इतिहास

सपाट पृथ्वी; वस्तुस्थितीस नकार; मानसशास्त्र आणि सोडवणूक

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
23 Feb 2014 - 7:07 pm

पृथ्वी गोल आहे हे विज्ञानानी सांगितलेल सत्य आपण बहुसंख्य भारतीय लोक बर्‍यापैकी सहजतेन स्विकारतो नाही ? पृथ्वी गोल आहे हे सत्यच आहे पण युरोपियन आणि ख्रिश्चन लोकांना हे सत्य स्विकारण एककाळी कठीण गेल हे ठिक पण आजही आमेरीकेत फ्लॅट अर्थ सोसायटी आहे ज्यांच्या मतानुसार पृथ्वी सपाटच आहे. हा विनोद नाही आजच्या काळात अत्यल्प असेल पण एका अत्याधुनिक राष्ट्रातलेही काही नागरीक का होईनात वस्तुस्थितीस नाकारतात.

कल्की

निलरंजन's picture
निलरंजन in जनातलं, मनातलं
22 Feb 2014 - 3:37 pm

कल्की अवतार हा विष्णूचा अंतिम अवतार आहे
असे म्हटले जाते की
कलियुगा मध्ये अशी
वेळ येईल की लोक खूप वाईट वागतील. जगाला हया संकटातून मुक्त करण्यासाठी
कल्की अवतार पृथ्वीवर येतील, आणि जगातून वाईट गोष्टी नष्ट करेल
तो जे वाईट वागेल त्याला ठार मारेल. लोक नंतर बदलतील, आणि चांगले लोक तयार होतील.
त्यानंतर नवीन टप्पा सत्ययुग सुरू होईल

संस्कृतीधर्मइतिहासलेख

म्हणून नथुराम उजवा ठरतो.....

महेश_कुलकर्णी's picture
महेश_कुलकर्णी in काथ्याकूट
20 Feb 2014 - 12:23 pm

गेले २-३ दिवस, २३ वर्षापासून रखडलेल्या राजीव गांधी हत्या प्रकरणातील दोषींच्या कारवाईवरून वेगवेगळया घडामोडी घडत आहेत. दया याचिकेची वेळीच दखल न घेतल्याने आपोआपच दोषींची फाशी रद्द होवून शिक्षेचे जन्ठेपेमध्ये रुपांतर झाले. इकडे लगेच तामिळनाडू सरकारने तमिळ अस्मिता दाखवत दोषींना सोडण्याचा निर्णय घेतला. पंतप्रधानाची हत्या करून देखील फक्त भाषेची अस्मिता म्हणून त्या ‘दहशतवादा’चे समर्थन होते हे खरेच शोचनीय आहे. देशाला अग्रक्रमी(Nation First) ठेवून निर्णय घेणारा राजकीय पक्ष अथवा सरकारी धोरणे सध्या अभावाने पाहायला मिळतात.

लोकमान्य टिळकांनी लिहिलेल्या; श्री. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलच्या गौरवपर अग्रलेखाचा इंग्रजीते मराठी अनुवाद

माहितगार's picture
माहितगार in जनातलं, मनातलं
18 Feb 2014 - 2:44 pm

१९ फेब्रुवारी हि आपणा सर्वांना प्रीय लोकोत्तर श्री छत्रपती शिवरायांची जयंती आहे. या निमीत्ताने मराठी विकिस्रोताच्या माध्यमातून आणि मिपा. धाग्याच्या साहाय्यातून साकार झालेल्या अनुवाद प्रयास (अनुवाद (पर्याय १ला)) आपणा समोर सादर करत आहे.

इतिहाससाहित्यिकविचारआस्वादसमीक्षालेखप्रतिभाभाषांतर

"महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास......

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
11 Feb 2014 - 10:28 am

मी.पा. च्या दिवाळी अंकामध्ये शिवोssहम यांनी "तालीम" ही खूप चांगली कथा लिहली. एकेकाळी राजाश्रय मिळालेल्या या उपेक्षित कुस्ती प्रकाराबद्दल त्यांनी खूप चांगले लिहून पुन्हा ते सोनेरी क्षण डोळ्यापुढे उभे केले. आजही "महाराष्ट्र केसरी" "हिंद केसरी" या सारख्या स्पर्धा इथे भरतात. यातील "महाराष्ट्र केसरी" स्पर्धेच्या सुरुवातीचा इतिहास सांगण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न !

