मार्केट १७००० च्यावर

दशानन's picture
दशानन in जनातलं, मनातलं
30 Sep 2009 - 6:38 pm

आज मार्केट १७००० च्यावर गेले....

अनेक ज्योतीषी / चॅनेलवाले बोंबलत होते की मार्केट ह्या महिन्यात नक्की पडणार पण.. असल्या लोकांच्या नाकावर टिच्चुन मार्केट ने भरारी मारली... मज्जा आली !

आता काही प्रश्न !

ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ?

ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?

जरा काही झाले की मार्केट पडणार... तो मंगळ वाकडा झाला.. तो राहु कुठे तरी घुसला तर म्हणे वाट लावणार... तरी मार्केट वर आलेच ना ?

भले आता खाली जाऊ दे.. पण खाली जाणे गरजचे असते कचरा साफ होतो त्याला करेक्शन असे म्हणतात... कारण भक्कम पाया असला की इमारत चांगली उभी राहते छोटी मोठी वादळे मग काही करु शकणार नाहीत वाकडे त्याचे.... पण हे मार्केट पडणार म्हणून बोंबलणारे कुठे गेले आज काल ;)

जरा या ह्या धाग्यात व कुठे चुकला ते सांगा.... ;)

*

सुरवात माझ्यापासून.

माझे ही मत होते की जेव्हा मार्केट १६००० -१६४०० च्या आसपास येऊल तेव्हा एक करेक्शन होईल व मार्केट परत १५०००-१५००० च्या आसपास जाईल पण FII's ने फुल्ल खरेदी केली व त्यामुळे... बाकीच्यांनी पण.. व मार्केटला चांगलाच सपोर्ट दिला त्यात आपले काही चांगले मुद्दे पण होते जसे.. काही कंपण्यांनी चांगला रिझर्ट पण दिला... व सामान्य गुंतवणूकदार मार्केटमध्ये खरेदीवरच जोर देऊन राहिला व त्यामुळे मार्केट वरच राहिले !

माझा अंदाज येथे चुकला मला वाटलं होते की FII's आपली गुंतवणूक १६००० नंतर काढुन घेतील... व नंतर खरेदी करतील पण त्यांनी स्पेशल जबरा खरेदीच केली :(
पण चांगलेच झाले !

अर्थव्यवहारअर्थकारणप्रकटनविचारसद्भावनाप्रतिसाद

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

30 Sep 2009 - 6:59 pm | पर्नल नेने मराठे

नानापण म्हणत होता रे कि मार्केट पडणार अजुन असे.
त्याला चान्ग्लाच जाब विचार ;)

चुचु
(आगलावी)

श्रावण मोडक's picture

30 Sep 2009 - 7:05 pm | श्रावण मोडक

हाहाहाहाहा... ओव्हर टू राजे!!!

दशानन's picture

30 Sep 2009 - 7:08 pm | दशानन

ते नाना तोंड लपवून पळालं आहे... आपली नाडी शोधायला...

पण खरोखर नाना पण म्हणत होता... व सर्वात महत्वाचे म्हणजे ग्लोबल मार्केटचा जास्त इफेक्ट आपल्या मार्केटवर पडला नाही ही सर्वात मोठी गोष्ट !

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

बिपिन कार्यकर्ते's picture

30 Sep 2009 - 7:23 pm | बिपिन कार्यकर्ते

ते नाना कायप्पण बोलतं रे... फार मनावर नको घेऊस.

बिपिन कार्यकर्ते

पाषाणभेद's picture

30 Sep 2009 - 7:00 pm | पाषाणभेद

लेखाच्या नावावरूनच वाटले की राजेने लिहीलेले आहे.
-----------------------------------
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या

सूहास's picture

30 Sep 2009 - 7:20 pm | सूहास (not verified)

=)) =)) =))
मार्केट १७००० च्यावर

राजे मार्केटच्या वर...

सू हा स...

दशानन's picture

30 Sep 2009 - 7:23 pm | दशानन

हॅ हॅ हॅ

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

टारझन's picture

30 Sep 2009 - 10:54 pm | टारझन

राजे मार्केटच्या वर ..

=)) =)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =)) =))
=)) =)) =)) =))
=)) =)) =))
=)) =))
=))
=))
=))
=))
=))
=))
=))

छोटा डॉन's picture

30 Sep 2009 - 7:27 pm | छोटा डॉन

१७००० च्या वर ?
बाब्बौ !!!

दिल्लीतल्या ४ कोंबड्या, २ सिग्नेचरच्या बाटल्या, २ बियर आणि १ पाकिट शिग्रेट ह्यांच्या आत्म्याला देव शांती देवो !!!!
हरि ओम !!!
------
छोटा डॉन
... करू नका एवढ्यात चर्चा पराभवाची, रणात आहेत झुंजणारे अजून काही !

दशानन's picture

30 Sep 2009 - 7:44 pm | दशानन

=))
=))
=))

***
"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,
बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले । "

राज दरबार.....

अवलिया's picture

30 Sep 2009 - 11:05 pm | अवलिया

वैचारिक लेख, संयमित प्रतिसाद.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

पिवळा डांबिस's picture

1 Oct 2009 - 12:07 am | पिवळा डांबिस

राजे, अभिनंदन!!!
आणि खूप शुभेच्छा!!!

हरकाम्या's picture

1 Oct 2009 - 1:35 am | हरकाम्या

नानाचा अंदाज बरोबर वाटतो, कारण शेअरबाजार हे असे प्रकरण आहे की त्याचा कधीच भरोसा देता येत नाही. कधी लोकांच्या खिशाला कात्री
लावेल याचे काही सांगता येत नाही.

युयुत्सु's picture

1 Oct 2009 - 8:37 am | युयुत्सु

ह्या ज्योतिष्यांचे काय करावे ?

ह्या टिव्ही वाल्यांचे काय करावे ?

या technical analysts चे जे काय करायचे तेच त्यांचे पण करायचे...

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

राधा१'s picture

1 Oct 2009 - 11:20 am | राधा१

ऑक्टो. मिड-एण्ड पर्यन्त वाट बघा...

अवलिया's picture

1 Oct 2009 - 11:22 am | अवलिया

कोणत्या सालचा ???
०९ असेल तर अंशतः सहमत.

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.