ढिस्क्लेमर :-
१) हा धागा निव्वळ मनोरंजनाच्या हेतूने काढला असून, कोणत्याही गैरकृत्याला उत्तेजन देण्याचा हेतू नाही.
२) धाग्यातील युक्त्या वापरून देखील आपण तोंडावरती पडल्यास लेखक जबाबदार नाही.
मित्र हो, काल आमचे मित्र श्री. मृत्युंजय ह्यांची एक प्रतिक्रिया वाचून आम्हाला फारच दु:ख झाले. येवढी वर्षे आंतरजालावरती काढून देखील अजून बर्याच सदस्यांना डुप्लिकेट आयडी बद्दलचा अभ्यास कमी पडतो आहे हे पाहून आता ह्यावरती मार्गदर्शन केलेच पाहिजे हे आम्ही जाणले. तर आजच्या ह्या लेखात आपण डुप्लिकेट आयडी कसे काढावेत व कसे सांभाळावेत ह्याचे मार्गदर्शन घेणार आहोत.
मला विचाराल तर खरे म्हणजे डुप्लिकेट आयडी कधी काढूच नयेत. काय आहे, की ह्या आयडीने कुणाची खेचल्यावरती, रेवडी उडवल्यावरती, चार शब्द सुनावल्यावरती देखील मनापासून समाधान असे मिळत नाही. आणि मिळाले तरी दर्शवता येत नाही.
असो..
तर आता एकदा डुप्लिकेट आयडी काढायचे ठरवले की मग दुसरा कुठलाही विचार मनात आणू नये. 'जगातील प्रत्येक माणसाच्या मनात एकदा तरी आत्महत्येचा विचार हा येतोच !' असे कोणा थोर तत्त्वज्ञानी माणसाने सांगितले आहेत. त्याच प्रमाणे 'आंतरजालावरील प्रत्येक सदस्याच्या मनात एकदा तरी डुप्लिकेट आयडी काढण्याचा विचार हा येतोच!' हे सत्य देखील जाणावे. मुळात अनेक संस्थळांवरती संस्थळ चालकांचे आणि संपादकांचे देखील खोर्याने डुप्लिकेट आयडी असतात, त्यामुळे आपल्या डुप्लिकेट आयडी काढण्यात काही अपराधी भावना अथवा लाज बिलकुल बाळगू नये. एकदा का विचार पक्का झाला की ताबडतोब कामाला लागावे.
डुप्लिकेट आयडी काढण्याआधी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात घेणे गरजेचे असते. :-
१) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता.
२) डुप्लिकेट आयडी साठी शक्यतो नाव आणि आडनाव असे निवडावे. शक्यतो आडनावात 'कर' असल्यास, तुमच्या आयडी लगेच पास होतो आणि संशय देखील घेतला जाण्याचे चान्स कमी होतात.
३) स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा. ताबडतोब काम झालेच समजा.
४) नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात.
५) आयडी घेताना इंडिया टाईम्स, रेडीफ, मेल डॉट कॉम असल्या आता कोणी वापरत नसलेल्या ईमेल प्रोव्हाइडर्सकडे ईमेल आयडी उघडून मग तो ईमेल नव्या खात्याच्या नोंदणी साठी वापरावा. ह्यामुळे तुम्ही इंटरनेटवरती बरेच आधी पासून वावरत असल्याचा उगाच भास निर्माण होतो.
आता एकदा का आयडी अॅप्रुव्ह झाला की तो वापरणे, टिकवणे आणि त्याला विश्वासपात्र बनवणे हे सगळ्यात जिकरीचे काम. त्यासाठी मेहनत आणि संयम सगळ्यात महत्त्वाचे. ह्या कामात काही गोष्टी आवर्जून पाळल्या जाणे आवश्यक आहे. :-
१) डुप्लिकेट आयडी अॅप्रुव्ह झाल्या झाल्या संस्थळावरती धाव घेऊ नये.
२) शक्यतो पहिले चार / पाच दिवस निव्वळ वाचनमात्र राहावे. 'कधी एकदा माझ्या विरोधकांना इंगा दाखवतो' हा विचार अशा काळात मनात सतत उसळ्या मारत असतो, अशा वेळी संयम अतिशय आवश्यक.
३) वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्हाड मारून घ्याल.
४) खरडवहीच्या स्वागत मजकुरात, नवीन असताना शक्यतो जि. ए. , व. पु. ह्यांच्या कथा / कादंबरी मधील एखादा उतारा, अथवा कोंकणातल्या खेड्याचे चित्र किंवा ग्रेस, सुरेश भट इत्यादींचे पद्य लावावे.
