लेख

एटलस सायकलीवर योग- यात्रा भाग ७: औरंगाबाद- जालना

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Jun 2018 - 3:56 pm

७: औरंगाबाद- जालना

समाजजीवनमानविचारलेख

एक उनाड संध्याकाळ

सचिन काळे's picture
सचिन काळे in जनातलं, मनातलं
11 Jun 2018 - 3:53 pm

एके दिवशी मला 'एक उनाड संध्याकाळ' कशी व्यतीत करावी लागली, त्याचा एक किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे. त्याचे असे झाले, मी कामावरून रोज संध्याकाळी बरोबर पाचच्या दरम्यान ऑफिसमधून घरी येतो. दुपारी १२ च्या दरम्यान आमच्या सौं.नी मला ऑफिसमध्ये फोन केला. "अहो! आज संध्याकाळी चार वाजता माझ्या आठ दहा मैत्रिणी पार्टीकरीता आपल्या घरी येणार आहेत. आमचं सर्व आटपायला निदान सहा तरी वाजतील. तर आज तुम्ही घरी जरा उशीरा याल का? आणि हो! बिल्डींगजवळ आलात की मला फोन करा. मैत्रिणी गेल्या असतील तर मी तसं तुम्हाला सांगते. मग तुम्ही वर या"

लेख

बागेतले आवाज

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
9 Jun 2018 - 11:49 pm

रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते .

भाषाआस्वादलेखअनुभवविरंगुळा

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ४ )

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
9 Jun 2018 - 11:22 am

तिच्या डोक्यातली चक्र काही थांबत नव्हती . आणि त्याला आपल्याशी काय बोलायचं आहे याचाच विचार ती करत होती . तो समोर आला  तरी त्याच्याशी काय आणि कसं बोलावं हे तिला कळत नव्हतं . पण मनातली घालमेल तिला स्वस्थ बसू देत नव्हती . शेवटी न राहवून तिने त्याला विचारलं
   " तू काहीतरी बोलत होतास ना माझ्याशी ? काय बोलायचं होत तुला ? "
एकवेळ त्याने काहीतरी बोलण्यासाठी पवित्रा घेतला पण तो थांबला आणि थोड्या वेळ घेऊन म्हणाला

कथालेख

मिरगाचा पाऊस -अप्लाईड खगोलशास्त्र

हेमंत ववले's picture
हेमंत ववले in जनातलं, मनातलं
8 Jun 2018 - 4:18 pm

तीन वर्षापुर्वी बांबु लागवडीच्या वेळी गावातील काही स्थानिकांशी या बाबतीत मार्गदर्शन घेण्यासाठी म्हणुन चर्चा केली. त्यावर त्यांनी एक सृष्टीचा एक अलिखित नियमच सांगितला. कोणतेही झाड, रोप लावायचे असेल तर ते मिरगात च लावायचे. मिरीग जरी कोरडा गेला तरी रोपांची लागवड मिरगातच करायची. त्यानुसार आम्ही आमच्या कॅम्पसाईटवर बांबुची लागवड मिरगामध्ये केली. ज्या बांबुच्या रोपाला पुढ्च्या वर्षी फुलोरा आला, तेवढे सोडुन जवळ जवळ ९५% बांबुची रोपे जगली व पुढच्या वर्षी अगदी एप्रिल मे महिन्यामध्ये सुध्दा आमच्या बांबुंना जमीनीमधुन नवीन कोंब आले.

मांडणीलेख

एटलस सायकलीवर योग- यात्रा: भाग ५: अंबड - औरंगाबाद

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
5 Jun 2018 - 11:42 pm
आरोग्यविचारलेख

अनवट वाट ३

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
5 Jun 2018 - 7:13 am

" तुझ्याशी बोलताना किती वेळ गेला तेच समजलं नाही , खूप उशीर झाला आता , आता मला जायला हवं . "
" अगं एव्हढा वेळ काय बोलत होतो आपण ? आणि आता तू जायचं म्हणतेय . "
" म्हटलं ना खूप उशीर झालाय आता , चुकले असले तरीही आता फार पुढं निघून आले आहे मी , आता माघारी नाही फिरू शकत , तुला भेटले , बोलले छान वाटलं पण विचार केला मी , हे लोक खूप मोठे आहेत , आणि मी यांच्या मान सन्मानाची गोष्ट आहे , मी तुझ्यासोबत जाण्याचा विचार जरी केला तरीही ते तुझं काहीतरी बरंवाईट करतील आणि म्हणून नको , मनाने राहीन सोबत, पण खरोखर तुझ्या सोबत येण्याचा विचारही नाही करू शकत . "

कथालेख

पूर्वा ( भाग २ ) (सत्यकथेवर आधारित )

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 7:13 am

" अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . " राहुलची आई तिला बोलावत होती .
" हो येते ना काय करताय ? " - पूर्वा
" अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला. " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "
" अगं तुला कुठं हि काम सांगू . "
" अहो असू द्या हो मी करते हे . तुम्ही बघा किती दमलाय आणि किती घाम आलाय तुम्हाला . थोडा वेळ बसा तोपर्यंत होईल माझं . "

कथासमाजजीवनमानलेख

जीवनात ही घडी अशीच राहू दे

पुष्कर's picture
पुष्कर in जनातलं, मनातलं
3 Jun 2018 - 5:31 pm

मागच्या भागात (आकाश के उस पार भी आकाश है) आपण मँडेलब्रॉटने उपस्थित केलेला प्रश्न पहिला. त्या अनुषंगाने कोखचा वक्र आणि अपूर्णांक भूमिती याबद्दलही काही वाचले. या स्व-साधर्म्यामुळे अतिशय कमी क्षेत्रफळाच्या आत प्रचंड मोठ्या लांबीची रेष, रेष म्हणण्यापेक्षा वक्र, कसा काय सामावू शकतो ते पाहिले. सृष्टीमध्ये विलसत असलेले स्व-साधर्म्य मँडेलब्रॉटच्या ध्यानात आले आणि यातूनच प्रेरणा घेऊन त्याने आकृत्यांशी बरेच खेळ केले.

तंत्रलेख

पूर्वा ( भाग १ ) ( सत्यकथेवर आधारित )

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
3 Jun 2018 - 9:28 am

ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .

कथालेख