पूर्वा ( भाग २ ) (सत्यकथेवर आधारित )

अनाहूत's picture
अनाहूत in जनातलं, मनातलं
4 Jun 2018 - 7:13 am

" अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . " राहुलची आई तिला बोलावत होती .
" हो येते ना काय करताय ? " - पूर्वा
" अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला. " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . "
" अगं तुला कुठं हि काम सांगू . "
" अहो असू द्या हो मी करते हे . तुम्ही बघा किती दमलाय आणि किती घाम आलाय तुम्हाला . थोडा वेळ बसा तोपर्यंत होईल माझं . "
" बर बाई बसते मी . तू आलीस म्हणून मला जरा तरी आराम मिळाला नाहीतर काही सुचत नाही बघ . "
बोलता बोलता तिनं सगळं आवरून घेतलं . " चला झालं माझं . "
" अगं एव्हढ्यात झालंही कामाचा उरक चांगला आहे तुझा . " तिने कढई गॅसवर ठेवली . " काकू तूप कुठं आहे ? "
" अगं तूप कुठल , मी डालडाच वापरते . हे बघ इथे आहे . "
" आणि बेसन . "
" हे बघ इथं आहे . अगं तुला मदतीला बोलावलं आणि सगळं तूच करतेय . "
" त्यात काय बेसन लाडू आहेत . काय वेळ लागतो का त्याला ? "
" हो ग ते आहे पण म्हटलं सोबतीला कोणी असले म्हणजे बर वाटत म्हणून तुला बोलावलं तर इथं तूच सगळं करतेय . "
" अहो काही नाही कॉलेजमधून आल्यावर दुपारी मोकळीच असते . "
" अगं पण तुझी आई म्हणेल माझ्या लेकीला कामालाच ठेवून घेतली काय . "
" आई काही म्हणत नाही . मी येत जाईन . "
" बर बाई एक तू आहेस, नाहीतर आजकालच्या पोरी कोणत्याही कामाला हात लावत नाहीत . "
तिचं त्यांच्याकडे जाणं रोजचच झालं . त्यांनाही मदत होऊ लागली आणि बोलायलाही कोणीतरी भेटलं . दोघींचं छान जमायचं . पूर्वा आईपेक्षा त्यांच्याकडेच जास्त असायची . एकदा पूर्वाची आई आणि त्या बोलत बसलेल्या त्यात पूर्वा आणि तिची स्तुतीच जास्त असायची . " पूर्वा ज्या घरी जाईल तिथे नंदनवन करेल बर का . "

" काय रे काय झालं ? " - पूर्वा
" अगं आई थकलीय तिला नाही जमत नानांचं करायचं आणि तुला तर माहित आहेच कि तब्बेत ठीक नसते त्यांची . त्यांचं सगळं करावं लागत . स्पंज बाथ द्यावा लागतो आणि मला अभ्यासातून आणि बाकीच्या एक्टिविटीतून वेळ मिळत नाही " - राहूल
" मी करेन कि सगळं त्यांचं "
" अग तू कशी "
" का लग्न करून याच घरात यायचं ना मला , आता लग्न झालं असत तर केलाच असत ना , मग आता का नाही ? बायकोच आहे मी तुझी . "
त्यानं तिला मिठी मारण्याचा प्रयत्न केला
" उं आई आहेत "
" का बायकोच आहेस ना मग काय झालं
" मग काय सगळ्यांसमोर "
" मग रात्री ..."
" ए जा .... कुत्र्या "
" एक ठरव ना काहीतरी बायको आहेस कि नाहीस ? "
" आहे पण हे सगळं लग्नानंतर "
" तुझ्याशिवाय आता राहवत नाही ग , अशी नको ना राहूस माझ्यापासून दूर . "
" आहे रे मी तू तुझं शिक्षण पूर्ण कर मग आपण असू ना आयुष्यभर सोबत "

" काय साहेब आता वेळ नसतो तुम्हाला मला भेटायला . " - पूर्वा
" अगं काम असतात त्यातून नाही भेटत . " - राहूल
" अरे ऐक ना माझ्या घरी मला स्थळ सांगून यायला लागली आहेत "
" अरे वा चांगलं आहे कि मग "
" काय चांगलं आहे ? "
" अगं बघ एखादा चांगला आणि कर लग्न "
" काहीही काय बोलतोय माझं मी कस सहन करतेय आणि तुला चेष्टा सुचतेय माझी " तिच्या डोळ्यात पाणी आलं होत .
" अगं गम्मत केली मी , आपण करू हं लग्न कुणाशी बरं करूया ? "
" ए नको ना रे अशी चेष्टा आता मला सहन नाही होत . बोल ना एकदा घरी . "
" ठीक आहे आता खुश "
त्याच्या बोलण्यानेही तिला धीर आला .

