बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

युयुत्सु's picture
युयुत्सु in जनातलं, मनातलं
1 Mar 2025 - 9:47 am

मंडळी,

ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).

बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया...

पुढे काय?

क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे. सोने मात्र अनिश्चित आहे.
मागच्या पोस्ट्मध्ये म्हटल्या प्रमाणे नव्या तिमाहीचे आकडे येईपर्यँत अपेक्षांमुळे छोटी रॅली येणे शक्य आहे. मी ज्या तज्ञांना गंभीरपणे घेतो, त्यांच्यामताप्रमाणे परदेशी गुंतवणूकदार परत येण्यासाठी अजून एका तिमाहीची वाट बघावी लागू शकते.

आकृती १ - निफ्टीचा ५ दिवस कालचौकटीवरील ऐतिहासिक आलेख (यात आधार पातळी व्यवस्थित कळत आहे).

आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता १००%. मार्केट ने तळ गाठला आहे, असे म्हणायला वाव आहे.आकडे

आकृती ३ - सोने वर/खाली शक्यता ४९.३/५१.७% थोडक्यात अनिश्चित

आकृती ४ - युयुत्सुनेट्चे भाकीत - मार्केट स्थिर होई पर्यंत बारीक डुबकीची शक्यता

टीप- मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

गुंतवणूकविचार

प्रतिक्रिया

आंद्रे वडापाव's picture

1 Mar 2025 - 11:28 am | आंद्रे वडापाव

डोहाळे तर , "२१५०० ते २१२००" चे लागले आहेत हो !

b

युयुत्सु's picture

1 Mar 2025 - 11:32 am | युयुत्सु

हा हा हा हा हा...

Bhakti's picture

1 Mar 2025 - 4:02 pm | Bhakti

;) काय मार्केटला ट्रम्पतात्यांचा टेरिफ पावला काय!!
मार्केट खुपच सॅटीनसारख सुळसुळीत झालंय,,घसरतच चाललंय :(

प्रसाद गोडबोले's picture

1 Mar 2025 - 12:21 pm | प्रसाद गोडबोले

आमचाही एक अंदाज

सध्या मार्केट २२१२४ वर आहे . ६ मार्च पर्यंत मार्केट २१८०० ते २२४०० ह्या रेंज मध्ये राहील .

२१५०० च्या खाली आणी २२५०० च्या वर जाण्याची शक्यता अत्यल्प आहे !

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2025 - 9:01 am | प्रसाद गोडबोले

काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -
आज २१८०० ला टच करण्याची शक्यता आहे - आता पाहु !
६ मर्च एक्स्पायरीच्या ओप्शन चेन मध्ये चेंज इन ओपन इन्टरेस्ट पाहिले तर २१५०० आणि २२२०० ही रेंज असेल असे वाटते .
बघुया आता

आंद्रे वडापाव's picture

5 Mar 2025 - 9:40 am | आंद्रे वडापाव

काल डाऊजोन्स आणि एसेन्पी मध्यील तब्बल सव्वा ते दीड टक्के झालेली घसरण पाहता , ते क्लुज घेऊन आज आपल्याकडे मार्केत १ ते सव्वा टक्के घसरेल असा अंदाज आहे -

"असा" अंदाज सर्वच जण लावतील , याचा अंदाज ऑपेरेटरला आधिच असेल तर , सगळ्यांचं शॉर्ट सेलिंग स्टॉप लॉस उडवण्यासाठी मार्केट वर नेलं तर ??

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2025 - 12:36 pm | प्रसाद गोडबोले

तसेच काहीसे झालेले दिसत आहे !

श्रीगुरुजी's picture

5 Mar 2025 - 9:54 am | श्रीगुरुजी

उलट झालंय. भांडवली बाजार जवळपास ०.७१% ने वाढलाय.

प्रसाद गोडबोले's picture

5 Mar 2025 - 12:40 pm | प्रसाद गोडबोले

+1.4%

Wow.

Need to check the FII cash flows.

अमरेंद्र बाहुबली's picture

5 Mar 2025 - 1:55 pm | अमरेंद्र बाहुबली

स्टॉपलॉस हम शर्मिंदा है, तेरे कातिल जिंदा है!

