✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

म
मन यांनी
Mon, 07/22/2013 - 01:41  ·  लेख
लेख
सत्य कल्पना करु शकाल त्याहून थरारक, विचित्र असतं असा एक वन लायनर फार पूर्वीपासून ऐकत आलोय. त्या फक्त म्हणायच्या गोष्टी आहेत असे पूर्वी वाटे. पण एक सत्यकथा हाताला लागली आणि काहीही तिखट मीठ न लावता जे जसं आहे ते तसं मांडलं तरी ते किती थरारक, रोमांचकारक, विचित्र आणि धम्माल गंमतीशीरही असू शकतं हे अनुभवलं. एक बरचसं अनवट, अल्पपरिचित किंवा अपरिचित असलेलं भूतकाळातलं पान जे जसं आहे ते जवळपास जशाला तसं भाषांतरीत करतोय विकिपिडियातून. . कल्पना करा. दुसरे महायुद्ध सुरु आहे आणि तुम्ही जर्मन सैन्याच्या pay roll वर आहात. ब्रिटनवगलता इतर युरोपमेनलँडवर नाझींचा ताबा आलेला आहे. फ्रान्स, पोलंड, बेल्जिअम, झेक कुठेहीए जा सर्वत्र जर्मन बलाढ्य सैन्य विस्तारलेलं आहे. तुम्ही नाझींना थापा मारण्याचा विचार कराल? आख्ख्या जर्मन यंत्रणेशी एकट्याने पंगे घेत आगीशी खेळ कराल? ज्यूंचे ते तसले हाल हाल करणारे जर्मन, त्यांच्या हाती आपली बदमाशी लागली तर काय होइल ह्या विचार करुनही आपले उद्योग सुरुच ठेवाल? "हो.मी असे करेन" असे म्हणणारा एक प्राणी आहे; जोन पुजोल गार्शिया (किंवा ज्झों/योन पुयोल्/प्योल गाsssअशिअ ) हे त्याचे नाव. दुसर्‍या महायुद्धातील डबल एजंट. . संक्षिप्त/लेखाचा सारांशः- जोन पुजोल गार्शिया(१४ फेब्रुवरी १९१२ - १०ऑक्टोबर १९८८) हा जाणीवपूर्वक डबल एजंट बनला. त्याचे ब्रिटिश टोपणनाव(संकेताक्षर) होते गार्बो आणि जर्मनांसाठी तो होता अराबेल. दोघाम्ना तो आपलाच गुप्तहेर वाटे. त्याला त्याच्या हेरगिरीबद्दल दोन्ही बाजूंनी उच्चा पुरकार मिळाले! ब्रिटिशांनी दिला Most Excellent Order of the British Empire हा पुरस्कार तर जर्मनांनी "आमच्यासाठी हेरगिरी करणारा" समजून दिला iron cross. स्पॅनिश यादवी युद्धातील कम्युनिस्ट अन् फॅसिस्ट दोन्ही पक्षांवर तो नाराज होता. म्हणून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने त्याची मनोभूमिका बनत गेली.(स्पॅनिश यादवी युद्ध दुसर्‍या महायुद्धाच्या थोडेसेच आधी झाले. हिटलर - मुसोलिनी मैत्री अक्ष उदयास येउ लागल त्या काळात.) पुजोल व त्याच्या पत्नीला ब्रिटन व अमेरिका अशा दोन्ही देशांच्या गुप्तचर संघटनांनी सामावून घेण्यास नकार दिला. तरी त्याने हार न मनता कट्टर नाझी समर्थक व (नाझींच्या मदत्/सहानुभूतीने सत्तेवर आलेल्या) स्पॅनिश सरकारचा हस्तक अशी स्वतःची प्रतिमा निर्माण केली व तो जर्मन हेर म्हणून नियुक्त झाला. त्यास ब्रिटनला जाउन इतर हेरांची भरती करण्यास सांगण्यात आले. पण तो ( पोर्तुगालची राजधानी) लिस्बन इथे गेला. गंमत म्हणजे चक्क असले थापाडे रिपोर्ट बनवूनही तो धरला गेला नाहिच; उलट जर्मनांच्या नजरेत विश्वासार्ह बनला. मग त्याने स्वतःसारखेच इतर काही सब्-एजंट बनवण्यास सुरुवात केली; फक्त त्या सब एजंटाचे अस्तित्व त्याच्या कल्पनेत होते, इतकीच गडबड होती. :)ह्या काल्पनिक एजंटांवर तो पुढे चुकांचे , उशीरा खबर देण्याचे खापर फोडणार होता. अशा कामगिरीमुळे दोस्तांनाही शेवटी पुजोलचा मैत्रीचा हात स्वीकारावाच लागला. त्याला आता दोस्तांतर्फे ( ह्यावेळी खरोखरच) सहकुटुंब ब्रिटनला पाठवण्यात आले. त्याचा बॉस/सहकारी टॉमस हॅरिस आणि तो स्वतः अशा दोघांनी उर्वरित युद्धकालात गुप्तहेरांचे काल्पनिक जाळे सुरुवातीस पत्राने आणि मग रेडियोमार्गे वाढवत ठेवले. पुजोलची खरोखर मोलाची ठरलेली कामगिरी म्हणजे ऑपरेशन फोर्टिट्यूड. ह्या ऑपरेशनचे उद्दिष्ट एकच. जर्मनांना दोस्तांच्या नॉर्मंडीवरील आक्रमणाबद्दल अनभिज्ञ ठेवणे व जमेल त्या मार्गाने त्याबद्दल जर्मनांची दिशाभूल करणे.(दुसर्‍या महायुद्धाबद्दल माहिती असणार्‍यांना नॉर्मंडीवरील युद्ध हे कसे निर्णायक ठरले, तो एक आख्ख्या युद्धाचा महत्वाचा turning point कसा ठरला हे सांगायला नकोच. कारण नॉर्मंडीवरील विजयानंतर आख्ख्या युद्धाचे पारडे सरळसरळ, अगदि स्पष्टपणे दोस्तांच्या बाजूने झुकले. इथे काही गडबड झाली असती तर युद्ध इतक्यातच संपण्याची काही शक्यताच नव्हती.) पुजोलने मुद्दाम दिलेल्या चुकिच्या माहितीमुळे जर्मन Pas de Calais इथे खरा मोठा हल्ला होणार आहे असे समजत होते. त्यांनी नॉर्मंडीवरील लढाईदरम्यान २ चिलखती डिव्हिजन्स, तब्बल १९ पायदळाच्या डिविजन्स भलतीकडेच , Pas de Calais मध्ये अडकवून ठेवल्या. . . अंक १ . --मनोबा
  • थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २

Book traversal links for थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक १

  • थरारक पण धमाल गंमतीशीर, दुसर्‍या महायुद्धातील एक पान --अंक २ ›
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
इतिहास
लेखनप्रकार (Writing Type)
माहिती
भाषांतर

प्रतिक्रिया द्या
6586 वाचन

💬 प्रतिसाद (2)

प्रतिक्रिया

हां!

स्पंदना
Mon, 07/22/2013 - 08:06 नवीन
हां! आत्ता कस? मन ने लिहिल्यासारख वाटलं. थरारक! वाचतेय. थोडफार माहीती आहे, आता तुमच्या योगाने उजळणी होइल.
  • Log in or register to post comments

आभार आणि अंक २

मन१
Wed, 07/24/2013 - 09:21 नवीन
सर्व वाचकांचे मनःपूर्वक आभार. हा धागा म्हणजे अंक पहिला आहे. अंक दुसरा हा http://misalpav.com/node/25242 इथे आहे.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा