एक चुकलेली बस - रेडबस डॉट इन

लॉरी टांगटूंगकर's picture
लॉरी टांगटूंगकर in जनातलं, मनातलं
18 Nov 2014 - 12:14 pm

२००५ दिवाळीचे दिवस
बेंगलोर मधली एक संध्याकाळ. इंदीरा नगर एरिया.
ऑफिसचं शेड्यूल पक्कं नसल्यानं त्यानं हैद्राबादची रिझर्वेशन्स केलेली नव्हती. बंगळूर ते हैद्राबाद आणि तेथून निजामाबाद. नेहमीचाच मार्ग होता. दिवाळीची चार दिवस असलेली सुट्टी बेंगलोर मध्ये घालवायची त्याची मुळीच ईच्छा नव्हती. ट्रेन मिळायची शक्यता आता शून्याहून कमी. सुट्टीचे दिवस म्हणल्यावर विमान कंपन्या लुटायला बसणार. बसने जाणे हाच एक आणि एकमेव पर्याय होता.
खाली नही है- ऑपरेटर. दुसरे एजंटसे पूछके देखो. दुसर्या एजंटने तीन चार फोन केले. त्याचे पण तेच उत्तर आणि तोच सल्ला. सात आठ एजंटना विचारून झाल्यानंतर तो वैतागला. आता दिवाळी बंगळूरातच फ्लॅटवरच काढावी लागणार होती.
फनिन्द्र सामा याच वर्षी नोएडामधून जॉब बदलून बंगळूरात आलेला. आता चार पाच दिवस त्याला एकट्याने बसून काढायचे होते. फ्लॅटवर जातांना त्याच्या मनात हेच विचार होते की, च्यायला अजून दहा एजंट्स कडे गेलो असतो त्याने कदाचित अजून वीस-पंचवीस ऑपरेटर पर्यंत चौकशी झाली असती. एखादं कॅन्सल झालेलं तिकीट मिळालं असतं. आणि एका एजंटला सीट देता येत नाहीये, दुसरा कसा काय देऊ शकेल? आणि दुसऱ्या एजंटकडे जाण्याचा सल्ला मिळतोय तो पण एका एजंट कडून. काही वेळ डोकं खाजवल्यानंतर त्याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली.
बस बुकींग सिस्टीम नेमकी कशी चालते हे बघायला फनिन्द्र दुसर्याच दिवशी काही एजंट्सकडे गेला. सामान्यतः ज्यांच्याकडे नेहमी गिऱ्हाईकं असतात अशा एजंटसाठी राखीव सिट्स असतात. आणि जर त्या सीट्स संपल्या तर मग फोन करून जागा आहेत का हे विचारावं लागतं. काही ऑपरेटर्स राखीव सीट्स न देता थेट फोनवरच माहीती देऊन बुकींग करायचे. शहराच्या कोणत्या कोपर्यात बस ऑपरेटर आहे हे प्रवाशाला माहीती नाही. आणि प्रवासी कुठे आहे हे ऑपरेटरला माहीती नाही.
त्याला असंही लक्षात आलं की सगळ्या बुकींग एजंट्सकडे सगळ्या बस ऑपरेटर्सची माहीती नाहीये. अर्धवट माहीतीमुळे काही ऑपरेटर्सच्या रिकाम्या सीट जात आहेत. आणि काही लोकांना तिकीटं मिळत नाहीयेत. रिटर्न झालेल्या तिकिटांचा तर पत्ताच नाही, ते पण जर का वापरता आलं तर दोघांचा पण फायदा!!
इंटरनेटवर आधारीत एकच कॉमन प्लॅट्फॉर्म बनवायचा. एजंट आणि सामान्य गिऱ्हाईक या दोघांना अॅक्सेस द्यायचा. काम प्रचंड सोपे होईल. एका ठिकाणी सगळ्या ऑपरेटर्सना सीट्सची माहीती द्यायला सांगायची. एजंट लॉग इन करेल आणि विचार न करता कोणताही random नंबर लावण्याऐवेजी ज्याच्याकडे सीट आहेत त्यालाच फोन करेल, असं पहीलं चित्र फनिन्द्रच्या मनात तयार झालं.
फनिंद्रने कल्पना फ्लॅट्मेट्सना सांगितली. त्यांनी लगेच कल्पना उचलून धरली. सगळेजणं नेहमीच्या विकांताच्या शिनेमे आणि बिर्याणी वगैरे शेड्यूलला कंटाळले होते. प्रोजेक्ट प्रचंड चित्तवेधक होता. सर्वजण कामाला लागले. सगळी मंडळी इंजिनिअर होती. सगळ्यांना सी, सीपीपी वगैरेची कल्पना होती, पण कोणालाही जावा, डॉट नेट वगैरे इंटरनेटशी संबंधीत प्रकार माहीती नव्हते. आणि ओपन सोर्स सॉफ्ट्वेअर चकटफू द्यायचे या विचारामुळे आपणच शिकू आणि आपणच करु असं त्यांनी ठरवलं. डॉटनेट “जावा”पेक्षा सोपं पडेल असं कुठून तरी कळाल्यानंतर त्यांनी बाजारातून जाउन डॉटनेटची पुस्तकं उचलून आणली. कोणी काय काम करायचं हे ठरलं. आणि पायरेटेड कॉपीवर कोडींगची सुरुवात झाली.
पाच महीन्यांच्या कामानंतर बॉस (bus Operator software system) नावाचं बीटा मॉड्यूल तयार झालं. या आधीची माहीती ज्या बस ऑपरेटर कडून घेतलेली त्याच ऑपरेटरला ते वापरण्यासाठी द्यावे असे ठरले. पहील्या मॉड्यूल मध्ये तीन भाग केलेले होते. एका भागात बस ऑपरेटर त्याच्या बसची माहीती टाकेल. दुसऱ्या भागात एजंट्स लॉग इन करून तिकीटं बुक करतील आणि तिसऱ्या भागात सामन्य ग्राहक.
तयार झालेलं मॉड्यूल घेऊन फनिन्द्र ऑपरेटरकडे गेला. याच ऑपरेटर कडून आधीची माहीती, सॉफ्ट्वेअरसाठीचे इन्पुट्स वगैरे घेतले होते. ऑपरेटरला वापरून बघण्यासाठी सॉफ्ट्वेअर देऊ केलं आणि इथे टीमला पहीला धक्का अगदी अनपेक्षीतपणे बसला. बस ऑपरेटर सॉफ्ट्वेअर घ्यायला तयार नव्ह्ता. पाच महीन्याचा वेळ घालवून तयार झालेलं, ऑपरेटर्सच्याच फायद्याचं सॉफ्ट्वेअर फुकट वापरायला सुद्धा ते लोकं स्पष्ट नकार देत होते. आता त्यानं बाकी ऑपरेटर्सकडे प्रयत्न करायला सुरुवात केली.
घालवलेला प्रचंड वेळ, इतकी मेहनत सहजासहजी पाण्यात जाउ देण्याची फनिंद्रची तयारी नव्हती. हा नाही दुसरा ऑपरेटर, दुसरा नाही, तिसरा असं करत दिवस चालले होते. दोन महीने वेळ ऑपरेटर्स मागे फिरण्यात गेला. काहीही प्रगती नव्हती. जर का ऑपरेटर नाहीत तर सीट्स कोण टाकणार आणि सीट नाहीत तर खेळच संपला. फनिंद्रच्या बरोबर काम करणार्या सातपैकी चार मित्रांना आता प्रोजेक्ट कंटाळवाणा वाटायला लागला. एक जण ऑफिसकडून युएसकडे निघून गेला तर इतर तिघांनी काम करण्याचं थांबवून टाकलं. आता त्याच्या बरोबर दोघं जणं उरले होते. सुधाकर पसुपुनुरुइ आणि चरण पद्मराजू . तीघंही BITS पासूनचे दोस्त होते.
फनिंद्र टेक्सस ईन्स्ट्रूमेंट्समध्ये नोकरी करत होता. चरण हनीवेलमध्ये तर सुधाकर आयबीएममध्ये होता. तिघांचाही प्रोजेक्ट्वर पुरेसा वेळ जात होता पण घोडं काही पुढे सरकत नव्हतं. फनिंद्रला एके दिवशी टाय*1 (The Indus Entrepreneurs) या संस्थेबद्दल काही माहीती मिळाली. एखाद्याकडे आयडीया आहे पण प्रगती होत नसेल तर अनुभवी सल्लागारांची मदत टाय मार्फत घेता येते. टायचा २००५ साली ईएपी (Entrepreneurs Acceleration Program) मध्ये फनिंद्रने जाण्याचे ठरवले. ईएपी प्रोग्रॅममुळे टीमला काही बाह्य सल्लागार मिळवता आले. संजय आनंदराम आणि अशोक येरनेनी यांनी फनिंद्रबरोबर बाह्यसल्लागार म्हणून काम करायचे मान्य केले.