५) ह्या काळात विनाकारण स्त्री सदस्यांच्या खरडवहीत जाऊन 'हाय हॅलो' करण्याची, त्यांच्या धाग्यावरती 'भावमारू' प्रतिसाद देण्याची, आपल्याला कोणी ओळखले आहे का ह्याची चाचपणी करण्याची जाम सुरसुरी येते. पुन्हा एकदा संयम धरावा. नाही धरवला तर सरळ लॉग आऊट करावे, मात्र तोल ढळू देऊ नये.
६) नवे नवे डुप्लिकेट खाते घेऊन दिवस दिवस जालावरती पडीक राहू नये. कुठल्याच नवीन सदस्याला एका दिवसात इतकी गोडी लागत नाही ह्याचे भान ठेवावे.
७) विनाकारण डुप्लिकेट आयडीसाठी भारंभार प्रॉक्सी, शेल वापरणे असले चाळे करू नयेत.
८) स्त्री सदस्यांनी आपले डुप्लिकेट आयडी घेऊन आल्या आल्या काथ्याकूट, ललित असल्या धाग्यांवरती भरार्या मारू नयेत. आणि पुरुष सदस्यांनी आपले डुप्लिकेट स्त्री आयडी घेऊन कविता, पाकृ अशा ठिकाणी तोंड मारू नये.
९) डुप्लिकेट आयडी पुरुष नावाने असल्यास शक्यतो एखाद्या व्यक्तिचित्रावरती, माहितीच्या धाग्यावरती किंवा कलादालनात प्रतिक्रिया देऊन लिखाणाला सुरुवात करावी.
१०) डुप्लिकेट आयडी स्त्री नावाने असल्यास शक्यतो कविता, पाकृ अथवा कलादालन अशी सुरुवात करावी.
११) आपले राहण्याचे ठिकाण हे उगाच परदेशात असल्याचे भासवू नये. थोडे जरी अज्ञान उघडे पडले तरी निवासी आणि अनिवासी दोघेही तुमच्या अब्रूची लक्तरे काढतील. तेव्हा शक्यतो आपले राहण्याचे ठिकाण चंद्रपूर, उस्मानाबाद, गडचिरोली, आंबेजोगाई गेला बाजार बेळगाव, हल्याळ, छत्तिसगढ असे सांगावे. इकडे शक्यतो कोणी अंतराळवीर फिरकण्याचे चान्सेस नसतात. आणि फिरकलाच तरी ताबडतोब आपण सध्या ट्रेनिंगसाठी मुंबई, दिल्ली किंवा बेंगलारूला आलो आहोत असे ठोकून द्यावे.
१२) पुणे, मुंबई ह्या विषयावरचे धागे आणि वाद ह्यापासून दूर राहावे. कधी तुमची अस्मिता उफाळून येईल आणि तुम्हाला गोत्यात आणेल ह्याची तुम्हाला देखील कल्पना येणार नाही. शक्यतो 'बाप रे तो मुंबईच्या लोकल्सचा भुलभुलय्या एकदाच अनुभवला होता आणि अचंबित झालो होतो' किंवा 'पुण्यात मंडईत भाज्यांचे ढीग बघून खूप मौज वाटली होती' असले प्रतिसाद देऊन आपण बाहेरचे असल्याचे वारंवार सिद्ध करत जावे. वाद विवाद घालताना 'पुण्या मुंबईच्या लोकांना त्यांनाच सगळे काय ते कळते असे का वाटते कोणास ठाऊक' अशी प्रतिक्रिया देणे तुम्हाला मस्ट आहे.
१३) अधे मध्ये लोड शेडिंग, खतांचा काळाबाजार, ग्रामपंचायतीच्या निवडणुका ह्याविषयी देखील इकडे तिकडे चर्चा करत फिरण्यास विसरू नये. आयडी स्त्री नामाने असल्यास 'पाडस' , 'सुन्या सुन्या मैफलीत माझ्या', 'राणी वर्मा' असले विषय घेऊन खरडवह्यांत बोंबलत हिंडावे.
१४) आपण ज्या प्रोफेशन मध्ये आहोत ते लपवण्याचा प्रयत्न कधीही करू नये.
