जनातलं, मनातलं

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
12 Mar 2025 - 18:30

अंतराळ स्थानक बघण्याचा सोहळा आणि लखलखत्या तार्‍यांची मांदियाळी!

नमस्कार. ८ मार्चच्या शनिवारी लोणावळ्याच्या जवळ अंजनवेल ऍग्रो टूरीझम इथे मी व माझा मित्र गिरीश मांधळे- आम्ही आकाश दर्शनाचा कार्यक्रम घेतला. महिला दिनी अंतराळ यात्री सुनीता विल्यम्स असलेलं स्पेस स्टेशन बघण्याचा थरार सर्वांनी अनुभवला!

विजुभाऊ's picture
विजुभाऊ in जनातलं, मनातलं
11 Mar 2025 - 19:38

दोसतार चे निमित्त

काल अचानक एका जुन्या मित्राचा फोन आला.
तो कुठल्याशा गावात एका अभिवाचन स्पर्धेचा परिक्षक म्हणून तिथे गेला होता.
तेथे एका मुलाने (वय वर्षे १४) माझ्या दोसतार कादम्बरीतील एक उतारा अभिवाचनासाठी निवडला होता.
मित्राला सध्या सम्पर्कात नसल्याने दोसतार बद्दल काहीच माहिती नव्हती.
पण पुस्तकातील उतारा धमाल वाटल्याने त्याने त्या मुलाच्या पालकांकडे चौकशी केली.

स्वरुपसुमित's picture
स्वरुपसुमित in जनातलं, मनातलं
11 Mar 2025 - 17:01

साहित्य चोराला अद्दल घडवायचा निर्धोक स्वस्त व टिकाऊ उपाय

मित्रानो
साहित्य चोरी हा प्रकार महाराष्ट्रात पार तुकाराम महाराज असल्यापासून लोकांना माहीत आहे
ऑनलाईन विश्वात तर कॉपी पेस्ट लगेच शक्य असता
फेसबुक आधी फक्त गुगल आणि ऑर्कुट ला शोधून आपले लिखाण चोरी शोधतात येत होती पण आता १७६० social नेटवर्किंग मुळे ते पण अवघड झाले
परत कोणी साहित्य चोरी केली तर लोक आपापल्या वाल वर त्याच्या नावाने खडे फोडून ठणाणा करतात

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
11 Mar 2025 - 11:20

धनवर्षाव (शतशब्दकथा)

सर्वपित्रीची रात्र

गावकुसाबाहेर तीन पिंपळामधल्या जागेत माझ्या चर्मासनासमोरचं धगधगतं, वखवखलेलं आहुतीकुंड.

शेवटच्या आहुतीच्यावेळी मांत्रिकानं लालभडक पट्टीनं डोळे झाकलेयत माझे.

ही महाआहुती ..कारण ती अर्भकाची.

याचे आई बाप काय करतील बाळ बळी गेल्याचं कळल्यावर?

आता असल्या वांझोट्या विचारांना थारा नाही. अन्यथा गुप्तधनाची संधी कायमची जाईल.

आजी's picture
आजी in जनातलं, मनातलं
10 Mar 2025 - 11:41

माझी मदतनीस..

मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात.

सर्वसाक्षी's picture
सर्वसाक्षी in जनातलं, मनातलं
9 Mar 2025 - 00:28

नववधू प्रिया मी..

साधारण पस्तीस वर्षे झाली असतील या गोष्टीला

विजा लग्न ठरल्याची बातमी घेऊन आला. आमच्या मित्रपरिवारामध्ये सर्वात लहान. गेल्या पाचेक वर्षात एकेक करून जवळपास सगळ्यांची लग्न होऊन गेली होती. नेहमी प्रमाणे सर्वांनी मुलगी कोण कुठली काय करते अशी सरबत्ती केली. वर पार्टीची मागणी होतीच.

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
8 Mar 2025 - 11:25

बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा

बाजाराचा कल : १० मार्चचा आठवडा
====================

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
7 Mar 2025 - 22:28

द स्टोरीटेलर (सिनेमा)

कोणतीही गोष्ट अभ्यास करून नाकारायची किंवा स्वीकारायची असा माझा पिंड आहे.मी बरोबरीनेच उजव्या विचारसरणीचा अभ्यास करताना त्यासंबंधी पोस्ट व्हायच्या.डायटविषयी समजून घेतांना वैज्ञानिक पोस्ट असायच्या.भारतीय तत्वज्ञानचा, पाश्चात्य तत्वज्ञान वगैरे वगैरे त्यावेळी तशा.. गंमत म्हणजे जे काही आकलन‌ ते इथे खरडायची खोड असल्यामुळे ज्या त्या वेळी ते वाचून मी तशीच आहे असा इथे अनेकांचा गैरसमज होतो.

अनन्त्_यात्री's picture
अनन्त्_यात्री in जनातलं, मनातलं
6 Mar 2025 - 13:24

नको रे मना मत्सरू..(शतशब्दकथा)

षड्रिपुंवरच्या माझ्या पाच शतशब्दकथांना मिळून जितके प्रतिसाद नाहीत त्याहीपेक्षा जास्त प्रतिसाद त्या महामायेच्या एकमेव शशकाला? प्रतिभेची पारखच नाही कुण्णाला उरलेली.

