सकाळ कोवळी
सकाळ कोवळी रात्रीनंतर हासत येई
हिरव्या गवताचा गर्द गंध घेवून येई
धुक्यातून दव फुलले उतरे अलगद पानांवर
शिखरावर झाडांच्या उन्ह सोनेरी हळूच येई
झुळू़क हवेची थंडगार वाहते चुकार अल्लड
सरत्या पावसाची सर ठिबठिबणारी सोबत येई
रान फुलले रानफुलांचे रंग लेवून ताजे सुंदर
वार्यावरती हालती डूलती नजरेला सुखवीत जाई
फुलपाखरांसवे पक्षी उडती वरती आरव करती
खोल दरीतून दूर कुणीतरी आल्हादक गीत गाई
- पाषाणभेद
१७/१०/२०२१