आणि सगळ्यात महत्त्वाचे :-
१५) डुप्लिकेट आयडी मिळाल्यापासून वरील सर्व पायर्या पूर्ण होईतो चुकून देखील विरोधकाच्या धाग्यावरती गरळ ओकण्याचा, स्वतःची जिलबी पाडण्याचा आणि कोणाच्याही खरडवहीत पांढर्याचे काळे करण्याचा अट्टहास करू नये.
१६) अगदीच न राहवल्यास 'मराठी लिहिण्यास मदत' ह्या धाग्यावरती नाक खुपसावे.
१७) कितीही शहाणपणा केला, अक्कल लावली तरी कुठल्याही संस्थळाच सर्व्हर अॅडमीन हा प्रत्येक डुप्लिकेट आयडीचा 'चित्रगुप्त' असतो हे कधीही विसरू नये.
अशा सर्व पायर्या यशस्वी पार पाडल्यात की तुमच्यावरती ५०% सच्चेपणाचा शिक्का बसलाच म्हणून समजा. त्यानंतरचे ५०% अधिक सावधपणे पार पाडणे तुमच्या हातात.
आशा करतो की ह्या मार्गदर्शनाने तुम्हाला बहुमोल अशी मदत मिळेल. मिपावरील इतर जाणकार देखील ह्या मार्गदर्शनात भर घालतीलच.
धन्यवाद.
प्रतिक्रिया
19 Apr 2012 - 1:07 pm | गवि
हायला.
काय अँगल आहे.. काय सूक्ष्म तपशील आहेत..
भलता जबरी मुद्दा हो.. डोक्याच्या सुपीकतेस दाद देत आहे..
19 Apr 2012 - 1:14 pm | कुंदन
विकांताला जाऊन वाळवंटात समाधी घेतो मी आता.
19 Apr 2012 - 1:21 pm | sneharani
परा पुन्हा एकदा फुल्ल फार्मात!
हसून हसून पुरेवाट झालीये.
=)) =)) =))
मज्जा आली वाचायल्ला.
अवांतर : आता डुप्लीकेट आयडी कसे ओळखावे यावर एक मार्गदर्शनपर लेख लिहावा ही विनंती !! ;)
19 Apr 2012 - 1:20 pm | इरसाल
जर ५०% हा सक्सेस रेट असेल तर आजच मी नवा आयडी स्वारी स्वारी डुआयडी घेतोच.
अवांतर : समजा मी कुंपणीच्या जालावरुन एक आय्डी आणि घरच्या जालावरुन दुसरा आय्डी घेतला तर..........आणि माझ्या भ्रमणध्वनीचा जीपीआरएस चालु असेल तर ...........देवा देवा देवा......:O
१. कुंपणीचा नेट -------पहिला आयडी J)
२.घरचे नेट-------दुसरा आयडी (रिलांयस, बीएसएनएल, तत्सम.) J) J)
३.भ्रमणध्वनी------तिसरा आयडी (आयडीया, एयरटेल, तत्सम) J) J) J)
19 Apr 2012 - 1:58 pm | नुपूर
फक्त तीनच आयडी नै कै...
संगणकावरच्या प्रत्येक ब्राऊजर मध्ये एक!! या ड्रुपलला फरक कळत नाही!!
19 Apr 2012 - 1:25 pm | पियुशा
भन्नाट सुट्लायेस रे ;)
ज.ब.ह.रा.च !!!!!!
वर स्नेहा विचारतेय तेच
" डुप्लीकेट आयडी कसे ओळखावे " ??? ;)
19 Apr 2012 - 1:25 pm | कवितानागेश
१२ आणि १३ वा मुद्दा मस्तच आहे. :)
19 Apr 2012 - 1:30 pm | अँग्री बर्ड
हे लै भारी होते.
19 Apr 2012 - 1:44 pm | स्पंदना
आर चांगला धंद्याचा चानस घालवलास मर्दा!
आर येव्हढ ज्ञान हाय तर कोचिंग क्लासेस उघाडशिल का बसलाय शाळत शिकवत.
म्हणुन , म्हणुनच मराठी माणुस धंद्यात कमी पडतो.
19 Apr 2012 - 1:51 pm | मूकवाचक
=)) =)) =))
19 Apr 2012 - 1:56 pm | शुचि
>> नवीन आलेल्या चित्रपटाचे, त्यातल्या हिरोचे अथवा हिरवणीचे नाव चुकून देखील घेऊ नका. एकतर तो आयडी अॅप्रुव्ह होणे कठीण, आणि त्यातून झालाच तरी इतर सदस्य तुमच्याकडे थरकी, बीन अकलेचा, झोपडपट्टी इ. इ. नजरेनेच बघतात >> =)) =)) =))
19 Apr 2012 - 2:10 pm | कपिलमुनी
कधी कौतुकाचे कधी भडकाऊ प्रतिसाद देणे
या सवयी विषयी पण लिहा कि राव :)
बाकी मार्गदर्शन झक्कास !!
