संपले का रंग सारे
का कुंचले मोडले
दोन रंगात सारे
विश्व का रे रेखले
नीळा सावळया निर्झराचा
रंग कोठे लपवीला
काय ठावे तुझ्या मानसी
शुभ्र धवल का रे भावला
अंथरुन कालीन धवल
लपवले रंग सारे
उजळून विश्व सारे
दीप तेज मंदावले
नील गगन ,धवल तारे
वाहती उष्ण वारे
शोषून धवल रंग
हळूच फुटती धुमारे
येता ऋतुराज यौवनाचा
उघडेल मूठ त्याची
आशा हीच उद्याची
उधळून रंग सारे
उमटतील चित्रं नव पल्लवांची
प्रतिक्रिया
17 Feb 2022 - 5:30 pm | चौथा कोनाडा
सुरेख रंगचित्र !
17 Feb 2022 - 11:58 pm | सौन्दर्य
सुंदर वर्णन आणि आशावाद.
18 Feb 2022 - 9:19 am | ज्ञानोबाचे पैजार
आवडली फारच सुरेख आणि सकारात्मक.
पैजारबुवा,