✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

य
युयुत्सु यांनी
Sat, 03/01/2025 - 09:47  ·  लेख
लेख
मंडळी, ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की). बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया... पुढे काय? क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे. सोने मात्र अनिश्चित आहे. मागच्या पोस्ट्मध्ये म्हटल्या प्रमाणे नव्या तिमाहीचे आकडे येईपर्यँत अपेक्षांमुळे छोटी रॅली येणे शक्य आहे. मी ज्या तज्ञांना गंभीरपणे घेतो, त्यांच्यामताप्रमाणे परदेशी गुंतवणूकदार परत येण्यासाठी अजून एका तिमाहीची वाट बघावी लागू शकते. आकृती १ - निफ्टीचा ५ दिवस कालचौकटीवरील ऐतिहासिक आलेख (यात आधार पातळी व्यवस्थित कळत आहे).  आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता १००%. मार्केट ने तळ गाठला आहे, असे म्हणायला वाव आहे.आकडे  आकृती ३ - सोने वर/खाली शक्यता ४९.३/५१.७% थोडक्यात अनिश्चित  आकृती ४ - युयुत्सुनेट्चे भाकीत - मार्केट स्थिर होई पर्यंत बारीक डुबकीची शक्यता  टीप- मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
गुंतवणूक
लेखनप्रकार (Writing Type)
विचार

प्रतिक्रिया द्या
5620 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

डोहाळे तर , "२१५०० ते २१२००"

आंद्रे वडापाव
Sat, 03/01/2025 - 11:28 नवीन
डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" चे लागले आहेत हो ! Image removed.
  • Log in or register to post comments

हा हा हा हा हा...

युयुत्सु
Sat, 03/01/2025 - 11:32 नवीन
हा हा हा हा हा...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

;) काय मार्केटला

Bhakti
Sat, 03/01/2025 - 16:02 नवीन
;) काय मार्केटला ट्रम्पतात्यांचा टेरिफ पावला काय!! मार्केट खुपच सॅटीनसारख सुळसुळीत झालंय,,घसरतच चाललंय :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

आमचाही एक अंदाज

प्रसाद गोडबोले
Sat, 03/01/2025 - 12:21 नवीन
आमचाही एक अंदाज सध्या मार्केट २२१२४ वर आहे . ६ मार्च पर्यंत मार्केट २१८०० ते २२४०० ह्या रेंज मध्ये राहील . २१५०० च्या खाली आणी २२५०० च्या वर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे !
  • Log in or register to post comments

काल डाऊजोन्स आणि एसेन्पी

प्रसाद गोडबोले
Wed, 03/05/2025 - 09:01 नवीन
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे - आज २१८०० ला टच करण्याची शक्यता आहे - आता पाहु ! ६ मर्च एक्स्पायरीच्या ओप्शन चेन मध्ये चेंज इन ओपन इन्टरेस्ट पाहिले तर २१५०० आणि २२२०० ही रेंज असेल असे वाटते . बघुया आता
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

काल डाऊजोन्स आणि एसेन्पी

आंद्रे वडापाव
Wed, 03/05/2025 - 09:40 नवीन
काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -
"असा" अंदाज सर्वच जण लावतील , याचा अंदाज ऑपेरेटरला आधिच असेल तर , सगळ्यांचं शॉर्ट सेलिंग स्टॉप लॉस उडवण्यासाठी मार्केट वर नेलं तर ??
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

तसेच काहीसे झालेले दिसत आहे

प्रसाद गोडबोले
Wed, 03/05/2025 - 12:36 नवीन
तसेच काहीसे झालेले दिसत आहे !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

उलट झालंय. भांडवली बाजार

श्रीगुरुजी
Wed, 03/05/2025 - 09:54 नवीन
उलट झालंय. भांडवली बाजार जवळपास ०.७१% ने वाढलाय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

+1.4%

प्रसाद गोडबोले
Wed, 03/05/2025 - 12:40 नवीन
+1.4% Wow. Need to check the FII cash flows.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

स्टॉपलॉस हम शर्मिंदा है, तेरे

अमरेंद्र बाहुबली
Wed, 03/05/2025 - 13:55 नवीन
स्टॉपलॉस हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रसाद गोडबोले

इथे ऑप्शन चेन ऍनालिसिस मधले

युयुत्सु
Sat, 03/01/2025 - 13:12 नवीन
इथे ऑप्शन चेन ऍनालिसिस मधले कोणी दर्दी असतील तर त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल. मला त्यात अजून म्हणावी तितकी गती नाही.
  • Log in or register to post comments