किरण करमरकर असा डू आय डी घ्यावा म्हणतो :) कर आहे आणि स्त्री कि पुरुष ओळखणे अवघड
19 Apr 2012 - 2:10 pm | स्पा
अबबबाबा .....
खपलो
19 Apr 2012 - 4:52 pm | अत्रुप्त आत्मा
बघा धाग्याचा प्र-ताप...! मन्याचे कित्ती डुआयडी येकदम हसायला लागले... ;-)
19 Apr 2012 - 2:11 pm | छोटा डॉन
एवढी सगळी पथ्ये पाळायची असतील तर ड्युप्लिकेट आयडी घेण्याची काय फायदा असा प्रश्न मनात आला. ;)
मुळात ड्यु. आयडी का घ्यावा असा माझा प्रश्न आहे.
- छोटा डॉन
19 Apr 2012 - 2:24 pm | पियुशा
@ छोटा डॉन तुम्ही विचारताय हे ???? ;)
मुळात ड्यु. आयडी का घ्यावा असा माझा प्रश्न आहे.
याचे फायदे पुढील प्रमाणे ;)
१ ) तुमच्या मुळ आय डी चा बाजार उठलेला असला असेल तर ;)
२ ) तुम्ही काही लिहिले पण त्याकडे बाकिच्यानी कानाडोळा केला तर तुम्ही तुमच्याच ४-५ डू आय डी ने
व्वा , चान चान्,कं लिवलय ;) असे प्रतिसादुन धागा वर आणायचा प्रयत्न करु शकता अथवा हातभार लावु शकता ;)
३) तुमचा इथे कुणाशी पंगा असेल तर तुम्ही डु आय डी ने त्याच्याबरोबर दंगा घालु शकता
४) कुणी तुमच्या जुन्या आय डी ला चारा घालत नसेल तर ,जुन्या बाट्लीत नविन दारु रिचवुन काय फरक पडतो की नाही हे पडताळ्न्यासाठी ;)
असो.......तुर्तास इतकेच............ ;)
19 Apr 2012 - 2:39 pm | छोटा डॉन
ऑ ?
ह्या वाक्याचा अर्थ माझे स्वतःचे १००-१२५ ड्यु. आयडी आहेत आणि आता मी साळसुदपणे 'ड्यु. आयडी का घ्यावा' असा प्रश्न विचारयो आहे असा आहे काय ?
तसे असल्यास आपली गल्लत होते आहे असे स्पष्टपणे सांगतो.
फायदा की कसे असा त्याचा हिशेब आपण शेवटी करुयात.
आत्तापर्यंत तसा प्रसंग कधी आला नाही. आंतरजालीय वाद वगैरे झाले ( काही चालु आहेत ) बाजार उठणे व त्यामुळे तोंड लपवायला दुसरा आयडी घेणे ही वेळ कधी आली नाही.
बाकी तशी वेळ आली तरी त्याने ड्यु. आयडी घेऊन काय फायदा होतो हा प्रश्नच आहे.
हे म्हणजे रस्त्यावर, चौकात एखाद्याने तुम्हाला धु-धु धुतले म्हणुन त्याचा बदला घेण्यासाठी तुम्ही तो रस्त्याने चालला असता दुसर्याच्या घराच्या गच्चीमध्ये वेश बदलुन बसुन वगैरे करुन त्याला वरुन बारीक बारीक दगड मारताय असा प्रकार झाला.
अशीही वेळ कधी आली नाही.
बाकी अशी परिस्थिती आली असेल तर त्याने 'मला पहा आणि फुलं वहा' हा अॅटिट्युड सोडुन देऊन ते ड्यु. आयडी वगैरे काढण्याचे खूळ डोक्यातुन काढुन टाकुन सरळ सन्यास वगैरे घ्यावा असे सुचवतो.
ओके.
पण त्याने तुमच्या मुळ आयडीचा कसा काय फायदा होईल ?
घ्या, म्हणजे मुळ आयडीच कोणी भाव देत नसेल म्हणुन नवा आयडी घ्यायचा ?
असो, ह्यावर आम्हाला एक चपखल उपमा आठवली आहे पण असो, जाऊ द्या. हा उपाय अत्यंत युसलेस आहे इतकेच सांगतो ;)
ओके, अजुन सुचले तर अजुन लिहा.
निदान ह्यातले एक तरी कारण आम्हाला 'फायदा' ह्या गटात मोजता येईल अशी अपेक्षा आहे, प्रथमदर्शनी तसे काही होईल असे वाटत नाही, असो.
- छोटा डॉन
19 Apr 2012 - 2:12 pm | बॅटमॅन
जबराट!!!! काय सुटलायत पराशेठ!
>>१) शक्यतो पुरुषांनी बाईचे किंवा बाईने पुरुषाचे नाव डुप्लिकेट आयडी म्हणून घेऊ नये. पाककृती आणि काथ्याकूट ह्या धाग्यावरती तुम्ही सरळसरळ उघडे पडता.
प्र ह च हं ड ह!!!!!!! साष्टांग दंडवत _/\_
19 Apr 2012 - 2:15 pm | गणपा
नव्या पुस्तकाची प्रस्तावना आवडली.
आशा करतो की पुस्तकात प्रत्येक मुद्यावर एक एक प्रकरण असेल. ;)
पुपुप्र. :)
19 Apr 2012 - 2:44 pm | मृत्युन्जय
ते सोडा. डु आयडी मुळात अप्रूव कसा करुन घ्यावा ते सांगा. ते जरा छुप्या संपादकांपैकी कोणाचा वशिला लागतोय का ते सांगा की. आजकाल बरेच जण ऑफ्लाइन आहेत ;)
19 Apr 2012 - 6:23 pm | रेवती
फक्त माहितीकरिता, संपादकांना कोणताही आयडी अप्रूव्ह करण्याची परवानगी नाही. मालकांनी घालून दिलेल्या नियमांचे पालन, बाकी काही नाही.:)
19 Apr 2012 - 3:10 pm | यकु
आजकाल श्रीयुत परा हे केवळ जळजळीत सत्य या-त्या धाग्यातून मांडत सुटले आहेत.
माननीय परा यांनी सर्वप्रथम 'माझे सत्याचे प्रयोग' वाचणे बंद करावे असा आग्रह करतो.. ;-)
19 Apr 2012 - 3:21 pm | पहाटवारा
आजकाल ??
आंजा वरच्या ह्या शिलेदाराने सत्याची अन घेतल्या संस्थळाच्या आयडि ची कास कधी सोडली नाहि .. आणी ते सत्य त्याच आयडिने प्रकाशीत करण्याचे धाडसहि केले आहे.. फक्त "आजकाल" असे म्हणून त्यांच्या कारकिर्दि चे मोजमाप तत्कालीक परिणांमांनी करू नका यकूशेठ !
19 Apr 2012 - 3:27 pm | यकु
अर्रर्रर्र! हो राव!
पण तुमच्या प्रतिसादामुळे आता बूच मारल्या गेले आहे ;-)
तेव्हा असोच.
19 Apr 2012 - 3:50 pm | सुहास झेले
पराशेठ, एकदम फर्मास आणि बहुउपयोगी धागा.... ;)
सदर धागा मदत पान म्हणून, सदस्यांच्या मदतीला कायम ठेवावे अशी ईनंती :) :p
19 Apr 2012 - 3:39 pm | भिकापाटील
धन्यवाद
19 Apr 2012 - 3:53 pm | गवि
सर्व वाचकांचे प्रतिक्रियांकरिता आभार... .. !!!
19 Apr 2012 - 4:05 pm | पहाटवारा
हेच म्हणते .. आपलं .. म्हणतो ..
19 Apr 2012 - 4:06 pm | सहज
काय म्हणतात ते ... हा हा ..
ठ्ठो!!
19 Apr 2012 - 4:13 pm | प्रास
गवि, कसला जबरदस्त प्रतिसाद.....
सन्मा. परा यांची भन्नाट शिकोणी आवडली आप्ल्याला.....
:-D
19 Apr 2012 - 5:29 pm | अन्नू
पराच्या धाग्यावर गविंचे आभार उत्तर??????
धाssड धाssड धाssड..!!!
19 Apr 2012 - 4:10 pm | रानी १३
सर्व वाचकांचे प्रतिक्रियांकरिता आभार... .. !!!
तुम्ही आभार मानताय म्हणून गवि हा परा चा डु आयडी समजावा का? :)
19 Apr 2012 - 4:16 pm | यकु
>>तुम्ही आभार मानताय म्हणून गवि हा परा चा डु आयडी समजावा का?
--- नाही. ही लिग ऑफ एक्स्ट्राऑर्डीनरी झंटल्मन आहे हे समजावे ;-)
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य
Only Fairytales Have Happy Endings ...
19 Apr 2012 - 4:19 pm | प्यारे१
आपलेदेखील आभार!
बाकी, स्वतःलाच 'चान चान' कसं म्हणायचं ? :)
19 Apr 2012 - 4:17 pm | बाळ सप्रे
चला आता यावरून आत्ता अस्तित्वात असलेले डु आयडी ओळखा पाहू ? :-)
19 Apr 2012 - 4:17 pm | स्मिता.
मी म्हणते, कुणी सांगितलेय असले पालथे धंदे करायला? जिथे एक आयडी घेऊन प्रतिसाद आणि खरडाखरडीला दिवस पुरत नाही तिथे ३-४ आयडी घेतले तर सगळी कामं-धामं सोडून दिवसभर इथेच टेकून रहायला लागेल.
पण आता लिहायला सुरुवात केलीच आहे तर डु. आयडी कसे ओळखायचे तेही लिहा. बरेच आयडी डु. असल्याची शंका येते पण नेमके कोणाचे ते ओळखता येत नाही.
19 Apr 2012 - 4:19 pm | विनायक प्रभू
प.रा. हा एक ह.ल.क.ट माणुस आहे ह्या बाबतीत माझ्या मनात कधीही संशय नव्हता.
19 Apr 2012 - 4:35 pm | सहज
यदा यदा ही जालस्य ग्लाणिर्भवति मिपा: अभ्युत्थानम् डुआयडीस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणायत छो.डॉनाम विनाशाय च छो.रात., दुर्लक्ष पँथरसंस्थापार्नाथाय सं लेखामी युगे युगे । । ।
अर्थात जेव्हा जेव्हा जालावर मिपावर ग्लानि म्हणजे सदस्यांना कंटाळा येउ लागतो | पालथे धंदे वाढू लागतात, तेव्हा सदस्यांच्या रक्षणार्थ, डुआयडींचा नि:पात करायला व दुलर्क्षीत पँथरची प्रस्थापना करायला मी लेख पाडतो |
श्री (प)राधेय उवाच|
19 Apr 2012 - 5:44 pm | छोटा डॉन
ओ कृष्णमामा,
ते मिपाभारतातली गीता सांगताना तुमची गल्लत झालीय काय ?
हा तुमचा मुळ श्लोक(!)
आणि हा त्याचा तुम्हीच ( इतरांना संधी न देता स्वतःच केलेला मराठीतला ) भावानुवाद ;)
पण ह्यात अंमळ गल्लत होत आहे काय ?
मुळ श्लोकात असलेले 'छो. डॉनाम' हे शब्द गेले कुठं ? ;)
- छोटा डॉन
19 Apr 2012 - 5:56 pm | चिंतामणी
मुष्कील ही नही, नामुमकीन है :)
19 Apr 2012 - 6:14 pm | सहज
तेच हो डान्राव! साधु व शैतान ह्यांना मिपाभारतात छोटा डॉन व छो.राजन असे कायसेसे (बहुदा अनुक्रमे असावे असा अंदाज.. ;-) ) वर्णीले आहे.
आणी हो, तुम्ही (अन्य कोणीही)अर्थानुवाद , भावानुवाद करु शकता!
19 Apr 2012 - 8:15 pm | विकास
ओ कृष्णमामा,
कृष्ण हा भाचा होता. "कंस मामा" होता. तेंव्हा डॉनरावांना नक्की सुचवायचे तरी काय आहे?
सहजरावांचा श्लोक मात्र एकदम मस्त आहे!
19 Apr 2012 - 8:32 pm | विकास
मिसळपाव वर संस्कृतमध्ये लिहील्याबद्दल निषेध होऊ शकतो म्हणून सहजगीतेतील श्लोकाचे मराठीकरण करण्याचे धाडस करत आहे.
गळूनी जात असे संस्थळ, ज्या ज्या वेळेस वाचका
असंख्य उठती आयडीज, तेंव्हा मी लेख पाडतसे
टाकावया स्थळी पिंका, आळस दूर करावया
जागवण्यासी सभासदां , येतसे मी पुन्हा पुन्हा
19 Apr 2012 - 4:32 pm | स्पा
मी एक दुप्ळीकेत आय डी आहे,
मला एका खर्या ID ची मार्गदर्शक तत्वे जाणता येतील काय
19 Apr 2012 - 5:35 pm | ५० फक्त
चला बरे झाले प्रकरण एक कळाले, आता प्रात्याक्षिकाकरता तुमच्या सौंदर्य फुफाटा केंद्रात कधी येउ ते बोला.