इथे समस्या अंडे आधी का कोंबडी? अशी काहीशी होती. आधी सॉफ्ट्वेअरवर बस ऑपरेटर आणायचे का आधी एजंटला सॉफ्ट्वेअर वापरायला द्यायचे?. जर आधी ऑपरेटर आणावे आणि त्यांना एजंट मिळाले नाही, तिकीटं विकली गेली नाही तर फार थोड्या वेळात ते वापरण्याचे बंद करणार. आणि जर आधी एजंट्स ना द्यावे. त्यांना तिथे सीट्स दिसत नाहीयेत तर ते तरी का रहातील ? कुठून तरी सुरुवात करायची म्हणून ऑपरेटर्स पासून सुरुवात.
बॉस मॉड्यूल घेऊन चकरा सुरु होत्या. कुठेच सुरुवात नसली तर हाच कल्पनेचा हाच शेवट असणार होता. मधल्या काळात ईएपी प्रोग्रॅममध्ये निवड झाल्यानंतर फनिंद्र, सुधाकर आणि चरण तिघांनी आपआपल्या नोकर्यांचे राजीनामे टाकले होते. खिशात काहीही नाही. पैसा फक्त खर्च होतोय. येत काहीच नाहीये. असलेला थोडा-फार पैसा कधीपण लागेल म्हणून टोकाची काटकसर. मधूनच प्रोजेक्ट सोडलेल्या चार दोस्तांसाठी आता काहीच प्रॉब्लेम्स नव्हते. प्रत्येक रविवार नेहमीच्या रविवारा सारखाच. ही लोकं जेव्हा सिनेमाला निघायचे तेव्हा रविवार चालू आहे हे लक्षात यावं.
हातात आता दुसरे काही काम नव्हते. आयटी मधल्या प्रचंड लाड करणार्‍या नोकर्‍यांमधून*2 या भलत्याच प्रकरणात तिघांनी उडी मारली होती. प्रत्येक शक्य असलेल्या पद्धतीने काळजी घेणार्‍या कंपन्यातून बाहेर पडून आता पोरं बस ऑपरेटर्स मागे फिरत होती.
कल्पना करा, आधीच्या जॉबमध्ये रोज सकाळी टेबलवर फुलं ठेवली जात आहेत. रोजच्या रोज ती बदलली जातायत. मॅनेजर कधी मोठ्या आवाजात पण बोलत नाही. शाळा कॉलेजात आपण जनरली “सर” अशी हाक मारतो. कंपनीत आल्यानंतर किती पण मोठ्या वयाच्या मॅनेजरला सर म्हणू नका असं शिकवलं जातं. आणि आता सगळीकडे सर-सर करत फिरायचं आहे.
सकाळी लवकर उठून कलासीपाल्यमला जायचं. आधी फोन करून वेळ विचारली असता "कल आ जाओ नौ बजे" वगैरे ऐकलेलं असायचं. नऊ वाजता हा प्राणी जागेवर नसणार. नंतर तिथेच बसून रहायचं. तो अकरा वाजता वगैरे कधी तरी येणार. काही तरी सॉफ्ट्वेअर वगैरेसाठी पोरं आलेली आहेत हे त्याला माहीती आहे. तो ऑपरेटर दुर्लक्ष करणार. दोन-तीनला तो जेवणाला जाणार. संध्याकाळी परत काम सुरू करणार. रात्रीच्या दहा वगैरे वाजता हे अतीव वैतागलेल्या चेहऱ्याने हे पोरगं सकाळपासून का बसलं आहे विचारणार. आणि सरते शेवटी “भाई वो सब वेबसाईट वगैरा प्लेन के लिये ठीक है, ये कौन नेट पे खरिदेगा?” ऐकवणार.
ऑपरेटर्सच्या बाजूचा प्रतिसाद हा असा होता. हे सर्व बघता सल्लागारांचे मत असे पडले की बस ऑपरेटरच्या मागे जाण्याऐवेजी दुसऱ्या बाजूला प्रयत्न करावेत. बस ऑपरेटर लगेच काही टेक सॅव्ही होणार नाहीत. त्यांची काम करण्याची जुनी पद्धत आणि कमी शिक्षण हे प्रचंड त्रासदायक अडथळे आहेत. त्यांना बदलणे अवघड आहे. पंचवीस वर्षाच्या जग बदलून टाकायचे विचार असलेल्या पोरांना ते ऐकून पण घेणार नाहीत. थेट वेबसाईट वर ग्राहक आणून त्यांना तिकीटं विकायची. बस ऑपरेटर ना सॉफ्ट्वेअर विकल्यानंतरही फारसा रिव्हेन्यू मिळणार नाही. ग्राहकाला तिकीटं विकणे हे मुख्य उद्दीष्ट ठेवावे.
या आधीचे सर्व काम बॉस मॉड्यूल वर झाले होते. वेबसाईटचं काम सुरु झालं. कंपनीचं नाव कॉलेजच्या प्रेमावरून पिलानी सॉफ्टलॅब्स असे ठेवले गेले होते. बिट्सच्या विद्यार्थ्यांसाठी पिलानी हे नावच अगदी भावूक करणारी गोष्ट होती. तर इतरांसाठी हीच गोष्ट पहिला विश्वास तयार करणारी होती. या नंतर प्रश्न आला की “वेबसाईट काय रजिस्टर करावी?” वेबसाईटच्या युआरएल मध्ये रंग असला पाहिजे. green वगैरे ठेवला तर लोकं स्पेलिंग चुकवू शकतात. चुकून एक ई टाईप करायचा राहिला तर गडी भलतीकडे पोहोचणार. सगळ्यात छोटं स्पेलिंग असलेला रंग म्हणून रेड!! रेडलाईन डॉट कॉम. दिल्लीकरांना व्हाईट लाईन, ब्लू लाईन माहितीच असतील. त्याच थीम वर रेड लाईन अशी वेबसाईट बनवायचं ठरलं. रेडलाईन डोमेन नेम उपलब्ध नसल्याने सर्वजण रेडबस या पर्यायावर आले. हे पण एका अर्थाने चांगलेच झाले कारण लाल डब्बा म्हणालं की बस प्रवास नजरेसमोर येतोच. रेड बस डॉट इन अशी वेबसाईट बनवली गेली.
एसी रूम मध्ये बसून ऑनलाईन गिऱ्हाईक शोधणे हा प्रकार ऐकायला-बोलायला हे फार सोपा वाटेल, पण जर का ऑपरेटर तुम्हाला तिकीटं देत नसतांना असं कसं करणार? गिऱ्हाईकाला काय देणार?
या वर पहीली कल्पना अशी आली होती की काही बस मध्ये आधीच दोन-चार सीट विकत घेऊन ठेवायचे. आणि वेब साईट वर तितकेच सीट विकायला ठेवायचे. बस ऑपरेटरने आधी सगळेच्या सगळे छत्तीस सीट विकले तर चार सीट परत(!) द्यायच्या. पण जर का बस ऑपरेटर आधी त्या चार सीट्स विकल्या गेल्या तर मग फोन करुन अजून सीट्स मागवायच्या. बस ऑपरेटर या प्रस्तावाला पण मान्यता देईनात. बसेसची मुख्य तिकीटविक्री शेवटच्या तीन दिवसांत होते, जर का त्याआधी तिकीटे विकली गेली नाहीत तर परत द्यायची. ऐन प्रवासाच्या आदल्या दिवशी वगैरे तिकीटं विकता येणार नाहीत, आणि विकेंडचे तिकीट देता येणार नाही या बोलीवर एका ऑपरेटरने दोन आठवडे चाचणी साठी काही सीट्स दिल्या. एक जरी सीट विकता आली तर पुढे बघू. जर तिकीटं विकले गेले नाहीत तर मी ते परत घेईन इतपत सवलत त्याने दिली. दोन आठवड्यात काही जमलं नाही तर गपचाप नोकऱ्या शोधा हे सुद्धा ऐकवलं.
दोनचार सीट्स तर मिळाल्या.
आता वेबसाईटवर गिऱ्हाईकं कशी आणणार हा पुढचा प्रश्न! बहुतांश आयटी कंपन्यांत पब्लिक लंच झाल्यानंतर जवळच्या भागात फेरफटका मारतं. कँपस गेट्स वर पत्रकं वाटायला सुरुवात झाली. पत्रकांना मिळणारा प्रतिसाद अपेक्षेपेक्षा खूप चांगला होता. एकतर तिथे क्रेडीटकार्ड वगैरेचे पत्रकं वाटणाऱ्या लोकांमध्ये टीम वेगळी उठून दिसायची. जर कोणाला काही प्रश्न असले तर अर्थात तिथल्या तिथे स्पष्टीकरण दिल्याने लोकांना चांगलाच विश्वास वाटायचा.
१८ ऑगस्ट २००५. इन्फोसिसच्या एका कर्मचार्याने रेडबस डॉट इन वरून पहिलं तिकीट बुक केलं. बेन्गलोर ते तिरुपती. सगळं काम नीट होतंय. ती त्या बस मधूनच जाते आहे का नाही? व्यवस्थित ठरलेली सीट दिली जाते आहे की नाही. हे सगळं बघायला फनिन्द्रची सगळी टीम त्या संध्याकाळी मडीवाला बस स्टँडवर होती.
फीडबॅक घेण्यासाठी जवळ जाऊन बोलण्याइतकं धैर्यपण अजून आलेलं नव्हतं.
एक चुकलेली बस, ते पकडलेली पहिली बस. बस आत्ताशी सुरु होत होती, अजून पुढे बराच प्रवास बाकी होता.
logo
क्रमशः

