अंधार क्षण भाग ४ - सॅम्युएल विलेनबर्ग (लेख १६)
अंधार क्षण - सॅम्युएल विलेनबर्ग
साल १९४२. मध्य युरोप.गोळीबार आणि बाँबस्फोट यांच्याशिवाय अजून एक आवाज त्यावेळी लोकांना ऐकू येत होता, तो म्हणजे आगगाड्यांचा. असंख्य आगगाड्या लोकांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी घेऊन जात होत्या. पण या आगगाड्या नेहमीसारख्या नव्हत्या. त्यांमधून प्रवास करणारे लोक कधीच परत येणार नव्हते. या गाड्या लोकांना ऑशविट्झ, रॅव्हेन्सब्रुक, बेल्झेक, चेल्म्नो, सॉबिबॉर या आणि इतर मृत्युछावण्यांमध्ये घेऊन जात आणि अजून लोकांना तिथे घेऊन जाण्यासाठी परत येत.