भाषांतर

सकारात्मक भाषा

निमिष सोनार's picture
निमिष सोनार in जनातलं, मनातलं
7 Oct 2013 - 10:45 am

मूळ ऑनलाईन छोटे पुस्तक: एक्झाम्पल्स ऑफ पॉझिटिव्ह लँग्वेज
स्रोत: इंटरनेट
अनुवाद : निमिष न. सोनार

प्रस्तावना:

महात्मा गांधी एकदा म्हणाले होते :
" शब्द नेहमी सकारात्मक ठेवा . शब्दानुसार आपली वागणूक बनते. आपली वागणूक, वर्तन सकारात्मक ठेवा कारण तेच आपल्या सवयी बनतात . आपल्या सवयी सकारात्मक ठेवा कारण सवयी पुढे मूल्ये बनतात. मूल्ये आपलं नशीब होतात. जीवन चांगले जगण्यासाठी आपले नशीब सकारात्मक बनवा. त्यासाठी शब्द नेहमी सकारात्मक ठेवा "

जीवनमानविचारभाषांतर

"लर्न मराठी फ्रॉम इंग्लीश, हिन्दी ! ऑनलाईन अ‍ॅंड फ्री !!" माझा उपक्रम

कौशिक लेले's picture
कौशिक लेले in काथ्याकूट
4 Oct 2013 - 12:22 pm

नमस्कार. मी कौशिक लेले,
मी २ वेबसाईट (ब्लॉग) तयार केल्या आहेत - एक इंग्रजीमधून मराठी शिकण्यासाठी आणि दुसरा हिन्दीमधून मराठी शिकण्यासाठी.
http://kaushiklele-learnmarathi.blogspot.in/
http://learn-marathi-from-hindi-kaushiklele.blogspot.in/

माध्यमे आणि मोदीविरोध

इष्टुर फाकडा's picture
इष्टुर फाकडा in काथ्याकूट
12 Sep 2013 - 1:55 pm

मी दररोज मटा, लोकसत्ता आणि सकाळ (लोकसत्ता प्रामुख्याने) हि वृत्तपत्रे वाचतो/चाळतो. त्यातले मटा हे लेटेस्ट बातम्यांसाठी ('बातम्या' या शब्दाबद्दल मतभेद मान्य), सकाळ हे पत्रकारितेतल्या पक्षपातीपणाच्या प्रत्ययांसाठी आणि लोकसत्ता तुलनात्मक दर्जासाठी वाचत असतो. बातम्यांमधील मजकुरातून राजकीय पक्षांच्या धोरणात्मक हालचालीतून प्रेरित केली जात असणारी विधाने, कुरघोड्या, मारलेल्या कोलांट्या उड्या आणि उधळलेली मुक्ताफळे यातले भेद आणि समयोचित संधिसाधुपणा या गोष्टी मला track करायला आवडतात.

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
22 Jul 2013 - 1:43 am
इतिहासमाहितीभाषांतर

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

मन's picture
मन in जनातलं, मनातलं
22 Jul 2013 - 1:41 am

सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून.
.

इतिहासमाहितीभाषांतर

कमिशनर- जेफ्री आर्चर (उत्तरार्ध)

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
13 Jun 2013 - 8:21 pm

पूर्वसूत्रः
कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

(या कथेचा हा भाग आधीच टाकला होता परंतु मिपाच्या गेल्या काही दिवसांच्या पडझडीत गायबलेला दिसतोय कथा पूर्ण असावी केवळ याच हेतूने हा भाग पुन्हा टाकत आहे).

मलिकच्या पूर्व ईतिहासाची माहिती, त्याचा फोटो, कमिशनर साहेबांनी केलेली मदत या सर्वच गोष्टींची गौरवपूर्ण दाखल मुंबईच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने घेतली. या लेखाचे कात्रण त्यांनी आवर्जून अनिस खान यांच्याकडे पाठवले.

कथाभाषांतर

कमिशनर- जेफ्री आर्चर (पुर्वार्ध)

लाल टोपी's picture
लाल टोपी in जनातलं, मनातलं
30 May 2013 - 12:54 pm

जेफ्री आर्चरच्या 'कमिशनर' कथेचा स्वैर अनुवाद....

कथाभाषांतर

वाद-संवाद

बहुगुणी's picture
बहुगुणी in जनातलं, मनातलं
8 May 2013 - 9:15 am

मला उशीर झाला होता. माझी पत्नी एलीनॉर आणि मी सात वाजता रेस्टॉरंट मध्ये भेटणार होतो, पण मला चांगले साडेसात होऊन गेले होते. मला उशीर व्हायला क्लायेंटबरोबरची मीटिंग खूप वेळ चालण्याचं कारण झालं होतं. मी धावतपळत पोहोचलो आणि एलिनॉरला माझ्या उशीरा येण्याचं कारण सांगून टाकून 'सॉरी' म्हणून मोकळा झालो,

"अगं खरं तर उशीर करण्याचा माझा मुळीच हेतू नव्हता."

"तुझा हेतू कधीच नसतो रे!"

अरे बापरे! बाईसाहेब घुश्शात होत्या तर…

"अगं सॉरी म्हंटलं ना, पण मला खरंच ती मीटिंग अर्धवट सोडून येणं अशक्य होतं!"

मुक्तकविचारभाषांतर

आगंतुक

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
4 May 2013 - 4:02 pm

नव्या वर्षाचा हा पहिला महिना. नेमके बोलायचे झाले तर आज एकतीस जानेवारी. गेले तीस दिवस मी प्रचंड दडपणाखाली आहे. केव्हाही काहीतरी अघटीत घडेल अशी भीती आम्हा तिघांनाही सतावते आहे. एकतीस डिसेंबरच्या रात्री 'ती' पार्टी झालीच नसती तर बरं असं आता आम्हा तिघांनाही राहून राहून वाटतं. आम्हा तिघांव्यतिरिक्त त्या पार्टीला हजर असणारा आमचा मित्र रिचर्ड कॅरेक त्यादिवसापासून बेपत्ता आहे आणि त्याचा शोध घेण्याची हिंमत आम्हा तिघांमधेही नाही. त्या दिवशी कॅरेकने सांगितलेली त्याची चित्तरकथा अशक्य कोटीतली वाटेल अशी असली तरी ती पूर्णपणे काल्पनिक आहे असं आम्हा तिघांनाही वाटत नाही.

वाङ्मयकथाआस्वादभाषांतर

खिडकी

मूकवाचक's picture
मूकवाचक in जनातलं, मनातलं
26 Apr 2013 - 4:03 pm

माधवराव देवळे त्या 'बुद्रुक' खेडेगावात खास विश्रांती घेण्यासाठी गेले होते. त्यांच्या फॅमिली डॉक्टरांनी किमान दोन महिने कामकाज बंद ठेउन पूर्णपणे विश्रांती घेण्याची त्यांच्यावर जवळजवळ सक्तीच केलेली होती. कुठलाही शारिरीक किंवा मानसिक ताण त्यांची तोळामासा झालेली प्रकृती लक्षात घेता कदाचित प्राणघातक ठरला असता. अनायासे त्यांच्या बहिणीच्या एका जीवश्चकंठश्च बालमैत्रिणीकडे त्यांची 'पेईग गेस्ट' पद्धतीने राहण्याची व्यवस्थाही झालेली होती. तशी तजवीज बहिणीने करून ठेवलेली होती. माधवरावांजवळ त्यांचा परिचय करून देणारी एक चिठ्ठीही दिली होती.

वाङ्मयकथाआस्वादभाषांतर