मला पण युयुत्सुनेट एकदा तरी

वामन देशमुख
Sat, 03/01/2025 - 17:40 नवीन
मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).
हे थोडंसं विस्तारित सांगाल का?
  • Log in or register to post comments

कोणतेही संख्या-शास्त्रीय

युयुत्सु
Sat, 03/01/2025 - 19:49 नवीन
कोणतेही संख्या-शास्त्रीय मॉडेल १००% अचूकतेने काम करत नाही. १००% अचूकता आली तर सूर्य पश्चिमेला उगवला हे नक्की समजायचे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

१०० % अचूकता म्हणजे मॉडेल

युयुत्सु
Sun, 03/02/2025 - 07:05 नवीन
१०० % अचूकता म्हणजे मॉडेल मध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, जे कदापि शक्य नसते. मॉडेल म्हणजे प्रतिकृती! ही उपलब्ध माहितीवर तयार केलेली असते. त्यामुळे असे सर्व समावेशक आदर्श मॉडेल तयार करता येणे अशक्य आहे. साहजिक १०० % अचूकता पण अशक्य आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

हं. पटलं.

वामन देशमुख
Sun, 03/02/2025 - 07:45 नवीन
हं. पटलं. हे मॉडेल तयार करताना तुम्ही कोणकोणते घटक विचारात घेतले आहेत?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

कृपया माझी १ली पोस्ट बघावी.

युयुत्सु
Sun, 03/02/2025 - 09:46 नवीन
कृपया माझी १ली पोस्ट बघावी. त्यात कोणती चले (व्हेरीएअबल्स) वापरली आहेत, ते सविस्तर दिले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

बाकी, निफ्टीचे जुलाब काही

वामन देशमुख
Sat, 03/01/2025 - 17:42 नवीन
बाकी, निफ्टीचे जुलाब काही थांबता थांबत नाहीयेत! पोट पूर्ण खपाटीला गेल्यावरच थांबतील बहुतेक.
  • Log in or register to post comments

थोडी आणखी गंमत

युयुत्सु
Sat, 03/01/2025 - 22:22 नवीन
थोडी आणखी गंमत बाजाराची सद्यस्थितीबद्दल पुढे दिलेल्या क्लेमास्पेस डायग्रॅमच्या त्रिमिती आवृत्तीमध्ये चांगली कल्पना येईल. मार्केटची आत्ताची लाल बाणाने दाखवली आहे. जिथे जायचे तो भाग एखाद्या प्रकाशमान शिखराप्रमाणे चमकत आहे :) इतके डाँगर चढून जायचे म्हणजे कष्ट्दायक काम नाही का? त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या कुबड्या हव्याच... Image removed.
  • Log in or register to post comments

बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत

श्रीगुरुजी
Mon, 03/03/2025 - 07:47 नवीन
बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत सुरू राहील.
  • Log in or register to post comments

पुढच्या तिमाहीचे आकडे चांगले

युयुत्सु
Mon, 03/03/2025 - 08:26 नवीन
पुढच्या तिमाहीचे आकडे चांगले येईपर्यंत!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्रीगुरुजी

आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे.

वामन देशमुख
Mon, 03/03/2025 - 09:06 नवीन
काल NIFTY जेवढा पडला तेवढाच USA चा बाजार वर चढला आहे. आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे.
  • Log in or register to post comments

मी निफ्टीची दैनिक भाकीते करू

युयुत्सु
Mon, 03/03/2025 - 10:02 नवीन
मी निफ्टीची दैनिक भाकीते करू शकतो, पण त्यासाठी अनेक कारणांमु़ळे तितकासा राजी नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वामन देशमुख

दैनंदिन नका करू फोरकास्ट ...

आंद्रे वडापाव
Mon, 03/03/2025 - 12:10 नवीन
दैनंदिन नका करू फोरकास्ट ... पण तेव्हडं जरा बॉट्म आला कि सांगा प्लिज..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

नक्की!

युयुत्सु
Mon, 03/03/2025 - 14:39 नवीन
नक्की!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

तेव्हडं जरा बॉट्म आला कि

युयुत्सु
Mon, 03/03/2025 - 14:52 नवीन
तेव्हडं जरा बॉट्म आला कि सांगा प्लिज..
एका दणदणीत मारूबोझू मेणबत्तीची वाट बघा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आंद्रे वडापाव

केवळ अपवाद म्हणून : हे आहे

युयुत्सु
Wed, 03/05/2025 - 11:15 नवीन
केवळ अपवाद म्हणून : हे आहे निफ्टीचे आज सकाळी ७:५० वाजता युयुत्सुनेट ने केलेले भाकीत! सध्या तरी बरं चाललं आहे. Image removed.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा