कला

तमाशा: महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार (भाग- २)

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
2 Aug 2014 - 10:45 am

ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते.

गण :-

कलाआस्वाद

तमाशा : महाराष्ट्रातील एक रांगडा कलाप्रकार

psajid's picture
psajid in जनातलं, मनातलं
25 Jul 2014 - 3:17 pm

नुकतेच जेष्ठ तमाशा कलावंत बाळू उर्फ अंकुश संभा खाडे यांचे वृद्धापकाळाने सांगलीच्या सरकारी रुग्णालयात निधन झाले. यापूर्वी २0११ मध्ये त्यांचे बंधू काळू ऊर्फ लहू संभाजी खाडे यांचे निधन झाले. दोघांच्या रूपाने गेल्या सुमारे ६0 वर्षांतील तमाशात इतिहास घडविणारे व या इतिहासाचे साक्षीदार असणारे हरपले आहेत. एवढा प्रदीर्घ काळ काळू-बाळू या जोडगोळीने तमाशा गाजवला. मराठी मनावर राज्य केले. अखेरच्या श्वासापर्यंत ही जोडी एक होती. त्यांचे प्रपंच वेगळे झाले, मात्र दोघांत मतभेद कधी झाले नाहीत. सारखे दिसण्याचा, जुळेपणाचा आनंद त्यांनी सार्यांना दिला.

कलाआस्वाद

दांभिक

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in काथ्याकूट
10 Jul 2014 - 11:14 pm

फारच कंटाळा आल्याने ही एक जिलबी पाडण्याची खुमखुमी आली आहे ...

दांभिक तुही दांभिक मीही दांभिक मिपा अवघे
'सांडुनी वाया व्यर्थ कथा' तू दारुची चव घे ||०||

वट्वृक्षापरीविस्तार जयाचा नाव घेतसे वल्ली
अन 'प्या...रे' म्हणणारा आता होत नाही टल्ली *drinks* ||१||

"शेजारीणबाईंचा टीव्ही आमच्या पोरांना पाहु देईना"
अशा सज्जन माणसाने नाव घेतले 'किस'ना *air_kiss* ||२||

'जोकरा'परी खोड्या ज्याच्या सदैव जिकडे तिकडे
बॅटमॅन तो नाव घेवुनी धाग्या जाऊन जखडे ||३||

सद्गुणांचा दिसेपुतळा मुळीच नाही हूड
अन मिपावर येवुन त्याने नाव ठेवले सूड ||४||

मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांची माहिती हवी (वेब डिझायनर्स /डेव्हेलपर्स)

माहितगार's picture
माहितगार in काथ्याकूट
4 Jul 2014 - 11:41 am

मराठीतील पहिले संकेतस्थळ मायबोलीच्या स्थापनेला जवळपास १८ वर्षे होत आली आहेत. मराठी संस्थळांना तंत्रज्ञान, स्थैर्य आणि आत्मविश्वास प्राप्त करून देण्यामध्ये मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांनी (वेब आर्कीटेक्ट्स/ डिझायनर्स /डेव्हेलपर्स) महत्वपूर्ण भूमीका निभावली आहे.

उल्लेखनीय मराठी संकेतस्थळ रचनाकार आणि विकसकांबद्दल आणि मराठी संकेतस्थळे विकासात कार्यरत व्यावसायिक आस्थापनांबद्दल माहिती हवी आहे.

मी केलेली आणखी काही पेन्सिल शेडिंग्ज

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in जनातलं, मनातलं
2 Jul 2014 - 12:22 pm

thakre

बाळासाहेब ठाकरे

shammi

शम्मी कपूर

pran

प्राण

कलाविरंगुळा

मी केलेला एक प्रयत्न !!

खटपट्या's picture
खटपट्या in कलादालन
26 Jun 2014 - 12:14 pm
कलाविरंगुळा

संजय क्षीरसागर आणि प्रशांत आवले यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे मी काढलेल्या चित्रावर स्वतंत्र धागा काढत आहे. -
---------------------------------------------------------------------------------

वारली चित्रकला

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in कलादालन
23 Jun 2014 - 11:17 pm
कला

वारली चित्रकलेची मी तुम्हाला वेगळी काय ओळख करुन देणार? ठाणे जिल्ह्यातील आदीवासींनी जपलेली आणि वाढवलेली ही कला श्री.जिव्या सोमा मशे यांच्यासारख्या कलाकारांनी सातासमुद्रापार पोचवली आहे.
ही नुसतीच चित्रशैली नसुन ती भाषासुद्धा आहे असे काहीजण मानतात. म्हणजे एखाद्या घरात लग्नकार्य असेल तर घरावर काढलेल्या चित्रांमधुन ते गावाला समजते. तसेच पूजा, सणवार, रोजचे जीवन असेही विषय चित्रात असतात.

वयस्कर अभिनेते कॉलेजकुमारांच्या भूमिकेत

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
13 Jun 2014 - 1:23 pm

नुकतीच "तुझे आहे तुजपाशी" या सदाहरीत नाटकाची जाहीरात वाचली. श्यामच्या भूमिकेत एव्हरग्रीन अविनाश खर्शीकर, डॉ. सतीशच्या भूमिकेत ग्रेसफूल डॉ. गिरीश ओक, काकाजींच्या अजरामर भूमिकेत रवि पटवर्धन, आचार्यांच्या भूमिकेत जयंत सावरकर इ. नामावळी होती.

बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

अत्रुप्त आत्मा's picture
अत्रुप्त आत्मा in जनातलं, मनातलं
5 Jun 2014 - 1:52 am

वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे. पुन्हा.......... हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात. एकच अर्थ देतात..तो म्हणजे पुन्हा!!! ..खरं तर तिथे पुन्हा जाणं,ही घटना..म्हटली तर माझ्या हतातली,म्हटली तर नाही!

संस्कृतीकलानाट्यकविताअनुभव