इतिहासमाहिती

काही प्रश्न सतावणारे...

अत्रन्गि पाउस's picture
अत्रन्गि पाउस in काथ्याकूट
7 Feb 2014 - 7:42 pm

१. असे वाचले आहे कि औरंगजेबाच्या काळात (किंवा त्या आधीही कदाचित)भारत युरोप ह्यांच्यात व्यापार होता ..म्हणजे भारतीय व्यापारी सुद्धा मोठ्या प्रमाणात युरोपात ये जा करत... हे खरंय? असेल तर कसा कोणता ?
२. पाश्चात्य देशात गेलेला पहिला भारतीय कोण ?
२.१ भारतात आलेला पहिला पाश्चात्य कोण? तो व्यापाराकार्तच आला कि अजून काही..

यादवी माजली

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
6 Feb 2014 - 11:25 pm

यादवी युद्ध किंवा यादवी माजली हे शब्द आपण वर्तमानपत्रांतुन बर्‍याचदा वाचत असु कदाचित. पण या शब्दाचा उगम कदाचित आपल्याला माहिती नसेल. आजच्या काळाचा विचार करता याचा संबंध बिहारच्या लालुप्रसाद यादवांशी जोडण्याचा प्रयत्न केला जाइल. या सत्शील माणसापाठी या असल्या भयंकर शब्दाचा उगम जोडला जाउ नये या साठी हा लेखन प्रपंच. "यादवी माजली" या शब्दामागे आहे खरे सांगायचे तर एक आद्य अट्टलबिहारी. वाजपेयी नव्हेत. खरोखरचा अट्टल बिहारी. श्रीकृष्ण. (अटलबिहारी म्हणजे माझ्या मते विष्णुचा आठवा अथवा सर्वात महत्वाचा अवतार.)

धर्मइतिहाससाहित्यिकविचारलेख

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे ...

सुहास झेले's picture
सुहास झेले in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 3:32 pm

जनसेवा समिती विलेपारले आयोजित, इतिहासाचार्य स्मृती ह्या एकदिवसीय अभ्यासवर्गास जाण्याचा रविवारी योग आला. ह्या आधीही असे अनेक अभ्यासवर्ग आयोजित केले होते, जसे पानिपतचा महासंग्राम, दुर्ग जिज्ञासा, प्रतापसूर्य बाजीराव पेशवे, महाराजांचा दक्षिण दिग्विजय आणि त्यास न चुकता मी हजेरीही लावली होती. ह्यावेळेस अभ्यासवर्गाचा विषय खूपच वेगळा होता. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, पेशवाई, युद्धनीती, गडकोट, अश्या रंजक आणि पराक्रमाने भारावलेल्या विषयावर अभ्यासवर्ग आयोजित न करता, एका थोर इतिहास संशोधकाचा परिचय आजच्या पिढीला करून देणे, हा ह्या अभ्यासवर्गाचा उद्देश होता.

इतिहासवाङ्मयप्रकटनविचारअनुभवमाहिती

दुर्योधन

मृत्युन्जय's picture
मृत्युन्जय in जनातलं, मनातलं
5 Feb 2014 - 2:59 pm

अतिदानात बलिर्बद्धो , अतिमानात सुयोधन:|
विनष्टो रावणो लौल्यात , अति सर्वत्र वर्जयेत ||

अतिरेकी दानशूरते पायी बळीराजा पाताळात गेला, अतिगर्विष्टपणाने दुर्योधन आणि अति स्त्रीलोभाने रावण नष्ट झाला. कोणत्याच गोष्टीमध्ये अतिरेक करू नये हेच खरे.

एक अतिरेकी अहंकार सोडला तर दुर्योधनाने त्याचे आयुष्य अतिशय सूत्रबद्ध रीत्या जगले आणि उपभोगले. पण दुर्दैवाने श्लील - अश्लीलतेची एक पुसटशी रेखा आणि अभिमान - अहंकार यातील फरक ओळखु न शकल्याने किंवा ओळखुनही आचरणात न आणु शकल्याने धृतराष्ट्राच्या या पोराने कमावलेले सगळे गमावले.

इतिहासलेख