अधुरी प्रेम कहाणी

अविनाशकुलकर्णी's picture
अविनाशकुलकर्णी in जे न देखे रवी...
7 Aug 2014 - 6:55 pm

अधुरी प्रेम कहाणी
***************************************
माधव जोशी मंडईत भाजी घेत होता..
माधव रिटायर्ड झाला होता..तसा संसार मार्गी लागलेलाच होता..
मोठा मुलगा लग्न करुन अमेरिकेत सेटल झालेला
मुलिचे हि लग्न झाले होते ..ति बंगलोरला..
भाजी घेत असताना त्याचे बाजुला लक्ष गेले..
ति पाठमोरी उभी होति..
बहुतेक स्मिता साने च असावी...

माधव तिच्या कडे गेला अन म्हणाला "तु स्मिता साने" ना..
अन तु माधव जोशी..ति हसत म्हणाली..
अरे काय... किति दिवसानी आपण भेटत आहोत..एफ वाय ची परिक्षा झाली अन तु जी गायब झाली ति अत्ता दिसतेय..माधव,,
हो ना परिक्षा झाली अन मी मुंबईला गेले ..त्याच वेळी लग्न ठरले झाले अन संसार सुरु झाला ....स्मिता..
ति अस म्हणताच माधवचे मन भुतकाळात गेले..
नगर सारख्या लहान गावात कॉलेजला स्मिता आली होति..
तिचे बाबा कलेक्टर म्हणुन नगरला बदलुन आले होते..
स्मिता दिसायला सुंदर होतिच पण मुंबई सारख्या ठिकाणी वावरल्याने तिच्या बोलण्यात एक ऐट व आत्मविश्वास असायचा..
माधव खुप हुषार मुलगा होता..टॉपर
गणीत शास्त्र विषयाच्या डिफिक्लटीज च्या निमीत्तने त्या दोघांची जवळिक वाढु लागली..
स्मिताला पण त्याच्या हुषारी च कौतुक होते... एक आदर होता..
माधवला बरेच वेळा वाटत असे कि आपल्या मनातिल भावना तिच्या कडे व्यक्त कराव्यात..पण त्याचा धिर होत नसे..शिवाय माधव चे वडील नगरपालिकेत साधे कारकुन होते..त्या सामाजिक अंतराचे दडपण पण माधवला असे करण्या पासुन परावृत्त करत होते..
माधव ची हि घालमेल त्याचा बाल मित्र बंडु गोडबोल्याच्या लक्षात येत होति..
तो म्हणाल.." माधव उगीच उंटाच्या मुका घ्यायला जावुन नको..शिवाय हे वर्ष महत्वाचे तुला मार्क कमवत इंजिनिअरिंग च्या कॉलेज जाधे जायचे आहे..हे करायला उभे आयुष्य पडले आहे...
माधव अभ्यासाला लागला.
परिक्षा झाल्या ..माधवला पेपर चांगले गेले होते..
सुट्या लागल्या व माधव स्मिता भेटण्या साठी तिच्या घराकडे निघाला ...वाटेत बंड्या भेटला .व त्याने सांगीतले..स्मिता कडे निघाला का? उपयोग नाहि ति मुंबईला गेली आहे.."
तुला कस माहित???माधव ने विचारले.
अरे माझी आत्या सांगत होति..ति व साने काकु ची मैत्रीणी आहे..

रिझल्ट्स लागले माधवला चांगले मार्क्स पडले होते..
पुण्याला ईंजीनिअरिन्ग कॉलेजला यायचे होतेच..माधव च्या मामा कडे त्याची रहायची सोय झाली होति..
मार्क शिट मिळताच माधव पुण्याला आला कॉलेज मधे प्रवेश मिळाला व कॉलेज सुरु झाले अधुन मधुन त्याला स्मिताची आठवण येत होतिच..
मधे माधव नगरला घरी आला होता.. बंड्याचा घरी गेला अन गप्पा रंगल्या...स्मिता कशी आहे?? माधवने विचारले
अरे तिचे लग्न झाले पण...बंड्या म्हणाला..
माधवचा चेहरा पडला..ते बघतातच बंडु म्हणाला छोडो यार.. एक तर ति सुंदर होति दिसायला शिवाय तिचे बाबा कलेक्टर..अश्या मुलिंचा नाद नाय करायचा..तिने नाहि म्हटले असते तर तुला खुप वाईत वाटले असते..
माधव काहिच बोलला नाहि..पण त्याला मनातुन खुप वाईट वाटत होते
काळ पुढे सरकत होता.

तुला पाहिल्यावर कॉलेजचे दिवस आठवले..धमाल यायची ना? अन तु सुटीत मुंबईला गेल्याचे कळाले अन मधे इतका काळ गेला अन आज भेट होत आहे..माधव म्हणाला..
हो ना मुंबईला आले अन लग्न ठरले व झाले पण अन नविन जिवनास सुरवात झाली...सारे खुप स्वप्नवत घाईत घडले सारे स्मिता म्हणाली
माधव काहिच बोलला नाहि पण जे मनात होते ते बोलुन टाकावेसे त्याला वाटले..
मला तु खुप आवडायचीस..बरेच वेळा मनात आले कि भावना व्यक्त कराव्यात पण धीर झाला नाहि..
तु दिसायला सुंदर होतिस शिवाय तुझे बाबा पण उच्च पद्स्थिय त्या मुळे धिर झाला नाहि..शेवटी ठरवले होते पण तुझे लग्न झाल्याची बातमी कळाली अन सारे तिथेच थांबले..माधव हसत म्हणाला..
कसला बुद्दु होतास तु..मला पण तु खुप आवडायचा तुझ्या हुशारीचे कौतुक होते..पण तु कधेच व्यक्त झाला नाहि..कदाचित मी तुझा टाइपची नसेल म्हणुन असे मला वाटायच..स्मिता हसत म्हणाली
आपणहि तिला आवडत होतो हे ऐकल्यावर माधवच्या काळजाचे पाणी पाणी झाली..एक सुंदर स्वप्न आपण पुर्ण करु शकलो नाहि..याचा विषाद त्याच्या चेह~यावर पसरला व चेहरा पडला..
हे पहाताच स्मिता म्हणाली..झाले ते झाले पण आज आपण दोघेही सुखि संसारिक आयुष्य जगत आहोत हे किति महत्वाचे आहे..आपले संसार मार्गी लागले..हेच महत्वाचे नसते का?
अन हो तुला आपले इंग्रजीचे सर आठवतात का ..तुम्ही मुले त्या ना पोत्या पोत्या म्हणुन चिडवायची....
पोतनिस सर..माधव म्हणाला.
हो पोतनिस सर त्यांचे एक आवडते वाक्य होते..man proposes god disposes
किति सार्थ आहे ते वाक्य..मानव ब~याच योजना ठरवत असतो..पण त्याला कसा आकार द्यायचा व त्याचा कस शेवट करायचा ते "तो" ठरवत असतो.. स्मिता म्हणाली.
चल निघते बाबा..तुझ बर आहे भाजीच्या पिशव्या बायको पुढे टाकल्या ति बिचारी पुढचे सारे करेल..मला घरी जाऊन स्वयंपाकाच बघायच आहे..नवरा भुकेला असेल माझा..
असे म्हणत ति निघाली
रस्तावरिल रिक्षा थांबवत ति त्यात बसुन गेली पण
माधवने भाजीच्या पिशव्या स्कुटर वर ठेवल्या व तो पण निघाला
त्याच्या मनात पोतनिस सरांचे वाक्य घुमत होते.
man proposes god disposes

कला