बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा
लेखनप्रकार
मंडळी,
ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की).
बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया...
पुढे काय?
क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे. सोने मात्र अनिश्चित आहे.
मागच्या पोस्ट्मध्ये म्हटल्या प्रमाणे नव्या तिमाहीचे आकडे येईपर्यँत अपेक्षांमुळे छोटी रॅली येणे शक्य आहे. मी ज्या तज्ञांना गंभीरपणे घेतो, त्यांच्यामताप्रमाणे परदेशी गुंतवणूकदार परत येण्यासाठी अजून एका तिमाहीची वाट बघावी लागू शकते.
आकृती १ - निफ्टीचा ५ दिवस कालचौकटीवरील ऐतिहासिक आलेख (यात आधार पातळी व्यवस्थित कळत आहे).
आकृती २ - निफ्टी वर जायची शक्यता १००%. मार्केट ने तळ गाठला आहे, असे म्हणायला वाव आहे.आकडे
आकृती ३ - सोने वर/खाली शक्यता ४९.३/५१.७% थोडक्यात अनिश्चित
आकृती ४ - युयुत्सुनेट्चे भाकीत - मार्केट स्थिर होई पर्यंत बारीक डुबकीची शक्यता
टीप- मार्केट्मधील व्यवहार स्वत:च्या जबाबदारीवर करावेत. युयुत्सुनेटच्या भाकीतावर डोळे मिटून विश्वास ठेवणे धोक्याचे आहे.

वाचन
5689
प्रतिक्रिया
0