जरा जास्तच 'खडुस' आहेत असे सुचवायचे आहे का तुम्हाला?
भेन्डि
सोलापुर्,कोल्हापुर सह विशाल कर्नाटक झाला पाहिजे.

सुनील's picture

11 Mar 2009 - 9:47 am | सुनील

काही वेळेस समिक्षकांच्या लेखणीतून काय अर्थ निघेल याची खात्री ब्रम्हदेवालाही लागत नसावी
हेच म्हणतो. त्यातून आम्ही ब्रह्मदेवदेखिल नाही!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

हरकाम्या's picture

11 Mar 2009 - 5:04 pm | हरकाम्या

देशपांडे,
अहो कळेल अस लिहा हो डोक्याची पार " मंडई " केलीत हो.

सँडी's picture

11 Mar 2009 - 5:21 pm | सँडी

छ्या! सगळी उतरवुन टाकली तुम्ही!

हेरंब's picture

11 Mar 2009 - 6:26 pm | हेरंब

समस्त मिपाकर बंधूंनो,
आपल्या सर्वांना जाणिवेची जाण करुन देऊन, आपल्याला जाणिवेकडून नेणिवेच्या पातळीवर घेऊन जाणारा हा नवीन प्रकाश आहे.

टारझन's picture

11 Mar 2009 - 6:40 pm | टारझन

क्रांतिकारी लेख. अभिणंदण !!

टिळकांच्या " सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय ? " ह्या लेखाची आठवण झाली !

- देशसांडे१

वाहीदा's picture

11 Mar 2009 - 7:26 pm | वाहीदा

जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही . एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते

:?
बरोबर आहे तुम्ही म्हणताय तर .. पण It is too heavy to understand .... :-(
आम्ही साधे मि.पा कर ... तेव्हा प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी अन वितर्क करणारे समिक्षक ही आम्ही ईथेच शोधतो ... भेट्ले की सांगुच :-)

लिखाळ's picture

11 Mar 2009 - 9:36 pm | लिखाळ

व्यक्तीमत्वात, समाजात जाणिव हि फार महत्वाची गोष्ट आहे. जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा जपलेले महान व्यासंगी आपल्या महाराष्ट्रात बरेच आहेत व त्यांच्यावर तर्क वितर्क करणारे समिक्षक ही .
एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते.
तुलनात्मक द्रुस्ष्टीकोणातून पाहता तर्क वितर्कांमुळे हि-याला पैलु पडण्या ऍवजी खच्चीकरण होण्याची शक्यता जास्त असु शकते.

माय मराठी हि हि-याहून तेजस्वी व सोन्याहून पिवळी आहे यात शंका नाही .पण तिची व्याप्ती जपण्या साठी मराठीला जाणिवपूर्वक वाव मिळावा असे वाटते.

जाणिवेतून मिळालेली प्रज्ञा --->एखाद्यामध्ये ह्या जाणिवेची उणीव भरूननिघे पर्यंत त्या व्यक्तीच्या प्रयंत्नाना वाव मिळणे अवश्यक असते --- > हे ठीक आहे.
समिक्षकांनी काय करावे हे सांगताना पुढे एकदम 'मराठीला वाव' हा मुद्दा कसा काय ? नवीन लेखकांना, ज्यांची जाणीव विकसीत होऊन प्रज्ञा प्रकट झाली नाही, त्यांना वाव मिळावा हे म्हणणे लेखनाच्या ओघात येते असे वाटले.

-- लिखाळ.

केशवराव's picture

11 Mar 2009 - 11:10 pm | केशवराव

या लेखाचे प्रयोजन समजले नाही . नेमके काय म्हणायचे आहे ते पण डोक्यावरून गेले. आता ' जाणकार ' अधिक प्रकाश काय टकणार? [ आणि कुठून टाकणार ?]

शरदिनी's picture

11 Mar 2009 - 11:52 pm | शरदिनी

खूप विचार करण्यासारखा लेख...
.... देशपांडे धन्यवाद...
मराठि समिक्षकांचे हेच चुकते असे वाटते...
मराठिला वाव हवा...

पिवळा डांबिस's picture

12 Mar 2009 - 10:35 am | पिवळा डांबिस

जाणकारांनी अधिक 'उजेड' पाडावा!
असे हवे होते....
बाकी चालू द्या....
:)

रम्या's picture

12 Mar 2009 - 4:07 pm | रम्या

देशपांडे१ साहेब, तुमच्या मुद्द्यांशी पुर्णपणे सहमत!
एक जाणकार या नात्याने मी खालील भर टाकत आहे.

जाणीव आणी समीक्षा एका बाजूला नेणीवेचा मुखवटा धारण करून निखळ कलाकॄती बनत असते. यामूळे समीक्षकाचा केंद्रबिंदू परिघाकडे सरकला जाऊन काव्य लेखानावरील तर्क वितर्काचे तुलनात्मक विश्लेषण करता येते. अशा दॄष्टीकोणामुळे एखाद्याची उणीव भरून निघते व दुसर्‍याची रिकामी होते. त्याच बरोबर हिर्‍याच्या पैलूचे खच्चीकरण होऊन त्याची प्रज्ञा ब्रम्हदेवालाही समजते. समीक्षकाची लेखणी ही सोन्यासारखी असल्याकारणाने ती पिवळी असते. मराठी सुद्धा सोन्यासारखी असल्या कारणाने पिवळी असते. त्याच बरोबर व्यक्तिमत्व आणि समाज सुद्धा पिवळा असतो. अशाप्रकारे समिक्षकाने मुखवट्यावर मुखावटे धारण केल्याने त्याचे विश्लेषण विषयाच्या क्षितिजावर कितीही ओढाताण केली तरी करता येत नाही. शिवाय त्यामूळे ब्रम्हादेवाच्या प्रयत्नानाही वाव मिळत नाही.

जाणकार या नात्याने मी जमेल तेवढा प्रकाश टाकलेला आहे. अजूनही अंधार असल्यास इतर जाणकारांनी उजेड पाडावा!

आम्ही येथे पडीक असतो!