त्याने घरी सांगितलं तिच्याबद्दल

" अरे कस शक्य आहे हे ती आपल्या जातीची आहे का ? लोक तोंडात शेण घालतील आपल्या
अग पण ती आपल्या घरातलं सगळं काम करत होती , स्वयंपाक करते , आजोबांचं सगळं केलं तिन "
" हे बघ यासाठी एखादी नर्स , कामवाली आणि स्वयंपाकीण असते, तिला घरातली सून नाही करत , सून तोलामोलाची आणि आपल्या जातीतीलच हवी . "
" मी तिला काय सांगू ? "
" कशाला काय सांगायचंय , पण तरीही सांगायचंच असेल तर सांग कि आई बाबांच्या शब्दाच्या बाहेर नाही मी , नाहीतर असं बोल कि ते स्वतःच्या जीवाचं बरंवाईट करतील , मी त्यांच्या शिवाय नाही राहू शकत . "

" पूर्वा , मी घरी सांगितलं आपल्याबद्दल पण घरचे नाही म्हणाले . "
" ए नको ना रे अशी चेष्टा करू मला भीती वाटते "
" चेष्टा नाही करत आहे मी खर सांगतोय मी , मी सांगितलं घरी मग बाबा खूप चिडले , आईनं तर जीव देईन अशी धमकीच दिली आहे . "
" का म्हणून मी तर नेहमी तुमच्या घरी येते , तेव्हा तर कुणाला काही वाटत नाही आई तर किती स्तुती करतात माझी बाबाही छान बोलतात . मग आता काय झालं .
" अगं ते वेगळं आहे आणि हे वेगळं आहे . इथे सून व्हायचं आहे तुला आणि त्यांना जातीतलीच मुलगी हवी आहे .
" इथं जात कुठं येते , तुमच्या घरात काही बनवलं तर ते आमच्या घरी येत आणि आमच्याकड काही बनवलं तर ते तुमच्याकडं पण येतच, शेजारी नातेवाईकच असतात तसेच आपण आहोत ना . तुमच्या घरी मी स्वयंपाक बनवते तेव्हा कुणाला काही वाटत नाही . मी घरातलं सगळं आपुलकीनं करते तेव्हा कुणाला काही वाईट वाटत नाही . मग आताच का . आई तर किती बोलतात भरभरून माझ्याबद्दल जिथं जाईन मी लग्न करून तिथं नंदनवन होईल असं म्हणत होत्या . मग आता असं का ? नाही मी बोलते एकदा त्यांच्याशी ऐकतील त्या माझं . आणि नंतर कशाला आताच बोलते मी " असं म्हणत ती जाऊ लागली . त्यानं तिला थांबवलं " थांब . तू असं काही करणार नाही तिनं तुला घरात घेऊन यायचं नाही, इतकच काय तिच्या समोरही आणायचं नाही असं सांगितलंय . ती जीवाचं काहीतरी बरंवाईट करेल . "
" पण मी आता काय करू मी तर तुझ्याशिवाय आयुष्याची कल्पनाच केली नव्हती . मी काय करू आणि कशी राहू . "
" होईल काहीतरी . बर मी निघतो मला काम आहे जायला हवं "
" प्लिज थांब ना असा नको ना रे जाऊस " पूर्वाने त्याला अडवण्याचा प्रयत्न केला .
" अगं काय करतेय तू सोड मला पाहिलं कोणीतरी काय म्हणतील "
त्यानं तिला दूर केलं आणि तो कोरडेपणान निघून गेला .

ती कितीतरी वेळ त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती आणि तिच्या डोळ्यातले अश्रू काही थांबत नव्हते . शेवटी ती उभ्याउभ्याच कोसळली . आवाज ऐकून आई बाहेर आली पूर्वा, अग पूर्वा काय झालं तुला ?