युयुत्सु's picture

1 Mar 2025 - 1:12 pm | युयुत्सु

इथे ऑप्शन चेन ऍनालिसिस मधले कोणी दर्दी असतील तर त्यांचे मत जाणून घ्यायला आवडेल. मला त्यात अजून म्हणावी तितकी गती नाही.

वामन देशमुख's picture

1 Mar 2025 - 5:40 pm | वामन देशमुख

मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).

हे थोडंसं विस्तारित सांगाल का?

युयुत्सु's picture

1 Mar 2025 - 7:49 pm | युयुत्सु

कोणतेही संख्या-शास्त्रीय मॉडेल १००% अचूकतेने काम करत नाही. १००% अचूकता आली तर सूर्य पश्चिमेला उगवला हे नक्की समजायचे.

युयुत्सु's picture

2 Mar 2025 - 7:05 am | युयुत्सु

१०० % अचूकता म्हणजे मॉडेल मध्ये सर्व घटकांचा विचार केला गेला आहे, जे कदापि शक्य नसते. मॉडेल म्हणजे प्रतिकृती! ही उपलब्ध माहितीवर तयार केलेली असते. त्यामुळे असे सर्व समावेशक आदर्श मॉडेल तयार करता येणे अशक्य आहे. साहजिक १०० % अचूकता पण अशक्य आहे.

वामन देशमुख's picture

2 Mar 2025 - 7:45 am | वामन देशमुख

हं. पटलं.

हे मॉडेल तयार करताना तुम्ही कोणकोणते घटक विचारात घेतले आहेत?

युयुत्सु's picture

2 Mar 2025 - 9:46 am | युयुत्सु

कृपया माझी १ली पोस्ट बघावी. त्यात कोणती चले (व्हेरीएअबल्स) वापरली आहेत, ते सविस्तर दिले आहे.

वामन देशमुख's picture

1 Mar 2025 - 5:42 pm | वामन देशमुख

बाकी, निफ्टीचे जुलाब काही थांबता थांबत नाहीयेत!
पोट पूर्ण खपाटीला गेल्यावरच थांबतील बहुतेक.

युयुत्सु's picture

1 Mar 2025 - 10:22 pm | युयुत्सु

थोडी आणखी गंमत

बाजाराची सद्यस्थितीबद्दल पुढे दिलेल्या क्लेमास्पेस डायग्रॅमच्या त्रिमिती आवृत्तीमध्ये चांगली कल्पना येईल. मार्केटची आत्ताची लाल बाणाने दाखवली आहे. जिथे जायचे तो भाग एखाद्या प्रकाशमान शिखराप्रमाणे चमकत आहे :) इतके डाँगर चढून जायचे म्हणजे कष्ट्दायक काम नाही का? त्यासाठी परदेशी गुंतवणूकदारांच्या कुबड्या हव्याच...

श्रीगुरुजी's picture

3 Mar 2025 - 7:47 am | श्रीगुरुजी

बाजाराचा फ्री फॉल कधीपर्यंत सुरू राहील.

पुढच्या तिमाहीचे आकडे चांगले येईपर्यंत!

काल NIFTY जेवढा पडला तेवढाच USA चा बाजार वर चढला आहे.
आज NIFTY थोडासा वर चढेल असे वाटते आहे.

युयुत्सु's picture

3 Mar 2025 - 10:02 am | युयुत्सु

मी निफ्टीची दैनिक भाकीते करू शकतो, पण त्यासाठी अनेक कारणांमु़ळे तितकासा राजी नाही.

आंद्रे वडापाव's picture

3 Mar 2025 - 12:10 pm | आंद्रे वडापाव

दैनंदिन नका करू फोरकास्ट ...
पण
तेव्हडं जरा बॉट्म आला कि सांगा प्लिज..

युयुत्सु's picture

3 Mar 2025 - 2:39 pm | युयुत्सु

नक्की!

युयुत्सु's picture

3 Mar 2025 - 2:52 pm | युयुत्सु

तेव्हडं जरा बॉट्म आला कि सांगा प्लिज..

एका दणदणीत मारूबोझू मेणबत्तीची वाट बघा

युयुत्सु's picture

5 Mar 2025 - 11:15 am | युयुत्सु

केवळ अपवाद म्हणून : हे आहे निफ्टीचे आज सकाळी ७:५० वाजता युयुत्सुनेट ने केलेले भाकीत! सध्या तरी बरं चाललं आहे.