हे ठिकाणप्रकटनविचारलेखअनुभवभाषांतर

प्रतिक्रिया

सुनील's picture

18 Nov 2014 - 12:27 pm | सुनील

वाचतोय...

सुनील's picture

19 Nov 2014 - 3:58 pm | सुनील

पुढचा भाग केव्हा?

सहसा बसप्रवास (विशेषतः खासगी बस कंपनीचा) टाळण्याकडेच कल आहे. तरीही लेख वाचनीय!

प्रमोद देर्देकर's picture

18 Nov 2014 - 12:28 pm | प्रमोद देर्देकर

वाचतोय.

मस्त आहे पु.भा.प्र

वाचतोय... पुढच्या भागाची वाट पाहतो. :)

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- तेरा ध्यान किधर है ? तेरा हिरो इधर है... ;) { Main Tera Hero }

विटेकर's picture

18 Nov 2014 - 12:41 pm | विटेकर

उत्तम लेख , बसच्याच धन्ध्यात असल्याने हे सारे बर्यापैकी माहीत आहे... पण तुमची शैली छान आहे.

बोका-ए-आझम's picture

18 Nov 2014 - 12:48 pm | बोका-ए-आझम

वाचतोय. एकदम उत्कंठावर्धक आहे. पुभाप्र.

आदूबाळ's picture

18 Nov 2014 - 12:50 pm | आदूबाळ

सहिच लिहिलं आहे. पुभाप्र.

प्रसाद१९७१'s picture

18 Nov 2014 - 12:53 pm | प्रसाद१९७१

फार च भारी.

स्पा's picture

18 Nov 2014 - 12:56 pm | स्पा

मजा आली

इनिगोय's picture

18 Nov 2014 - 1:18 pm | इनिगोय

मस्तच रे! लेखाला मुहूर्त चांगला शोधलास. हा आठवडा वैश्विक उद्योजकता सप्ताह म्हणून साजरा होतोय. त्या मुहूर्तावर चांगला लेख वाचायला मिळाला. पुभाप्र. :-)

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

18 Nov 2014 - 2:22 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

छान रे. जरा थोडे रंजित वाटले(तसे यश मिळाले की केलेल्या कष्टांमध्ये थोडा मसाला घालावाच लागतो म्हणा).
असे अनेक मराठी फणिन्द्र तयार व्हावेत ही मराठी आय.टी.वाल्यांना सदिच्छा.

मनिमौ's picture

18 Nov 2014 - 2:23 pm | मनिमौ

वा अतिशय सुरेख

वेल्लाभट's picture

18 Nov 2014 - 2:42 pm | वेल्लाभट

अप्रतिम लेख.... पुढच्या भागाची वाट बघतोय :)
लेखन सुरेख्ख

नाखु's picture

18 Nov 2014 - 2:42 pm | नाखु

काय करावे आणि काय करू नये हे समजेल अश्या सुटसुटीत सोप्या भाषेत मांडल्याबद्दल विशेष धन्यवाद.