तिला हॉस्पिटलमधे घेऊन गेले . " काहीतरी शॉकमध्ये आहे ती त्यामुळे बीपी लो झालय तीच . जरा दोन दिवस राहूद्या हॉस्पिटलमधे अंडर ऑबसेर्व्हशन राहील मग सुट्टी देऊ . ओके बेटा टेक केअर .
थँक यु म्हणून ती कसनुसं हसली .

तीच लक्ष बाहेरून येणाऱ्या राहुल कडे गेलं तिच्या डोळ्यात एकदम चमक आली आणि ती उठून बसू पहात होती , तेव्हढ्यात तो म्हणाला काम आहे मला आता जायला हवं . काळजी घ्या असं अर्धवट तिच्याकडे आणि पटकन नजर वळवून तिच्या आईकडे पाहत तो निघाला जाताना हातातला बिस्किटचा पुडा त्याने टीपॉयवर ठेवला . ती कितीतरी वेळ त्या पुड्याकडे नुसतीच पाहत होती .

काही दिवसांनी तो आला
" माझं लग्न ठरलय "
" तू करणार आहेस "
" काय करू ? आईबाबांची तशी इच्छा आहे आणि मी त्यांच्या शिवाय नाही राहू शकत "
" आणि माझ्याशिवाय राहू शकतोस ? असू दे . तुला त्रास नाही देणार मी . जा तू कर तुझ्या घरच्यांच्या मनासारखं "

त्यानं जाताना पत्रिका दरवाजाशेजारी टेबलावर ठेवली . त्याच सगळंच ठरलं होत . तो फक्त पत्रिका द्यायला आला होता पण तीही द्यायची हिम्मत नाही झाली त्याची .

" काय करतो आहेस तू " पूर्वा दूर होण्याचा प्रयत्न करत म्हणाली .
" नवीन आहे का हे " - राहूल
" लग्न झालाय तुझं आता "
त्यानं आवेगाने तिला जवळ ओढलं
" पण माझं मन तुझ्यातच गुंतलय , कशी आहे ती ? मला अजिबात आवडत नाही ती तिच्याजवळ गेलं कि तुझी आठवण होते मग मी काय करू ? "
" तुमच्यामधे काही झालं नाही ? "
" नाही ग तुझ्याशिवाय कुणाचाही विचार नाही करू शकत मी ? " असं म्हणून त्यानं तिला जवळ ओढलं ओठांना ओठ भिडले होते मनातली तगमग शरीराच्या रूपानं बाहेर येऊ पाहत होती . त्याची बोट तिच्या पाठीवरून फिरत होती त्याचा हात पाठीमागे तिच्या ड्रेसमधे जाऊ पाहत होता तिने सगळी ताकत लावून त्याला स्वतःपासून दूर केलं " काय करतोय तू ? "
" नाही . आता मला तुझ्यापासून अजिबात दूर राहायचं नाही . मला आता तुझ्यासोबत पूर्णपणे एकरूप व्हायचं आहे . असं म्हणत तो परत तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करू लागला . तिने त्याला दूर लोटलं . " नाही . अजिबात नाही . कोण समजलास कोण मला तू ठेवलेली कि आणि कोण ? "
" अग तस नाही "
" तस असेल तर आधी तिच्यापासून दूर हो मगच माझ्याकडे ये "
" आईबाबांसाठी मी तिला नाही सोडू शकत "
" मग मला विसरून जा "
" तू मला थोडा वेळ दे . मी सोडतो तिला . " असं म्हणत तो परत तिच्या जवळ आला
" जेव्हा सोडशील तिला तेव्हा ये " त्याचा नाईलाज झाला .

