ढिस्क्लेमर :-
१) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही.
२) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही.
मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले. तर आजच्या ह्या लेखात आपण डुप्लिकेट आयडी कसे काढावेत व कसे सांभाळावेत ह्याचे मार्गदर्शन घेणार आहोत.
मला विचाराल तर खरे म्हणजे डुप्लिकेट आयडी कधी काढूच नयेत. काय आहे, की ह्या आयडीने कुणाची खेचल्यावरती, रेवडी उडवल्यावरती, चार शब्द सुनावल्यावरती देखील मनापासून समाधान असे मिळत नाही. आणि मिळाले तरी दर्शवता येत नाही.
असो..
तर आता एकदा डुप्लिकेट आयडी काढायचे ठरवले की मग दुसरा कुठलाही विचार मनात आणू नये. 'जगातील प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतोच !' असे कोणा थोर तत्त्वज्ञानी माणसाने सांगितले आहेत. त्याच प्रमाणे 'आंतरजालावरील प्रत्येक सदस्याच्या मनात एकदा तरी डुप्लिकेट आयडी काढण्याचा विचार हा येतोच!' हे सत्य देखील जाणावे. मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये. एकदा का विचार पक्का झाला की ताबडतोब कामाला लागावे.
डुप्लिकेट आयडी काढण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. :-
१) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता.
२) डुप्लिकेट आयडी साठी शक्यतो नाव आणि आडनाव असे निवडावे. शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो आणि संशय देखील घेतला जाण्याचे चान्स कमी होतात.
३) स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा. ताबडतोब काम झालेच समजा.
४) नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात.
५) आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो.
आता एकदा का आयडी अॅप्रुव्ह झाला की तो वापरणे, टिकवणे आणि त्याला विश्वासपात्र बनवणे हे सगळ्यात जिकरीचे काम. त्यासाठी मेहनत आणि संयम सगळ्यात महत्त्वाचे. ह्या कामात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जाणे आवश्यक आहे. :-
१) डुप्लिकेट आयडी अॅप्रुव्ह झाल्या झाल्या संस्थळावरती धाव घेऊ नये.
२) शक्यतो पहिले चार / पाच दिवस निव्वळ वाचनमात्र राहावे. 'कधी एकदा माझ्या विरोधकांना इंगा दाखवतो' हा विचार अशा काळात मनात सतत उसळ्या मारत असतो, अशा वेळी संयम अतिशय आवश्यक.
३) वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्हाड मारून घ्याल.
४) खरडवहीच्या स्वागत मजकुरात, नवीन असताना शक्यतो जि. ए. , व. पु. ह्यांच्या कथा / कादंबरी मधील एखादा उतारा, अथवा कोंकणातल्या खेड्याचे चित्र किंवा ग्रेस, सुरेश भट इत्यादींचे पद्य लावावे.
५) ह्या काळात विनाकारण स्त्री सदस्यांच्या खरडवहीत जाऊन 'हाय हॅलो' करण्याची, त्यांच्या धाग्यावरती 'भावमारू' प्रतिसाद देण्याची, आपल्याला कोणी ओळखले आहे का ह्याची चाचपणी करण्याची जाम सुरसुरी येते. पुन्हा एकदा संयम धरावा. नाही धरवला तर सरळ लॉग आऊट करावे, मात्र तोल ढळू देऊ नये.
६) नवे नवे डुप्लिकेट खाते घेऊन दिवस दिवस जालावरती पडीक राहू नये. कुठल्याच नवीन सदस्याला एका दिवसात इतकी गोडी लागत नाही ह्याचे भान ठेवावे.
७) विनाकारण डुप्लिकेट आयडीसाठी भारंभार प्रॉक्सी, शेल वापरणे असले चाळे करू नयेत.
८) स्त्री सदस्यांनी आपले डुप्लिकेट आयडी घेऊन आल्या आल्या काथ्याकूट, ललित असल्या धाग्यांवरती भरार्या मारू नयेत. आणि पुरुष सदस्यांनी आपले डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन कविता, पाकृ अशा ठिकाणी तोंड मारू नये.
९) डुप्लिकेट आयडी पुरुष नावाने असल्यास शक्यतो एखाद्या व्यक्तिचित्रावरती, माहितीच्या धाग्यावरती किंवा कलादालनात प्रतिक्रिया देऊन लिखाणाला सुरुवात करावी.
१०) डुप्लिकेट आयडी स्त्री नावाने असल्यास शक्यतो कविता, पाकृ अथवा कलादालन अशी सुरुवात करावी.