प्यारे१'s picture

18 Nov 2014 - 2:47 pm | प्यारे१

मस्त लिहीलंय रे! लोगो पण आकर्षक आहे. आन दे आन दे!

सस्नेह's picture

18 Nov 2014 - 2:50 pm | सस्नेह

छान लेख. सर्व बारकावे नीट टिपलेत
पुभाप्र

'रेड बस'चा अनुभव चांगला आहे. पण त्याचा इतिहास माहिती नव्हता. तो सांगायला सुरुवात केल्याबद्दल आभारी आहे.

खेडूत's picture

18 Nov 2014 - 3:18 pm | खेडूत

अत्यंत रोचक!

पु भा प्र.

जेपी's picture

18 Nov 2014 - 3:26 pm | जेपी

आवडले.पुभाप्र...

यसवायजी's picture

18 Nov 2014 - 3:27 pm | यसवायजी

मस्त.पु.भा.प्र

प्रचेतस's picture

18 Nov 2014 - 3:41 pm | प्रचेतस

क्या बात है...!!!!
खूप कमी वेळा लिहितोस पण जेव्हा लिहितोस तेव्हा भारीच लिहितोस.

यसवायजी's picture

18 Nov 2014 - 3:47 pm | यसवायजी

+१
तुंबा शेरतू.

अजया's picture

18 Nov 2014 - 3:59 pm | अजया

मस्तच.पुभाप्र.

पैसा's picture

18 Nov 2014 - 4:37 pm | पैसा

लिहिण्याची पद्धत आवडली. खूप छान माहिती आहे. मात्र ही साईट खूपच कमर्शिअल पद्धतीने चालवली जाते. तिकीट कॅन्सल करायला दंड बराच आहे. मुळात तिकिटे महाग असल्याने कापलेली रक्कम बरीच जास्त वाटते. मात्र महाराष्ट्र एस टी च्या साईटवर प्रवासाच्या थोडा वेळ आधीही तिकीट कॅन्सल केले तरी मोठा दंड कापला जात नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Nov 2014 - 9:47 pm | लॉरी टांगटूंगकर

माझ्या माहीती प्रमाणे हे नियम रेडबसच्या अधिकारात येत नाहीत, ज्या कोणत्या प्रायव्हेट ऑपरेटरची बस असते त्याचे नियम असतात. १२ तासाला ५०% रक्कम, १६ तासाला ६०% असे काहीतरी.
आपले डोमेन एक्सपर्ट विटेकर जास्त योग्य पद्धतीने सांगू शकतील.

प्रसाद१९७१'s picture

18 Nov 2014 - 4:50 pm | प्रसाद१९७१

कोणी चिलखत तयार करणारी कंपनी काढली आणी पाहीजे तिथे पैसे चारले की चिलखत सक्ती सुद्धा येइल.

छान लिहिताय. कल्पना कागदावरून प्रत्यक्ष व्यवसाय सुरू करून नंतर तो आपल्याच ताब्यात ठेवता ठेवता कोणीतरी ते चोरतो.इथेच जागरूक राहावे लागते.ओलाकैब टैक्सी हायर पोर्टल मला वाटते असेच एका आइआइटीच्या तरूण एंजिनिअरचे आहे.
विटेकरांकडूनही काही येण्याच्या अपेक्षेत.

बहुगुणी's picture

18 Nov 2014 - 7:03 pm | बहुगुणी

चांगली सुरूवात, पुढील भागाची प्रतीक्षा. विटेकरांच्या एक्स्पर्ट कॉमेंटरीची आणि याच विषयातील इतर माहितीच्या लेखाचीही प्रतीक्षा.

रेवती's picture

18 Nov 2014 - 7:52 pm | रेवती

छान.

मिहिर's picture

18 Nov 2014 - 8:01 pm | मिहिर

पुढच्या भागाच्या प्रतीक्षेत.

डॉ सुहास म्हात्रे's picture

18 Nov 2014 - 8:12 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्त चित्तवेधक कथा ! खर्‍या जीवनातले नाट्य !!

पुभाप्र.