" आधीच कॉम्प्लिकेशन्स होत्या आणि आता तर तीच मिसकॅरेज झालं , बहुदा ती आता परत कधीच आई नाही होऊ शकणार " - राहुल
" ती प्रेग्नेंट होती , तू तर म्हटला तू कधीच तिच्यासोबत .... मग हे कस " - पूर्वा
" अग एकदा असच झालं आमच्यात " - राहुल
" काय बोलतोय तू ? असच ?आणि एकदाच झालं कि रोज होत काय माहित ?आणि माझ्याकडून काय हवंय तुला ? आता फक्त माझं शरीर ? अरे मनापासून प्रेम केलं होत रे तुझ्यावर आणि तू ... छी घाण वाटतेय मला तुझी आणि माझीही . तू इतका नालायक आहे म्हणून तुझी आणि तुझ्यावर प्रेम केलं म्हणून माझी . तू निघ इथून . "

" आता लग्नाची इच्छा नाही " - पूर्वा
" अगं असं कस चालेल लग्न न करताच राहणार आहेस का ? " आई तिला समजावत म्हणाली .
" का काय फरक पडतो त्याने ? "
" ऐक असं सोपं नाही जगणं . "
" पण मला नाही करायचं लग्न . "
" अगं आता येणारेत ते . आता नुसती भेट तरी पुढचं पुढे पाहू . "आता तिचा निरुपाय झाला होता , ती तशीच अधुऱ्या मनाने भेटली त्यांना , त्यातल्यात्यात मुलगा जरा डिसेन्ट वाटलं . त्याने शेवटी दोघांनाच बोलायचं आहे असं सांगितलं . तिला जरा बर वाटलं . थोड्या इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या त्यानंतर त्याने ती त्याला आवडल्याचं सांगितलं आणि तिनंही स्पष्टपणे तिचं मत सांगावं असं सांगितलं . तिला हे आवडलं पण तिला त्याला अंधारात ठेऊन काही करायचं नव्हतं म्हणून स्वतःचा संपूर्ण पूर्वइतिहास सांगितला .

त्यानंतर काही क्षण शांततेत गेले . पुढे तो म्हणाला
" बर झालं हे तू आधी सांगितलंस "

तो बोलताना ठीक बोलला पण नंतर नकार आला त्यांचा .

" पूर्वा तू हे सगळ्यांना नको सांगत बसू प्रत्येकाला हे झेपणार नाही ,आणि तुझी बदनामी होईल "
" असुदे काय फरक पडतो बाय द वे मी आता कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा अभ्यास करते आहे
माहीत नाही माझं आयुष्य मला कुठं घेऊन जाईल आणि कुठं नाही पण चालते आहे, लढते आहे, चालायची थांबणार नाही, लढायची थांबणार नाही .

( ही कथा इथे संपते , पण ख-या आयुष्यात इथूनच तर खरी सुरूवात होते )

कथासमाजजीवनमानलेख

प्रतिक्रिया

श्वेता२४'s picture

4 Jun 2018 - 10:10 am | श्वेता२४

शेवटचे वाक्य एकदम पटले. खूप जणांच्यया आयुष्यात थोड्याफार फरकाने घडणारी गोष्ट. आंतरजातीय प्रेम करणं खूप सोपं, लग्न करून संसार करणं अवघड आणि त्यानंतर ते नातं आयुष्यभर निभावणं आणि फुलवणे कठीण

अनाहूत's picture

5 Jun 2018 - 10:09 pm | अनाहूत

धन्यवाद

रातराणी's picture

4 Jun 2018 - 11:02 am | रातराणी

कथा आवडली.

अनाहूत's picture

5 Jun 2018 - 10:09 pm | अनाहूत

धन्यवाद

कथा आवडली. सत्यकथा आहे तर त्याच्या एक सणसणीत कानाखाली दिली असती तर जरा जास्तच आवडली असती.

इथच तर प्रॉब्लेम येतो , इतक होउनही
ढग दाटून आले कि मनातही दाटून येत . तुझ्या आठवणींच्या सावल्या मनात रुंजी घालू लागतात . डोळ्याच्या कडा अलगद ओल्या होऊ लागतात आणि पाऊस सुरु होतो जणूकाही सगळी सृष्टीचं माझ्यासोबत रडते आहे . हा धुंद गार वारा घेऊन जातो मला भूतकाळात जिथे तू होतास , मी होते , आपण होतो ... सोबत .
समोरचा चुकीचा असला तरी तिच्या भावना ख-या होत्या

श्वेता२४'s picture

5 Jun 2018 - 10:44 pm | श्वेता२४

असं वाटतं कधी कधी. पण अशी फसवणूक झाल्यावर व्यवहारी निर्णय घ्यायला हवा

निर्णय तर घेतला आहे तिने , पण भूतकाळ विसरता येत नाहीये इतकच .