११) आपले राहण्याचे ठिकाण हे उगाच परदेशात असल्याचे भासवू नये. थोडे जरी अज्ञान उघडे पडले तरी निवासी आणि अनिवासी दोघेही तुमच्या अब्रूची लक्तरे काढतील. तेव्हा शक्यतो आपले राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, आंबेजोगाई गेला बाजार बेळगाव, हल्याळ, छत्तिसगढ असे सांगावे. इकडे शक्यतो कोणी अंतराळवीर फिरकण्याचे चान्सेस नसतात. आणि फिरकलाच तरी ताबडतोब आपण सध्या ट्रेनिंगसाठी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलारूला आलो आहोत असे ठोकून द्यावे.
१२) पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे.
१३) अधे मध्ये लोड शेडिंग, खतांचा काळाबाजार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्याविषयी देखील इकडे तिकडे चर्चा करत फिरण्यास विसरू नये. आयडी स्त्री नामाने असल्यास 'पाडस' , 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'राणी वर्मा' असले विषय घेऊन खरडवह्यांत बोंबलत हिंडावे.
१४) आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ते लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
आणि सगळ्यात महत्त्वाचे :-
१५) डुप्लिकेट आयडी मिळाल्यापासून वरील सर्व पायर्या पूर्ण होईतो चुकून देखील विरोधकाच्या धाग्यावरती गरळ ओकण्याचा, स्वतःची जिलबी पाडण्याचा आणि कोणाच्याही खरडवहीत पांढर्याचे काळे करण्याचा अट्टहास करू नये.
१६) अगदीच न राहवल्यास 'मराठी लिहिण्यास मदत' ह्या धाग्यावरती नाक खुपसावे.
१७) कितीही शहाणपणा केला, अक्कल लावली तरी कुठल्याही संस्थळाच सर्व्हर अॅडमीन हा प्रत्येक डुप्लिकेट आयडीचा 'चित्रगुप्त' असतो हे कधीही विसरू नये.
अशा सर्व पायर्या यशस्वी पार पाडल्यात की तुमच्यावरती ५०% सच्चेपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. त्यानंतरचे ५०% अधिक सावधपणे पार पाडणे तुमच्या हातात.
आशा करतो की ह्या मार्गदर्शनाने तुम्हाला बहुमोल अशी मदत मिळेल. मिपावरील इतर जाणकार देखील ह्या मार्गदर्शनात भर घालतीलच.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
10 Nov 2015 - 12:53 pm | सागरकदम
हा लाल नाही
magneta आहे
10 Nov 2015 - 12:56 pm | टवाळ कार्टा
बरं मग?
10 Nov 2015 - 6:45 pm | सुबोध खरे
delusions of grandeur
https://en.wikipedia.org/wiki/Grandiose_delusions
10 Nov 2015 - 6:51 pm | पियुशा
कहि ये अमितपतिल तो नही;)
4 Nov 2015 - 8:03 pm | टवाळ कार्टा
आज्काल आपण डुआयडी आहोत हे मिरवणे हे इनथिंग आहे
6 Nov 2015 - 1:26 pm | मांत्रिक
काय झकास पंच मारला!!!
6 Nov 2015 - 1:43 pm | कंजूस
खरं सांगायचं आणि खोटं नाही बोलता येत -आमचे दोन डुआइडी आहेत आणि ते आम्ही लैट गेल्यावर हातपंखा जसा जपून वापरतो ( कारण हात दुखतात )तसे वापरत आहोत. एका खरंतर दोन गोष्टींचे वैट वाटते की आणखी दोन डुआइडी नोंदणीसाठी टाकले आणि मिपाचे दरवाजे बंद होताना त्यात चिमटले.
7 Nov 2015 - 6:21 pm | पगला गजोधर
हे वाक्य आधी मी चुकून
असे वाचलेले. वाचल्यावर शरीरात सूक्ष्म कळ आली ( कुठे ते विचारू नका ) डोळ्यासमोर अंधारात घामाघूम झालेली व हात दुखावलेली व्यक्ती आली. मग परत नीट वाचल्यावर मनातील गोंधळ शमला
7 Nov 2015 - 7:23 pm | टवाळ कार्टा
=))
निदान हातपंप म्हटल्यावर सनी पाजीचा हातपंप उखाडण्याचा सीन तरी आठवायचा
7 Nov 2015 - 10:51 pm | बॅटमॅन
या संदर्भात त्या शीनचा अर्थ लावावयाचा तर "वसतिगृह भाग २" नामक विंग्रजी चित्रपटातील काही दृश्ये पहावी लागतील. =))
8 Nov 2015 - 12:06 am | टवाळ कार्टा
यक्क....काय फाल्तू पिच्चर आहे तो
7 Nov 2015 - 7:23 pm | खटपट्या
आवरा...
7 Nov 2015 - 7:29 pm | अद्द्या
bhaat सांडला सगळ्या ताटातला च्यायला
=]]]]]
10 Nov 2015 - 3:38 pm | सूड
अर्र!! लैच!!
6 Nov 2015 - 1:49 pm | कंजूस
आज्काल आपण डुआयडी आहोत हे मिरवणे हे इनथिंग आहे---अशा प्रतिसादांनी उत्साह वाढतो. हे सांगायचं राहिलं.परंतू खंत अशी आहे की पंचेस मारायला पंचिंग बॅगज उर्फ भुशाची पोती न उसवणारी शोधावी लागतात.
7 Nov 2015 - 12:28 pm | ब्रिटिश टिंग्या
डुआयडी धाग्यावर माझा प्रतिसाद नाही? हा धागा कसा काय मिसला?
असो, दुसर्या आयडीने सविस्तर प्रतिसाद देतो.....थोड्या एक्सेल शीटा ढुंढाळाव्या लागतील....
10 Nov 2015 - 12:59 pm | सागरकदम
मी वर आणला म्हणून सगळ्यांना दिसला
10 Nov 2015 - 1:24 pm | टवाळ कार्टा
मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी
7 Nov 2015 - 4:01 pm | अद्द्या
पऱ्याला बोलवा रे कोणी तरी . . (जर नसेल दुसऱ्या आयडी नि तर )
३ वर्षांनी परत पेटलाय म्हणावं धागा तुझा
10 Nov 2015 - 1:41 pm | सागरकदम
अहो मी पेतावलाय धाग्याला
7 Nov 2015 - 7:49 pm | जेपी
शंभरी उलटल्याबद्दल श्री.परा आणी श्री.प्यारे 1 यांचा सत्कार एक निरमा सुपर बार,एक धोपाटणे आणी धुणे धुण्यास एक धोंडा देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम धोबीघाट कार्यकर्ते.
7 Nov 2015 - 9:16 pm | अत्रुप्त आत्मा
@यांचा सत्कार एक निरमा सुपर बार,एक धोपाटणे आणी धुणे धुण्यास एक धोंडा देऊन करण्यात येत आहे.
शुभेच्छुक-जेपी आणी तमाम धोबीघाट कार्यकर्ते.>>>
9 Nov 2015 - 9:40 am | नाखु
ध्ण्यवाद
कार्यकर्ता.
7 Nov 2015 - 9:44 pm | उडन खटोला
सर्वानी शान्ती ठेवावी !
किमान शान्ताबाई चा व्हिडियो तरी पहावा !
अशी णम्र इणन्ती !
शान्तीचा उपासक (आणि शान्ताबाई चा फॅन) = उ.ख.
7 Nov 2015 - 10:01 pm | मांत्रिक
लिंक द्या महाराज उडनखटौलाजी!
7 Nov 2015 - 11:06 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
हर बार हुआ है जो, वही तो नहीं होगा
डर जिसका सताता है, अभी तो नहीं होगा
दुनिया को चलो परखे, नए दोस्त बनाये
हर शख्स ज़माने में, वही तो नहीं होगा
वो शख्स बड़ा है तो गलत हो नहीं सकता
दुनिया को भरोसा ये, अभी तो नहीं होगा
है उसका इशारा भी समझने की जरुरत
होगा तो कभी होगा, अभी तो नहीं होगा
दो चार गड़े मुर्दे उखाड़ेंगे किसी रोज
हर बार नया झगडा, तभी तो नहीं होगा
कुछ और भी हो सकता है तक़रीर का मतलब
जो तुमने सुना सिर्फ, वहो तो नहीं होगा
हर बार ज़माने का सितम होगा मुझी पर
हाँ; मै ही बदल जाऊ कभी, तो नहीं होगा
- अलोक श्रीवास्तव
9 Nov 2015 - 11:11 pm | सागरकदम
बाकी व्यासंग चांगला
10 Nov 2015 - 1:42 pm | याॅर्कर
असं हाय तर सगळं
10 Nov 2015 - 11:18 pm | डॉ सुहास म्हात्रे
तुमच्या आयडीतही "कर" आहे म्हणून ती पास झाली का !? ;)