हतबल
खरं तर टक्क जागा आहे मी. घरच्यांना वाटतंय की झोपलोय मी अजून, पण जागा आहे मी.
डोक्यावरचा पंखा मंद फिरतोय. तोही सहन नाही होत आहे मला. पण उठून बंद नाही करू शकत मी.
हतबल आहे मी.
खिडकीचा पडदा जरासा उघडा राहिलाय आणि सकाळच्या उन्हाची कोवळी तिरीप नेमकी डोळ्यावर पडतेय.
तो बंद करता आला असता उठून तर किती बरं झालं असतं.... पण नाही जमत आहे मला.
हतबल आहे मी.
लाव जोर आणि उठ, कर पुन्हा एकदा प्रयत्न, जमेल तुला.... असा माझ्या स्वतःच्या मनातून आवाज येतोय..
पण नाहीच जमत आहे.
खरंच हतबल झालोय मी.