काय नाहीये माझ्या पाच शशकांत?

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
6 Mar 2025 - 07:27

शिवसृष्टी पुणे

महाशिवरात्रीच्या दिवशी मुलांना शाळेला सुट्टी असल्यामुळे त्यांना कुठे तरी नेऊन आणावं असा विचार आला. कात्रज रोडला असलेल्या शिवसृष्टीची आठवण झाली आणि तिथे जायचं ठरवलं.

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Mar 2025 - 10:07

राजकुमार, बुटका आणि राक्षस: नवी कहाणी

एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली.

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
1 Mar 2025 - 10:20

इतरांच्या कठीण काळात त्यांची सावली होणारे सोबती

✪ The more you sweat in peace, the less you bleed in war!
✪ शिक्षण ही जशी शिक्षक- विद्यार्थी अशी दुतर्फा प्रक्रिया आहे तशी आरोग्यसुद्धा आहे
✪ अवघड प्रश्नांवर भाष्य करून उत्तरांचा मागोवा घेणारं पुस्तक
✪ गंभीर विषय पण अनौपचारिक, unpredictable शैली व विनोदाचा शिडकावा
✪ स्वत:ला अनेक प्रश्न विचारण्याची गरज
✪ “व्यक्त होण्याचं" आणि संवादाचं महत्त्व- बोलने से सब होगा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
1 Mar 2025 - 09:47

बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

मंडळी,

ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).

भागो's picture
भागो in जनातलं, मनातलं
28 Feb 2025 - 10:59

We Rbots.

जडव्यागळ
असा असा कोणताही शब्द कोशात नाहीये, सर. तुम्हाला जगड्‌व्याळ असे म्हणायचे आहे का?
नाही. पण असाच एक शब्द आहे. त्याचा अर्थ काहीसा असा आहे म्हणजे किचकट, गुंतागुंतीचे, समजण्यास अवघड.
तुम्हाला जडजंबाळ असे म्हणायचे आहे का?
थँक्यू. आवडली का?
काय आवडली का, सर?
कविता रे.
सिंटक्स तपासला सर,बरोबर आहे. मला शब्दांच्या पलीकडले काही समजत नाही.

कर्नलतपस्वी's picture
कर्नलतपस्वी in जनातलं, मनातलं
27 Feb 2025 - 20:11

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य!

vcdatrange's picture
vcdatrange in जनातलं, मनातलं
27 Feb 2025 - 19:05

नांदेड जिल्ह्यातील प्राचीन मंदिरे

गेल्या आठवड्यात धावता नांदेड दौरा होता. अगदी थोडा वेळ काढूनही शहरा नजीकच्या प्राचीन मार्कंडेय शिव व ऋषी मंदिराला भेट दिली. मंदिरापर्यंत पोहोचण्याचा रस्त्याचे अर्धवट काम सुरू असल्याने प्रत्येक ठेचीला सोबतींच्या शिव्या खात गोदावरी किनारच्या या मंदिरात पोहोचलो. परिसर आणि बाह्य भागाचे सुशोभिकरण सुरू असल्याने प्रथमदर्शनी निराश होत मंदिरात प्रवेश केला.

आकाश खोत's picture
आकाश खोत in जनातलं, मनातलं
27 Feb 2025 - 14:14

संकल्प - मराठी भाषा गौरव दिन

साहित्य संमेलनातलं मोदीजींचं आणि संमेलनाध्यक्षांचं भाषण ऐकलं आणि एका माहित असलेल्या गोष्टीची पुन्हा जाणीव झाली.

मराठीला सरकारने अभिजात दर्जा दिल्यामुळे सरकार जे काही उपक्रम सुरु करेल त्याचा आर्थिक लाभ काही मराठी मंडळींना नक्कीच होईल. पण मराठीला लाभ तेव्हाच होईल जेव्हा तुम्ही आम्ही जाणीवपूर्वक मराठीसाठी काही करू.

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
26 Feb 2025 - 22:30

साधो यह तन ठाठ तँबूरे का - कबीर

साधो यह तन ठाठ तँबूरे का

काल एका सांस्कृतिक कार्यक्रमाला जाण्याचा योग आला. तिथे कबीरांची एक अप्रतिम रचना सादर केली गेली - "साधो यह तन ठाठ तँबूरे का" .
ऐकता क्षणी मनाला भावली ही रचना ! ते कोणत्या रागातील सादरीकरण होते मला कळले नाही पण युट्युबवर शोधल्यावर हे एक सादरीकरण निदर्शनास आले जे की अगदी तत्सम आहे -

प्रसाद गोडबोले's picture
प्रसाद गोडबोले in जनातलं, मनातलं
26 Feb 2025 - 01:54

श्री अमृतानुभव अध्याय सातवा - अज्ञान खंडन

१. अमृतानुभव - अध्याय पहिला - शिवशक्तीसमावेशनमन - https://www.misalpav.com/node/44374
२. श्री अमृतानुभव अध्याय दुसरा - श्रीगुरुस्तवन - https://www.misalpav.com/node/44416