मुक्त विहारि's picture

18 Nov 2014 - 8:40 pm | मुक्त विहारि

पुभाप्र

किसन शिंदे's picture

18 Nov 2014 - 8:48 pm | किसन शिंदे

अत्यंत रोचक माहीती!! त्या एका संस्थळामागे एवढा सगळा खटाटोप असेल हे माहीती नव्हतं.

स्वप्नज's picture

18 Nov 2014 - 9:02 pm | स्वप्नज

मस्त लिहलाय लेख.. नायकाचा प्रवास आणि लेखकाची लेखनशैली दोन्ही मस्त....
पु.भा.प्र.

अमित खोजे's picture

18 Nov 2014 - 9:44 pm | अमित खोजे

छान वर्णन केलंय. रेड बसच्या वेबसाईटची कल्पना नव्हती. या लेखामुळे ओळख मिळाली. आता मित्रांना सांगता येईल.
कंपनी सुरु करायला किती कष्ट लागतात ते यावरून स्पष्ट होते परंतु चिकाटी सोडून चालत नाही.

लॉरी टांगटूंगकर's picture

18 Nov 2014 - 9:44 pm | लॉरी टांगटूंगकर

सुनील, प्रमोद देर्देकर, मदनबाण, विटेकर, बोका ए आझम, आदुबाळ, प्रसाद१९७१, स्पा, एनिगोय, माईसाहेब, मनिमौ, वेल्लाभट, नादखुळा, प्यारे, स्नेहांकिता, खेडूत, एसवायजी, जेपी, वल्ली, अजया, पैसातै, कंजूस , बहुगुणी, रेवती, मिहीर, एक्काबुवा, किसन शिंदे, स्वप्नज

कचकून धन्यवाद!

खटपट्या's picture

18 Nov 2014 - 11:52 pm | खटपट्या

जबरा !!
पुभाप्र

श्रीरंग_जोशी's picture

19 Nov 2014 - 12:20 am | श्रीरंग_जोशी

याविषयी फार पूर्वी रेडिफवर वाचले होते. मराठीतून वाचून अधिक आनंद झाला.

पुभाप्र.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

19 Nov 2014 - 2:49 am | निनाद मुक्काम प...

वाचतोय

स्पंदना's picture

19 Nov 2014 - 6:44 am | स्पंदना

मस्त लेख!
लेखन शैली अतिशय आवडली.

मित्रहो's picture

19 Nov 2014 - 10:38 am | मित्रहो

मस्त लिहीलेय
मी स्वतः ही कथा एका TIE च्या कार्यक्रमात हे सारे फनिंद्रच्या तोंडून ऐकलेय तरीही पूर्ण लेख वाचावासा वाटला.

Maharani's picture

19 Nov 2014 - 2:23 pm | Maharani

मस्त लेख..पुभाप्र

बॅटमॅन's picture

19 Nov 2014 - 2:29 pm | बॅटमॅन

मन्द्या, मस्ताड रे. रेडबस खरेच भारी प्रकार आहे.

कवितानागेश's picture

19 Nov 2014 - 3:51 pm | कवितानागेश

मस्त!

मोहनराव's picture

19 Nov 2014 - 7:34 pm | मोहनराव

रंजक आहे लेख. पुभाप्र

सुबोध खरे's picture

19 Nov 2014 - 11:48 pm | सुबोध खरे

छान लेख

बोबो's picture

21 Nov 2014 - 2:38 am | बोबो

छान

यशोधरा's picture

21 Nov 2014 - 7:02 am | यशोधरा

वाचते आहे...

स्वामी संकेतानंद's picture

21 Nov 2014 - 8:24 am | स्वामी संकेतानंद

मस्त मांडले आहे. कथा माहीत असली तरी तुम्ही रंजक पद्धतीने मांडली आहे.

अनुप ढेरे's picture

23 Nov 2014 - 3:04 pm | अनुप ढेरे

मस्तं गोष्ट!

मोदक's picture

26 Nov 2014 - 12:38 pm | मोदक

वाचतो आहे...

पुढचा भाग लवकर टाकणे.

लॉरी टांगटूंगकर's picture

27 Nov 2014 - 6:21 am | लॉरी टांगटूंगकर

अमित खोजे, खटपट्या, श्रीरंग_जोशी, निनाद, aparna akshay, मित्रहो, Maharani, बॅटमॅन, मोहनराव, डॉ.खरे, बोबो, संकेतानंद, अनुप, मोदक
धन्स!
पुढचा भाग लवकरच टाकतो.