19 Apr 2012 - 5:43 pm | अत्रुप्त आत्मा
अंsss अचं नैsss...मी पण मी पण येणार... ;-)
19 Apr 2012 - 5:44 pm | चिंतामणी
आपल्या बहूमुल्य मार्गदर्शनाबद्दल
__/\__
19 Apr 2012 - 6:54 pm | पैसा
माहितीसाठी धन्यवाद रे धमाल मुलगा! ;)
फक्त काही आयडींबद्दल मला सौंशय आहे की ते सहकारी तत्त्वावर ५/६ जण चालवत आहेत!
19 Apr 2012 - 7:13 pm | निशदे
खुर्चीतून पडायची वेळ आली........ अतितुफान आहे हे आणि प्रचंड अचूक निरीक्षण.....:bigsmile:
19 Apr 2012 - 7:15 pm | छो.राजन
प. रा. / गवि / ध मु
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद
19 Apr 2012 - 11:14 pm | धनंजय
तुफान उपयोगी.
पण इतकी यवढी काळजी घ्यायची म्हंजे त्रासच की हो.
20 Apr 2012 - 5:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
चोक्कस!
लगे रहो राजेश घासकडवी.
20 Apr 2012 - 11:49 am | प्यारे१
>>>लगे रहो राजेश घासकडवी
गप्प बसायचे ठरवले आहे.
- प्यारेलि :)
20 Apr 2012 - 1:50 pm | चिंतामणी
आँ.
परिकथेतील राजकुमार हा राजेश घासकडवी यांचा डु आय डी आहे का?:o
20 Apr 2012 - 5:54 am | चित्रा
मस्त.
20 Apr 2012 - 10:01 am | चाफा
अरे देवा,
हसू आवताना नाकी नऊ आले परा फुल्ल थ्रॉटल :)
20 Apr 2012 - 11:39 am | दिपक
=)) =)) =))
हैला परा काय खाऊन बसला होता रे लेख लिहायला. एकदम खत्री. "वारंवार विचारले जाणारे प्रश्न"मध्ये ह्या लेखाची लिंक देण्यात यावी अशी इनंती. :-)
20 Apr 2012 - 12:41 pm | नंदन
काय अभ्यास, काय अभ्यास!
फ्रॉईडच्या थिअरीला पुढे नेणार्या 'मराठी आंतरजाल: आय.डी., इगो आणि सुपरइगो' ह्या आपल्या आगामी पुस्तकाची एक प्रत आजच नोंदवून ठेवतो ;)
20 Apr 2012 - 12:43 pm | मदनबाण
च्यामारी या पर्याला आवारा कोणातरी !
नुसात मोकाट सुटलाय !
याने तर डु आयडीवर पीएचडी केली रे ! ;)
20 Apr 2012 - 12:46 pm | मयुरपिंपळे
प्रसाद ताम्ह्नकर सर तुम्हाला सलाम! ;)
20 Apr 2012 - 12:52 pm | अभिज्ञ
ज ब र द स्त!
वाचनमात्र असलेल्या चार / पाच दिवसात आपली खरडवही जमेल तेवढी सजवावी. खरडवहीत नाव-गाव-फळ-फुल सगळ्याची सविस्तर माहिती द्यावी. लेखकांची नावे लिहिताना आठवणीने 'पु . ल. देशपांडे' आणि गायकांच्या नावात 'भीमसेन जोशी' लिहावे. बर्याचदा सवयीने (आणि अघोषित आंतरजालीय कायद्यानुसार) तुम्ही 'भाई' अथवा 'अण्णा' लिहाल आणि स्वतःच्या पायावरती कुर्हाड मारून घ्याल.
हे तर लै भारी.
:)
अभिज्ञ.
20 Apr 2012 - 1:14 pm | बिपिन कार्यकर्ते
=)))
20 Apr 2012 - 3:07 pm | निखिल देशपांडे
.
20 Apr 2012 - 7:15 pm | अन्या दातार
अर्र्र! हा लेख चुकुन या आयडीवरुन प्रकाशित केला गेला का? छे! पुढच्या वेळेपासून नीट खबरदारी घेतली पाहिजे ब्वा :(
20 Apr 2012 - 7:17 pm | प्रचेतस
डु आयडींनी आपल्या ब्लॉगच्या लिंका स्वाक्षरीत ठेऊ नयेत. उघडे पडतात लगेच.
4 Nov 2015 - 1:32 am | सागरकदम
स्त्रियांनी बाईचे आणि पुरुषाने नाव एकत्र करून आयडी घ्यावा
म्हणजे काय ?
4 Nov 2015 - 9:16 am | कपिलमुनी
किरण करमरकर :)
4 Nov 2015 - 3:02 pm | सूड
किती निरागस प्रश्न!!
4 Nov 2015 - 4:29 pm | कंजूस
कल्पनाविलास , भावनाचोर ,करुणानंदन वगैरे म्हणायचे असेल.
4 Nov 2015 - 4:52 pm | होबासराव
काका हा षटकार एकदम स्टेडियम च्या बाहेर गेला :))
9 Nov 2015 - 11:15 pm | सागरकदम
भावना प्रधान
स्मृती चित्रे असे?
4 Nov 2015 - 9:43 am | सुबोध खरे
वरील सल्ला वाचून एक पुरुष आणि एक स्त्री डू आय डी घ्यावे असे फार फार वाटून राहिले आहे.
4 Nov 2015 - 6:21 pm | पैसा
डॉक, तुम्हाला नाही जमणार ते! पहिल्या दोन ओळीत ओळखू याल तुम्ही! =))
5 Nov 2015 - 1:27 pm | सुबोध खरे
पैसा ताई
लहानपणी एक वाक्य वाचलेलं लक्षात राहिलेलं आहे. तुम्ही जर एक नंबरचे थापाडे नसाल तर आपलं खरं बोललेलं बरं.
म्हणून तर आमचा कोणताही डू आय डी नाही आणि नाव सुद्धा खरं आहे.
उगाच जे जमत नाही ते करा कशाला. पण असावं असा वाटतं त्याचं काय करायचं?
5 Nov 2015 - 1:51 pm | पैसा
नेहमी खरं बोललं तर कोणाला कधी काय खोटं सांगितलं होतं ते लक्षात ठेवावं लागत नाही! =))
4 Nov 2015 - 9:45 am | नाखु
कालातीत लेख !
4 Nov 2015 - 12:31 pm | मुक्त विहारि
+१
4 Nov 2015 - 5:19 pm | विजुभाऊ
माई कुरसुंदीकर , नाना साहेब नेफळे , काकासाहेब केंजळे ,दादा दरेकर, ग्रेट्थिंकर यांचं काय ?
4 Nov 2015 - 6:06 pm | चिंतामणी
ज्यांनी प्रतिसाद टाकुन हा लेख वर काढला त्यांचा. भूतकाळात गेलो हे वाचुन.
स्वगत- पराचे पुनरागमन झाले आहे हे समजण्यासाठी इतके डु आय डी????
5 Nov 2015 - 11:44 am | सागरकदम
मी आणलाय
5 Nov 2015 - 1:21 pm | टवाळ कार्टा
मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी मी
6 Nov 2015 - 12:35 pm | कॅप्टन जॅक स्पॅरो
सर तुम्हाला रंगाचा (कलर, आपला रंगा नव्हे. रंगाण्णा डबा वापरत असतील असं वाटत नै!) डबा आणुन देउ का?
6 Nov 2015 - 1:05 pm | टवाळ कार्टा
णक्को
6 Nov 2015 - 10:57 pm | सूड
'मी' ला पकडणं केवळ सोपंच नाही शक्यही आहे. =))
9 Nov 2015 - 11:13 pm | सागरकदम
डॉन डॉन डॉन
9 Nov 2015 - 11:20 pm | टवाळ कार्टा
पातेलं पातेलं पातेलं =))
9 Nov 2015 - 11:45 pm | सागरकदम
दिल ने
दिल को पुकारा
लो मैन आया
मिळणे दुबार
काहो ना प्यार हैन
10 Nov 2015 - 9:14 am | टवाळ कार्टा
खि खि खि....श्टैल भारीयाइ तुझी...कस्स क्कॉय्य जम्तं बुवा
10 Nov 2015 - 11:14 am | सागरकदम
अहो त्यामुळेच तर स्त्री प्रजाती माझ्याशी भांडतात व नंतर त्यांना मी आवडू लागतो
काहो न प्यार हैन
10 Nov 2015 - 12:52 pm | टवाळ कार्टा